चालू घडामोडी : २५ फेब्रुवारी

बॉलिवूडच्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे अकाली निधन

 • बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले.
 • श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांचा तोल गेल्याने बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे दुबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून उघड झाले आहे.
 • श्रीदेवी उर्फ अम्मा यंगर अय्यपन यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी येथे झाला.
 • त्या १९९६साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
 • श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.
 • त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
 • वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी तमिळ चित्रपट ‘थुनैवन’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
 • १९७१साली ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.
 • वयाच्या १२व्या वर्षी ‘ज्युली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. तर १५व्या वर्षी ‘सोलवा सावन’ हा त्यांचा प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट ठरला.
 • त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. १९८३मध्ये ‘हिम्मतवाला’ हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. तर मॉम हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.
 • लग्नानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर ६ वर्षानंतर त्यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केली. 
 • त्यानंतर २०१२साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 • अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट 
 • जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले, गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.

पारुपल्ली कश्यपला ऑस्ट्रियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद

 • राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या पारुपल्ली कश्यपने ऑस्ट्रियन खुल्या आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकाविले.
 • त्याने मलेशियाच्या जून वेई चीमचा २३-२१, २१-१४ अशा फरकाने अवघ्या ३७ मिनिटांत पराभव केला.
 • यापूर्वी कश्यपने २०१५मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अखेरचे जेतेपद मिळवले होते. तर गतवर्षी कश्यपने अमेरिकन खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
 • जागतिक क्रमवारीत एकेकाळी सहाव्या क्रमांकावर असलेल्या कश्यपला मागील काही वर्षांत दुखापतींनी त्रस्त केले होते. त्यातून सावरत त्याने हे यशस्वी पुनरागमन केले.

नोबेलविजेते शास्त्रज्ञ रिचर्ड एडवर्ड टेलर यांचे निधन

 • भौतिकशास्त्रातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ आणि स्टॅनफर्डचे मानद प्राध्यापक रिचर्ड एडवर्ड टेलर यांचे २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 • नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरी या दोन किलोमीटर लांबीच्या रेषीय त्वरणक यंत्राच्या मदतीने त्यांनी बरेच प्रयोग केले होते.
 • अणूतील अनेक उपकण कालांतराने शोधले गेले, त्यात क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो.
 • या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.
 • टेलर यांचा जन्म कॅनडामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते.
 • १९४५मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले.
 • अल्बर्टा विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस केले. १९९२मध्ये ते स्टॅनफर्डला हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले.
 • अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांचे ते मानद सदस्य होते.
 • नोबेलव्यतिरिक्त त्यांना ऑर्डर ऑफ कॅनडा, हुम्बोल्ट प्राइज असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा