चालू घडामोडी : ११ डिसेंबर

पृथ्वीप्रदक्षिणा मारणारे अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे निधन

  • पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे ९५व्या वर्षी निधन झाले.
  • अंतराळवीर होण्याआधी ते फायटर पायलट होते, त्यांनी दोन युद्धामध्ये आपली सेवा प्रदान केली होती. त्यांच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम आहेत.
  • त्यानंतर ते यशस्वी अंतराळवीर झाले आणि तेथून निवृत्त झाल्यावर ओहियोचे प्रतिनिधी म्हणून ते २४ वर्षे सिनेटमध्ये होते.
  • एक योद्धा, अंतराळवीर आणि राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मर्क्युरी ७ या अवकाश यानातून प्रवास केलेले ते शेवटचे अंतराळवीर होते.
  • वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी डिस्कवरी यानातून अंतराळ प्रवास केला आणि ते अमेरिकेतील सर्वात वृद्ध अंतराळवीर देखील ठरले.
  • १९६१साली युरी गागरीन पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारा जगातील पहिला अंतराळवीर ठरला.
  • त्यानंतर १९६२मध्ये फ्रेंडशिप ७ यानांतून पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारे ते पहिले अमेरिकी अवकाशवीर ठरले.
  • त्यांनी एकूण तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी त्यांना नासाचे विशिष्ट सेवा पदक दिले.
  • अमेरिकेच्या जडण-घडणीमध्ये मोठा वाटा असलेल्या लोकांपैकी ते एक आहेत. ते सर्वार्थाने अमेरिकन लोकांचे हिरो होते. 

पंडित रविशंकर यांचा स्मृतीदिन

  • पंडित रविशंकर यांचा ११ डिसेंबर रोजी स्मृतीदिन आहे. रविशंकर हे सतार वादनातील सर्वोत्तम वादकांपैकी एक मानले जातात.
  • अभिजात भारतीय संगीतातील माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते.
  • ७ एप्रिल १९२० साली जन्मलेल्या पं. रविशंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले होते.
  • त्यांना प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कारासह भारत सरकारच्या पद्मभूषण आणि भारतरत्न या सन्मानांनी गौरविण्यात आले होते.

कॅशलेस पेमेंटबाबत मदतीसाठी हेल्प लाइन

  • कॅशलेस पेमेंट करताना जर काही अडचण येत असतील तर त्यासाठी सरकारने कॅशलेस टोल फ्री हेल्प लाइन नंबर सुरू केला आहे.
  • जर कॅशलेस पेमेंट करण्यात काही अडचण असल्यास १४४४४ या नंबरवर फोन केल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. पुढील आठवड्यामध्ये ही सेवा सुरू होणार आहे.
  • यासाठी सरकारने नासकॉमची मदत घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी जरी या सेवेचा लाभ घेतला तरी फोन करण्यास अडचण होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे.
  • संपूर्ण देशासाठी एकच हेल्प लाइन वापरली जाणार आहे. त्यामुळेच या सेवेचा क्रमांक हा पूर्ण देशासाठी एकच असणार आहे. देशात यासाठी कॉल सेंटर्सची स्थापना केली जाईल.
  • ही हेल्पलाइन लोकांना वेगवेगळ्या स्तरावर मदत करणार आहे. ग्राहकांकडून माहिती घेऊन त्यांच्या समस्येचे समाधान केले जाईल.
  • एकदा का डिजीटल पेमेंटचे मार्ग लोकांनी स्वीकारायला सुरुवात केली की त्यानंतर हेल्पलाइनचाही उपयोग लोकांना होईल.
  • लोकांच्या समस्यांचे समाधान व्हावे याकरिता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘डीजीशाला’ हे चॅनेल सुरू केले आहे.
  • तसेच कॅशलेस इंडिया ही वेबसाइट देखील सरकारने सुरू केली आहे. त्या वेबसाइटद्वारे देखील कॅशलेस पेमेंटबद्दल ज्ञान दिले जाते.
  • नासकॉमचे अध्यक्ष: आर. चंद्रशेखर

कवी प्रदीप यांचा स्मृतिदिन

  • 'ए मेरे वतनके लोगो' हे अजरामर गीत रचणारे कवी प्रदीप यांचा ११ डिसेंबर रोजी स्मृतिदिन आहे.
  • ६ फेब्रुवारी १९१५ रोजी मध्य प्रदेशातील बडनगर येथे जन्मलेल्या प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदी होते. मात्र ते कवी प्रदीप म्हणूनच प्रसिद्धीस आले.
  • हिंदी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी अनेक उत्तमोत्तम गीतांची रचना केली. पैकी देशभक्तीने प्रेरित असलेली त्यांची गीते विशेष गाजली.
  • १९६२साली झालेल्या चीन युद्धानंतर भारताच्या जवानांना समर्पित केलेले त्याचे ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐतिहासिक ठरले.
  • ११ डिसेंबर १९९८ रोजी प्रदीप यांचे मुंबईत निधन झाले. तत्पूर्वी १९९७साली त्यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा