चालू घडामोडी : ९ जून

सिमोना हालेपला फ्रेंच ओपनचे जेतेपद

  • फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रोमानियाच्या सिमोना हालेपने अमेरिकेच्या स्लोन स्टिफन्सला नमवत फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले.
  • सिमोनाचे कारकिर्दीतील हे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. तिने स्टिफन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला.
  • याआधी हालेपने तीनवेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तिला जेतेपदाने हुलकावणी दिली होती.
  • तिने २०१४ आणि २०१७मध्ये फ्रेंच ओपनमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. तर यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमच्या फानलमध्ये तिला कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
  • मागील ४० वर्षांत ग्रॅण्डस्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे.

फ्लाइट्स कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

  • पोलंडमधील साहित्य वर्तुळात मोठा दबदबा असलेल्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांच्या ‘फ्लाइट्स’ या कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  • हा पुरस्कार मॅन बुकर पुरस्काराचाच एक भाग असून, तो इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो.
  • ‘फ्लाइट्स’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर हे जेनिफर क्रॉफ्ट यांनी केले असून, या पुरस्काराची ५० हजार पौंडाची रक्कम दोघींना समान वाटली जाणार आहे.
  • मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ओल्गापहिल्या पोलिश लेखिका आहेत. १०० कादंबऱ्यातून त्यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली.
  • त्यांच्या ‘फ्लाइटस’ या कादंबरीला यापूर्वी पोलंडचा सर्वोच्च नाइके साहित्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जर्मन पोलिश इंटरनॅशनल ब्रिज पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
  • ओल्गा यांना लेखिका म्हणून मोठे व्यावसायिक यश मिळाले आहे. त्यांची ओळख ही केवळ लेखक एवढीच नसून, त्या कार्यकर्त्या व विचारवंतही आहेत.
  • त्यांनी वॉर्सा विद्यापीठातून मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले असून, त्यांच्या कादंबऱ्या, कविता प्रसिद्ध आहेत.
  • ओल्गा यांची रूटा नावाची खासगी प्रकाशन कंपनी आहे. त्या ‘द ग्रीन्स’ या पर्यावरणवादी राजकीय पक्षाच्या सदस्य असून डाव्या विचाराच्या आहेत.
  • पोलंडमधील प्रचलित उजव्या राजकारणाच्या टीकाकार म्हणून दुसरीकडे त्या बदनामही आहेत. त्यांच्या मतांनी देशात खळबळ उडवली आहे.

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

  • आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशन मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४००वे रेल्वे स्टेशन ठरले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ‘रेलवायर’ या वाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती.
  • ही सेवा ४०० स्टेशनवर सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते व त्यासाठी डिसेंबर २०१८पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
  • या सेवेसाठी रेल्वेने ‘रेलटेल’ नावाची स्वतंत्र उपकंपनी सुरु केली आहे. दररोज सुमारे ८ कोटी लोक या मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेतात.

७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार

  • प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारासाठी ७ खासदारांची निवड करण्यात आली असून, यामधील ५ खासदार महाराष्ट्राचे आहेत.
  • महाराष्ट्रातील ज्या ५ खासदारांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे.
  • या सर्व खासदारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चेन्नईत आयआयटीच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
  • माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
  • लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम टाईम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन ‘प्रिसेन्स’च्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांची उपस्थिती, त्यांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली जाते.

स्मिथ कॉलेजच्या पहिल्या महिला अध्यक्ष जिल केर कॉन्वे यांचे निधन

  • अमेरिकेतल्या स्मिथ कॉलेजच्या अध्यक्षपदी (कुलगुरूंच्या समकक्ष पद) विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला जिल केर कॉन्वे यांचे १ जून रोजी निधन झाले.
  • स्मिथ कॉलेज ही अमेरिकेतली महिलांना कला शिक्षण देणारी १०० वर्षे जुनी व सगळ्यात मोठी संस्था आहे.
  • मुळच्या ऑस्ट्रेलियातून असलेल्या जिल यांचे शिक्षण सिडनी विद्यापीठात झाले. राजनीती, कायदे, शास्त्र, कला अशा फक्त पुरुषांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांना वाव मिळावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
  • स्त्रियांसाठीचे उच्च शिक्षण बाहेरच्या व्यावसायिक क्षेत्रांच्या गरजांशी जोडले गेलेले नव्हते. ते जोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
  • स्मिथमध्ये अनेक विषयांसाठी पुरुष प्राध्यापकांचीच संख्या एक तृतीयांश होती. याकडे लक्ष वेधून त्यांनी स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक बदल केले.
  • १९८५मध्ये स्मिथमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नायकी, मेरिल लिंच, कोलगेट पामोलिव्ह, लेंडलीज अशा बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम केले.
  • अमेरिकेतील एमआयटी (मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये त्या अभ्यागत प्राध्यापक होत्या.
  • ऑस्ट्रेलियातील ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सर्वोच्च सन्मान (२०१३) आणि अमेरिकी सरकारतर्फे ‘नॅशनल ह्य़ुमॅनिटीज मेडल’ असे मान त्यांना मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा