चालू घडामोडी : १२ मे

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे व्यक्ती : पवनकुमार चामलिंग

 • भारतातील घटकराज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान पवनकुमार चामलिंग यांनी मिळवला आहे.
 • २१ मे २०१४ रोजी सलग पाचव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सिक्किम राज्याचे गेली २३ वर्षे ५ महिने इतका प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत.
 • त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकेकाळचे आधारस्तंभ असलेल्या पश्चिम बंगालचे मुख्यमत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. त्यांनी सलग २३ वर्षे पश्चिम बंगालची धुरा सांभाळली होती.
 • सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे संस्थापक असलेल्या ६८ वर्षीय पवन चामलिंग यांनी डिसेंबर १९९४मध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली.
 • ‘नवे सिक्कीम, आनंदी सिक्कीम’ या आपल्या घोषणेद्वारे त्यांनी राज्याचा कायापालट केला.
 • सिक्कीममधील याँगयाँग येथे जन्मलेल्या चामलिंग यांनी वयाच्या २२व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला.
 • १९८३मध्ये याँगयाँगचे सरपंच झाले, तेथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. १९८५मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
 • दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर मंत्रिमंडळात उद्योगखात्याची जबाबदारी त्यांच्या सोपविण्यात आली. १९८९ ते ९२ या काळात नरबहादूर भंडारी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.
 • १९९३मध्ये त्यांनी सिक्कीम डेमॉक्रेटिक फ्रंटची स्थापना केली. त्यानंतर १९९४, १९९९, २००४, २००९ व २०१४ अशा सलग ५ वेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला आहे.
 • १६ मे १९७५ रोजी सिक्किमचा भारतात २२वे राज्य म्हणून समावेश झाला. राज्याच्या गेल्या ४३ वर्षांमध्ये २३ वर्षे एकट्या चामलिंग यांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.
 सिक्कीमची प्रगती 
 • सिक्किमची लोकसंख्या केवळ ६ लाख इतकी असून लवकरच या राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन होत आहे.
 • उघड्यावर शौच करण्याची प्रथा बंद करणारे सिक्किम हे पहिले राज्य बनले. २००८सालीच ही समस्या सिक्किमने मोडित काढली.
 • २०१६च्या एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार सिक्किममध्ये ९८.२ टक्के घरांमध्ये शौचालये असून सर्व नागरिक बंद शौचालयांचा वापर करतात.
 • सिक्किममध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.
 • १९९८मध्ये सिक्किमने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली तसेच प्लास्टिक बाटल्यांचा वापरही कमी करणारे ते देशातले पहिले राज्य आहे.
 • २०१६साली सिक्किमने सरकारी कार्यालये, सरकारी कार्यक्रमांमध्ये बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यास बंदी घातली. तसेच स्टायरोफोम आणि थर्मोकोलच्या वस्तू, भांडी, प्लेट्स वापरण्यावरही येथे बंदी आहे.
 • सिक्किममध्ये चामलिंग सरकारने सर्व नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवल्या असून, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
 • चामलिंग यांच्या धोरणांमुळे गेली अनेक वर्षे सेंद्रिय शेतीकडे या राज्याने कटाक्षाने लक्ष दिले. परिणामी आज संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती केली जाते.
 • त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी २ वर्षांपूर्वी सिक्कीम हे देशातील पहिले ‘सेंद्रिय राज्य’ म्हणून जाहीर केले.

मलेशियाच्या पंतप्रधानपदी ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद

 • निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
 • राजे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी महाथीर मोहम्मद यांना पंतप्रधानपदाची अधिकृतपणे शपथ दिली.
 • जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ते ओळखले जातील.
 • यापूर्वी महाथीर यांनी जवळपास २२ वर्षे मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले होते. मात्र २००३ साली त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
 • महाथिर यांनी २२२ पैकी ११३ जागांवर विजय मिळवला. तर मावळते पंतप्रधान नजीब रजाक यांच्या बँरिसन नँशनल आघाडीला केवळ ७९ जागा मिळाल्या.
 • नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. १ एमडीबी योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 • त्यामुळे नजीब रजाक आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

रवी व्यंकटेशन यांचा इन्फोसिसच्या संचालकपदाचा राजीनामा

 • देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदाचा रवी व्यंकटेशन यांनी राजीनामा दिला आहे.
 • इन्फोसिससारखी एक भक्कम कंपनी आता एका चांगल्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया देत व्यंकटेशन यांनी सोडचिठ्ठी दिली.
 • इन्फोसिसमध्ये सहअध्यक्ष राहिलेले कृष्णन हे इन्फोसिसच्या संचालक मंडळात २०११मध्ये सहभागी झाले होते.
 • त्याचबरोबर ते यापूर्वी मायक्रोसॉफ्ट इंडिया, कमिन्स इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. रॉकफेलर फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर ते सध्या आहेत.

क्ले कोर्टवर सलग ५०वा सामने जिंकण्याचा नदालचा विक्रम

 • स्पेनच्या राफेल नदाल याने क्ले कोर्टवर सलग ५०वा सामना जिंकून जॉन मॅकेन्रो यांचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
 • मॅकेन्रो यांनी १९८४मध्ये माद्रिद इनडोअर स्पर्धेत विजेतेपद मिळवत क्ले कोर्टवर सलग ४९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
 • नदालने माद्रिद खुल्या स्पर्धेतच दिएगो श्वार्टझमन याच्यावर ६-३, ६-४ असा विजय नोंदविला आणि क्ले कोर्टवर सलग ५०वा सामना जिंकण्याची किमया साधली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा