राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८

  • राष्ट्रपती भवनात २५ सप्टेंबर २०१८ रोजी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आले.
  • क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आणि राष्ट्रीय क्रीडादिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
  • परंतु १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा असल्यामुळे हे पुरस्कार २५ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आले.
पुरस्कार्थींची यादी
खेळाडू खेळ
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
साइखोम मीराबाई चानू वेटलिफ्टिंग
विराट कोहली क्रिकेट
अर्जुन पुरस्कार
नीरज चोप्रा ॲथलेटिक्स
जिन्सन जॉन्स ॲथलेटिक्स
हिमा दास ॲथलेटिक्स
एन. सिक्की रेड्डी बॅडमिंटन
सतीश कुमार बॉक्सिंग
स्मृती मानधना क्रिकेट
शुभंकर शर्मा गोल्फ
मनप्रीत सिंग हॉकी
सविता पुनिया हॉकी
रवी राठोड पोलो
राही सरनोबत नेमबाजी
अंकुर मित्तल नेमबाजी
श्रेयशी सिंग नेमबाजी
मनिका बत्रा टेबल टेनिस
जी. साथीयान टेबल टेनिस
रोहन बोपण्णा टेनिस
सुमीत वेटलिफ्टिंग
पूजा कडियान वुशू
अंकुल धामा पॅराॲथलेटिक्स
मनोज सरकार पॅराबॅडमिंटन
द्रोणाचार्य पुरस्कार
छेनंदा अछैय्या कुटप्पा बॉक्सिंग
विजय शर्मा वेटलिफ्टिंग
ए. श्रीनिवास राव टेबल टेनिस
सुखदेव सिंग पन्नू धावपटू
क्लॅरेन्स लोगो हॉकी (जीवनगौरव)
तारक सिन्हा क्रिकेट (जीवनगौरव)
जीवन कुमार शर्मा ज्युडो ( जीवनगौरव)
व्ही.आर.बीडू धावपटू (जीवनगौरव)
ध्यानचंद पुरस्कार
सत्यदेव प्रसाद तिरंदाजी
भरत छेत्री हॉकी
बॉबी अलॉयसिस ॲथलेटिक्स
दादू चौगुले कुस्ती
मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार
गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स
इशा आऊटरीच
तेनसिंग नोर्गे पुरस्कार
आयएनएस तारिणी पथक (वर्तिका जोशी, प्रतिभा जामवाल, स्वाती पी., ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
  • सुरुवात: १९९१ (प्रथम विजेता : विश्वनाथन आनंद)
  • हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • पुरस्काराचे स्वरूप: पदक, प्रशस्तीपत्र आणि ७.५ लाख रुपये रोख
  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दरवर्षी एका खेळाडूला दिला जात असे. २००८साली हा नियम शिथिल एकापेक्षा जास्त खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येऊ लागला.
  • २०१७मध्ये हॉकी संघाचे माजी कर्णधार सरदार सिंग आणि भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
साइखोम मीराबाई चानू
  • मीराबाई चानू हिने गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • याशिवाय २०१७मध्ये तिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती.
  • तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.
  • अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
  • क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल यापूर्वी तिला पद्मश्री पुरस्कानेही सन्मानित करण्यात आले आहे.
  • कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे.
विराट कोहली
  • सचिन तेंडुलकर (१९९७) आणि महेंद्रसिंग धोनी (२००७) यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारा कोहली हा तिसरा क्रिकेटपटू आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर आहे.
  • विराटने ७१ कसोटी सामन्यांत २३ शतकांसह ६१४७ धावा केल्या आहेत. तर २११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ शतकांसह ९७७९ धावा केल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके झळकावणाऱ्या सचिननंतर या पंक्तीत दुसऱ्या स्थानावर विराट (५८ शतके) आहे.
  • कोहली फेब्रुवारी-मार्च २००८मध्ये मलेशियामध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता.
  • त्याला यापूर्वी अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार तसेच पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अर्जुन पुरस्कार
  • सुरुवात : १९६१
  • पुरस्काराचे स्वरूप : ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
  • अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.
  • २००१पासून अर्जुन पुरस्कार फक्त पुढे उल्लेख केलेल्या क्रीडासत्रांतील खेळांसाठी दिला जाऊ लागला : ऑलिंपिक खेळ, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, विश्वचषक, विश्वविजेतेपद, क्रिकेट, देशी खेळ आणि अपंगांसाठीचे खेळ
राही सरनोबत
  • महाराष्ट्रातील कोल्हापूरची राही सरनोबत २५ मीटर पिस्तुल नेमबाजी प्रकारात आघाडीची भारतीय महिला खेळाडू आहे.
  • कोल्हापूर येथे तिने नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. २००८साली राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
  • नवी दिल्लीमध्ये २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २ सुवर्णपदके पटकावली होती.
  • आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय पिस्तुल नेमबाज आहे.
  • ग्लासगो येथे २०१४साली पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळात तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
  • राहीने २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. २०१२साली लंडन ऑलिंपिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
  • उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या राहीने जकार्ता येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.
  • अर्जुन पुरस्कार मिळविणारी ती कोल्हापुरातील पाचवी खेळाडू आहे. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांना मिळाला आहे.
स्मृती मानधना
  • महाराष्ट्रातील सांगलीची स्मृती मानधना भारताच्या आतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची डावखुरी सलामवीर फलंदाज आहे.
  • प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मुतीने क्रिकेटचे धडे गिरवले. तिने २०१४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने ४ शतके आणि १३ अर्धशतकांसह १६०२ धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-४४ सामन्यांमध्ये ५ अर्धशतकांसह ८६७ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे २ कसोटी सामन्यांत ८१ धावा केल्या आहेत.
  • कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
  • यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वर्षांतील सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार तिने पटकावला.

द्रोणाचार्य पुरस्कार
  • गत ३ वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
  • पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ध्यानचंद पुरस्कार
  • जीवनभर क्रीडा क्षेत्रासाठी कार्य केलेल्या खेळाडूंना हा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार म्हणून दिला जातो.
  • पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादू चौगुले
  • मैदानातील कुस्ती, कुस्तीचा प्रसार, संघटन, प्रशिक्षण अशा सर्व क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या दादुंना मानाचा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
  • कोल्हापूरच्या तेज:पुंज कुस्ती परंपरेतील एक लखलखीत नाव म्हणजे रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले. समकालीन नामवंत मल्लांना अस्मान दाखवणारे वज्रदेही मल्ल.
  • १९७०साली परशुराम पाटील यांना पराभूत करून ‘महाराष्ट्र केसरी’, १९७३ साली दीनानाथसिंग यांना अवघ्या एका मिनिटात नमवून ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि याच वर्षी दिल्लीच्या नेत्रपाल यांना लोळवून ‘महान भारत केसरी’ या मानाच्या गदा चौगुले यांनी आपल्या खांद्यावर मिरवल्या.
  • देशातच नाही तर विदेशातही त्यांची कामगिरी अजोड राहिली. १९७३साली ऑकलंड, न्यूझीलंडच्या येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०० किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात त्यांनी रौप्यपदकावर नाव कोरले.
  • त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १९७४साली त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले.

तेनसिंग नोर्गे पुरस्कार
  • साहसी खेळांमध्ये उल्लेखनीय प्रदर्शनासाठी तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • सागरी जलतरण, गिर्यारोहण आणि हवाई साहसी खेळ यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह आणि ब्लेझर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आयएनएसव्ही तारिणी सागर परिक्रमा चमू
  • यावर्षी हा पुरस्कार आयएनएसव्ही तारिणी नौकेवरून समुद्री मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या महिला चमूला देण्यात आला.
  • ४ खंड, ३ महासागर आणि सुमारे २१,६०० नॉटिकल मैल अंतर पार करत नौदलाच्या ६ महिला अधिकाऱ्यांच्या या चमूने पृथ्वी प्रदक्षिणा घातली.
  • या सागरी परिक्रमेबरोबरच त्या समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या. 
  • या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आले होते.
  • देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश होता.
  • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये प्रतिभा जामवाल, स्वाती पी., ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता.
  • एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात घालवले.
  • जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला ७ मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी ६० किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचा सामना करावा लागला.

मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार
  • आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा