चालू घडामोडी : १९ डिसेंबर

जुन्या नोटा जमा करण्यावर निर्बंध

  • देशातील काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का देत आता केंद्र सरकारने जुन्या नोटा जमा करण्यावर निर्बंध घातले आहेत.
  • आता नागरिकांना ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरुपात केवळ एकदाच ५००० रुपयांची रक्कम बँकेत जमा करता येणार आहे. नव्या नोटांसाठी मात्र हा नियम लागू असणार नाही.
  • परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणाऱ्या ठेवींवर कोणतेही निर्बंध नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
  • नोटा जमा करण्याची मुदत संपण्यापूर्वी नागरिकांना एका खात्यावर केवळ ५००० रुपयांची रक्कम जमा करता येणार आहे.
  • एखादी व्यक्ती दोनवेळा एकाच खात्यात पाच हजारांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असल्यास त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येईल.
  • याआधी जुन्या नोटा बँकेत का जमा केल्या नाहीत, याबद्दलची विचारणा या व्यक्तीकडे करण्यात येईल.

सुरक्षा दलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध

  • संरक्षण क्षेत्रासंबंधीची माहितीची गुप्तता कायम राखण्यासाठी सोशल मीडियाबाबत गृह मंत्रालयाकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. 
  • सुरक्षा दलांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्टमधून संवेदनशील गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
  • या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिकारी आणि जवानांना समाज माध्यमांवर माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
  • जवानांनी ऑपरेशन दरम्यान काढलेले फोटो अनेकदा फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांवर पोहोचल्याचा उल्लेख या सूचनेत करण्यात आला आहे.
  • याप्रकारचे फोटो आणि व्हिडीओ फक्त अधिकृत वापरासाठी आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणे या नियमाचे उल्लंघन आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात करुण नायरचे त्रिशतक

  • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली.
  • कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत. 
  • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस भारतीय विक्रमांचा ठरला.
  • नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर ७ बाद ७५९ धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
  • कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची ९ बाद ७२६ ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध २००९मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती.
  • नायरने भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर (वय २५ वर्षे १३ दिवस) होण्याचा मानदेखील मिळविला. सेहवागने (वय २५ वर्षे १६० दिवस) २००४मध्ये पहिले त्रिशतक केले होते. 
 करुण नायरचे विक्रम 
  • करुण नायरचे (नाबाद ३०३) त्रिशतक. भारताकडून कसोटी क्रिकेटमधील तिसरे त्रिशतक. 
  • कसोटीत त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय.
  • पहिल्या शतकी खेळीचे त्रिशतकात रुपांतर करणारा पहिला भारतीय.
  • त्रिशतक झळकावणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज. 
  • पहिल्याच शतकी खेळीत सर्वोच्च खेळी करणारा नायर पहिला आशियाई खेळाडू.
  • पाचव्या क्रमांकावर येऊन त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय.

जेष्ठ अर्थतज्ज्ञ सौमित्र चौधरी यांचे निधन

  • देशाची अर्थव्यवस्था अडचणीतून जात असताना मदत करणारे अर्थतज्ज्ञ व नियोजन आयोगाचे माजी सदस्य सौमित्र चौधरी यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाले
  • त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीत युरो निकषांचा आग्रह धरून पर्यावरणाबाबतची संवेदनशीलता जागी ठेवली.
  • रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी २०१३मध्ये त्यांचे नाव चर्चेत होते. त्या वेळी रघुराम राजन यांनी नियुक्ती झाली होती.
  • सौमित्र चौधरी यांच्या समितीने २०२५पर्यंत सर्व तेलशुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यांना युरो-५ निकष लागू करण्याची शिफारस केली होती.
  • २०१७ पर्यंत युरो-४ व २०२० पर्यंत युरो-५ मानके पाळली गेली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.
  • भारत-६ निकष एप्रिल २०२४पासून अमलात येतील. त्यात त्यांच्या शिफारशींचा मोठा वाटा असणार आहे. इंधनातून प्रदूषण होऊ नये म्हणून हे निकष लावले जात असतात.
  • चौधरी हे जानेवारी २००५मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य बनले. नंतर २००९ ध्ये नियोजन आयोगाचे सदस्य झाले.
  • आयसीआरए या संस्थेवर त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून काम केले. मनी अ‍ॅण्ड फायनान्स या संशोधन नियतकालिकाचे ते संपादक होते.
  • ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल कॉस्टस अ‍ॅण्ड प्रायसेस, उद्योग मंत्रालय, स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अनेक संस्थांत त्यांनी काम केले. जागतिक बँकेतही त्यांनी अल्पकाळ काम केले.
  • त्यांची मूळ पदवी विज्ञानातील होती व नंतर त्यांनी दिल्लीतील स्कूल ऑफ सोशल सायन्सेस व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.
  • त्यांचे आर्थिक धोरण, प्रादेशिक विकास व उद्योगातील समस्या यावर एकूण २५ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.
  • पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या अर्थतज्ज्ञांमध्ये सौमित्र चौधरी यांचाही समावेश होता.

ज्युनिअर भारत संघ हॉकी विश्वविजेता

  • भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २–१ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
  • १५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. 
  • ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा हा अंतिम सामना लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारत आणि बेल्जियम या संघांमध्ये झाला.
  • ८व्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि २२व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले.
 थोडक्यात स्पर्धा 
  • भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही.
  • ही स्पर्धा एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारा भारत हा दुसरा संघ (जर्मनी सहा वेळा).
  • ही स्पर्धा जिंकणारा भारत पहिला यजमान देश.
  • स्पेनचा एनरिक कॅसेयॉन गोन्झालेझ स्पर्धेचा मानकरी.
  • इंग्लंडच्या एडवर्ड होर्लरचे सर्वाधिक ८ गोल.
  • बेल्जियमचा लोईक व्हॅन डोरेन सर्वोत्कृष्ट गोलरक्षक.
  • गुरजंत सिंग अंतिम सामन्याचा मानकरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा