चालू घडामोडी : १० एप्रिल

लष्कराच्या बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी करार

 • केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ६३९ कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला १.८६ लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत.
 • गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत यासाठी लष्कर प्रयत्न करत होते.
 • दिल्लीमधील एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा करार मिळाला आहे. हा आतापर्यंत त्यांना मिळालेला सर्वात मोठा करार आहे. कंपनी ३ वर्षांमध्ये हे जॅकेट्स लष्कराला पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.
 • हे बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना ‘३६० डिग्री सुरक्षा’ पुरवतील तसेच जॅकेटमध्ये सुरक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातील असा दावाही करण्यात आला आहे.
 • हे जॅकेट तयार करण्यासाठी ‘बोरॉन कार्बाइड सेरैमिक’ चा वापर करण्यात येणार आहे. बॅलेस्टिक सुरक्षेसाठी हे सर्वात हलके मटेरिअल आहे. यामुळे जॅकेटचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८

 • नेमबाजी
 • भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्ण जिंकले. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता रायने २३५.१ गुणांची नोंद केली.
 • २०१४मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू रायने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्याला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात स्थान मिळाले नव्हते.
 • हीना सिद्धूने महिला नेमबाजीच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
 • चौथ्या दिवशी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्याच मनू भाकरने हीनाला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 • मेक्सिकोत आयएसएफ विश्वचषकाची सुवर्ण विजेती मेहुली घोषने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले.
 • दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ओमप्रकाश मिथरवाल याला कांस्य तसेच दहा मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला हिला कांस्यपदक मिळाले.
 • टेबल टेनिस
 • भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारताने नायजेरियावर ३-० ने मात केली.
 • स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय महिलांनी सिंगापूरवर ३-२ ने मात करत पहिल्यांदाच राष्ट्रकुल टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 • ग्लास्गो २०१४मध्ये झालेल्या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला केवळ पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळाले होते.
 • वेटलिफ्टिंग
 • वेटलिफ्टिंगमध्ये प्रदीप सिंहने १०५ किलो वजनी गटात ३५२ किलो (स्नॅच १५२ किलो + क्लीन-जर्क २०० किलो) वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली.
 • भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके पटकावली आहेत.
 • पाचव्या दिवसाअखेर भारताच्या पदकाची संख्या २० झाली आहे. यामध्ये ११ सुवर्ण पदक, ४ रौप्य पदक, ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
 • पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
 • राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेली पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू न्यूझीलंडची भारोत्तोलनपटू लारेल हबार्डला खांद्याचे हाड सरकल्यामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
 • ४० वर्षीय लारेल हबार्डने एक दशकापूर्वी लिंग बदल केला होता. हबार्ड ९० किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३२चा विक्रम नोंदवण्याच्या प्रयत्नात होती, पण तिच्या खांद्याचे हाड सरकले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा