चालू घडामोडी : १३ फेब्रुवारी

एडीआरचा देशातील मुख्यमंत्र्याशी संबंधित अहवाल जाहीर

 • देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • या अहवालानुसार.......
 • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (संपत्ती : १७७ कोटी रुपये) देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. 
 • त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार (संपत्ती : २६ लाख रुपये) हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री.
 • देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तर ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती १ कोटी ते १० कोटी रुपयांदरम्यान आहे.
 • देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश.
 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ३० लाख रुपयांची आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे ५५ लाख रुपयांची संपत्ती.
 • अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे १२९ कोटी रुपयांची तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावावर ४८ कोटी रुपयांची संपत्ती. 
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे (२२) दाखल. यात तीन गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन (११) हे दुसऱ्या तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (१०) तिसऱ्या स्थानी.
 • सर्वात कमी गुन्हेगारी खटल्यांची नोंद बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (१) आणि जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (१) यांच्या नावावर आहे.
 • ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून ८ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
 • देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी के चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे.
 • ३२ टक्के मुख्यमंत्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. ज्यांनी माध्यमिक शिक्षणही पूर्ण केले नाही अशांचे प्रमाण १० टक्के आहे.  

स्टीव्हन स्मिथला प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बोर्डर पदक

 • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बोर्डर पदक जिंकले. त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव कोरले.
 • महान माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गणल्या जाणाऱ्या स्मिथला २४६ मते पडली.
 • त्याने दोन वेळचा पदक विजेता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१६२ मते) आणि फिरकीपटू नॅथन लियॉनला (१५६ मते) मागे टाकले.
 • ऑस्ट्रेलियाचा यंदाचा वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवलेल्या स्मिथने २०१५मध्ये बोर्डर पदक जिंकले होते.

१३ फेब्रुवारी : जागतिक रेडिओ दिन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा