चालू घडामोडी : १ जानेवारी

मोदींकडून अनेक नव्या योजनांची घोषणा

 • निश्चलनीकरण आणि वारंवार निर्णयबदलामुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला अनेक नव्या योजनांची घोषणा केली.
 • ‘सबका साथ़, सबका विकास’ हे प्रचारवाक्य उधृत करत मोदी यांनी वंचित, गरीब, शोषित, महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.
 मोदींनी घोषणा केलेल्या योजना 
घरबांधणी
 • प्रधानमंत्री आवास योजनेंगर्तत २०१७मध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी शहरात घरासाठी ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजदारात ४ टक्के तर १२ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरात ३ टक्के सूट देण्यात येईल.
 • गावांमध्ये ३३ टक्के जादा घरे बांधण्यात येतील. गावातील घरबांधणी किंवा राहत्या घराचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी २ लाखांच्या कर्जावरील व्याजदारात ३ टक्क्यांची सूट देण्यात येईल.
कृषीकर्ज
 • सहकारी बॅंकांकडून ज्या शेतकऱ्यांनी कृषीकर्ज घेतले आहे, त्यावरील ६० दिवसांचे व्याज सरकार फेडणार आहे.
 • तीन कोटी किसान क्रेडिट कार्ड ही रूपे क्रेडिट कार्डमध्ये रुपांतरित केली जातील.
लघु व मध्यम उद्योग
 • लघुउद्योगांसाठी कॅश क्रेडिट मर्यादा २० टक्क्यांवरुन २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना १ कोटींऐवजी २ कोटींपर्यंत कर्ज देण्यात येईल.
गर्भवती महिला
 • माता मृत्यूदर कमी करण्यासाठी  सरकार गर्भवती महिलांसाठीही देशव्यापी योजनेची सुरुवात करणार आहे.
 • सरकार गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूती, पौष्टीक आहारासाठी ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. 
ज्येष्ठ नागरिक
 • ज्येष्ठ नागरिकांच्या साडेसात लाखांच्या दहा वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर आठ टक्के व्याजदर देणार. ही मिळणारी रक्कम प्रत्येक महिन्याला त्यांना मिळू शकते.

अनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ

 • ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांना नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.
 • ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान परदेशात असणारे अनिवासी भारतीय ३० जून २०१७पर्यंत त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात.
 • मात्र ही मुदतवाढ नेपाळ, भूटान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू असणार नाही.
 • सध्याच्या नियमानुसार अनिवासी भारतीयांना त्यांच्यासोबत २५ हजार रुपये नेण्याची मुभा आहे.
 • रिझर्व्ह बँकेच्या नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि नागपूरमधील कार्यालयांमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर अॅड. रोहित देव

 • अॅड. श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • शिवसेना-भाजप युतीच्या काळातील देव हे तिसरे महाअधिवक्ता आहेत. याआधी सुनील मनोहर व श्रीहरी अणे यांनी या पदाचा काही महिन्यातच राजीनामा दिला.
 • श्रीहरी अणे यांनी पदावर असताना स्वतंत्र विदर्भ राज्याची उघडपणे मागणी करून राजकीय वर्तुळात वाद निर्माण केला होता.
 • श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाचा प्रभार सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
 • माजी महाधिवक्ता सुनील मनोहर यांच्याकडे यापूर्वी सहयोगी महाधिवक्ता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
 • मात्र, मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर जून २०१५मध्ये रिक्त झालेल्या सहयोगी महाअधिवक्ता या पदावर देव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 रोहित देव यांच्याबद्दल 
 • ५१ वर्षांचे देव हे मूळचे नागपूरचे आहेत. नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली.
 • अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ सहायक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.
 • विद्यार्थिदशेत काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले. आता बंद पडलेल्या ‘नागपूर टाइम्स’मध्ये त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली.
 • देव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या निकटच्या वर्तुळातील म्हणून ओळखले जातात.
 • राज्याच्या विक्रीकर खात्याचे तसेच नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणूनही देव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे.
 • देव गेल्या दोन वर्षांपासून नागपूर येथील खंडपीठात केंद्राचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून काम बघत होते.

भारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर

 • भारतीय कालगणनेत १ जानेवारी २०१७ रोजी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली.
 • जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते.
 • पृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले.
 • यानंतर १ जानेवारी रोजी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.
 • पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो.
 • उपग्रहांचे कार्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही फार महत्त्वाचे असतो. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.
 • भारतात आतापर्यंत ३६वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.

अखिलेश यादव सपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

 • समाजवादी पक्षाच्या १ जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
 • मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. 
 • अखिलेश यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर या बैठकीत अखिलेश यांची बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 • शिवपाल यादव यांना समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर, मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले आहे.
 • समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 
 • पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय संमेलन बोलावण्यासाठी ४० टक्के सदस्यांची मंजुरी लागते. अखिलेश यांच्याकडे सध्या ४० टक्क्यांहून अधिक सदस्यांचे समर्थन आहे.
 • लखनौ येथील जनेश्वर मिश्र पार्क येथे अखिलेश यादव समर्थकांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन केले होते. 
 • रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहू नये असे आवाहन मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना केले होते.
 • मात्र मुलायम यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि नेत्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा