डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज

डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज

  • संरक्षण नवोन्मेष संघटनेने इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) योजनेंतर्गत नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज सुरु केले आहे.
  • हा उपक्रम संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय, अटल इनोवेशन मिशन आणि नीती आयोगाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे.
  • या उपक्रमाद्वारे भारताच्या संरक्षण सामग्रीच्या तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या चॅलेंज अंतर्गत ११ समस्यांची यादी
  • संरक्षण मंत्रालयाने ११ समस्यांची यादी तयार केली आहे, ज्यावरील उपाय भारतीय स्टार्ट-अप व्यवस्थेकडून येणे अपेक्षित आहे. या ११ समस्या खालीप्रमाणे:
  1. बिल्ट-ईन सेन्सरसह वैयक्तिक सुरक्षा प्रणाली
  2. पारदर्शक कवच (आर्मर)
  3. कार्बन फायबर विन्डींग
  4. सक्रिय संरक्षण प्रणाली (ॲक्टीव्ह प्रोटेक्शन सिस्टम)
  5. ऑफलाइन एन्क्रिप्ट आधारित सुरक्षित हार्डवेअर
  6. ४-जी/एलटीई आधारित टॅक्टीकल लोकल एरिया नेटवर्कचा विकास
  7. अत्याधुनिक जल शुध्दीकरण प्रणालीचा विकास
  8. लॉजिस्टिक आणि एससीएममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस
  9. मानवरहित जलमग्न आणि जमिनीवरील वाहने.
  10. रिमोटली पायलटेड हवाई वाहने
  11. लेझर आधारित हत्यारे (वेपनरी)
  • या ११ समस्यांसाठी कार्यरत प्रोटोटाइप तयार करण्याची अथवा विद्यमान तंत्रज्ञान वापरून या समस्या सोडवण्याची क्षमता आणि इच्छा असणाऱ्या स्टार्ट-अप्सना १.५ कोटी रुपये अनुदान/इक्विटी/कर्ज/इतर स्वरूपात देण्यात येतील.
संरक्षण नवोन्मेष संघटना
  • इंग्रजी: डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन
  • ही एक ना-नफा आधारित संस्था आहे. तिचे मुख्यालय बंगळूरूमध्ये आहे.
  • या संघटनेला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) व भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (बीईएल) या कंपन्यांद्वारे निधी दिला जातो.
इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX)
  • देशात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • याद्वारे स्टार्ट-अप्स, वैयक्तिक इनोव्हेटर्स, संशोधन आणि विकास संस्था, सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग (एमएसएमई) इत्यादींना निधी/अनुदानाद्वारे सरंक्षण क्षेत्रातील कार्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा