चालू घडामोडी : ५ मार्च

बेनामी व्यवहार करणाऱ्यांना सात वर्षाची शिक्षा

  • वारंवार प्रतिबंध घालूनही बेनामी व्यवहार करणाऱ्यांना यापुढे सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
  • त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला प्राप्तिकराच्या कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे, अशी घोषणा सरकारने केली.
  • बेनामी व्यवहारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर विभागाने १९८८चा बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा आता नव्या रूपात १ नोव्हेंबर २०१६पासून लागू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
  • बेनामी मालमत्ता कायदा लागू झाल्यापासून फेब्रुवारीअखेर २३५ प्रकरणांची नोंद झाली आहे व ५५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर देशभरात टाच आणली गेली आहे.
  • याशिवाय १४० प्रकरणांत कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये २०० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे.
  • टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये बँक खाती, कृषी व अन्य जमीन तसेच सदनिका आणि दागिने यांचा समावेश आहे.
 बेनामीदारांच्या शिक्षा 
  • बेनामीदार, लाभार्थी व अशा कृत्याला प्रोत्साहन देणारे यांना सात वर्षांपर्यंत सश्रम कारावास होणार.
  • बेनामी मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार.
  • चुकीची माहिती देणाऱ्यांवर खटला भरण्यात येऊन त्यांना ५ वर्षे कैद व बेनामी मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार.

प्रीमियम एच१बी व्हिसा सुविधा बंद

  • उच्च कौशल्य असलेल्या व्यक्तींना अमेरिकेतील कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जाणारा अमेरिकेचा एच१बी व्हिसा जलदगत्या देण्याची ‘प्रीमियम प्रोसेसिंग’ सुविधा ३ एप्रिलपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहे.
  • त्यामुळे एच१बी व्हिसाच्या मंजुरीसाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. भारतीय आयटी व्यावसायिकांना अमेरिकेत प्रवेशासाठी हा व्हिसा प्रामुख्याने वापरला जातो.
  • यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सिस्टिमनुसार (यूसिस), प्रीमियम सेवा ३ एप्रिलपासून रद्द करण्यात आली असून सहा महिन्यांपर्यंत तिची अमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
  • सध्याच्या पद्धतीनुसार, एच१बी व्हिसा मिळण्यासाठी साधारण तीन ते सहा महिने लागतात.
  • आपल्या कर्मचाऱ्याला जलदगत्या एच१बी व्हिसा मिळवून देण्यासाठी कंपन्या अतिरिक्त शुल्क भरतात, त्याला ‘प्रीमियम प्रोसेसिंग’ असे म्हटले जाते.
  • सध्या प्रीमियम प्रोसेसिंगसाठी १,२२५ डॉलर्स अतिरिक्त मोजावे लागतात. याअंतर्गत पंधरा दिवसांत व्हिसा मिळतो, अन्यथा हे शुल्क परत केले जाते.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वादग्रस्त प्रवेशबंदी निर्णय तेथील न्यायालयाने रद्द केल्यानंतर, आदेशाचा नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा