क्रीडा पुरस्कार २०१७

  • हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आणि राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी भारतातील गुणवत्तावान खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • यावेळी क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जीवनगौरव या पुरस्कारांची घोषणा केली आहे. 
  • यामध्ये २ खेळाडूंना खेलरत्न, ७ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, १७ क्रीडापटूंना अर्जुन तर ३ जणांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि हॉकीपटू सरदारसिंग यांना २०१७चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • देवेंद्र झाझरिया खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेला आणि हा पुरस्कार मिळविणारा पहिलाच पॅरालिम्पिक (दिव्यांग) खेळाडू ठरला आहे.
  • देवेंद्रने २००४ आणि २०१६ सालच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीमध्ये २ सुवर्णपदकांची कमाई करुन दिली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू आहे.
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या देवेंद्रने २०१६पॅरालिम्पिकमध्ये ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला होता. २०१३मध्ये जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
  • त्याला २००४साली अर्जुन पुरस्काराने आणि २०१२मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे.
  • भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह याने सुमारे १० वर्षे आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ८ वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
पुरस्कार्थींची अंतिम यादी
खेळाडू खेळ
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
देवेंद्र झाझरिया भालाफेक
सरदार सिंग हॉकी
अर्जुन पुरस्कार
व्ही जे सुरेखा तिरंदाजी
खुशबीर सिंग ॲथलेटिक्स
अरोकिया राजीव ॲथलेटिक्स
प्रशांती सिंग बास्केटबॉल
लैशराम देवेंद्रो सिंग बॉक्सिंग
चेतेश्वर पुजारा क्रिकेट
हरमनप्रीत कौर क्रिकेट
ओईनाम बेमबेम देवी फुटबॉल
एसएसपी चौरसिया गॉल्फ
एस व्ही सुनील हॉकी
जसवीर सिंग कबड्डी
पी एन प्रकाश नेमबाजी
ए अमलराज टेबलटेनिस
साकेत मायनेनी टेनिस
सत्यव्रत कादियन कुस्ती
मरियप्पन दिव्यांग खेळाडू
वरुण सिंग भाती दिव्यांग खेळाडू
द्रोणाचार्य पुरस्कार
स्व. डॉ आर गांधी अथलेटिक्स
हिरानंद कटारिया कबड्डी
जी एस एस व्ही प्रसाद बॅडमिंटन
ब्रिजभूषण मोहंती बॉक्सिंग
पी ए राफेल हॉकी
संजय चक्रवर्ती नेमबाजी
रोशन लाल कुस्ती
ध्यानचंद पुरस्कार
भूपेंदर सिंग अथलेटिक्स
सय्यद शाहिद हकीम फुटबॉल
सुमाराई टेटे हॉकी

 तेनसिंग नोर्गे पुरस्कार 
  • देशातील साहसी खेळासाठी दिला जाणारा ‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे याला प्रदान करण्यात आला.
  • देशातील सागरी जलतरण, गिर्यारोहण आणि हवाई साहसी खेळ यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, प्रतिमा आणि ब्लेजर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • रोशनने १९९६मध्ये म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किलोमीटर (सागरी) अंतर पार केले होते.
  • त्यानंतर त्याने इंग्लिश खाडी, अमेरिकेतील कॅटलिना खाडी, मोलिकोई खाडी, न्यूयॉर्कमधील मॅनहंटन बेटाजवळील खाडी, आयर्लंड-स्कॉटलंडमधील आयरीश खाडी, जपानमधील त्सगरू खाडी आणि स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर खाडी यशस्वीरित्या पार केली आहे.
 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 
  • सुरुवात: १९९१ (प्रथम विजेता : विश्वनाथन आनंद)
  • २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी प्रदान करण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • पुरस्काराचे स्वरूप: पदक, प्रशस्तीपत्र आणि ७.५ लाख रुपये रोख
  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दरवर्षी एका एका खेळाडूला दिला जातो. २००८साली हा नियम शिथिल करीत बॉक्सर मेरिकोम, बॉक्सर विजेंदर आणि मल्ल सुशीलकुमार यांना तसेच २०१२साली मल्ल योगेश्वर दत्त व नेमबाज विजयकुमार यांना संयुक्तपणे या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०१६मध्ये बॅडमिंटनपटू  पी व्ही सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
 अर्जुन पुरस्कार 
  • सुरुवात : १९६१
  • पुरस्काराचे स्वरूप : रु. ५ लाख रोख, कांस्य धातू पासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र
  • अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.
  • राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडादिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • २००१पासून अर्जुन पुरस्कार फक्त पुढे उल्लेख केलेल्या क्रीडासत्रांतील खेळांसाठी दिला जाऊ लागला : ऑलिंपिक खेळ, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, विश्वचषक, विश्वविजेतेपद, क्रिकेट, देशी खेळ आणि अपंगांसाठीचे खेळ
 द्रोणाचार्य पुरस्कार 
  • गत ३ वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
  • रोख पंचाहत्तर हजार रूपये, मानपत्र व मानचिन्ह यांचा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ही नोट्स मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा