चालू घडामोडी : १४ सप्टेंबर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते १४ सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
  • अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या ३ तासांत कापणे शक्य होणार आहे.
  • हा प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व २०२२पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आभार मानले.
  • तर शिंजो आबे यांनी केलेल्या भाषणात भारत आणि जपानच्या मैत्रीचा पुनारोच्चार करत, ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा दिला.
 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्ये: 
  • प्रकल्पासाठीचा खर्च: किंमत १.०८ लाख कोटी रुपये
  • या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने ८८ हजार कोटीचे कर्ज ०.१ टक्के इतक्या अत्यल्प व्याज दराने दिले असून, ५० वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे.
  • उर्वरित ३० हजार कोटी रुपयांपैकी प्रत्येकी ८ हजार कोटी रुपये महाराष्ट्र आणि गुजरात सरकार देईल आणि उर्वरित निधी हा रेल्वे मंत्रालय देणार आहे.
  • या प्रकल्पासाठी प्रारंभिक भागभांडवल म्हणून ५०० कोटी रुपयांचा जो निधी दिला जाणार आहे, त्यातील प्रत्येकी १२५ कोटी रुपयांचा भार महाराष्ट्र व गुजरात सरकार उचलेल अन्य निधी रेल्वे मंत्रालय देणार आहे.
  • मुंबई ते अहमदाबादचे ५०८ किलोमीटरचे अंतर ताशी ३५० किमी वेगाने पूर्ण होईल.
  • महाराष्ट्रातील १५६ किमी, गुजरातमधील ३५१ किमी या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे.
  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद, साबरमती ही १२ या ट्रेनची नियोजित स्थानके असतील
  • बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावू लागेल तेव्हा दररोज सुमारे ७० फेऱ्यांसह ३५ बुलेट ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. ही संख्या २०५०पर्यंत १०५ गाड्यांपर्यंत वाढवली जाईल.
  • सुरुवातीला या गाडीला १० डबे असतील व त्यातून एकूण ७५० प्रवाशांची प्रवास करण्याची क्षमता असेल.
  • या रेल्वेमार्गापैकी ९२ टक्के मार्ग उन्नत (एलेव्हेटेड), ६ टक्के मार्ग बोगद्यांमधून आणि फक्त २ टक्के मार्ग जमिनीवर राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी रेल्वेला फक्त ८२५ हेक्टर संपादित करावी लागणार आहे.
  • ही रेल्वे मुंबईतून २१ किमी अंतर भूमिगत मार्गाने जाणार आहे. त्यापैकी ७ किमी अंतर समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे.
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या ७ ते ८ तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ ३ तासांत हे अंतर पार करता येणार आहे.
  • बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.
  • प्रकल्पासाठी काही ट्रेन जपानहून येणार तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार.
  • यामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल.
  • तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही विकास होण्यास मदत होणार.
  • यातून सुमारे २४ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचा प्राथमिक अंदाज.
  • १५ ऑगस्ट २०२२ रोजी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ते भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असेल.

दिल्लीतील जुन्या वाहनांवरील बंदी कायम

  • दिल्ली एनसीआरमध्ये १० वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांवरील बंदी उठविण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नकार दिला आहे.
  • केंद्र सरकारने हरित लवादाला वाहनबंदीचा कालावधी १० वरून १५ वर्षे करावा, असे सूचवले होते. मात्र एनजीटीने कोणतेही बदल न करता ही बंदी कायम ठेवली आहे.
  • राष्ट्रीय हरित लवादाने २०१५मध्ये १० वर्षांहून जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. एनजीटीने दिल्लीतल्या जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनवरही बंदी घातली आहे.
  • १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांची विस्तृत माहिती जमा करण्याचे आदेशही लवादाने दिल्ली सरकारचा वाहतूक विभाग तसेच अन्य खात्यांना दिले होते.
  • याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणताच प्रयत्न करत नसल्याचा आरोपही केंद्र सरकारवर केली आहे.

दाऊदच्या संपत्तीवर ब्रिटिश सरकारकडून टाच

  • कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती ब्रिटिश सरकारने गोठवली आहे.
  • दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर (सुमारे ४५ हजार कोटी) असून, त्यापैकी ४ हजार कोटी रुपयांची मालमत्ता ब्रिटनमध्ये जप्त करण्यात आली आहे.
  • ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरे आहेत, त्यांची किंमत काही हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांसंबंधीच्या यादीमध्ये दाऊदचा समावेश केला होता. या संदर्भात भारतानेही ब्रिटनला पूर्वीच आपला अहवाल सुपुर्द केला आहे.
  • गेल्या महिन्यात ब्रिटनकडून मालमत्ता गोठविण्याच्या संदर्भात काही जणांची यादी जारी करण्यात आली होती. त्यात दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ मालमत्तांचाही उल्लेख होता.
  • दाऊदची अनेक अरब व मुस्लीम राष्ट्रांत गुंतवणूक, उद्योग व मालमत्ता आहे. संयुक्त अरब अमिरातीने जानेवारी २०१७मध्ये त्याच्या १५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
  • ‘फोर्ब्ज’ नियतकालिकाच्या माहितीनुसार दाऊद हा सर्वांत श्रीमंत गँगस्टर असून २०१५मध्ये त्याची एकूण संपत्ती ६.७ अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ४५ हजार कोटी) एवढी होती.
  • युरोप, अफ्रिका, दक्षिण आशियातील ५०हून अधिक देशांत दाऊदची गुंतवणूक असल्याचे म्हटले जाते.

२०२४च्या ऑलिम्पीक स्पर्धा पॅरिसमध्ये

  • २०१६साली ब्राझीलच्या रिओ दी जनेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पिकनंतर आगामी २०२०च्या ऑलिम्पिक खेळांचा मान जपानच्या टोकीयो शहराला मिळाला आहे.
  • यानंतर होणाऱ्या २०२४मधील खेळांचे यजमानपद फ्रांसची राजधानी पॅरिस शहराला मिळणार आहे. याआधी १०० वर्षापूर्वी १९२४मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पीक स्पर्धा खेळविल्या गेल्या होत्या.
  • याशिवाय २०२८च्या ऑलिम्पीक खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान अमेरिकेतल्या लॉस एंजलिस या शहराला मिळाला आहे.
  • ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी दोन्ही शहरांना आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती १.८ दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये गरजेनूसार २ दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य

  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ‘क’ गटात भरती करताना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने लावून धरली होती.
  • परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यापूर्वीच परिवहन विभागात हा निर्णय लागू केला होता.
  • मात्र हा निर्णय सर्वच सरकारी विभागांसाठी लागू करावा, अशी मागणी रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
  • सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

हिक्स होप ट्रम्प यांची प्रमुख संपर्क संचालक

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिक्स होप या माजी मॉडेलला आपल्या प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे.
  • जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतल्यापासून या पदावर त्यांनी केलेला हा तिसरा फेरबदल आहे. एंथोनी स्कॅमुची यांच्या जागी हिक्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हिक्स होप ही ट्रम्प प्रशासनातील सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांपैकी एक असणार आहे. हिक्स होप अनेक वर्षांपासून ट्रम्प यांच्याशी संबंधित आहे.
  • २८वर्षीय हिक्सने मॉडेलिंगमधून करिअर सुरू केले होते. वयाच्या ११व्या वर्षीच राफ लॉरेनसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत हिक्सने काम केले आहे.
  • हिक्स २०१२साली ट्रम्प यांच्या संपर्कात आली आणि दोघांनी मिळून काम करण्यास सुरुवात केली.
  • जानेवारी २०१७मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने ‘अंडर-२० अचिव्हर्स’मध्ये तिचा समावेश केला होता.
  • हिक्स होप डोनाल्ड ट्रम्प यांच पूर्ण जनसंपर्क सांभाळत होती. यामध्ये की ट्रम्प कोणाला किती वाजता भेटणार, किती वेळ बोलणार हे सर्व नियोजन ती ठरवत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा