चालू घडामोडी : १० सप्टेंबर

आखाडा परिषदेकडून भोंदू बाबांची यादी प्रसिध्द

  • अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ बाबांची यादी जाहीर करुन ते भोंदू असल्याचे जाहीर केले आहे.
  • १० सप्टेंबर रोजी अलाहाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या १४ ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. 
  • या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन आखाडा परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले.
  • यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेने ‘संत’ उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन, त्याचे आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे.
  • याद्वारे गुरमीत राम रहीमसारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल.
 अखिल भारतीय आखाडा परिषद 
  • अखिल भारतीय आखाडा परिषद १४ प्रमुख आखाड्यांमधील साधू-संतांचा समावेश असलेली संयुक्त संस्था आहे.
  • यामध्ये आयोध्येतील राम जन्मभूमीच्या आंदोलनाचा चेहरा असलेल्या निर्मोही आखाड्याचाही समावेश आहे.
 आखाडा परिषदेने जाहीर केलेली १४ भोंदू बाबांची यादी 
  • आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
  • सुखबिंदर कौर उर्फ राधे मां
  • सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
  • गुरमीत राम रहीम सिंह
  • ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
  • निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
  • रामपाल
  • आचार्य कुशमुनि
  • बृहस्पती गिरी
  • मलकान गिरी सिंह
  • इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी
  • स्वामी आसीमानंद
  • ओम नम: शिवाय बाबा
  • नारायण साई

नौदलाच्या ६ महिला पहिल्यांदाच जगाच्या सफरीवर

  • भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत जगप्रवासाला निघाल्या आहेत.
  • भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या छोट्याशा शिडाच्या नौकेने त्या १० सप्टेंबर रोजी जगप्रवासाला रवाना झाल्या आहेत.
  • समुद्रमार्गे संपूर्ण पृथ्वी परिक्रमेचा हा प्रवास २१,६०० नॉटीकल मैलांचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
  • यादरम्यान फ्रीमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्युझीलंड), पोर्ट स्टॉन्ले (फॉकलॅन्ड), आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या ४ ठिकाणी दुरुस्तीसाठी व रसदीसाठी ही सफर थांबणार आहे.
  • या जलप्रवासाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून आतापर्यंत सुमारे २० हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला आहे.
  • ज्यामध्ये २०१६ व २०१७ मधील दोन मोहिमा आणि डिसेंबर २०१६ मधील गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश आहे.
  • या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा उद्देश आहे.
  • ही मोहिम देशातील तरुणांना समुद्राचे ज्ञान घेण्यास आणि साहस तसेच परस्पर सदभाव वाढवण्यास प्रेरित करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • आशियातील महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीही सुरू होती.
  • यापूर्वी पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता.
  • तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत केला होता.
  • आयएसएनव्ही तारिणी
  • आयएसएनव्ही तारिणी या ५५ फुट नौकेची बांधणी गोव्यातील मेसर्स एक्वारीअस शिपयार्ड प्रा. लि. या कंपनीने केली आहे.
  • ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतीय नौदलात या नौकेचा समावेश करण्यात आला.
  • आयएनएसव्ही तारिणीवरील चमूमधील महिला अधिकारी
    • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी
    • लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल
    • लेफ्टनंट कमांडर स्वाती पी
    • लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती
    • लेफ्टनंट विजया देवी
    • लेफ्टनंट पायल गुप्ता

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी निवृत्त

  • ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी सक्रिय वकिली व्यवसायातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या ७६ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.
  • नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा सन्मानसोहळा बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी निवृत्तीची घोषणा करताना केंद्र सरकारवर टीकाही केली.
  • राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला.
  • त्यांनी एस सी शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या १७व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले.  
  • देशातील सर्वात नामंकित वकिलांमध्ये राम जेठमलानी गणना होते. निवृत्तीनंतर भ्रष्टाचाराविरोधातील आपली लढाई सुरू ठेवणार असल्याचे जेठमलानी यांनी सांगितले.
  • राम जेठमलानी यांनी या व्यक्तींसाठी केली वकिली
    • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली. 
    • दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.
    • जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली. 
    • १६ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.
    • लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली. 
    • सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.
    • २ जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.
    • शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.
    • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली. 
    • चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.
    • केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली.

२१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

  • जीएसटी परिषदेच्या २१व्या बैठकीत, ज्या कारागीरांची वार्षिक उलाढाल २० लाख रुपयांपर्यंत आहे अशा कारागीरांना जीएसटीच्या नोंदणीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • याबरोबरच, सरकारी कामाच्या करारासाठी कर १८ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आला आहे.
  • जीएसटी नेटवर्क, नोंदणीचे पोर्टल आणि टॅक्स रिटर्न यातील तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांच्या एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
  • जीएसटी परिषदेच्या या बैठकीत मध्यम आकाराच्या तसेच आलिशान आणि एसयूव्ही प्रकारात मोडणाऱ्या या गाडयांवर २ ते ७ टक्के अतिरिक्त उपकर (सेस) आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यानुसार मध्यम आकारांच्या गाडयांवर २ टक्के, मोठया गाडयांवर ५ टक्के आणि एसयूव्हीवर ७ टक्के सेस आकारण्यात येईल.
  • त्याचवेळी सर्वसामान्यांना दिलासा देताना इडली/डोशासह दैनंदिन वापरांच्या वस्तूंवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्यात आला आहे.

सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन बाली येथे सुरु

  • सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन इंडोनेशियातील बाली या बेटावर १० सप्टेंबर रोजी सुरु झाले.
  • पद्मश्री डॉ तात्याराव लहाने या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी तर निलेश गायकवाड संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
  • संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
  • आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ लहाने यांनी येथे केले.
  • या संमेलनात निलेश गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आकाशपंख’, ‘थरार उड्डाणाचा’, ‘माझे अंदमान’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. 
  • त्याचप्रमाणे, डॉ शुभा साठे यांच्या ‘त्या तिघी’, तसेच सुमन मुठे यांच्या ‘सहकार चळवळीतील महिला’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा