चालू घडामोडी : १२ सप्टेंबर

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार

  • भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.
  • बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. 
  • पदुकोण यांनी १९८०मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते  पहिलेच भारतीय होते.
  • १९७८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.

देशी पारंपरिक वाद्यांना जीएसटीमधून सूट

  • पुंगी, एकतारा, हार्मोनिअम, सरोद, सितार आणि तबला अशा हातांनी बनविलेल्या १३४ देशी पारंपरिक वाद्यांना वस्तू आणि सेवा कर परिषदेने अप्रत्यक्ष करातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
  • संगीताच्या देशी उपकरणांना करातून सूट दिल्यामुळे, त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन, त्यांच्या वापराला उत्तेजन मिळेल.
  • वाद्ये, हस्तकला आणि खेळांच्या साहित्यावर कर लादला जाऊ नये, हा मुद्दा काही आठवड्यांपूर्वी समितीसमोर आला होता.
  • संगीतकार आणि या वस्तू विक्रेत्यांनी २८ टक्के कराबद्दल तक्रार करताना, या वस्तुंच्या गटातील काही विसंगती सरकारने दूर कराव्यात, असे म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राईकचे अनुभव पुस्तकरूपात

  • पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर व २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती.
  • या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे मेजर माइक टँगो यांनी या कारवाईचा थरारक अनुभव एका पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.
  • ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
  • मेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेला हल्ला योजना आखल्यानुसार अत्यंत योग्य पद्धतीने व गतीने करण्यात आला.
  • भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकसाठी उरी दहशतवादी हल्ल्यामुळे नुकसान सहन करणाऱ्या दोन युनिटमधून सैनिकांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
  • भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईत ३८ दहशतवादी तर  पाकिस्तानचे २ सैनिक ठार झाले होते.

अभिजित कटकेला भारत केसरी किताब

  • कर्नाटकातील जमखंडी येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटके याने ‘भारत केसरी’ किताब पटकावला.
  • अभिजितने पाच लढती जिंकल्या. त्याने दिल्लीचा भीमसिंग, हरियानाचा अनिल कुमार, हवाई दलाचा सतीश फडतरे, उत्तर प्रदेशचा अमित कुमार यांना हरविले.
  • निर्णायक फेरीत त्याने ‘कर्नाटक केसरी’ शिवय्याला १०-२ असे हरविले. चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असे इनाम त्याला मिळाले.
  • अभिजित कटके शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

  • अनस्टॉपेबलः माय लाइफ सो फार - रशियाची पाच ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू मारिया शारापोव्हाचे आत्मचरित्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा