चालू घडामोडी : १३ डिसेंबर

ख्रिस्तियानो रोनाल्डोला चौथ्यांदा बॅलॉन डी ओर पुरस्कार

 • पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीला मागे टाकत बॅलॉन डी ओर पुरस्कार चौथ्यांदा पटकावला आहे.
 • रिअल माद्रिद क्लबचा आधारस्तंभ असलेल्या रोनाल्डोने यंदा संघाला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
 • प्रतिष्ठेच्या युरो चषक स्पर्धेत पोर्तुगालने जेतेपदावर नाव कोरले. या वाटचालीतही रोनाल्डोची भूमिका महत्त्वाची होती.
 • २०१६मध्ये ख्रिस्तियाने रोनाल्डो यांने केलेल्या कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने २०१६मध्ये पोर्तुगाल आणि क्लबसाठी ५२ फुटबॉल सामन्यात ४८ गोल केले आहेत.   
 • रोनाल्डोने २००८मध्ये पहिल्यांदा या पुरस्कावर नाव कोरले होते. त्यानंतर २०१३ आणि २०१४मध्ये पुन्हा रोनाल्डोने हा पुरस्कार मिळविला होता.
 • या स्पर्धेत मेस्सीने द्वितीय तर यंदाच्या वर्षांत फॉर्ममध्ये असणाऱ्या अँटोइन ग्राइझमनने तृतीय स्थान मिळवले. लियोनेल मेस्सीने यापूर्वी पाच वेळा हा पुरस्कार मिळविला आहे.
 बॅलॉन डी ओर पुरस्कार 
 • १९५६पासून फ्रान्स फुटबॉल संघटनेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. मात्र गेली सहा वर्षे हा पुरस्कार फिफातर्फे देण्यात येत होता.
 • विविध देशांतील फुटबॉल वार्ताकन करणारे १७३ पत्रकार या पुरस्कारार्थीची निवड करतात.
 • सप्टेंबर २०१६मध्ये फिफाने या पुरस्काराशी संलग्नत्व रद्द केले. वर्षांतील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला फुटबॉलपटूसाठी फिफा स्वतंत्र पुरस्कार देणार आहे. ९ जानेवारीला झुरिच येथे हे पुरस्कार जाहीर होतील.

पंकज अडवाणीचे १६वे जगज्जेतेपद

 • पंकज अडवाणीने ११व्या जागतिक बिलियर्डस स्पर्धेत जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याचबरोबर त्याने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याचा पराक्रमही केला.
 • कारकिर्दीतील १६वे विश्वविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टला ६-३ असे नमवले.
 • त्याने वेळेच्या प्रकारातील बिलियर्डस विजेतेपद सात वेळा, जागतिक स्नूकर विजेतेपद दोनदा, जागतिक सिक्स रेड स्नूकर विजेतेपद दोनदा, तसेच जागतिक सांघिक बिलियर्डस एकदा जिंकले आहे.

सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जपून ठेवण्याचा आरबीआयचा आदेश

 • नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यापासून म्हणजेच ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यतचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जपून ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिला आहे.
 • देशभरात आयकर आणि सक्तवसुली संचलनालयाकडून करण्यात येत कारवाईच्या पार्श्वभुमीवर हा आदेश देण्यात आला आहे.
 • देशभरात धडक कारवाई सुरु असून अनेक ठिकाणी नव्या, जुन्या आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 
 रिझर्व्ह बँकेचे दिशानिर्देश 
 • बँकेच्या तिजोरीतून वितरीत होणाऱ्या प्रत्येक नोटेचा तपशील ठेवावा. त्यासाठी रिपोर्टिंग सिस्टिम बनवावी.
 • नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ट्रॅप करता यावे यासाठी सर्व व्यवहार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतील याची दक्षता घ्यावी.
 • ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान बँकेच्या शाखांमधील व्यवहार तसेच तिजोरीतून झालेल्या नोटांच्या वितरणाचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा