चालू घडामोडी : ५ मार्च

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदके

  • मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी आणि मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. 
  • शहझार रिझवीने रिझवीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ख्रिस्तियन रिट्झवर मात करताना २४२.३ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला.
  • तर मनूने विश्वचषक अंतिम फेरीची विजेती अ‍ॅलेझांड्रा जेव्हेला हिला पराभूत करताना २३७.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • अकरावीमध्ये शिकणाऱ्या मनूने २०१८मध्ये ब्यूनस आयर्स येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.
  • मनूने जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. गतवर्षी मनूने दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली.
  • रवी कुमारने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवताना २२६.४ गुणांची नोंद केली.
  • महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुली घोषने २२८.४ गुण नोंदवत कांस्यपदक मिळवले.
  • जितू रायने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले.

जगामध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर

  • ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने २०१७मध्ये जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन या देशांची क्षमतेनुसार क्रमवारी एका अहवालात प्रसिध्द केली आहे.
  • या १३३ देशांच्या यादीमध्ये सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • पाकिस्तान या ग्लोबल फायर पावरच्या यादीत १३व्या स्थानावर आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५मध्ये प्रवेश केला होता.
  • पाकिस्तानशी तुलना करता भारत जवळपास सर्वच आघाडयांवर सरस असल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे.
  • फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत.
  • चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत.
  • भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या अशा एकूण ५० निकषांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अपंगांचे तारणहार जावेद अबिदी यांचे निधन

  • अपंगांच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४ मार्च रोजी निधन झाले.
  • अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणूनही जावेद अबिदी यांची ओळख होती.
  • उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वयाच्या १५ वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.
  • अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘डिसअॅबिलिटी राइट ग्रुप’ (डिआरजी)ची स्थापना केली होती.
  • ‘राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल २०१४’ हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता.
  • ताजमहालपासून अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना व्हीलचेअरवरून भेटी देता याव्यात, यासाठी तेथे रॅम्प बांधण्याचा आग्रह अबिदींनीच धरला होता.
  • १९९३मध्ये सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अपंग विकास विभागाची जबाबदारी स्वीकारली.
  • ‘इंटरनॅशनल डिसॅबिलिटी अलायन्स’च्या उपाध्यक्षपदी २०१३ मध्ये अबिदी यांची निवड झाली.
  • जनगणनेत अपंगांना स्वतंत्र प्रवर्ग, अपंग कामकाज मंत्रालय या महत्त्वाच्या निर्णयांना त्यांची अपंगांच्या हक्कांसाठी चळवळ कारणीभूत होती.
  • अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच त्यांना अपंगांचे तारणहार म्हणून ओळखले जायचे.

चीनकडून सैनिकांच्या संख्येत कपात

  • चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) संख्येत ३ लाखांनी कपात करत पीएलएमधील सैनिकांची संख्या आता २० लाखांवर आणली आहे.
  • चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसला सोपवलेल्या आपल्या वार्षिक अहवालात याचा खुलासा केला आहे.
  • आधुनिक पद्धतीने युद्ध लढून त्यात विजय मिळविणे व जगातील सर्वांत ताकदवान सैन्य बनवणे हा सैनिकांची संख्या घटवण्यामागचा उद्देश आहे.
  • पीएलएमध्ये यापूर्वी दोनवेळा सैन्यदलात कपात करण्यात आली होती. यापूर्वी १९८०पर्यंत चिनी सैन्यदलात ४५ लाख सैनिक होते.
  • १९८५मध्ये पहिल्यांदा कपात करत सैनिकांची संख्या ३० लाखांवर आणण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा सैन्य संख्या घटवत २३ लाखांपर्यंत आणण्यात आली. आता चिनी सैन्यदलात २० लाख सैनिक राहिले आहेत.
  • सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे सैन्यदल आहे. चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत असली तरी ते आधुनिकतेचा स्वीकार करत आहेत.
  • ते आता सैनिकांची संख्या कमी करून खर्चात कपात करत आहेत. याचाच उपयोग ते आधुनिक आणि मजबूत सैन्यदलासाठी करत आहेत.
 संरक्षणासाठीची चीनची १७५ अब्ज डॉलरची तरतूद 
  • चीनने २०१८च्या आपल्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठीची तरतूद ८.१ टक्क्यांनी वाढवली आहे. ही वाढ मागील वर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक आहे.
  • चीनच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी यंदा १,११० कोटी युआनची (१७५ अब्ज डॉलर) तरतूद असेल. ही तरतूद भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीपेक्षा तिप्पट आहे.
  • चीन हा अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणारा दुसरा देश आहे. अमेरिका संरक्षणावर ६०२.८ अब्ज डॉलरची तरतूद करते. चीनपेक्षा हे चारपट अधिक आहे.
  • भारताने यंदा २०१८-१९मध्ये संरक्षणासाठी २.९५ लाख कोटींची तरतूद केली आहे. जी मागील वर्षीच्या २.७४ लाख कोटी रूपयांच्या तुलनेत ७.८१ टक्क्यांनी जास्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा