चालू घडामोडी : ३१ ऑक्टोबर

पंतप्रधानाच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे लोकार्पण केले.
  • ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वी जयंती साजरी केली जात आहे.
  • या लोकार्पण सोहोळ्याआधी गंगा, यमुना आणि नर्मदेसहीत देशातील ३० नद्यांच्या पवित्र जलाने सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला.
  • १ नोव्हेंबरपासून पर्यटकांना हा पुतळा पाहाता येणार आहे. हा पुतळा गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्ट्ये

  • सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याची उंची १८२ मीटर (५९७ फुट) आहे. तर या पुतळ्याचे वजन १७०० टन आहे.
  • हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याच्या पायांची उंची ८० फूट, हाताची उंची ७० फूट आहे.
  • नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची निर्मिती लार्सन आणि टुब्रो कंपनीने केली आहे.
  • स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. राम सुतार हे त्यांच्या खास शैलीच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक पुतळे जगातील विविध देशांमध्ये आहेत.
  • चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उंची १५३ मीटर आहे. हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच पुतळा मानला जायचा, मात्र ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने त्याचा पुतळ्याचाही रेकॉर्ड मोडला आहे.
  • ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती ३३ महिन्यात करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.
  • सरदार पटेल यांचे हे शिल्प साकारण्यासाठी सुमारे २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च आला आहे.
  • या भव्य पुतळय़ाखाली एका सफेद रंगाच्या पाटीवर देशी-विदेशी भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लिहिले आहे. यात वेगवेगळय़ा हिंदुस्थानी भाषासुद्धा आहेत. परंतु यात मराठीचा समावेश नाही.
  • या पुतळ्याचे काम ३१ ऑक्टोबर २०१३मध्ये सरदार पटेल यांच्या १३८व्या जयंती दिनी सुरु करण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

सरदार वल्लभभाई पटेल

  • सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी तर मृत्यू १५ डिसेंबर १९५० रोजी झाला. ते भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांना भारताचे बिस्मार्क म्हणूनही ओळखले जाते.
  • त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.
  • वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे ते पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले.
  • या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.
  • फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.
  • मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
  • तसेच, ते आधुनिक अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यासाठी भारताच्या नागरी सेवकांचे प्रेरणा दूत (Patron Saint) म्हणून देखील ओळखले जातात.
  • त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. तसेच १९९१साली त्यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • २०१४पासून सरदार पटेल यांचा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.

३१ ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिवस

  • देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन ३१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले जाते.
  • भारतीय स्वातंत्र्य आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करण्याच्या दिशेने सरदार पटेल यांच्या योगदानाबद्दल जागृती निर्माण करणे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
  • स्वातंत्र्यानंतर भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेण्यात सरदार पटेल यांनी महत्वाची भूमिका पार पडली होती.
  • याशिवाय हैद्राबाद संस्थानाला भारतात विलीन करून घेण्यातही त्यांची भूमिका फार महत्वाची होती.
  • त्यांना भारताचे लोहपुरूष आणि भारताचे बिस्मार्क म्हणूनही ओळखले जाते. ते देशाचे ते पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आहेत.
  • दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार पटेल यांच्या विचारांच्या व कार्याच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय एकता किंवा एकात्मता दिवस’ साजरा करण्याचा निर्णय सरकारने २०१४साली घेतला.

पंकज अडवाणीला आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने चीन येथे सुरु असलेल्या आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पंकज अडवाणीने प्रतिस्पर्धी चीनचा जु रेती याला ६-१ असे पराभूत केले.
  • आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे हे भारतासाठीचे पहिले विजेतेपद ठरले. पंकज अडवाणी हि स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

रूपम शर्मा याला स्टार्ट अप पुरस्कार

  • २३ वर्षीय भारतीय तरुण रूपम शर्मा याला बर्लिनमध्ये जागतिक आरोग्य शिखर बैठकीचा २०१८मधील स्टार्ट अप पुरस्कार मिळाला.
  • बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान त्याने विकसित केल्याबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • गेल्या ३ वर्षांत त्याने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवकल्पना वापरून जी निर्मिती केली, त्यामुळे त्याची तुलना स्टीव्ह जॉब्ज व एलोन मस्क यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिक-तंत्रज्ञांशी होत आहे.
  • अलीकडेच दृष्टिहीनांसाठी मॅनोव्ह्यू ही प्रणाली त्याने विकसित केली असून त्यामुळे आता छापील मजकूर वाचण्यासाठी ब्रेल लिपीची गरज उरणार नाही.
  • रूपमने दृष्टी बुद्धिमत्तेचा वापर करून वेगळ्या पद्धतीने अंधांना वाचनाची सुविधा निर्माण करून दिली आहे.
  • याच प्रणालीला २०१५मध्ये मायक्रोसॉफ्ट इमॅजिन करंडक व नंतर याहू असेंशुअर इनोव्हेशन जॉकीज पुरस्कार मिळाला होता.
  • हरयाणातील फरिदाबाद येथे शिकलेल्या रूपमने तेथील मानव रचना विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
  • रूपमला रंगांध व्यक्तींसाठी सुरुवातीला गेम तयार करायचा होता. त्यासाठी त्याने संशोधन सुरू केले.
  • ब्रेल लिपीनंतर अंधांच्या साक्षरतेसाठी फारसे काम झालेले नाही, हे त्याच्या लक्षात आले. त्यातून त्याने ‘मानवरचना इनक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर’च्या मदतीने अंधांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला.
  • त्यातून मॅनोव्ह्यू हे उपकरण तयार झाले. हे उपकरण हातमोज्यांसारखे हातात घालता येते. त्यात कॅमेरा असून तो सर्व मजकूर वाचतो व त्याचे आवाजात रूपांतर करतो.
  • जर वाटेत अडथळे असतील, तर कंपनांच्या माध्यमातून हे उपकरण इशारा देते. शिवाय, यामुळे दृष्टिहीनही मोबाइल-संदेश पाठवू शकतात.
  • त्याने आरोग्य क्षेत्रासाठी ‘फिजिओ’ हे उपकरण तयार केले असून, त्यातून आरोग्य उद्योगाला विशेषतः फिजिओथेरेपिस्टला फायदा होणार आहे. मायक्रोसॉफ्टचा किनेक्ट संवेदक यात वापरला आहे.
  • एमआयटी टेक रुव्ह्यूने त्याचा २०१६मध्ये गौरव केला असून त्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारही मिळाला होता.

एचडीएफसी बँकेच्या सीईओपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती

  • देशातील आघाडीच्या खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
  • याबाबत बँकेने २२ ऑक्टोबरला मागितलेल्या परवानगीला रिझव्‍‌र्ह बँकेने मान्यता दिली आहे.
  • १ नोव्हेंबर २०१८पासून ही नियुक्ती पुढील २ वर्षांसाठी असेल. पुरी यांच्या ५ वर्षे नियुक्तीला बँकेच्या भागधारकांनी २०१५मध्ये मंजुरी दिली होती.
  • मुख्याधिकारीपदाबरोबरच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार पुरी यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२०पर्यंत असेल.
  • बँक अस्तित्वात आल्यापासून पुरी हे एचडीएफसी समूहाबरोबर आहेत. कोणत्याही खाजगी बँकेच्या प्रमुखपदावर सर्वाधिक काळ राहिलेले ते अधिकारी ठरले आहेत.

इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारताने ७७व्या स्थानी

  • ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने ७७वे स्थान पटकावले आहे.
  • जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभ असलेल्या देशांच्या या क्रमवारीत गतवर्षी भारत १००व्या क्रमांकावर होता.
  • व्यवसायांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या १९० देशांची क्रमवारी जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येत असते.
  • या क्रमवारीमध्ये २०१४साली भारत १४२व्या क्रमांकावर होता. त्यानंतरच्या काळात भारताने या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे.
  • गतवर्षी या क्रमवारीत भारताने ३० स्थानांनी प्रगती केली होती. भारताची या क्रमवारीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी झेप होती.
  • यावर्षीही भारताच्या क्रमवारीत २३ स्थानांची प्रगती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत पुढच्या २ वर्षांत अव्वल ५० देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • गेल्या २ वर्षात भारताच्या क्रमवारीत ५३ स्थानांची सुधारणा झाली आहे. तर गत ४ वर्षात भारताच्या क्रमवारीत ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे.
  • या अहवालात भारताला सर्वाधिक सुधारणा झालेल्या अव्वल १० देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
  • या यादीतील भारताच्या शेजारी देशांचे स्थान: भूटान (८१), श्रीलंका (१००), नेपाळ (११०), मालदीव (१३९), पाकिस्तान (१३६), अफगाणिस्तान (१६७), बांग्लादेश (१७६).
  • या यादीतील अव्वल १० देश: न्यूजीलँड, सिंगापूर, डेन्मार्क, हाँगकाँग, चीन, कोरिया रिपब्लिक, जॉर्जिया, नॉर्वे, अमेरिका, यूनाइटेड किंगडम आणि मॅसिडोनिया.

जागतिक बँक

  • स्थापना: १९४४
  • मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी
  • जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ती विकसनशील व अविकसित देशांना विकासासाठी कर्जपुरवठा करते. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
  • विकसनशील व अविकसित देशातील सरकारांचे सबलीकरण, अर्थव्यवस्थांचा विकास, गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विशेष प्रयत्नशील आहे.
  • जागतिक बँकेचे दोन प्रमुख भाग आहेत: आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय विकास संघ.

संरक्षण मंत्रालयाचा जीआरएसईसोबत सर्वेक्षण व्हेसलसाठी करार

  • संरक्षण मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनीयर्स (जीआरएसई) या कंपनीसोबत ४ सर्वेक्षण व्हेसलच्या बांधणीसाठी २४३५.१५ कोटी रुपयांचा करार केला आहे.
  • हा प्रकल्प ५४ महिन्यांत पूर्ण होईल. या करारांतर्गत पहिले व्हेसल ३६ महिन्यात हस्तांतरित केले जाईल तर उर्वरित व्हेसल्स प्रत्येक ६-६ महिन्यांनी प्राप्त होतील.
  • हे सर्वेक्षण व्हेसल ११० मीटर लांब असेल. याची जलविस्थापन क्षमता ३,३०० टन असेल. हे व्हेसल्स आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या प्रदूषण मानकांशी अनुकूल असतील.
  • या व्हेसलमध्ये आधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणे आणि सेंसरचा वापर करण्यात येईल. यात अत्याधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर उतरविण्याची सुविधाही असेल.
  • बंदरे, नेव्हिगेशन चॅनेल आणि खोल पाण्यातील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणांसाठी या व्हेसल्सचा वापर केला जाईल.
  • विशेष आर्थिक क्षेत्राच्या (SEZ) सर्वेक्षणासाठीही यांचा उपयोग होईल. सागरी आणि भूगर्भीय माहितीच्या संकलनासाठीही हे व्हेसल्स उपयुक्त ठरतील.
  • या व्यतिरिक्त संरक्षण आणि बचाव कार्य, समुद्री संशोधन इत्यादींसाठीदेखील यांचा वापर केला जाणार आहे.

गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनीयर्स

  • गार्डन रीच शिपबिल्डर अँड इंजिनियर (जीआरएसई) हा सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आहे.
  • भारतातील अग्रगण्य सरकारी जहाज निर्मात्यांपैकी हा एक असून, तो कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे स्थित आहे.
  • हे शिपयार्ड व्यावसायिक आणि नौसेना व्हेसल्सची उत्पादन व दुरुस्ती करते. आता ते निर्यात जहाजांची बांधणीही करत आहेत.
  • १८८४साली हुगळी नदीच्या शेजारी एक लहान खाजगी कंपनी म्हणून जीआरएसईची स्थापना केली गेली.
  • १९१६मध्ये त्याचे नाव गार्डन रीच वर्कशॉप असे ठेवले गेले. १९६०मध्ये सरकारद्वारे जीआरएसईला राष्ट्रीयकृत केले गेले.
  • सध्या जीआरएसई भारताच्या मिनीरत्न कंपन्यांपैकी एक आहे. १०० लढाऊ जहाजे तयार करणारे हे पहिलेच भारतीय शिपयार्ड आहे.
  • सध्या हे शिपयार्ड P१७A प्रकल्पाखाली भारतीय नौसेनेसाठी ३ स्टील्थ फ्रिगेट्स तयार करीत आहेत.

मलाला युसुफझाई यांचा हॉर्वर्ड विद्यापीठाकडून सन्मान

  • नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफझाई यांना मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल हॉर्वर्ड विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात येणार आहे.
  • ६ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांचा ग्लिट्समॅन पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. सध्या मलाला युसुफझाई सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात विद्यार्थी आहेत.
  • ग्लिट्समॅन पुरस्कारांतर्गत जगातील जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना १.२५ लाख डॉलर्सची रक्कम पुरस्कार्स्वरूप देण्यात येईल.

मलाला युसुफझाई

  • जन्म: १२ जुलै १९९७
  • मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे.
  • मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती.
  • या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.
  • २०१२मध्ये शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर ३ गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेली मलाला या हल्ल्यातून बचावली.
  • मलालावरील या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला.
  • ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले. ‘आय एम मलाला’ हे तिचे आत्मचरित्र आहे.
  • २०१४मध्ये तिला नोबेल शांतता पारितोषिक भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी मलाला हा सर्वात तरुण व्यक्ती आहे.

तुर्कस्तानमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ

  • तुर्कस्तानची राजधानी इस्तांबुलमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ बांधण्यात आले आहे. या विमानतळाचे उद्घाटन २९ ऑक्टोबरला तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांच्या हस्ते करण्यात आले.
  • जवळपास ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेले हे विमानतळ १९ हजार एकर परिसरात पसरले आहे.
  • एकावेळी २५० एअरलाइन्स ३५०पेक्षा जास्त जागांवरून उड्डाणे करतील असे हे विमानतळ असून संपूर्ण अत्याधुनिक बनविण्यात आले आहे.
  • या विमानतळावर ऑर्टिफीशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याचबरोबर, विमानतळ एटीसी ट्युलिप डिझाइनमध्ये करण्यात आले आहे.
  • या विमानतळाची निर्मिती करण्यासाठी जवळपास १० वर्षांचा कालावधी लागला आहे. तसेच, या विमानतळाचे बांधकाम करतेवेळी ३० कामगारांचा मृत्यू झाला होता.
  • हे विमानतळ बांधण्यासाठी ३५ हजारहून अधिक कामगार आणि ३ हजार अभियांत्याचे योगदान लाभले आहे.
  • २०२८पर्यंत या विमानतळावरुन २० कोटी लोक प्रवास करु शकणार आहेत. जगात सध्या अटलांटा विमानतळावरुन १० कोटी लोक प्रवास करतात.

३१ ऑक्टोबर: जागतिक नगर दिन

  • ३१ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक नगर (शहर) दिन म्हणून साजरा केला जातो. (World Cities Day)
  • वाढती लोकसंख्या आणि समस्यांवर मात करून नियोजित आणि शाश्वत शहरी जीवनासाठी कार्य करणे, हा या दिनाचा उद्देश आहे.
  • जागतिक शहरीकरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये सहकार्य वाढविणे आणि शाश्वत शहरी विकासात योगदान देणे, या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.
  • जागतिक स्तरावर वर्ल्ड सिटीज डे २०१८ युनायटेड किंगडम मधील लिव्हरपूलमध्ये साजरा केला गेला.
  • यावर्षीच्या जागतिक नगर दिनाची मुख्य संकल्पना ‘शाश्वत आणि संवेदनक्षम शहरांची उभारणी’ (Building Sustainable and Resilient Cities) ही होती.
  • विविध धोक्यांपासून शहरांना सुरुक्षित ठेवण्याकरिता संवेदनक्षम शहरे निर्माण करण्यावर भर देणे, हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
  • डिसेंबर २०१३मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने वर्ल्ड सिटीज दिनाची स्थापना केली होती. हा दिन साजरा करण्यामागची मूळ संकल्पना ‘उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट जीवन’ (Better City, Better Life) ही आहे.

चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर

आयआयटी मद्रासमध्ये देशातील पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित

  • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. या मायक्रोप्रोसेसरला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे.
  • या मायक्रोप्रोसेसरचा उपयोग मोबाइल कम्प्युटिंग उपकरणे, कमी उर्जा वापरणाऱ्या वायरलेस प्रणाली आणि नेटवर्किंग प्रणाली यामध्ये करता येणार आहे.
  • या मायक्रोप्रोसेसरचे डिझाइनपासून सर्व काही आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
  • या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप चंदीगड येथील सेमी-कंडक्टर प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा भारताच्या अंतराळ विभागांतर्गत कार्य करते.
  • ही प्रयोगशाळा देशाच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या संशोधन आणि विकासासाठी कार्य करते.
  • भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून, यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल.
  • भारतात बनलेला मायक्रोप्रोसेसर १८० एनएमचा आहे. तर अमेरिकेत बनवला जाणारा प्रोसेसर २० एनएमचा आहे.
  • १८० एनएमचा मायक्रोप्रोसेसर कालबाह्य झाला असला तरी आजही जगातील अनेक अॅप्लिकेशन्समध्ये आवश्यक आहे. पारंपारिक ऊर्जा उपलब्ध असलेल्या प्रत्येक अॅप्लिकेशनमध्ये ही चीप उपयोगात येऊ शकते.
  • अमेरिकेत बनवलेल्या मायक्रोप्रोसेसरला कमी ऊर्जा लागते तसेच ते मोबाइलमध्ये वापरता येऊ शकतात.
  • आयआयटी मद्रासने बनवलेल्या शक्ती मायक्रोप्रोसेसरने भारतीय उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • आयआयटी मद्रास ही चेन्नई (तमिळनाडू) येथे स्थित भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षण संस्था आहे. तिची स्थापना १९५९मध्ये पश्चिम जर्मनीच्या सहाय्याने करण्यात आली होती.

निधन: ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव

  • मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे ३० ऑक्टोबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • मराठी चित्रपटगीत, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.
  • यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते.
  • जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
  • भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, असेन मी नसेन मी, अखेरचे येतील माझ्या, दिवस तुझे हे फुलायचे अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते.
  • आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. त्यामुळे संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.
  • आकाशवाणीवर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.
  • भावसरगम, असे गीत जन्मा येते, शब्दप्रधान गायकी, रियाजाचा मंत्र असे कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले.
  • शब्दप्रधान गायकीचे उद्गाते अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी संगीतकार म्हणून अनेक अविस्मरणीय गाणी दिलीच, पण याबरोबरच गीतकार-कवी म्हणून त्यांची ओळखही रसिकांना भावली.
  • ग. दि. माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
  • त्यांना गदिमा पुरस्कार, गासम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
  • त्यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी
  • या जन्मावर या जगण्यावर
  • जीवनात ही घडी अशीच राहु दे
  • भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
  • दिवस तुझे हे फुलायचे
  • येशिल येशिल येशिल राणी
  • अशी पाखरे येती आणिक
  • असेन मी नसेन मी
  • कुठे शोधिसी रामेश्वर
  • ठुमकत आल्या किती गौळणी
  • काही बोलायाचे आहे
  • डोळ्यात सांजवेळी आणू
  • गणपती तू गुणपती तू
यशवंत देव यांनी लिहिलेली काही गाणी
  • जीवनात ही घडी अशीच राहू दे
  • कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
  • माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे
  • कामापुरता मामा
  • स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
  • अरे देवा तुझी मुले अशी
  • दिवाळी येणार अंगण सजणार
  • मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही
  • रात्रिच्या धुंद समयाला

ओडिशामध्ये नैसर्गिक आपत्तींची धोक्याची सूचना देणारी प्रणाली

  • ओडिशा सरकारने चक्रीवादळ, त्सुनामी, महापूर इत्यादी या नैसर्गिक आपत्तींची धोक्याची सूचना नागरिकांना देण्यासाठी एक प्रणाली सुरू केली आहे.
  • ‘क्विक वॉर्निंग ट्रान्समिशन सिस्टम’ क्षेत्रामध्ये या प्रकारची ही पहिली प्रणाली आहे. जागतिक बँकेच्या मदतीने ८२ कोटी रुपये खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • आपत्कालीन स्थितीत सायरनसाठी ओडीशाच्या ४८० किमी लांब किनारपट्टीवर १२२ टॉवर्स उभारण्यात आले आहेत.
  • या टॉवरमधून १.५ किलोमीटरच्या परिसरात धोक्याच्या सूचनेसाठी सायरनचा आवाज पोहचविला जाऊ शकतो.
  • ही प्रणाली राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम निम्नीकरण प्रकल्पाचा भाग आहे. याद्वारे लोकांचे चक्रीवादळांपासून संरक्षण होणार आहे. तसेच मच्छीमारांसाठीही ही यंत्रणा उपयोगी ठरेल.
ओडिशामधील नैसर्गिक आपत्ती
  • ओडिशा राज्याला चक्रीवादळ, त्सुनामी, पूर इत्यादि अनेक आपत्तींचा धोका आहे. ओडिशाचा एक मोठा भाग भूकंप जोखीम क्षेत्र II मध्ये येतो.
  • ओडिशामध्ये १९९९ साली १० हजार लोक चक्रीवादळाने मरण पावले. २०१३मध्ये ओडिशाच्या किनाऱ्यावर फुलिन चक्रीवादळाने थैमान घातले.
  • २०१४मध्ये हुधुद चक्रीवादळ आणि अलीकडे बटरफ्लाय नावाचे चक्रीवादळ ओडिशामध्ये आढळून आले.

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ए. एस. बोपन्ना

  • न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • बोपन्ना यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश ए. के. गोस्वामी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
  • न्यायमूर्ती बोपन्ना यांचा जन्म १९५९मध्ये झाला. १९८४मध्ये त्यांनी वकील म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला.
  • कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनो नागरी, संवैधानिक, सेवा आणि श्रमविषयक बाबींशी संबंधित क्षेत्रामध्ये सेवा केली.
  • त्याशिवाय केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालय
  • हे भारताच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. याची स्थापना १ मार्च १९४८ रोजी करण्यात आली.
  • या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात.
  • गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते. तर इटानगर, कोहिमा व ऐजवाल येथे या न्यायालायाची ३ खंडपीठे आहेत.
  • १९४८मध्ये स्थापन झाल्यानंतर ईशान्य भारतातील सर्व ७ राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते.
  • परंतु मार्च २०१३मध्ये मेघालय, मणिपूर व त्रिपुरा या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली.

मायकल हिग्गिंस आयर्लंडचे नवे राष्ट्रपती

  • मायकल हिग्गिंस यांची आयर्लंडचे राष्ट्रपती म्हणून पुनर्नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली. हिग्गिंस यांचा राष्ट्रपती म्हणून हा सलग दुसरा कार्यकाळ असेल.
  • या निवडणुकीत आयर्लंडचे व्यावसायिक पीटर कैसे दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांना २३.१ टक्के मते मिळाली. इतर ४ उमेदवारांपैकी कोणालाही १० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत.
  • या निवडणुकीत मायकल हिग्गिंस यांनी एकतर्फी विजय मिळवला. ते ११ नोव्हेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • हिग्गिंस यांचा जन्म १८ एप्रिल १९४१ रोजी आयर्लंडमध्ये झाला. नोव्हेंबर २०११मध्ये ते आयर्लंडचे ९वे राष्ट्रपती झाले.
  • जुलै १९९० ते मे १९९१ दरम्यान ते गॅलवेचे मेयर होते. १९९४ ते १९९७ दरम्यान ते कला व सांस्कृतिक मंत्री होते. तर २००३ ते २०११ दरम्यान लेबर पार्टीचे अध्यक्ष होते.
  • हिग्गिंस हे एक कवी आणि लेखकही असून, द बिट्रेयल, द सीजन ऑफ फायर, ॲन एरिड सीजन, न्यू अँड सिलेक्टेड पोयम्स, द प्रोफेट्स आर वीपिंग, कॉजेज फॉर कंसर्न, रिन्यूइंग द रिपब्लिक इत्यादी त्यांच्या साहित्यकृती आहेत.

जपानकडून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारास पाठींबा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यादरम्यान जपानने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारास पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • याबरोबरच जपान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या कराराला पाठींबा देणारा ४८वा देश बनला आहे.
  • तसेच जपान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी करणारा ७१वा देश ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • इंग्रजी: International Solar Alliance (ISA)
  • भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात पॅरिस येथे आयोजित युनायटेड नेशन्स क्लाइमेट चेंज कॉन्फरन्स (COP 21) दरम्यान नोव्हेंबर २०१५मध्ये करणायत आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.
  • याचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये (NISE) स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय अंतर-सरकारी संस्था आहे.
आयएसएची उद्दिष्टे
  • कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या १२१ देशांना या पर्यायी ऊर्जेच्या शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणे.

भारतात वायू प्रदूषणामुळे १.२५ लाख लहान मुलांचा बळी

  • भारतात वायू प्रदूषणामुळे २०१६मध्ये सुमारे १.२५ लाख लहान मुले दगावली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून समोर आले आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या मुद्द्यांच्या संदर्भांत हा अहवाल सादर केला आहे.
  • कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा या निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये ५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सुमारे ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणातून निर्माण झालेल्या हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात जगातील एकूण ५ देशांची नावे आहेत. या ५ देशांमध्ये भारताचेदेखील नाव आहे.
  • भारतात प्रदुषणाचे प्रमाण अधिक आहे. मुख्यतः राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
  • भारतात विशेषतः स्वयंपाकघरात आणि घराबाहेर निर्माण होणारे वायूचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.
  • भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
  • जगातील वायू प्रदूषणाचे २५ टक्के बळी हे भारतातच जातात. तेव्हा येत्या काळात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
  • भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी ४७ हजार लहान मुले वायू प्रदूषणाचे बळी ठरतात.
  • जागतिक वायू प्रदूषणाबाबत ग्रीनपीसनेही १ अहवाल सादर केला आहे. ग्रीनपीस यांनी जारी केलेल्या अहवालात भारताच्या प्रदूषण पातळीची स्थिती खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचा हा वायू प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली आणि देशातील क्षेत्रांत प्रदूषणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटना
  • इंग्रजी: World Health Organization (WHO)
  • स्थापना: ७ एप्रिल १९४८
  • मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड
  • सदस्य: १९३ देश
  • जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.
  • जागतिक स्तरावर लोकांच्या आरोग्याचा स्तर उंचावणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

निधन: उर्दू साहित्यिक काझी अब्दुल सत्तार

  • उर्दू साहित्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, विख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक काझी अब्दुल सत्तार यांचे २९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
  • उत्तर प्रदेशात १९३३साली जन्मलेले अब्दुल सत्तार, विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यावर अध्यापनाकडे वळले.
  • अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ते उर्दूचे ते प्राध्यापक बनले. प्रदीर्घ सेवा बजावून ते १९९१मध्ये तेथूनच निवृत्त झाले.
  • त्यांनी लिहिलेल्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये दारा शिकोह, सलाहुद्दीन अयुबी, खालिद इब्न अल वलिद व गालिब या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
  • अनेक ऐतिहासिक वाचनीय कादंबऱ्यांनी साहित्यात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या साहित्याचा विविध जागतिक भाषांमध्ये अनुवादही झाला आहे.
  • साहित्य क्षेत्रातील भरीव कामाबद्दल त्यांना १९७४मध्ये वयाच्या ४१व्या वर्षीच पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
  • १९७८मध्ये त्यांना गालिब अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच व्यक्ती होते.
  • याशिवाय त्यांना उर्दूतील मीर सन्मानही प्रदान करण्यात आला होता. पश्चिम आशियातील कतारनेही त्यांचा सन्मान केला होता.
  • साहित्य अकादमीसह अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांनीही त्यांच्या जीवन व कार्यावर माहितीपट बनवले.

वर्ध्यामध्ये गांधीवादी विचारसरणी आणि स्वच्छतेवर संमेलनाचे आयोजन

  • केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने २०१९-२०पर्यंत देशाला ‘स्वच्छ भारत’ बनविण्यासाठी गांधीवादी विचारसरणी आणि स्वच्छतेवर संमेलनाचे आयोजन केले.
  • या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात करण्यात आले. यामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता क्षेत्रातील प्राप्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
  • ग्रामीण स्वच्छतेमध्ये योग्य तंत्राचा वापर, जैविक कचरा व्यवस्थापन आणि निवारक स्वच्छता ही या संमेलनातील चर्चेचे मुख्य मुद्दे होते.
  • गांधीजींचे ‘स्वच्छ आणि स्वावलंबी संकुल’ ही या संमेलनाची मुख्य संकल्पना होती. या संमेलनाचा समारोप सेवाग्राम आश्रमच्या भेटीने झाला. गांधीजींच्या जीवनातून अनुभव प्राप्त करणे, हा त्यामागील उद्देश होता.
स्वच्छ भारत अभियान
  • भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेला हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
  • २०१९पर्यंत गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी या मोहिमेची सुरूवात केली.
  • स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.
  • ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.
  • भारताच्या शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
  • सार्वजनिक शौचालय निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, जनजागृती, क्षमता निर्माण हे या अभियानाचे मुख्य भाग आहेत.
  • हे एक प्रकारे जन आंदोलन असून, हे अभियान सुरु झाल्यानंतर देशातील स्वच्छतेचा स्तर उंचावला आहे.
  • स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर

९२व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे

  • यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.
  • साहित्य संमेलनाच्या ९ दशकांच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा बहुमान लाभलेल्या त्या पाचव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.
  • यापूर्वी ज्येष्ठ कवयित्री कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर-१९६१), विदुषी दुर्गा भागवत (कराड-१९७५), ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (आळंदी-१९९६) आणि ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष (इंदूर-२००१) यांना बहुमान लाभला होता.
  • अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत डॉ. ढेरे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
  • संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने निवड करावी, या साहित्य महामंडळाच्या नव्या घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीनुसार ही निवड करण्यात आली.
डॉ. अरुणा ढेरे
  • सर्जनशील कवयित्री आणि संशोधनात्मक लेखन करणाऱ्या लेखिका, असा डॉ. अरुणा ढेरे यांचा लौकिक आहे.
  • लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा वारसा त्यांना लाभला.
  • घरातच त्यांना वस्तुनिष्ठ संशोधनाचे बाळकडू मिळाले. मूळ पिंड कवितेचा असला तरी संशोधनाची वाट त्यांनी आपल्या लेखनातून प्रशस्त केली.
  • संशोधन आणि ललित साहित्यातही डॉ. अरुणा ढेरे यांची कामगिरी मोठी असली, तरी त्यांच्या कवितांचा ठसा अमीट आहे.
  • ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एमए आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९८३ ते १९८८ या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठात अध्यापन केले.
  • कवयित्री ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.
  • ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक समृद्ध झाली.
  • कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ११ ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
  • याशिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते.
  • त्यांचा ‘विस्मृतिचित्रे’ हा ग्रंथ गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष कार्य केलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केले आहे.
  • महाराष्ट्राच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांवर ढेरे यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. लोकसाहित्य समिती, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठीच्या ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
अरुणा ढेरे यांची साहित्यसंपदा
  • वैचारिक: अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, महाद्वार, लोक आणि अभिजात, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृतिचित्रे, स्त्री आणि संस्कृती, विवेक आणि विद्रोह, शाश्वताची शिदोरी
  • कथासंग्रह: काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, रूपोत्सव, लावण्ययात्रा, मनातलं आभाळ, मैत्रेयी, अज्ञात झऱ्यावर
  • कवितासंग्रह: निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र, बंद अधरों से
  • संपादन: दुर्गा भागवत: व्यक्ती, विचार आणि कार्य, स्त्री-लिखित मराठी कविता, स्त्री-लिखित मराठी कादंबरी, स्त्री-लिखित मराठी कथा
पुरस्कार-सन्मान
  • नागपूर येथील डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यास आणि अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान.
  • सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार.
  • लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार.
  • पुण्यातील साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार
  • ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथ पुरस्कार
  • मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार.

शांतता अभियानासाठी भारताकडून ३ दशलक्ष डॉलर्सचे योगदान

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानासाठी भारताने ३ दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले. या निधीचा वापर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानाच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येईल.
  • हा प्रशिक्षण कार्यक्रम ३ वर्ष चालेल. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आचरण आणि अनुशासनावर विशेष भर देण्यात येईल.
  • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानाद्वारे संघर्षामध्ये अडकलेल्या अस्थिर देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सैन्य, पोलिस अधिकारी आणि नागरी कर्मचारी (पीसकिपर्स) पाठवले जातात.
  • हे पीसकिपर्स संघर्षात अडकलेल्या राष्ट्रांच्या परिस्थितीचा आढावा घेतात आणि विविध पक्षांमध्ये शांती स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात.
  • या अभियानासाठी संयुक्त राष्ट्र्संघांच्या सदस्य देशांकडून सैन्य आणि कर्मचारी पुरविले केले जातात.
  • सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानात १,०४,६८० कर्मचारी (९०,४५४ सैनिक, १२,९३२ नागरी कर्मचारी आणि १,२९४ स्वयंसेवक) कार्यरत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघटना
  • इंग्रजी: United Nations
  • स्थापना: २४ ऑक्टोबर १९४५
  • मुख्यालय: न्युयॉर्क, अमेरिका
  • सदस्य: १९३ सदस्य राष्ट्रे + २ निरीक्षक राष्ट्रे (होली सी आणि पॅलेस्टाईन)
  • संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे, अशी उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • या संघटनेची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेची ६ मुख्य अंग: आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, ट्रस्टीशिप कौन्सिल, सचिवालय.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालय वगळता इतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्य अंगांची मुख्यालये न्युयॉर्कमध्ये आहेत. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग (नेदरलँड्स) येथे आहे.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कामकाजाच्या इंग्रजी, फ्रेंच, रशियन, चीनी, स्पॅनिश आणि अरेबिक या ६ अधिकृत भाषा आहेत.
  • अँटोनियो गुटेरेस हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान महासचिव आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांचा कार्यकाळ ५ वर्ष असतो.
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन हे ५ देश स्थायी सदस्य असून, फक्त त्यांच्याकडेच नकाराधिकार आहे.
  • याशिवाय सुरक्षा समितीचे १० अस्थायी सदस्यही असतात. त्यांची निवड सदस्य राष्ट्रांमधून २ वर्षांसाठी केली जाते. दरवर्षी ५ राष्ट्रे बदलली जातात.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक सलग्न संस्था तसेच संयुक्त राष्ट्रासंघाशी संबंधित अनेक व्यक्तींना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार २०१८

  • ७३व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अध्यक्षा मारिया फर्नांडा एस्पिनोसा गारसेज यांनी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार २०१८च्या विजेत्यांची घोषणा केली.
  • या पुरस्काराचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:
  • अस्मा जहांगीर: पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या.
  • रेबेका ग्युमी: टांझानियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या.
  • जेओनिया वापिचाना: ब्राझिलच्या प्रथम महिला मूळ निवासी वकील.
  • फ्रंटलाइन डिफेंडर: आयर्लंडची मानवाधिकार संघटना.
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार
  • इंग्रजी: युनायटेड नेशन्स ह्यूमन राइट्स अवॉर्ड
  • मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९६६मध्ये या पुरस्कारांची स्थापना केली.
  • पहिल्यांदा हा पुरस्कार १९६८मध्ये प्रदान करण्यात आला होता. हे पुरस्कार प्रत्येक पाच वर्षांनी प्रदान केले जातात.
अस्मा जहांगीर
  • या पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या मृत्यू फेब्रुवारी २०१८मध्ये झाला.
  • महिला आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी लढा देण्याऱ्या त्या एक वकील होत्या. 
  • पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष होण्याचा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
  • त्यांनी पाकिस्तान मानवाधिकार आयोगाची स्थापना केलीहोती. त्या पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थांच्या टीकाकार होत्या. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
रेबेका ग्युमी
  • या टांझानियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या व वकील आहेत. तसेच त्या म्सिचाना उपक्रमाच्या संस्थापक आहेत.
  • म्सिचाना उपक्रमाअंतर्गत बालिकांच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. २०१६मध्ये त्यांनी बालविवाह विरोधातील खटल्यामध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला.
  • त्यांनी टांझानिया विवाह कायद्याच्या विरोधातही याचिका दाखल केली होती, हा कायदा सध्या बालविवाहाला परवानगी देतो.
जेओनिया वापिचाना
  • ब्राझिलच्या प्रथम महिला मूळ निवासी वकील व मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. ब्राझिलमधील विधी विद्यालयातून पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या प्रथम मूळ निवासी पदवीधर आहेत.
फ्रंटलाइन डिफेंडर्स
  • फ्रन्टलाइन डिफेंडर्स ही आयर्लंडची मानवाधिकार संस्था आहे आणि ही संस्था मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. या संघटनेची स्थापना २००१मध्ये आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये केली गेली.
  • टीप: आतापर्यंत बाबा आमटे (१९८८ साली) या एकमेव भारतीय व्यक्तीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार देण्यात आला आहे.

ओलेग सेन्त्सोव्ह यांना प्रतिष्ठेचा साखारोव्ह पुरस्कार

  • मानवाधिकार कार्यकर्ते ओलेग सेन्त्सोव्ह यांना युरोपीय संसदेचा प्रतिष्ठेचा ‘साखारोव्ह पुरस्कार’ जाहीर झाला.
  • क्रिमियाच्या न्यायासाठीच्या रशियाविरुद्धच्या चळवळीत ओलेग सेन्त्सोव्ह यांनी मोठे योगदान दिले.
  • २०१४मध्ये रशियाने क्रिमियात आक्रमण करून त्या द्वीपकल्पाचा ताबा घेतला, त्यावेळी ते राजकीय कैदी म्हणून पकडले गेले.
  • रशियाच्या क्रिमियावर केलेल्या आक्रमणाचा विरोध करत त्यांनी उपोषण केले. पण त्यांना वैद्यकीय मदतीने १४५ दिवसांच्या उपोषणातही जिवंत ठेवण्यात आले.
  • त्यांच्यावर पूल, विजेचे खांब व लेनिनचा पुतळा उडवण्याचा कट रचल्याचा आरोप असून, गेल्या २० वर्षांपासून ते सायबेरियाच्या तुरुंगात खितपत पडले आहेत.
  • रशियाच्या अफगाणिस्तानातील आक्रमणासही सेन्त्सोव्हने विरोध केला होता. त्यासाठी त्यांना ६ वर्षे अंतर्गत विजनवास पत्करावा लागला होता.
  • मूळचे क्रिमियाचा असलेले सेन्त्सोव्ह हे उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत. ‘अ परफेक्ट डे फॉर बनानाफिश’, ‘द हॉर्न ऑफ द बुल’ हे लघुपट केल्यानंतर त्यांनी ‘गेमर’ व ‘ऱ्हायनो’ हे चित्रपटही साकारले.
  • नंतर युरोमेडन व ऑटोमेडन या चळवळीतील सहभागामुळे त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. पुढे ते क्रिमियाच्या न्यायासाठीच्या लढ्यातही सामील झाले.
साखारोव्ह पुरस्कार
  • हा पुरस्कार रशियन भौतिकशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल विजेते आंद्रे साखारोव्ह यांच्या नावाने दिला जातो. हा पुरस्कार मानवी हक्क व विचार स्वातंत्र्यासाठी दिला जातो.
  • युरोपियन संसदेद्वारे १९८८मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. याआधी हा पुरस्कार नेल्सन मंडेला, अलेक्झांडर डुबसेक, आँग सान स्यू की व मलाला युसुफझाई यांना मिळाला आहे.
  • आंद्रे साखारोव्ह हे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक होते व नंतर ते मानवी हक्क कार्यकर्ते बनले.
  • आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धेचे मानवजातीला असलेले संभाव्य धोके लक्षात आल्यामुळे त्या संबंधात जागृतीसाठी त्यांनी प्रयत्न केला.
  • भौतिकशास्त्रज्ञ असणाऱ्या आंद्रे साखरोव्ह यांना १९७५मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.

आयएटीएचा हवाई वाहतुकीविषयीचा अहवाल प्रकाशित

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) हवाई वाहतुकीविषयी अंदाजानुसार २०२४पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ असेल. जागतिक हवाई वाहतूक बाजारात सध्या भारत सातव्या स्थानी आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
  • २०३७पर्यंत जगभरातील हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट होऊन ८.२ अब्ज होईल.
  • २०२०च्या दशकादरम्यान चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनेल.
  • तसेच २०२४मध्ये भारत अमेरिकेनंतर हवाई वाहतूक बाजारपेठेत तिसऱ्या स्थानी असेल.
  • सध्या भारतात घरगुती हवाई प्रवाशांच्या संख्येत १८.२८ टक्क्यांनी वाढ होत आहे. ही संख्या २०१८-१९मध्ये २४३ दशलक्ष आणि २०२०मध्ये २९३ दशलक्ष होईल.
  • २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीमध्ये १०.४३ टक्क्यांची वृद्धी झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ६५ दशलक्ष झाली आहे. २०२०मध्ये हा आकडा ७५ दशलक्ष होईल.
  • पुढील २० वर्षांमध्ये हवाई वाहतुकीतील सर्वाधिक वाढ आशिया-पॅसिफिक प्रदेशात होईल आणि पुढील २० वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट होईल.
  • हवाई वाहतुकीत आशिया-पॅसिफिक प्रदेशात ४.८ टक्के, आफ्रिकेत ४.६ टक्के आणि पश्चिम आशियामध्ये ४.४ टक्के वृद्धी होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना
  • इंग्रजी: International Air Transport Association (IATA)
  • स्थापना: १९ एप्रिल २०१८
  • मुख्यालय: मॉन्ट्रियल (कॅनडा)
  • ही कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक व्यापार संघटना आहे.
  • जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. सध्या ११७ देशांमधील २९० विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
  • हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित धोरण आणि मानदंड ठरविण्यामध्ये ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.
  • याव्यतिरिक्त, ही संस्था अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणदेखील प्रदान करते.

सलग ३ शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय

  • वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला.
  • यामुळे सलग ३ एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
  • याशिवाय असा विक्रम करणारा तो जगातील दहावा खेळाडू आहे. यात सलग ४ शतकांसह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा पहिल्या क्रमांकावर आहे.
  • कोहलीचे हे एकदिवसीय सामन्यांमधील ३८वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६२वे शतक ठरले.
  • विराटने २०१७मध्ये विंडीजविरुध्द नाबाद १११ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर या मालिकेत त्याने विंडीज विरुध्द सलग ३ शतके केली.
  • त्यामुळे विराटने एकाच संघाविरूध्द सलग ४ शतके करण्याचा विक्रमही केला. असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
  • यापूर्वीच्या सामन्यामध्ये विराटने सर्वाधिक जलद आणि पदार्पणानंतर सर्वात कमी कालावधीत १० हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला होता.

भारत आणि जपान दरम्यान ६ विविध करारांवर स्वाक्षऱ्या

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यादरम्यान भारत आणि जपान यांच्यात ६ विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात हायस्पीड रेल्वे प्रकल्प, नौदल सहयोग इत्यादींचा समावेश आहे.
  • पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी मंत्रीस्तरीय २ + २ चर्चेच्या आयोजनास सहमती दर्शविली.
  • या चर्चेनंतर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ओडीए कर्जाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी भारत आणि जपान यांच्यात करार झाला.
  • याशिवाय, दोन्ही देशांमध्ये आयुष्मान भारत योजनेशीसंबंधी आरोग्य सेवा, डिजिटल भागीदारी, अन्न प्रक्रिया आणि नौसैनिक सहकार्यांसंबंधी करार झाले.
  • जपानने भारताच्या पुढाकाराने सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यासही सहमती दर्शविली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान जपानी गुंतवणूकदारांनी भारतात २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दिली
  • शिन्जो आबे यांच्याशी झालेल्या चर्चेत अनेक द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

क्लारा सोसाला मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ खिताब

  • पेराग्वेच्या क्लारा सोसा हिने मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ हा खिताब जिंकला. या सौंदर्य स्पर्धेच्या ६व्या आवृत्तीचे आयोजन म्यानमारमध्ये करण्यात आले होते.
  • क्लारा सोसो पेराग्वेची एक मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. यापूर्वी तिने मिस ग्रँड पेराग्वे २०१८ हा खिताब जिंकला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पेराग्वेतील ती पहिली महिला आहे.
  • या स्पर्धेत भारताची मीनाक्षी चौधरी उपविजेती ठरली. तर इंडोनेशियाच्या नादिया पुरवोकोला तिसरे स्थान मिळाले.
  • गेल्यावर्षी मिस ग्रँड इंटरनॅशनल हा खिताब पेरूच्या मारिया जोसे लॉराने जिंकला होता.

चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर

ईडीच्या हंगामी संचालकपदी संजय कुमार मिश्रा यांची नेमणूक

  • केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) हंगामी संचालक म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नेमणूक केली आहे. ही नेमणूक ३ महिन्यांसाठी आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मिश्रा यांच्या नावाला हंगामी संचालकपदासाठी मंजुरी दिली.
  • संजय कुमार मिश्रा भारतीय महसूल सेवेचे प्राप्तिकर केडरचे १९८६च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते ईडीचे मावळते संचालक कर्नाल सिंग यांची जागा घेतील.
  • कर्नाल सिंह केंद्रशासित प्रदेशच्या कॅडरच्या १९८४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी ईडीच्या संचालकपदाचा ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहेत.
  • दिल्लीत मुख्य प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत असणारे मिश्रा यांचा केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवपदाच्या यादीत समावेश माही. त्यामुळे त्यांना अतिरिक्त प्रभारासह ईडीचे संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.
  • मिश्रा यांचा लवकरच यादीत समावेश केला जाईल आणि त्यानंतर स्वतंत्ररीत्या ईडीच्या प्रमुखपदाचा कार्यभार सोपवला जाईल. ईडीचे संचालकपद हे केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवपदाच्या दर्जाच्या बरोबरीचे आहे.
अंमलबजावणी संचालनालय
  • इंग्रजी: Enforcement Directorate (ED)
  • अंमलबजावणी संचालनालय ही भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे.
  • ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात आयपीएस, आयएएस आणि आयआरएस अधिकारी काम करतात.
  • भारत सरकारच्या २ प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे हे ईडीचे मुख्य कार्य आहे. हे २ कायदे आहेत ‘परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९’ (फेमा) व ‘अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध २००२’ (पीएमएलए).
  • ईडीची स्थापना १ मे १९५६ रोजी ‘अंमलबजावणी युनिट’च्या स्वरूपात करण्यात आली. १९५७मध्ये याचे नामकरण अंमलबजावणी संचालनालय करण्यात आले.
  • ईडीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चंडीगढ, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ, कोचीन, हैदराबाद येथे क्षेत्रीय कार्यालये आहेत.

एसबीआयमधून होणार निवडणूक रोख्यांची विक्री

  • भारत सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २९ अधिकृत शाखांद्वारे १ ते १० नोव्हेंबर दरम्यान निवडणूक रोख्यांच्या विक्रीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
  • २०१७च्या केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडण्यात आली कोटी, तर २०१८मध्ये निवडणूक रोखे योजना सुरू झाली.
निवडणूक रोखे योजना
  • राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता यावी आणि हा निधी कराच्या चौकटीत यावा यासाठी निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडण्यात आली.
  • निवडणूक रोखे योजनेनुसार राजकीय पक्षांना द्यावयाच्या देणग्या रोख्यांच्या रूपात असतील.
  • रोख स्वरूपात राजकीय पक्षांना देणगी देण्याची कमाल मर्यादा २००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम देणगी म्हणून देण्यासाठी निवडणूक रोखे बंधनकारक असतील.
  • निवडणूक रोखे प्रॉमिसरी नोटप्रमाणे असतात. अशा रोख्यांची खरेदी फक्त भारतीय नागरिक वा भारतात स्थापन झालेल्या कंपन्या/संस्थाच करू शकतील.
  • निवडणूक रोख्यांचे दर्शनी मूल्य हजारच्या पटीमध्ये, १० हजार, १ लाख, १० लाख व १ कोटी रुपयांचे असेल.
  • रोखे एकदा खरेदी केल्यावर १० दिवसांच्या आत राजकीय पक्षांना देणगी म्हणून द्यावे लागतील. या रोख्यावर कोणतेही व्याज असणार नाही.
  • निवडणूक रोख्यावर खरेदी करणार्‍या नागरिकांचे, व्यक्तीचे, संस्थेचे नाव असणार नाही.
  • निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला रोखे खरेदी करताना स्टेट बँकेला स्वतःचा पॅन नंबर द्यावा लागेल.
  • ज्या व्यक्तीने पॅन नंबर देऊन रोखे खरेदी केले आहेत, त्या व्यक्तीवर हे रोखे त्याने कोणत्या पक्षाला दिले हे सांगण्याचे बंधन नाही.
  • अशा रोख्यांचा वापर ज्या राजकीय पक्षांची नोंदणी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट (कलम २९-क) या कायद्याखाली झाली असेल, त्यांनाच करता येईल.
  • हे रोखे फक्त त्याच राजकीय पक्षांना देता येतील ज्यांना गेल्या निवडणुकीत किमान १ टक्का किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाली असतील.
  • रोखे मिळाल्यानंतर राजकीय पक्ष हे रोखे त्याच बँकेत जमा करू शकतील, ज्याची माहिती निवडणूक आयोगाकडे आहे.
  • रोख्याचा धारण कालखंड फक्त १५ दिवसांचा असल्यामुळे व्यक्ती, कायदेशीर संस्था, किंवा राजकीय पक्ष अशा निवडणूक रोख्यांचा वापर पर्यायी चलन किंवा मालमत्तेचा एक नमुना म्हणून करू शकणार नाहीत.

FAIDF स्थापनेस मान्यता

  • आर्थिक विषयावरील कॅबिनेट समितीने (सीसीईए) मत्स्यपालन आणि ॲक्वाकल्चर पायाभूत सुविधा विकास निधी (FAIDF) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. 
  • या निधीची घोषणा २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या निधीचा मुख्य उद्देश मत्स्य उत्पादनात वाढ करणे आहे आणि २०२२पर्यंत मस्त्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आहे.
  • सध्या भारताचे मत्स्य उत्पादन ११.४ दशलक्ष टन आहे. ते वाढवून २०२०पर्यंत १५ दशलक्ष टन मत्स्य उत्पादन आणि २०२२-२३पर्यंत २० टन मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
  • नाबार्ड, नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अनुसूचित बॅंक या निधीसाठी नोडल एजन्सी असतील.
  • या निधीचा अनुमानित आकार सुमारे ७,५२२ कोटी रुपये असेल, ज्यामुळे देशांतर्गत आणि समुद्री मत्स्य उत्पादन क्षेत्रांना फायदा होईल.
  • या निधीद्वारे देशात मत्स्यव्यवसाय उद्योगाच्या विकासासाठी खासगी गुंतवणूकही आकर्षित केली जाईल.
  • मत्स्य उत्पादन आणि ॲक्वाकल्चर उद्योगात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. मासेमारीमुळे देशातील १४.५ दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतो.
  • सध्या मासेमारी क्षेत्राचा देशाच्या निव्वळ देशांतर्गत उत्पादनात १ टक्के वाटा आहे, तर देशाच्या कृषी जीडीपीमध्ये ५ टक्के वाटा आहे. देशातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी १० टक्के वाट निर्यात केला जातो.
  • FAIDF: Fisheries & Aquaculture Infrastructure Development Fund

मॅमल्स ऑफ इंडिया: भारतातील सस्तन प्राण्यांबद्दल माहितीचा संग्रह

  • बंगळुरूच्या नॅशनल बायोलॉजिकल सायन्स सेंटरच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी ‘मॅमल्स ऑफ इंडिया’ नावाने भारतातील सस्तन प्राण्यांबद्दल माहितीचा एक संग्रह तयार केला आहे.
  • या नागरिक-वैज्ञानिक संग्रहाची सुरुवात सप्टेंबर २०१८मध्ये करण्यात आली असून, भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच संग्रह आहे.
  • ‘मॅमल्स ऑफ इंडिया’ हे एक ऑनलाइन पोर्टल आहे. याचा उद्देश भारतात आढळणाऱ्या सर्व सस्तन प्राण्यांची माहिती एकत्रित करून प्रकाशित करणे आहे.
  • सामन्य जनता mammalsofindia.org या संकेतस्थळावर सस्तन प्राण्यांची चित्रे अपलोड करू शकतात. २५ ऑक्टोबरपर्यंत या पोर्टलवर १६१ सस्तन प्राण्यांची ७६८ चित्रे अपलोड केली गेली आहेत.
  • या पोर्टलवर अनेक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची चित्रे अपलोड केली गेली आहेत. यामुळे देशातील अनेक दुर्मिळ सस्तन प्रजातींच्या वितरणाची माहिती मिळेल.
  • भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त २.४ टक्के आहे. परंतु भारतात जगातील एकूण सस्तन प्राण्याच्या प्रजातींपैकी ७-८ टक्के प्रजाती आढळतात.
  • भारतात सस्तन प्राण्याच्या सुमारे ४२६ प्रजाती आढळतात, ही संख्या जगातील एकूण सस्तन प्रजातींच्या ८.८६ टक्के आहे.

निधन: ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना

  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांचे २७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांच होते.
  • खुराणा हे भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. दिल्लीच्या राजकारणात ते दीर्घकाळ सक्रिय होते.
  • १९९३ ते १९९६ या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३६ रोजी पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये झाला होता.
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात खुराना संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही राहिले होते.
  • दिल्लीमधून ते ४ वेळा संसदेवर निवडून गेले होते. खुराना यांना २००१मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले होते.
  • परंतु २००४मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि भाजप आमदारांच्या आग्रहावरून पुन्हा सक्रिय राजकारणात परतले.
  • खुराना दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही राहिले होते. बेशिस्त वर्तनावरून भाजपकडून २००५मध्ये त्यांना भाजपमधून काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते.

आशियाई स्पर्धेचे भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद

  • हॉकीच्या आशियाई अजिंक्यपद ट्रॉफीच्या पुरुषांच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले आहे.
  • या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले.
  • भारत आणि पाकिस्तान यांनी तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०११ व २०१६मध्ये पाकिस्तानला नमवून जेतेपद मिळविले होते, तर पाकिस्तानने २०१२ व २०१३ मध्ये बाजी मारली होती.
  • हॉकी आशियाई अजिंक्यपद ट्रॉफीची सुरुवात २०११मध्ये करण्यात आली होती.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना ७ वर्षांची शिक्षा

  • ढाकातील एका न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
  • त्यांना अनाथ आश्रमाच्या नावाखाली निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर ४ जणांना १८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • याआधी बांगलादेशच्या न्यायालयाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवडणुकीच्या मेळाव्यातील ग्रेनेडवरील हल्ल्याच्या संबंधात झिया यांचा मुलगा तारिक रहमानसह ३८ जणांना दोषी ठरवले होते.
  • फेब्रुवारीपासून भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणामुळे झिया तुरुंगात आहे. घोटाळ्याच्या प्रकरणात झिया यांना ५ वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली होती.
  • एसीसीने खालिदा आणि इतर तिघांविरोधात झिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ३१.५४ मिलियन टकाचा (३,९७,४३५ डॉलर) घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
  • २००१ ते २००६ दरम्यान त्या बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी असताना २० मिलियन टकाचा (२,५३,१६४ डॉलर) भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.
  • खालिदा झिया बांगलादेशच्या माजी पंतप्रधान असून, त्या १९९१-१९९६ आणि २००१-२००६ या काळात त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधानआहेत.
  • त्या बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष जियाउर रहमान यांच्या पत्नी आहेत. सध्या त्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष आहेत. या पक्षाची स्थापना १९७०मध्ये करण्यात आली होती.

जेर बोल्सोनारो ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष

  • ब्राझीलमधील सैन्याचे माजी कॅप्टन, अतिउजव्या विचारसरणीचे नेते जेर बोल्सोनारो यांची ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
  • १ जानेवारी २०१९पासून ते राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ २०२२पर्यंत असेल. ते ब्राझीलचे ३८वे राष्ट्राध्यक्ष असतील.
  • राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना ५५.१३ टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी फर्नांडो हद्दाद यांना ४४.८७ टक्के मते मिळाली. 
  • बोल्सोनारो आता राष्ट्राध्यक्ष माइकल टेमेर यांची जागा घेतील. टेमेर हे डेमोक्रॅटिक मुव्हमेंट पार्टीचे नेते आहेत.
  • कन्झरवेटिव्ह सोशल लिबरल पार्टीचे नेते असलेले बोल्सोनारो लष्कराचे कॅप्टन राहिले आहेत. त्यांचा विजय ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव दर्शवतो.
  • गर्भपात, नक्षलवाद, स्थलांतर, समलैंगिकता आणि शस्त्रांशी निगडीत कायद्यांवर बोल्सोनारो यांचे अतिकडवे विचार पाहता त्यांना ‘ब्राझीलचे ट्रंप’ म्हटले जाते.
  • ब्राझीलमध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराने देश पोखरून काढला आहे, अर्थव्यवस्था कोलडमली आहे.

चालू घडामोडी : २७ ऑक्टोबर