चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८

  • मुंबईत पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४,१०६ सामंजस्य करार झाले.
  • उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्रासाठी हा एक मैलाचा दगड ठरला.
  • या परिषदेला उद्योजकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला आहे.
  • या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते.
  •  ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी झाले.
  • तर २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.
  • जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यापूर्वी २०१६मध्ये मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते.
 दृष्टिक्षेपात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ 
  • एकूण करार : ४ हजार १०६
  • गुंतवणूक : १२,१०,४०६ कोटी 
  • रोजगार : ३६ लाख ७७ हजार १८५
क्षेत्रनिहाय गुंतवणूक (कोटी रुपयांमध्ये)
  • उद्योग : ५ लाख ४८ हजार १६६
  • गृह निर्माण : ३ लाख ८५ हजार
  • ऊर्जा : १ लाख ६० हजार 
  • उच्च शिक्षण :  २ हजार ४३६  
  • महाआयटी : ५ हजार ७०० 
पायाभूत प्रकल्पांसाठी सरकारची ३ लाख ९० हजार कोटींची गुंतवणूक
  • वाहतूक आणि बंदरे (४८ प्रकल्प) :  ५९ हजार ३२ कोटी
  • सार्वजनिक बांधकाम (५ प्रकल्प) : १ लाख २१ हजार ५० कोटी
  • मुंबई महानगरपालिका (१८ प्रकल्प) : ५४ हजार ४३३ कोटी
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (३० प्रकल्प) :  १ लाख ३२ हजार ७६१ कोटी
  • नगर विकास (३ प्रकल्प) : २३ हजार १४३ कोटी
  • देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कची उभारणी लवकरच मुंबईनजीक करण्याची घोषणाही या परिषदेत करण्यात आली.
  • लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना प्रस्तावित असून, त्या माध्यमातून ६० हजार रोजगार निर्माण होतील.
  • गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार यांसारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागातही गुंतवणूक होणार आहे.
प्रमुख गुंतवणूक करार आणि प्रकल्प
  • रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड : ६० हजार कोटी
  • व्हर्जिन हायपरलूप वन : ४० हजार कोटी
  • थ्रस्ट एअरक्राफ्ट क्लस्टर (अमोल यादव) : ३५ हजार कोटी
  • जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेइकल : ६ हजार कोटी
  • ह्योसंग कंपनी : १२५० कोटी
  • महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल : ५०० कोटी
क्लस्टर विकासामुळे एमएसएमई उद्योगांना चालना
  • राज्यात क्षेत्रनिहाय क्लस्टर विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना फायदा होणार आहे. त्याचा थेट रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे.
  • सिंधुदुर्ग येथे कॉयर क्लस्टर विकसित होणार असून, ७.५६ कोटींची गुंतवणूक होणार.
  • रायगड जिल्ह्यात चामडे उद्योगाचे क्लस्टर असून, त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक होणार.
  • पालघरमध्ये चित्रावारली फाउंडेशन आर्ट ॲण्ड क्राफ्ट क्लस्टरसाठी १ कोटींची गुंतवणूक.
  • नागपूरमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी ५ कोटींची गुंतवणूक होईल.
  • अहमदनगरमध्ये गोल्ड ज्वेलरी क्लस्टर विकसित केले जाणार. 
रतन टाटा यांचा ‘महाउद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव
  • या परिषदेत टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाउद्योगरत्न’ या राज्याच्या सर्वोच्च उद्योग पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • तसेच रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना या वेळी ‘महाउद्योगश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • या वेळी माहिती तंत्रज्ञान, निर्यात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, महिला उद्योजक, खादी ग्रामोद्योगातील उद्योजकांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
  • या कार्यक्रमात नागपूर येथील जयसिंग चव्हाण या दिव्यांग उद्योजकाचा विशेष गौरव करण्यात आला.
विमान निर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमोल यादव यांच्याशी राज्याने ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. 
  • करारानुसार, अमोल यादव यांच्या विमान कारखान्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून पालघर येथे १५७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • त्यामुळे स्वदेशी विमान निर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात असणार आहे. या प्रकल्पातून सुमारे १० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.
  • या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १९ आसनी चार प्रोटोटाइप विमाने बनविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन वर्षांत सहाशे विमाने बनविण्याचे लक्ष्य आहे.
  • पहिल्या चार आसनी विमानाची सर्व चाचणी पूर्ण झाली असून तपासणी व नोंदणीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

अभिनेते कमल हसन यांचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश

  • दाक्षिणात्य अभिनेते कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला असून, त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
  • कमल हसन यांनी मदुराईत घेतलेल्या एका सभेत आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचेही अनावरण केले.
  • एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असे हसन यांच्या नवीन पक्षांचे चिन्ह असणार आहे.
  • या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हसन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली.

कोळसा खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्याचा निर्णय

  • कोळसा खाणी खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी खुल्या करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
  • १९७३साली कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्यात येत आहेत.
  • या निर्णयाकडे अत्यंत महत्त्वाची सुधारणा म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कोल इंडिया या कंपनीची कोळसा खाणी क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.
  • आजपर्यंत कॅप्टिव्ह वीज निर्मितीसाठीच खासगी कंपन्यांना कोळसा खाणी दिल्या जात होत्या. आता ई-लिलावाद्वारे देशातील खासगी व जागतिक कंपन्यांनाही खाणपट्टे दिले जातील. या कंपन्या कोळसा काढून विकू शकतील.
 सरकारचा दावा 
  • या निर्णयाने कोळसा क्षेत्र एकाधिकारशाहीकडून स्पर्धात्मकतेकडे प्रवास करणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यक्षमता वाढेल.
  • या निर्णयाने स्पर्धात्मकता वाढेल, तसेच सवोत्तम तंत्रज्ञानही या क्षेत्रात येईल. मोठी गुंतवणूक मिळण्यास मदत होईल.
  • त्यामुळे कोळसा असलेल्या भागात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार निर्मिती होईल. या भागाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे चालना मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा