चालू घडामोडी : २९ मे

सुधा बालकृष्णन आरबीआयच्या पहिल्या सीएफओ

  • ‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तत्कालिन डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेत सप्टेंबर २०१६मध्ये मध्यवर्ती गव्हर्नर झाल्यानंतर मुख्य वित्तीय अधिकारी पदनिर्मिती हा मोठा फेरबदल आहे.
  • आक्टोबर २०१७मध्ये बँकेत हे पद भरण्याबाबतचे सुतोवाच प्रथम करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय कामगिरीचे नेतृत्व या पदाकडे असेल.
  • सुधा बालकृष्ण या ‘एनएसडीएल’ या देशातील पहिल्या मोठय़ा डिपॉझिटरी सेवा कंपनीच्या पहिल्या ज्येष्ठ महिला अधिकारी राहिल्या आहेत.
  • रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळातील सुधा या आता १२व्या संचालक असतील. पुढील ३ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.

मिझोराम राज्यपालपदी कुम्मानम राजशेखरन

  • मिझोरामचे राज्यपाल म्हणून केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी २९ मे रोजी शपथ घेतली. मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ २८ मे रोजी संपला.
  • गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजीत सिंह यांनी राजशेखरन यांना पदाची शपथ दिली.
  • यावेळी मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानहावला यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
  • २०१४मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी १९७०मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. २०१५मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नासिरुल मुल्क पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

  • पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नासिरुल मुल्क यांचे नाव देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूक नियोजित आहे. सध्याच्या सरकारचा कार्यकाल ३१ मे रोजी संपत आहे.
  • त्यामुळे नासिरुल मुल्क हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत साधारण अडीच महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार चालवतील.
  • संसद विसर्जित झाल्यापासून नवीन सरकार येईपर्यंत देशाचा कारभार योग्य रीतीने चालविणे हे काळजीवाहू पंतप्रधानाचे काम असते.
  • त्यांच्याकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.
  • काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव निश्चित करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेले काही आठवडे मतभेद सुरू होते.
  • सुमारे सहा बैठका झाल्यानंतर मुल्क यांच्या नावावर एकमत झाले. मुल्क हे २०१४मध्ये पाकिस्तानचे २२वे सरन्यायाधीश होते.
  • पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान : शाहिद खकान अब्बासी

पतंजली टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे वृत्त खोटे

  • बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी बीएसएनएलसोबत हातमिळवणी करत आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे प्रसिध्द झालेले वृत्त खोटे असल्याची माहिती समोर आली आहे.
  • पतंजलीने बीएसएनएलसोबत फक्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करार केला असून, पतंजली कोणतेही सिमकार्ड लाँच करत नाहीये. पतंजली फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना ‘स्वदेशी समृद्धी सिमकार्ड’ देणार आहे.
  • बीएसएनएल पंतजलीच्या कर्मचाऱ्यांना १४४ रुपयांचा प्लान देणार आहे. ज्यात अनलिमिटेड कॉल, एसटीडी, रोमिंग तसंच दिवसाला २जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत.
  • पतंजलीचे सिमकार्ड हे कंपनीच्या स्वदेशी मोहिमेचा भाग आहे, ज्यामध्ये भारतीय सेवा आणि सुविधांना प्राधान्य दिले जाते.
  • पतंजलीने बीएसएनएलसोबत हातमिळवणी केल्याने त्यांच्या स्वदेशी मोहिमेला हातभार लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा