चालू घडामोडी : १३ मे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जगन्नाथ वाणी यांचे निधन

  • विविध सामाजिक उपक्रमांतून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कॅनडास्थित डॉ. जगन्नाथ वाणी यांचे ५ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • डॉ. वाणी यांचा जन्म ११ सप्टेंबर १९३४ रोजी धुळ्यात झाला. त्यांनी धुळ्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर उच्चशिक्षण पुण्यात, तर विद्या वाचस्पती पदवी कॅनडात मिळवली.
  • पुणेस्थित गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधक साहाय्यक पदावर काम केल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठ, मेरीज विद्यापीठ, कॅलगिरी विद्यापीठात अध्यापन केले.
  • कॅलगिरी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद सांभाळताना विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती केली.
  • मराठी भाषा संशोधन व विकासासाठी डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था स्थापन करून या क्षेत्रात भरीव योगदान दिले.
  • मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी त्यांनी स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
  • कॅनडात त्यांनी वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी आणि महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. डॉ. वाणी हे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक होते.
  • कॅनडामध्ये भारतीय संगीताचा प्रसार करण्यासाठी ‘रागमाला म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगिरी’ची स्थापना केली.
  • मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा, गरीब विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी, गरजू रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया अशा विविध कार्यात डॉ. वाणी यांचा अखेपर्यंत मोलाचा सहभाग राहिला.
  • २०१२मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच भारतात राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला होता. 
  • वाणी यांच्या कार्याचा गौरव अल्बर्ट कल्चर, इंडिया-कॅनडा असोसिएशन ऑफ गॅलरी जीवन गौरव आदी पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात आला.
  • डॉ. वाणी यांनी जनजागृतीसाठी निर्माण केलेले चित्रपट:-
    • एक कप चा (माहिती अधिकाराच्या प्रचारासाठी)
    • डॉक्टर, बाळ बोलत नाही (जन्मतःच मूक-बधिर असलेल्या मुलांवर)
    • देवराई (स्किझोफ्रेनिया-मनोविदलतेच्या आजारावरील)
  • डॉ. वाणी यांनी लिहिलेली पुस्तके:-
    • अंधारातील प्रकाशवाटा
    • Probability and Statistical Inference
    • Triumphs and Tragedies

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

  • नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवले.
  • पुनियाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या ली सीयुंग च्युलवर विजय मिळवला. या कुस्ती स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
  • याआधी महिला गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि दिव्या काकरन यांनी रौप्यपदक मिळविले होते.
  • पहिल्यांदाच ६० किलो वजनी गटातून खेळणाऱ्या साक्षी मलिकला अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

अमिताभ बच्चन ‘डब्लूएचओ’चे हेपेटायटिस सदिच्छा दूत

  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) हेपेटायटिसबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
  • हेपेटायटिसचे या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील.
  • विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह आग्नेय आशियात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. भारतात पंजाबमध्ये हेपेटायटिसचे सर्वाधिक रुग्ण आढळतात.
  • बाळ जन्मल्यानंतर २४ तासांत एक आणि त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत लसीचे तीन डोस दिल्यास आईपासून बाळाला होणाऱ्या हेपटायटिसच्या संसर्गास पायबंद बसतो.
  • हिपेटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. तो कमी करण्यासाठी आणि औषधे सर्वत्र उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

९०हून अधिक देशांमध्ये एकाचवेळी सायबर हल्ले

  • जगभरातील ९०हून अधिक देशांमधील हॉस्पिटल्स, दूरसंचार कंपन्या आणि इतर अनेक कंपन्यांच्या वेबसाइट हॅकर्सनी १२ मे रोजी हॅक केल्या.
  • अमेरिकेच्या गुप्तचर संस्था ज्या तंत्राचा वापर करतात त्याच तंत्राचा उपयोग या सायबर हल्ल्यात करण्यात आला आहे.
  • अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या वेबसाइट हॅक करण्याच्या तंत्राचा वापर करून खंडणीच्या हेतूने हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात हे सायबर हल्ले केले.
  • या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका ब्रिटनमधील आरोग्य सेवांना बसला. हल्ल्यांमध्ये हॉस्पिटल्समधील वॉर्ड आणि आपत्कालीन विभाग बंद करण्यात आले होते.
  • ब्रिटन प्रमाणेच स्पेन, पोर्तुगाल आणि रशियातही सायबर हल्ले झाले. ९० हून अधिक देशांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला.
  • सायबर हल्लेखोरांनी मालवेअरद्वारे हॉस्पिटलच्या कम्प्युटर्स लॉक केले. आणि ३०० ते ६०० अमेरिकन डॉलर्स खंडणीची मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा