चालू घडामोडी : १ व २ एप्रिल

इस्रोचा जीसॅट -६ए उपग्रहाशी असलेला संपर्क तुटला

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) देशातील आजवरच्या सर्वात मोठ्या स्वदेशी बनावटीच्या जीसॅट-६ए या दळवळण उपग्रहाशी असलेला संपर्क तुटला आहे.
 • सतीश धवन अंतराळ केंद्रातून (श्रीहरीकोटा) २९ मार्च रोजी जीएसएलव्ही एफ ०८ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.
 • या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच हा उपग्रह १० वर्षांपर्यंत सेवा देईल, असे इस्रोने स्पष्ट केले होते.
 • जीसॅट-६ए या उपग्रहामध्ये सर्वात मोठा अॅँटेना असून इस्त्रोनेच त्याची निर्मिती केली होती.
 • या उपग्रहामुळे सॅटेलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्यूनिकेशन सेवा अधिक प्रभावी होणार होती.
 • तसेच यामुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते.
 • सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता.
 • पॉवर सिस्टममधील बिघाडामुळे उपग्रहाशी असलेला संपर्क तुटला असून, त्यामुळे इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहीमेला धक्का बसला आहे.

चीनचे  स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

 • चीनने सात वर्षांपूर्वी अंतराळात सोडलेली आणि नियंत्रणाबाहेर गेलेली तियांगोंग-१ ही प्रयोगशाळा (स्पेस स्टेशन) २ एप्रिल रोजी दक्षिण पॅसिफिक महासागरात कोसळली.
 • एका स्कूल बसच्या आकाराची ही प्रयोगशाळा सुमारे ३४ फूट लांब आणि ११ फूट रुंद होती. तिचे वजन ८.५ टन इतके होते.
 • चीनने सप्टेंबर २०११मध्ये तिचे प्रक्षेपण केले होते आणि ती दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहण्याचा अंदाज होता.
 • त्या तुलनेमध्ये ही प्रयोगशाळा २०१६पर्यंत कार्यरत राहिली. मार्च २०१६मध्ये या प्रयोगशाळेचे काम थांबविण्यात आले. त्यानंतर या प्रयोगशाळेसोबतचा तुटला होता.
 • हे स्पेस स्टेशन मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अवकाशयान महासागरात कोसळले.
 • २०११मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले हे चीनचे पहिले स्पेस स्टेशन होते. त्यावेळी स्वर्गातील राजमहल असे त्याला नाव देण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा