चालू घडामोडी : १३ मे

‘न्यूड’ला न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान

 • रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळविला आहे.
 • तर याच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी मुळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
 • या महोत्सवाचे उद्घाटन ‘न्यूड’ या चित्रपटानेच करण्यात आले होते. या सन्मानामुळे पुन्हा एकदा मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे.
 • १८वा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या विलेज ईस्ट सिनेमा येथे ७ ते १२ मे दरम्यान पार पडला.
 • या महोत्सवात ‘न्यूड’ला दोन नामांकने होती. त्या दोन्ही नामांकनांमध्ये चित्रपटाने पुरस्कार मिळविले. 
 • या महोत्सवाचा समारोप अभिनेता राजकुमार रावच्या ‘ओमेर्ता’ या चित्रपटाने झाला.
 • गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी सिनेमांना एंट्री देण्यात आली होती. त्यात ‘न्यूड’ला एंट्री देऊन नंतर प्रवेश नाकारला होता.
 • त्यानंतर बराच वादही निर्माण झाला होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध केला गेला. मात्र अशातही चित्रपटाने त्याचे महत्त्व पटवून दिले आहे.
 • नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कल्याणी मुळे, छाया कदम आणि मदन देवधर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

उपराष्ट्रपतींचा मध्य व दक्षिण अमेरिकेचा दौरा

 • पेरु आणि भारत यांच्या राजनयीक संबंधाना यंदा ५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू शिष्टमंडळासह पेरु देशाच्या दौऱ्यावर गेले.
 • नायडू यांनी या भेटीमध्ये पेरूचे पंतप्रधान सीजर विलियनुएवा बार्डालेस तसेच त्यांच्या चार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
 • या भेटीमध्ये भारत व पेरु या दोन्ही देशांनी जेनेरिक औषधे, माहीती आणि तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, लष्करी साहित्य. अंतराळ मोहिमांमधील उपकरणे यांबाबत एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
 • पाच दिवसांच्या या दौऱ्यामध्ये उपराष्ट्रपतींनी मध्य व दक्षिण अमेरिकेतील पेरुसह पनामा आणि ग्वाटेमाला या देशांनाही भेटी दिल्या.
 • या तिन्ही देशांचे भारताशी असणारे संबंध वृद्धींगत व्हावे या त्यांच्या दौऱ्यामागचा उद्देश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा