चालू घडामोडी : १५ नोव्हेंबर

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड

  • ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • सावरकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केल्या आहेत.
  • रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलन अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
  • ‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा, ‘तुझ आहे तुझपाशी’मधील शाम, ‘सौजन्याची ऐशीतैशी’मधील मंडलेकर, ‘सम्राट सिंह’ मधील विदूषक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.
  • इना मिना डिका, कुरुक्षेत्र, जावई माझा भला, गुलाम ए मुस्तफा अशा १००हून अधिक चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. मा.गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
  • ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे.

पुढील अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता

  • ८२ वर्षानंतर प्रथमच रेल्वे आणि अर्थसंकल्प असे सर्वसमावेशक बजेट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर होणार आहे.
  • नव्या वेळापत्रकानुसार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
  • रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
 नियोजित बदल आणि त्याचे रेल्वेला फायदे 
  • स्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला तरी सरकारची व्यापारी आस्थापना म्हणून रेल्वेचे अस्तित्व कायम.
  • रेल्वेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित व वित्तीय अधिकारही सध्याप्रमाणेच. 
  • सध्याची वित्तीय व्यवस्था कायम. सर्वसाधारण कामकाज खर्चासह सर्व महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन हे रेल्वेच्या उत्पन्नातूनच.
  • रेल्वेच्या खातेपुस्तकांत केंद्र सरकारचे सुमारे २.२७ लाख कोटी रुपयांचे भांडवल तसेच राहील. मात्र त्यावर यापुढे रेल्वेकडून केंद्राला लाभांश नाही.
  • लाभांशापोटी दरवर्षी द्यावी लागणारी सुमारे ९,७०० कोटी रुपयांची रक्कम रेल्वेकडेच राहील.
  • इतर खात्यांप्रमाणे रेल्वेलाही केंद्रीय अर्थसंकल्पातून पैसे मिळतील. रेल्वेच्या खर्चाचे विनियोजनही मुख्य विनियोजन विधेयकातच.
  • एकत्रित अर्थसंकल्प मांडल्याने रेल्वेला कारभारावर लक्ष केंद्रित करता येईल व सरकारच्या वित्तीय स्थितीचे सर्वंकष चित्र स्पष्ट होईल.
  • प्रक्रियात्मक मंजुरीची गरज न राहिल्याने निर्णय झटपट होतील व सुशासनाच्या मोजपट्टीत रेल्वेही येईल.

अजय राजाध्यक्ष अमेरिकेच्या राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य

  • अजय राजाध्यक्ष यांची अलीकडेच अमेरिकेच्या कोषागार विभागाने राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
  • जागतिक बृहत-संशोधन व सल्ला क्षेत्रातील संस्था बार्कलेज कॅपिटलचे राजाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहेत. 
  • अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या सल्लामसलतीच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
  • त्यांनी मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण आणि आयआयएम कोलकातामधून एमबीए पूर्ण केले आहे.
  • आयआयएम कोलकातानंतर त्यांनी अ‍ॅरिझोना येथील अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर पदवी मिळविली.
  • वयाच्या ३१व्या वर्षी बार्कलेजमध्ये त्यांच्या एमबीएस फ्रँचाइजी व्यवसायाच्या ते व्यवस्थापकीय संचालक या पदावर पोहोचले.

लुईस हॅमिल्टनला ब्राझिलीयन ग्रां. प्री. स्पर्धेचे  विजेतेपद

  • मर्सिडीजचा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने ब्राझिलीयन ग्रां. प्री. स्पर्धेचे  विजेतेपद मिळविले.
  • एफ वन रेसमधील एकमेव भारतीय संघ असलेल्या ‘फोर्स वन’च्या रेसर सर्जियो परेरा (मॅक्सिको) आणि निको हल्केनबर्ग (जर्मनी) यांनी अनुक्रमे चौथे व सातवे स्थान मिळविले.
  • सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आपला संघसहकारी निको रोसबर्गला या शर्यतीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
  • यंदाच्या वर्षातील हॅमिल्टनने नववे जेतेपद पटकावले आहे. यासह त्याने रोसबर्गच्या ९ विजेतेपदांची बरोबरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा