चालू घडामोडी : ४ सप्टेंबर

उ. कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी

  • अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाकडून ३ सप्टेंबर रोजी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. हि उत्तर कोरियाची सहावी अणुचाचणी आहे.
  • या चाचणीच्या काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची हायड्रोजन बॉम्बसोबतचे छायाचित्र शेअर केले होते.
  • उत्तर कोरियाने चाचणी केलेला हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुबॉम्बपेक्षा शंभर पट संहारक क्षमता आहे. हा बॉम्ब क्षेपणास्त्राद्वारे डागता येऊ शकतो.
  • उत्तर कोरियाने घेतलेल्या पाचव्या अणुचाचणीच्या तुलनेत आज झालेला स्फोट ९.८ पटीने अधिक शक्तिशाली होता.
  • जगातील प्रमुख देशांनी यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी करण्याचा विचार सुरु केला आहे. 
  • काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया विरोधात लष्करी कारवाईचे संकेत दिले होते.
 हायड्रोजन बॉम्ब 
  • हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो.
  • अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो.
  • संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो.
  • हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते.
  • शितयुद्धाच्या काळात १९५२साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर १९६१साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती.
  • अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते.
  • मात्र महाभयंकर आणि अतिसंहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.  

आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाला

  • ‘स्टार इंडिया’ या कंपनीने सर्वाधिक १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहे.
  • स्टार इंडियाकडे २०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीगच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल असे दोन्ही प्रक्षेपणाचे हक्क असतील.
  • भारतासह आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमधील प्रक्षेपणाचे हक्कदेखील स्टारनेच मिळविले आहेत.
  • आयपीएलच्या मीडिया हक्कांची टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन माध्यमांमध्ये विभागणी करण्यात आली होती.
  • टेलिव्हिजन हक्कांसाठीच्या लिलावप्रक्रियेत सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, इको नेट, परफॉर्म ग्रुप अशा जगभरातील २४ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
  • तर, डिजीटल हक्कांसाठी अमेझॉन, ट्विटर, डिस्कव्हरी, फेसबुक, एअरटेल यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रयत्न केले.
  • मात्र  टेलिव्हिजन आणि डिजिटल तसेच संपूर्ण भारत आणि जगभरातील सर्व मीडिया हक्क मिळवण्यात स्टार इंडियानेच बाजी मारली. 
  • २००८मध्ये ‘सोनी’ने ८,२०० कोटी रुपयांमध्ये दहा वर्षांसाठी आयपीएलच्या टेलिव्हिजन प्रक्षेपणाचे हक्क घेतले होते.
  • त्यानंतर २०१५साली नोवी डिजिटलने ३०२.२ कोटी रुपये मोजून तीन वर्षांसाठी डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क मिळविले होते.

शिल्पा अग्रवाल यांना मिसेस युनिव्हर्स लव्हली किताब

  • दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत महारष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजिका शिल्पा अग्रवाल ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७’ किताबाच्या मानकरी ठरल्या.
  • दरबान येथे २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान मिसेस युनिव्हर्स किताबासाठी हि स्पर्धा पार पडली. ‘महिला सक्षमीकरणातून परिवर्तनाचा उदय’ अशी या स्पर्धेची थीम होती.
  • या स्पर्धेत जगभरातून २१ ते ४५ वर्षे वयोगटातील १८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
  • अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत शिल्पा अग्रवाल यांनी विविध फेऱ्यांमध्ये स्वत:च्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला.
  • त्या ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली’ किताब पटकाविणाऱ्या मध्य भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
  • अग्रवाल यांनी यापूर्वी थायलंडमध्ये झालेल्या मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेचा मिसेस इन्स्पिरेशनल किताब आपल्या नावावर केला आहे.
  • तसेच म्यानमारमध्ये झालेल्या मिसेस इंडिया ग्लोब २०१५ या स्पर्धेचे उपविजेतेपदही त्यांनी मिळविले आहे
  • याशिवाय त्यांनी २००४मध्ये ‘मिसेस नागपूर’ आणि पती आकाश अग्रवाल यांच्यासोबत २००५मध्ये ‘मि ॲण्ड मिसेस नागपूर’ किताब मिळविला आहे. 
  • प्रसिद्ध उद्योजिका म्हणून प्रख्यात असलेल्या शिल्पा आकाश फर्निचर ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच समाजसेवेच्या माध्यमातून त्या महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत आहेत.

हेलिकॉप्टर्ससाठी एचएएलचा सरकारसोबत करार

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) भारतीय लष्कर आणि नौदलाला ४१ अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (एएलएच) पुरवणार आहे.
  • यासंदर्भात संरक्षण मंत्रालय आणि ‘एचएएल’ यांच्यामध्ये ६,१०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. ६० महिन्यांसाठी हा करार लागू असेल.
  • मार्च २०१७मध्ये एचएएल कंपनीने ३२ ‘एएलएच’ हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला आणि तटरक्षक दलाला पुरविले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा