चालू घडामोडी : १९ जानेवारी

१८ बालकांचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरव

  • नांदेड जिल्हय़ाच्या पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • यावर्षी देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे.
  • साहसी एजाझने दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.
  • २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही ही बालके सहभागी होणार आहेत.
  • एजाझ दहावीत शिकत असून लष्करात रुजू होऊन देशाची सेवा कराण्याची त्याची इच्छा आहे.
  • ७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ३ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.
  • पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते.
  • तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

जीएसटी दरात पुन्हा कपात

  • १८ जानेवारी रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २५व्या बैठकीत ५३ सेवांच्या दरात कपात करण्यात आली असून, हस्तकलेसह २९ वस्तूंवर आता शून्य टक्के कर लावला जाईल.
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली जीएसटी परिषदेची बैठक राजधानीत झाली.
करमुक्त झालेल्या प्रमुख सेवा
  • ‘उडान’अंतर्गत विमानसेवांसाठीचा निधी (३ वर्षांसाठी).
  • माहिती अधिकारांतर्गत माहिती देणे.
  • सरकारसाठीच्या कायदे सेवा.
  • देशातून विदेशात माल पाठविणे.
  • तटरक्षक सैनिकांसाठीचा नौदल समूह विमा.
  • शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश परीक्षांसाठी घेण्यात येणारे शुल्क.
  • सर्व प्रकारच्या मंच कलाकारांचे ५०० रुपये प्रति कलाकार मानधन.
  • कर्णबधिरांसाठी लागणारी उपकरणे.
  • हस्तशिल्पांच्या यादीत असलेल्या ४० वस्तू.
  • पाण्याचा २० लीटरचा जार.
कमी झालेले प्रमुख दर
  • मेट्रो, मोनो रेल्वेवर : १८ ऐवजी१२ टक्के
  • शिवणकामावर : १८ ऐवजी५ टक्के
  • थीम पार्क, वॉटर पार्क, जॉय राइड्स : १८ ऐवजी५ टक्के
  • सरकारी उपक्रमांसाठीच्या उपकंत्राटदारांच्या बिलावर : १८ ऐवजी१२ टक्के
  • लेदर फूटवेअर निर्मितीवर : १२ ऐवजी५ टक्के
  • सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या सेवेवर : १८ ऐवजी १२ टक्के
  • मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सेकंडहॅण्ड कारवर : २८ ऐवजी१८ टक्के
  • सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेसमध्ये वापरण्यात येणारे जैव इंधनावर : २८ ऐवजी१८ टक्के

आयएनएसव्ही तारिणी केपहॉर्नमध्ये

  • आयएनएसव्ही तारिणी या बोटीतून समुद्रमार्गाने जगाची परिक्रमा करत असलेल्या भारतीय नौदलातील महिला केपहॉर्नला पोहोचल्या आहेत.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.
  • या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ त्यांनी यशस्वीरित्या पार केला.
  • एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) होता. त्यानंतर लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा त्यांनी डिसेंबर २०१७मध्ये गाठला.
  • आता पोर्ट स्टॅन्लेनंतर ते केप टाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत. नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत.
  • सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक मंचावर ‘नारीशक्ती’चे दर्शन घडविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
आयएनएसव्ही तारिणीची वैशिष्टे
  • भारतीय नौदलाकडे असलेली तारिणी ही शिडाची नौका (सेल बोट) खोल समुद्रात दूरवर जाऊ शकते.
  • हॉलँडच्या टोंगा-५६ डिझाइनवर आधारित गोव्याच्या अॅक्वेरियस शिपयार्डमध्ये तिची निर्मिती झाली आहे.
  • आयएनएसव्ही तारिणी ५५ फूट लांबीची शिडाची नौका आहे आणि त्याचे वजन २३ टन आहे.
  • यासाठी फायबर ग्लास, अॅल्युमिनियम आणि स्टील या धातूंचा वापर केला गेला आहे.
  • अत्याधुनिक सॅटेलाइट यंत्रणेद्वारा तारिणीवरील कर्मचारी जगाच्या कोणत्याही भागातून संपर्क करू शकतात.
  • ओडिशातील सुप्रसिद्ध तारातारिणी मंदिराच्या नावावरून या नौकेचे नाव ठेवले गेले आहे.
  • तारिणी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये दुसऱ्या तीरावर नेऊन पोहोचवणारी नौका असा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा