चालू घडामोडी : ३१ मार्च

कर्जबुडव्यांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर

 • रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ७२ बड्या कंपन्यांच्या समावेश असलेली कर्जबुडव्यांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यांच्याकडे ५,५३,१६७ कोटींचे कर्ज थकीत आहे.
 • ७२ पैकी ४० कंपन्यांनी तीन वर्षात थोडी देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. त्यामध्ये पाच बड्या कंपन्यांवर रु. १.४ लाख कोटींचे कर्ज आहे.
 • बड्या करबुडव्यांची नावे जाहीर केल्यास त्याचा सध्याचे कर्मचारी व व्यावसायिक या दोहोंवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
यादीतील पाच प्रमुख कंपन्या
कंपनीचे नाव कर्ज
अदानी पॉवर ४४,८४० कोटी
लॅन्को इन्फ्रा ३९,८९० कोटी
जीव्हीके पॉवर २५,०६२ कोटी
सुझलॉन १८,०३५ कोटी
एचसीसी १२,१७० कोटी

भारत उपांत्य सामन्यात पराभूत

 • वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात यमजान भारतावर सात गडी राखून मात करत अंतिम सामन्यात धडक मारली. ३ एप्रिल रोजी इडन गार्डन्सवर रंगणाऱ्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी होईल.
 • भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १९२ धावा केल्या. कोहलीने ४७ चेंडूंमध्ये एक षटकार व ११ चौकारांसह नाबाद ८९ धावा केल्या. कोहलीने कर्णधार धोनीसह ४.३ षटकांत नाबाद ६४ धावांची भागीदारी केली.
 • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजच्या सिमॉन्सने ५१ चेंडूंत पाच खणखणीत षटकार व सात चौकारांसह नाबाद ८३ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याला जॉन्सन चार्ल्स (५२) व आंद्रे रसेल (नाबाद ४३) यांची साथ लाभली.
 • या सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत विरत कोहलीने टी-२० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले.
 • या अर्धशतकाबरोबरच टी-२०मध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ब्रेण्डन मॅक्युलमचा १५ आणि  विंडिजच्या ख्रिस गेलचीही १५ अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.
 • विंडीजच्या महिलांनी संघानेही वर्ल्ड टी-२०च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

 • दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुपोषण या सामाजिक विकास निर्देशांक तसेच प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात हे करार करण्यात आले.
 • राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात राज्य शासनाबरोबर काम करण्यात येणार आहे. अनेक सुविधा टाटा ट्रस्ट शासनाला विनामुल्य उपलब्ध करून देणार आहेत.

युरियाच्या उत्पादनात विक्रमी वाढ

 • देशात यंदा युरियाचे उत्पादन २४५ लाख टन झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टन एवढी विक्रमी वाढ झाली आहे.
 • आगामी तीन वर्षांत भारताला युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट खत उत्पादक कंपन्यांनी गाठावे, असे आवाहन 
 • गेल्या वर्षी जूनपासून युरिया धोरण लागू झाल्यानंतरची ही वाढ आहे. म्हणजे केवळ नऊ महिन्यांत उत्पादनात मोठी वाढ झाली.
 • युरियाची देशांतर्गत गरज ३१० लाख टनांची असून दर वर्षी ८० लाख टन युरियाची आयात होते. यंदाच्या विक्रमी वाढीमुळे युरियाची आयात ६० ते ६५ लाख टन एवढीच असेल.

 ‘टाटा स्टील’ची ब्रिटनमधील व्यवसायाची विक्री

 • ‘टाटा स्टील’ या भारतातील आंतराष्ट्रीय कंपनीने ब्रिटनमधील आपल्या संपूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • प्रामुख्याने स्टीलच्या घसरत्या किंमती, वाढता उत्पादन खर्च आणि चीनशी निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे कंपनीला तेथील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 • कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार धोक्यात येणार आहेत. ब्रिटनमध्ये टाटा स्टीलमध्ये १५,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
 • गेल्या वर्षभरात कंपनीची ब्रिटनमधील कामगिरी अत्यंत ढासळली आहे. स्टील उद्योगाला मागणी कमी झाली असून भविष्यातदेखील सुधारणेचे कोणतेही संकेत नसल्याने कंपनीने लवकरात लवकर व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकातामध्ये फ्लायओव्हर कोसळला

 • उत्तर कोलकाता शहरात २ कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत.
 • कोलकात्यातील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या बडाबाजारजवळील टागोर मार्गावर ही घटना घडली. अतिशय दाट वस्ती असलेला हा भाग आहे.
 • पुलाचा भाग कोसळला तेव्हा त्याच्याखाली मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. तसेच काही दुकान देखील गाडली गेली आहेत.
 • पश्चिम बंगाल राज्य सरकार मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना तीन लाख रुपयांची मदत देण्यासह जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार आहे.

चालू घडामोडी : ३० मार्च

पायाभूत प्रकल्पांसाठी जपानकडून भारताला कर्ज

 • भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन (१४,२५० कोटी रुपये) कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे. हे कर्ज अधिकृत विकास साह्यतेच्या रूपात केले जाईल.
 • त्यात मध्यप्रदेशातील पारेषण प्रणाली मजबूत करण्यासाठी १५.४५ अब्ज येन, ओडिशातील एकीकृत साफसफाई सुधार प्रणाली मजबूत करण्यासाठी २५.७ अब्ज येन आणि समर्पित मालवाहतूक प्रकल्प (टप्पा-एक) आणि टप्पा तीनसाठी १०३.६ अब्ज येन अर्थसाह्य केले जाणार आहे.
 • याशिवाय ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी ६७.१ अब्ज येन, झारखंडमध्ये सूक्ष्म ड्रिप सिंचन प्रकल्पाद्वारे फळबागातील सुधारणांसाठी ४.६५ अब्ज येन दिले जाणार आहेत.
 • हे सारे कर्ज जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेद्वारे (जिका) दिले जाणार आहे.
 • अधिकृत विकास साह्यता अंतर्गत दिले जाणारे कर्ज साधारणपणे द्विपक्षीय मदत आणि बहुपक्षीय मदतीच्या स्वरूपात दिले जाते.
 • विशेषत: द्विपक्षीय मदतीतहत विकसनशील देशांना थेट मदत दिली जाते; तर बहुपक्षीय मदत आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे दिली जाते.

‘उदय’ रोख्यांची विक्री

 • केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेल्या उज्ज्वल डिसकॉम अॅशुरन्स योजना अर्थात उदय अंतर्गत निधी उभारणी सुरू आहे.
 • या निधीच्या साह्याने विविध राज्यांतील कर्जबाजारी झालेल्या वीज वितरण कंपन्यांना संजीवनी देण्यात येणार आहे.
 • यासाठी रोख्यांची विक्री करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
 • बिहार, हरयाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, पंजाब व राजस्थान या राज्यांनी हे रोखे बाजारात विक्रीसाठी आणले आहेत.
 • रोखे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांनी प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे ३० मार्चपर्यंत रोखे खरेदी करावी लागणार आहे.

‘नॅफकब’ अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता

 • ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटी’च्या (‘नॅफकब’) अध्यक्षपदी ज्योतिंद्रभाई मेहता यांची निवड झाली आहे.
 • नॅफकब ही देशातील सर्व सहकारी बँका व पतसंस्थांची शिखर संस्था आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मेहता हे पुढील तीन वर्ष नॅफकबचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 
 • गुजरात स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या मेहता यांनी गुजरातमधील सहकारी बँकांना अडचणीतून सोडवत नफ्यात आणले आहे.

पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला

 • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • शुक्ला या १९८८च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त आणि आयुक्तपदी काम केले आहे.
 • मुंबई शहर पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर कर्तव्य बजाविले आहे. एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्या पोलिस दलात परिचित आहेत.
 • पुण्याचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के. के. पाठक ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार हे स्पष्ट होते. त्यांची जागा आता रश्मी शुक्ला घेतील.
 • शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा मान मिळविणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी आयुक्तपद भूषविले होते.

शर्मिला इरोम दोषमुक्त

 • मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां शर्मिला इरोम यांना दिल्ली न्यायालयाने २००६ मधील जंतरमंतर येथे उपोषणाच्या वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे.
 • मणिपूरच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां असलेल्या इरोम या गेली सोळा वर्षे उपोषण करीत आहेत. मणिपूरमधील आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट (एएफएसपीए) हा कायदा रद्द कायदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे.
 • ४ ऑक्टोबर २००६ रोजी इरोम यांनी या मागणीकरिता दिल्लीत जंतरमंतर येथे प्राणांतिक उपोषण केले होते.
 • शर्मिला यांच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला होता. शर्मिला या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत. 

म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव

 • लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी हितीन क्याव यांनी शपथ घेतली.
 • लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असले हितीन क्याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 
 • स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्यू की यांनी हितीन क्याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
 • स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे हितीन क्याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय स्यू की यांनीही परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली.

चालू घडामोडी : २९ मार्च

राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाचा प्रस्ताव मंजूर

 • अमेरिकेतील ‘९११’, इंग्लंडमधील ‘९९९’ या आपत्कालीन संपर्क क्रमांकांच्या धर्तीवर आता भारतातही भारतातही ‘११२’ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करावा या ट्रायच्या प्रस्तावाला सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली आहे.
 • भारतात सध्या १०० (पोलिस), १०१ (अग्निशामन), १०२ (रुग्णवाहिका) आणि १०८ (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो. पण, आता या सर्व सुविधा ११२ क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.
 • संपूर्ण देशभरात ११२ या एकाच क्रमांकवर संपर्क साधल्यास अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होऊ शकणार आहे.
 • घटनास्थळापर्यंत मदत पोहचविण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्याची सर्व माहिती संबंधित विभागांना तत्काळ देण्यात येईल. त्यामुळे मदत पोचविण्यास मदत होणार आहे.
 • गेल्यावर्षी एप्रिलमध्ये दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार मंत्रालयाला दिलेल्या एका अहवालामध्ये देशभरात एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याची सूचना केली होती. त्यासाठी ११२ हा क्रमांकही निश्चित करण्यात आला होता.
 • या सेवेमध्ये सुरुवातीला पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, महिलांना सहाय्य, वृद्धांना सहाय्य आणि लहान मुलांसाठी सहाय्य याचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर टप्याटप्प्याने त्यामध्ये इतर सेवांची वाढ करण्यात येणार आहे.
 • ही सेवा अधिक उपयुक्त आणि कार्यक्षम करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही या क्रमांकाला वेगळे प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर एसएमएसच्या साह्यानेही ही सेवा पुरविण्यात येईल.
 • ट्राय (TRAI) : Telecom Regulatory Authority of India (दूरसंचार नियामक प्राधिकरण)

सेबीला सहारा समुहाची मालमत्ता विकण्याची परवानगी

 • सर्वोच्च न्यायालयाने भांडवली बाजार नियामक मंडळ ‘सेबी‘ला सहारा समुहाच्या ८६ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.
 • मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्यासाठीदेखील वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
 • परंतु सर्कल रेटपेक्षा ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दराने निविदा आल्या नाही तर या मालमत्ता विकू नयेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे. 
 • सुब्रतो रॉय १४ मार्च २०१४ पासून तुरुंगात असून न्यायालयाने त्यांच्या जामीनासाठी १०,००० कोटी रूपये रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे. त्यापैकी ५,००० कोटी रोख तर उर्वरित रक्कम बँक गॅरंटीच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे. 
 • शिवाय, सर्व व्याजासह ३६,००० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची अवघड अट कंपनीसमोर आहे. सहारा समुहातील गुंतवणूकदारांना ही रक्कम परत केली जाणार आहे. 
 • नियोजित रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीच्या विदेशातील मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी सहारा समूहाला मिळाली होती.
 • रॉय यांना खरेदीदारांशी चर्चा करण्यासाठी तुरंगात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु त्यासाठी कोणीही खरेदीदार न मिळाल्याची सबब कंपनीने दिली होती.

देशातील निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

 • ‘असोचेम’ या उद्योग संघटनेच्या एका अभ्यास अहवालानुसार देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • निर्यातीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर असून देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के आहे. त्यात महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे. 
 • २००७-०८ ते २०१४-१५ या वित्तीय वर्षातील निर्यातीचे विश्लेषण केले असता २०१४-१५ या वर्षात ७२.८३ अब्ज डॉलरची निर्यात करून महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले. या काळात गुजरातमधून ५९.५८ अब्ज डॉलरची निर्यात झाली.
 • या अभ्यासात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना भौगोलिकदृष्ट्या विशाल सागरी किनारा असल्याने त्यांना निर्यातीत फायदा झाला.
 • पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना मात्र निर्यात वाढविण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सेवांत सुधारणा करणे आवश्यक आहे.
 • ASSOCHAM : Associated Chambers of Commerce and Industry of India
 निर्यातीचे वृद्धीदर कमी 
 • निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये अग्रेसर असली तरीही त्याचा निर्यातविषयक वृद्धीदर उत्तर प्रदेश व हरियाणा यासारख्या राज्यांपेक्षा कमी आहे.
 • २०१४-१५ या वित्तीय वर्षात उत्तर प्रदेशची निर्यात १८.३ टक्के, तर हरियाणाची निर्यात १४.४ टक्के इतक्या वेगाने वाढली.
 • याउलट गुजरातच्या निर्यात दराचा वेग ८ टक्के, तर महाराष्ट्राचा निर्यात दर ७.२ टक्के राहिला.

ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये १०० टक्के एफडीआय

 • झपाट्याने विकसित होणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
 • मात्र, ही मान्यता देताना ज्या कंपन्या ‘मार्केट प्लेस’ पद्धतीने व्यवहार करतात, त्यांनाच गुंतवणूक घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशनने ही मान्यता दिली आहे.
 ‘मार्केट प्लेस’ आणि ‘इन्व्हेन्ट्री’ 
 • सध्या ई-कॉमर्स कंपन्या ‘मार्केट प्लेस’ आणि ‘इन्व्हेन्ट्री’अशा दोन पद्धतीने काम करतात.
 • यापैकी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा आढावा घेऊन त्यानुसार त्या वस्तूंची विक्री करणारी पद्धती मार्केट प्लेस म्हणून परिचित आहे.
 • तर स्वत:कडे विशिष्ट माल साठवून त्यांची विक्री करणे याला इन्व्हेन्ट्री पद्धती म्हणून ओळखले जाते.
 • भारतात सध्या कार्यरत असलेल्या बहुतांश परदेशी कंपन्या या मार्केट प्लेस पद्धतीने काम करतात तर भारतीय ई-कॉमर्स कंपन्या या इन्व्हेन्ट्री पद्धतीने काम करतात.
 • त्यामुळे भारतातून कार्यरत परदेशी कंपन्यांना याचा जास्त फायदा होणार असून त्यांना १०० टक्क्यापर्यंत गुंतवणुकीचा टक्का वाढविता येणार आहे.

पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुकमध्ये

 • प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
 • भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक जास्त गाणी गायिल्याने त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. 
 • पी. सुशीला मोहन यांनी भारतातील १२ भाषेतून १७,६९५ गाणी गायली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे, तर अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये १७,३३० गाणी गायल्याचे नोंद करण्यात आले आहे. रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेली गाणी ही १९६० पासूनची आहेत.
 • गेल्या पाच दशकाच्या करिअरमध्ये पी. सुशीला मोहन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. अमित समर्थ ‘रॅम’साठी पात्र

 • नागपूरचे ॲथलिट डॉ. अमित समर्थ यांनी नवी दिल्ली ते वाघा बॉर्डर ही एक हजार किमी अंतराची ‘ब्रेव्हेट’ सायकल शर्यत २७ मार्च रोजी पूर्ण केली. ही शर्यत पूर्ण करणारे ते विदर्भातील पहिले ॲथलिट ठरले.
 • या साहसी उपक्रमाची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी सहाला ऐतिहासिक इंडिया गेट येथून झाली.
 • दिल्ली ते वाघा बॉर्डर आणि परत वाघा बॉर्डर ते दिल्ली हे एक हजार किमी अंतर सायकलपटूला ७५ तासांत पूर्ण करावयाचे होते. मात्र, डॉ. समर्थ यांनी ५४ तासांतच अंतर कापले.
 • या कामगिरीमुळे ते जगातील सर्वांत जुन्या व प्रतिष्ठेच्या ‘रेस ॲक्रॉस अमेरिका’ (रॅम)साठी पात्र ठरले. या शर्यतीत आतापर्यंत एकही भारतीय वैयक्तिक गटात यशस्वी ठरला नाही.
 • नऊ वेळा ‘आयर्न मॅन’ किताब पटकाविणाऱ्या डॉ. समर्थ यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे ते गोवा ही साडेसहाशे किमी अंतराची डेक्कन क्लिफहॅंगर शर्यत अवघ्या ३६ तासांत पूर्ण केली होती. 
 • व्यवसायाने डॉक्टर असलेले अमित समर्थ प्रो हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून विदर्भातील युवकांना सायकल चालविण्याबद्दल प्रेरित करीत आहेत.

चालू घडामोडी : २८ मार्च

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१६

 • ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २८ मार्च रोजी दिल्लीत करण्यात आली.
 • यामध्ये मूळ तमिळ व तेलुगू भाषेत निर्मिती झालेल्या एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाला २०१५-१६साठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून जाहीर करण्यात आले.
 • ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान मिळाला. अमिताभ यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
 • कंगना राणावतला ‘तनू वेड्‌स मनू अगेन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान जाहीर झाला. तिला सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळाला आहे.
 • बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर ‘बजरंगी भाईजान’ला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
 पुरस्कार यादी 
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली 
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी) 
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पिकू) 
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्‌स मनू अगेन) 
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : समुथिराकानी (विसारानी) 
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी) 
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हैशा 
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) इंदिरा गांधी पुरस्कार : नीरज घायवान (मसान) 
 • सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट : बजरंगी भाईजान 
 • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : रेमो डिसूझा (बाजीराव मस्तानी, दिवानी मस्तानी गाणे) 
 • सर्वोत्कृष्ट गायक : महेश काळे (कट्यार काळजात घुसली) 
 • सर्वोत्कृष्ट गायिका : मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) 
 • सर्वोत्कृष्ट गीतकार : वरुण ग्रोव्हर (मोह मोह के धागे) 
 • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : सुदीप चटर्जी (बाजीराव मस्तानी) 
 • नर्गीस दत्त पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपट : नानक शाह फकीर 
 • सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा : जुही चतुर्वेदी (पिकू) आणि हिमांशू शर्मा (तनू वेड्‌स मनू अगेन) 
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : रिंगण
 • सर्वोत्कृष्ट लघुपट : आसूड

हरियाणामध्ये जाट समाजाला आरक्षण मंजूर

 • शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकाचा मसुदा हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केला.
 • तीन एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा जाट समुदायाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 • मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणा मागासवर्ग (सेवेत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश) विधेयक २०१६ आणि हरयाणा मागासवर्ग आयोग विधेयक २०१६ अशी दोन विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. ही दोन्ही विधेयके सभागृहाने एकमताने मंजूर केली.
 • जाटांबरोबरच शीख, रोर, बिश्नोई आणि त्यागी या चार जातींना सरकारी आणि सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये आणि वर्ग तीन आणि वर्ग चार सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.
 • ‘अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समिती‘ या संघटनेच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारीमध्ये जाट आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये नऊजणांना प्राण गमवावे लागले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियम दौऱ्यावर

 • बेल्जियमसह अन्य दोन देशांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मार्च रोजी रवाना होणार आहेत. अमेरिका आणि सौदी अरेबिया या दोन देशांनाही ते भेट देणार आहेत.
 • ब्रुसेल्समध्ये भारत-युरोपियन युनियनच्या (ईयू) महत्त्वपूर्ण बैठकीस मौदी उपस्थित राहतील. दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत ते बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
 • ब्रुसेल्सहून मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला जातील. आण्विक सुरक्षा परिषदेच्या चौथ्या बैठकीस ते उपस्थित राहतील. ३१ मार्च व १ एप्रिल रोजी ही बैठक होईल.
 • अमेरिकेहून मोदी सौदी अरेबियाला जातील. राजे सलमान बीन अब्दुलाझिझ अल सौद यांच्या निमंत्रणानुसार मोदी रियाधला जात असून, तेथे ते दोन दिवस असतील.

फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणार

 • १ एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य होणार आहे. फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना १३९ क्रमांकावर फोन करावा लागेल.
 • त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल. पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. 
 • रेल्वे तिकिटांचा काळा-बाजार करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवासभाड्याच्या नियमांमध्ये बदल केले होते. मात्र गरजू प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळेच आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी १३९ क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान संसदेवर रॉकेट हल्ला

 • भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर २८ मार्च रोजी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला.
 • अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांची बैठक सुरु असताना हा रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.
 • अफगाणिस्तानला संसदेची नवी इमारत बांधून देण्यात भारताने निधीसह अन्य मदत मोठया प्रमाणावर केली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ही संसद इमारत आहे. डिसेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन झाले होते.

चालू घडामोडी : २७ मार्च

पाकिस्तानचे तपास पथक भारतात दाखल

 • पठाणकोट येथील हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे तपास पथक (जेआयटी) २७ मार्च रोजी भारतात दाखल झाले.
 • या पथकात पाकिस्तानी गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्याही एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
 • २ जानेवारी रोजी पठाणकोट येथील हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप असून त्यात सुरक्षा दलाचे ७ कर्मचारी मारले गेले होते.
 • एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख (सीटीडी) महंमद ताहीर राय हे या पथकाचे प्रमुख आहेत.
 • लाहोरच्या जनरल गुप्तचर यंत्रणेचे उपसंचालक महंमद अझिम अर्शद, आयएसआयचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद, लष्करी गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा आणि गुजरानवाला येथील सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तन्वीर आदींचा पथकात समावेश आहे.
 • हे पथक २९ मार्च रोजी पठाणकोटला जाणार आहे. तत्पूर्वी २८ मार्च रोजी ते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या मुख्यालयात जाणार असून तेथे सुमारे ९० मिनिटे त्यांच्यासमोर हल्ल्याच्या तपासाबाबत सादरीकरण केले जाणार आहे.
 • या सहकार्याच्या बदल्यात भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात जाऊन तपास करण्याची परवानगी मिळावी, अशी भारताची अपेक्षा आहे.

भारताचे हवाईदल प्रमुख इस्राईलच्या दौऱ्यावर

 • भारताचे हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा हे चार दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
 • भारत व इस्राईलमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होत असून; या दौऱ्यादरम्यान राहा हे इस्राईलचे संरक्षण मंत्री मोशे यालून यांची भेट घेणार आहेत.
 • संरक्षण मंत्र्यांबरोबरच राहा हे इस्राईलच्या अनेक लष्करी उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट

 • कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी बंड पुकारल्यामुळे अस्थिर बनलेल्या उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतला आहे.
 • केंद्राने तशी शिफारस केल्यानंतर कलम ३५६ अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
 • उत्तराखंडमध्ये नऊ आमदारांच्या बंडखोरीनंतर राजकीय परिस्थिती अस्थिर बनली होती. राज्यपाल के. के. पॉल यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री हरीश रावत यांना २८ मार्चपर्यंत मुदत दिली होती.
 • परंतु बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस अगोदरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 
 • उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असली तरी विधानसभा बरखास्त करण्यात आलेली नाही.

निदा फाजली यांना उर्दू अकादमीचा पुरस्कार

 • उर्दू अकादमीचा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार प्रसिद्ध शायर निदा फाजली यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना अमिर खुसरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 • याशिवाय विविध क्षेत्रांतील पाच जीवनगौरव पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय एकता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
 प्रमुख पुरस्कार 
 • डॉ. सुराग मेहंदी राष्ट्रीय एकता पुरस्कार : अख्तरुल वासे आणि डॉ. सगीर अफ्राहीम 
 • अमिर खुसरो पुरस्कार : माजी राज्यपाल अझीझ कुरेशी 
 • प्रेमचंद पुरस्कार  : डॉ. अली अहमद फातिमी

चालू घडामोडी : २६ मार्च

स्वच्छ भारत अभियानासाठी जागतिक बँकेची मदत

 • स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) साठी जागतिक बँकेच्या १५०० दशलक्ष डॉलर्स परियोजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
 • या प्रकल्पाअंतर्गत राज्यांची कामगिरी विशिष्ट मापदंडांच्या आधारावर मापली जाईल त्यांना डिसबर्समेंट-लिंक्ड इंडिकेटर्स म्हणून संबोधण्यात येणार आहे.
  1. आधीच्या वर्षाशी तुलना करता, राज्यातल्या ग्रामीण भागात उघड्यावर शौचाला बसण्याच्या प्रमाणात झालेली घट
  2. गावांची हागणदारी मुक्त स्थिती कायम राखणे
  3. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सेवा केल्या जाणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येची वाढती टक्केवारी
 • राज्ये, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन अनुदान निधीचा मोठा भाग (९५ टक्के पेक्षा जास्त) संबंधित जिल्हा, ग्रामपंचायत स्तराकडे वर्ग करतील. यामुळे २०१९ पर्यंत स्वच्छता क्षेत्रातले उद्दीष्ट गाठण्याच्या प्रयत्नांना वेग मिळणार आहे.

ग्रामीण आवास योजनेअंतर्गत २.९५ कोटी घरे

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गृहनिर्मिती योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी देण्यात आली.
 • या योजनेअंतर्गत बेघरांना तसंच मोडकळीला आलेल्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
 • या योजनेखाली २०२२ पर्यंत २.९५ कोटी घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी १ कोटी घरे येत्या तीन वर्षात बांधण्यात येतील.
 • या घरांच्या बांधकामासाठी सखल भागातल्या प्रत्येक घरासाठी १.२० लाख रुपये तर डोंगराळ भागासाठी १.३० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरविण्यात येईल. ७०,००० रुपयांचं कर्जही लाभार्थीला घेता येईल मात्र हे कर्ज ऐच्छिक आहे.
 • २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांच्या काळात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८१,९७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दिल्ली आणि चंदीगड वगळता देशभरातल्या सर्व ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
 • सखल भागात घरबांधणीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ६०:४० तर ईशान्य आणि डोंगराळ भागात ९०:१० या प्रमाणात विभागला जाईल.
 • जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक-आर्थिक माहितीचा उपयोग करुन गरजूंचा शोध घेतला जाईल यामुळे पारदर्शकताही राखली जाणार आहे.
 • संपूर्ण यादीतून ग्रामसभेच्या सहभागातून वार्षिक लाभार्थींची यादी निश्चित केली जाईल.

सफाई कर्मचारी आयोगाला मुदतवाढ

 • सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात ३१-०३-२०१६च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
 • वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे १३.०८ कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे. सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.
 • सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो.

एस. श्रीसंतला भाजपची उमेदवारी

 • मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेला माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्याला केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिरुअनंतपुरममधून भाजपने उमेदवारी दिली आहे. 
 • भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने केरळ विधासभेतील एकूण ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली.
 • क्रिकेटपटू श्रीसंतला इर्नाकुलम किंवा त्रिपुनीथुरा मतदारसंघातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. मात्र पक्षाने त्याला तिरुअनंतपुरममधून उमेदवारी दिली आहे.
 • १६ मे रोजी केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत २९ एप्रिलपर्यंत आहे.

सात वर्षाची प्रिती निवडणुक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर

 • इयत्ता दुसरीत जाणारी सात वर्षाची प्रिती यावर्षी मतदान जागृती अभियानात निवडणूक आयोगाच्या सोबत काम करणार आहे. 
 • मे महिन्यात तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने सात वर्षाच्या प्रितीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे. 
 • मतदान जागृतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या शॉट फिल्ममध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
 • इतक्या लहान वयाच्या प्रितीची निवड करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तामिळनाडूतील सर्व म्हणजे २३४ विधानसभा मतदारसंघांची नावे तिला तोंडपाठ आहेत. 
 • मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोग मतदानाआधी जनजागृती करत असते.
 • निवडणूक आयोगाने राज्यातून एकूण १ हजार २०० ब्रँड अँबॅसिडर निवडले आहेत. यात अभिनेते, क्रीडापटूंचा समावेश आहे.

टीम चिट्टोकचा सायकलयात्रेचा नवा विक्रम

 • ‘वर्ल्डस् फास्टेस्ट किवी’ म्हणून प्रसिद्ध न्यूझीलंडच्या टीम चिट्टोक याने भारताच्या सुवर्ण चतुर्भुज (इंडियन गोल्डन क्वाड्रिलॅटरल) ही सुमारे ६ हजार किमीपर्यंची सायकलयात्रा पूर्ण करीत नवा विक्रम केला आहे.
 • चिट्टोक याने न्यूझीलंडच्या दूतावासापासून सायकलने प्रवास करीत चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, जयपूर, कानपूर, पुणे, गुंटूर आणि विशाखापट्टणम असे जवळजवळ ६००० किमीचे अंतर पूर्ण केले.
 • त्याने दररोज २५० कि.मी. अंतर पार पाडत २४ दिवसांमध्ये हा पल्ला गाठला.
 • चिट्टोक याने न्यूझीलंडच्या वैकाटो विद्यापीठातून कायदा आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड ते ऑस्ट्रेलिया असे अंतर पार करीत तो वेगवान सायकलपटू बनला होता.

चालू घडामोडी : २५ मार्च

‘फॉर्च्यून’च्या महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल

  Arvind Kejriwal
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फॉर्च्यून मासिकाने जगातील ५० महान नेत्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.
 • आम आदमी सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दल फॉर्च्यूनने केजरीवाल यांचे विशेष कौतुक केले आहे. जानेवारीमध्ये १५ दिवसांसाठी सम-विषम योजनेचा प्रयोग यशस्वीपणे राबविला होता.
 • जगभरातील ५० नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा ४२वा क्रमांक आहे. केजरीवाल यांनी आपल्या कारकिर्दीची जोखीम पत्करून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आणि दिल्लीतील गर्दी व प्रदूषण कमी केले.
 • गेल्या वर्षी पाचव्या क्रमांकावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीच्या यादीत स्थान मिळालेले नाही. अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांनी या यादीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
 • तसेच, अमेरिकेतील देशांतर्गत व जागतिक आव्हानांसमोर बराक ओबामा यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना सलग तिसऱ्या वर्षी या यादीतून वगळण्यात आले आहे.
 • या यादीत जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुसऱ्या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की तिसऱ्या स्थानावर आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

 • जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे तीन महिन्यांपासून लागू असलेल्या राज्यपालांच्या राजवटीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
 • त्यामुळे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या मेहबुबा काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
 • मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षपदी व मुख्यमंत्रीपदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झाली.
 • एकूण ८७ सदस्यसंख्या असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीकडे सर्वाधिक २७ आमदार असून, भाजपाकडे २५ आमदारांचे बळ आहे.
 • याशिवाय पीडीपी-भाजप युतीला सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सच्या दोन तसेच दोन अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.
 मेहबुबा मुफ्ती 
 • मेहबुबा मुफ्ती या जमुऊ काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत.
 • १९९९मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर त्या ओमर अब्दुल्लांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
 • २००२मध्ये मेहबुबा पहलगाम येथून विजयी झाल्या होत्या. २००४मध्ये त्या कांग्रेससोबतच्या आघाडीमध्ये सहभागी झाल्या आणि लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या.
 • आता मेहबुबा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत.

इंधनासाठी नेपाळचा चीनसोबत करार

 • इंधनाच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नेपाळने भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत. त्यामुळे यापुढे भारताशिवाय चीनकडूनही नेपाळ इंधन खरेदी करू शकणार आहे. 
 • नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नुकतीच बीजिंगला भेट दिली. त्यावेळी हे करार करण्यात आले.
 • भारत हा नेपाळला अनेक वर्षांपासून इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो.
 • नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे मैदानी भागात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मधेशी नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 • त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मधेशी नागरिक आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेपाळचे भारताशी असलेले संबंध ताणले गेले आहेत. या सर्व प्रकारामुळे नेपाळ भारतावर अवलंबून असल्याचे दिसून आले.
 • परिणामी नेपाळने भारतावर अघोषित नाकेबंदीचा आरोपही केला होता. नेपाळच्या मते, भारताकडून होणाऱ्या अघोषित नाकेबंदीमुळे नेपाळला गॅस, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा भासत आहे.
 • त्यामुळेच नेपाळ आणि चीनदरम्यान चार अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.

शेन वॉटसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

 • ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू शेन वॉटसनने वर्ल्ड टी-२० स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटसनने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.
 • वॉटसनने बरोबर चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच २००२मध्ये २४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यांत पदार्पण केले होते.
 • वॉटसनने ५९ कसोटींत ३७३१ धावा केल्या असून, यात ४ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, १९० वनडेत त्याने ९ शतके आणि ३३ अर्धशतकांसह ५७५७ धावा केल्या आहेत.
 • कसोटीत वॉटसनने ७५, तर वनडेत १६८ विकेट घेतल्या आहेत. त्याने ५६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १४०० धावा आणि ४६ विकेट घेतल्या आहेत.
 • या वर्षी आयपीएलच्या लिलावत वॉटसनला ९.५ कोटी रुपयांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने खरेदी केले आहे.
 • वॉटसन हा २००७ आणि २०१५च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने सहाही टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये तो मालिकावीर ठरला होता.
 • ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, रिकी पाँटिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट या माजी क्रिकेटपटूंसोबत खेळलेला ऑस्ट्रेलियन संघातील तो एकमेव खेळाडू आहे.

फुटबॉलपटू जोहान क्रिफ यांचे निधन

 • महान फुटबॉलपटू जोहान क्रिफ यांचे फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे २४ मार्च रोजी निधन झाले.
 • हॉलंडच्या जोहान यांनी अॅजेक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना तीन युरोपियन कप जिंकण्यात योगदान दिले.
 • तसेच चमकदार खेळामुळे त्यांना तीनवेळा मानाच्या बॅलन डी ओर (१९७१, १९७३, १९७४) या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 • ८ वर्ष ते बर्सोलिनाच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी व्यवस्थापकाची भूमिका बजावत बार्सिलोनाला चारवेळा स्पॅनिश ला लीगाचं विजेतेपद मिळवून दिले होते.
 • जोहान क्रिफ यांच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सने १९७४ साली फिफा विश्वचषकाचं उपविजेतेपद मिळवले होते.
 • जोहान क्रिफ यांनी नेदरलँड्सकडून ४८ सामन्यांमध्ये ३३ गोल झळकावले आहेत. व्यावसायिक फुटबॉलमध्ये जोहान क्रिफ यांच्या नावावर ६६१ सामन्यांमध्ये ३६९ गोल जमा आहेत. 

मासिक : फेब्रुवारी २०१६ (PDF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ परीक्षेसाठी चालू घडामोडींची विस्तृत व परीक्षाभिमुख तयारीसाठी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ‘MPSC Toppers’ने फेब्रुवारी २०१६चे हे मासिक PDF स्वरूपात तयार केले आहे. हे मासिक मोफत असून परीक्षेपूर्वी डिसेंबर २०१५ व जानेवारी आणि मार्च २०१६ चे मासिक आम्ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आमच्या प्रयत्नांना तुमचा पाठींबा देण्यासाठी ‘MPSC Toppers’चे Mobile App जास्तीत जास्त Share करा.

हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers All in One Mobile App
★ राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २४ मार्च

‘ब्रिक्स’चे आठवे शिखर संमेलन गोव्यामध्ये

 • जगातील पाच प्रभावशाली देशांचा समूह असलेल्या ‘ब्रिक्स’ची आठवी शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे.
 • जगात ‘ब्रिक्स’चे सदस्य असलेल्या या पाच देशांची लोकसंख्या ४२ टक्के आहे आणि या देशांचे सकल राष्ट्रीय उत्पादन १६००० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
 • परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या शिखर संमेलनाची वेबसाईट आणि प्रतीक चिन्हाचे (लोगो) अनावरण केले. या वर्षी ‘ब्रिक्स’ समूहाचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
 • रशियन महासंघाने जुलै २०१५ मध्ये उफा या अतिशय सुंदर अशा शहरामध्ये सातव्या ब्रिक्स संमेलनाचे आयोजन केले होते.
 • अंडर-१७ फुटबॉल सामने, चित्रपट महोत्सव, वेलनेस फोरम, युथ फोरम, यंग डिप्लोमॅट्स फोरम, व्यापार मेळा, फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह, थिंक टँक आणि शैक्षणिक मंच यांसारखे कार्यक्रम या संमेलनात राबविण्यात येणार आहेत.

अश्गाबात कराराला मंजुरी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अश्गाबात कराराला मंजुरी देण्यात आली. 
 • अश्गाबात करार हा आंतरराष्ट्रीय वाहतूक तसेच मध्य आशिया व पर्शियन आखातामधील माल वाहतूक सुलभ व्हावी यासाठी करण्यात आला आहे.
 • या कराराचे ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान हे देश संस्थापक सदस्य आहेत. आता कझाकिस्तान हा देश देखील या करारात सहभागी झाला आहे.
 • या करारामुळे भारत या मार्गाचा उपयोग युरो-एशियन क्षेत्रासोबत व्यापार व व्यावसायिक संवाद वाढविण्यासाठी करू शकतो.
 • याशिवाय, संपर्क वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीच्या आपल्या प्रयत्नांना याची जोड मिळेल.
 • अश्गाबात करार स्वीकारण्याचा आपला निर्णय भारत आता ‍डिपॉझिटरी देश तुर्कमेनिस्तानला कळवेल. संस्थापक सदस्यांच्या संमतीनंतर भारत या कराराचा एक घटक बनेल.

भारत आणि लिधुआनिया दरम्यान सामंजस्य करार

 • कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लिधुआनिया दरम्यानच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
 • या कराराअंतर्गत कृषी उत्पादन क्षेत्र, उद्यानविद्या, सुगीनंतरचे व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, शीतगृह साखळी विकास, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्योत्पादन, यासह कृषी उत्पादन क्षेत्रातील सहकार्य उपलब्ध होणार आहे.
 • करारामुळे क्षमता वृद्धी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांमधे ज्ञानाचे आदानप्रदान, जेनकिय स्रोतांची देवाणघेवाण, तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि चांगल्या कृषी प्रथांचा विकास आदी बाबतीत मदत होणार आहे.

तामिळनाडूमध्ये तिसरी आघाडी

 • तामिळनाडू राज्यात अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांना शह देण्यासाठी पीपल्स वेल्फेअर फ्रंट नावाने तिसरी आघाडी तयार झाली आहे.
 • अभिनेते विजयकांत यांचा डीएमडीके ही पक्ष आघाडीत सहभागी झाला असून, त्यांना मुख्मंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
 • डीएमडीके केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. राज्यात मात्र त्यांनी भाजपशी आघाडी केलेली नाही.
 • पीपल्स वेल्फेअर फ्रंटमध्ये चार पक्षांचा समावेश आहे. त्यात एमडीएमके, माकप, भाकप आणि व्हिसीके हे पक्ष आहेत. 
 • आपण या निवडणुकीत वेगळे लढणार असल्याचे विजयकांत यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यात आता अण्णा द्रमुक-द्रमुक-पीडब्लूएफ, भाजप आणि पीएमके अशी बहुपक्षीय लढत होणार आहे. 

विजय मल्ल्याचा सनोफीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 • किंगफिशर एअरलाइन्समुळे वादात सापडलेले आणि सनोफी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष असलेले विजय मल्ल्या यांनी सनोफीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • सनोफी इंडिया या औषध उत्पादक कंपनीमध्ये विजय मल्ल्या १९७३पासून संचलाक मंडळातील सदस्य होते. १९८३पासून ते या कंपनीचे अध्यक्ष आहेत.
 • मूळ हेक्स्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेड म्हणून प्रसिद्ध असलेल्या व नंतर सनोफी इंडिया म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या या कंपनीत आपल्याला पुन्हा संचालक मंडळावर नियुक्त केले जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सनोफी इंडियाला कळवले आहे.

चालू घडामोडी : २३ मार्च

शहीद दिन

 • भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची २३ मार्च रोजी पुण्यतिथी आहे.
 • २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.

अटल पेन्शन योजनेत सुधारणा

 • केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेत सुधारणा केली असून या सुधारणेनुसार या योजनेअंतर्गत खातेधारकाचा जर वयाच्या ६० व्या वर्षांपूर्वी मृत्यू झाला, तर खातेधारकाच्या पत्नी वा पतीला शिल्लक कालावधीसाठी आपल्या जोडीदाराच्या खात्यात पैसे टाकून योजनेला नियमित ठेवता येणार आहे.
 • या योजनेतील खातेधारकाच्या पती किंवा पत्नीला मूळ खातेधारकाप्रमाणेच आजीवन पेन्शन रकमेचा लाभ घेण्याचा हक्क असेल.
 • परंतु, दोघांचाही मृत्यू झाला, तर खातेधारकाने निश्चित केलेल्या वारसदाराला पेन्शनची रक्कम मिळणार आहे.
 • शिवाय खातेधारकाच्या खात्यात ६० वर्षांपर्यंत जेवढी रक्कम जमा होणार आहे, तेवढी रक्कम अंतर्भूत करून ती संपूर्ण रक्कम वारसदाराला देण्यात येणार आहे.
 • खातेधारकाचा वेळेआधीच मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला संपूर्ण रक्कम दिली जाईल ही या योजनेतील तरदूत खातेधारकाला आवडलेली नव्हती हेच या बदलाचे कारण असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 • मोदी सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत खातेधारकाचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दर महिन्याला खातेधारकाला निश्चित केलेली रक्कम मिळणे सुरू होणार आहे.

ई-कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम जाहीर

 • पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे नियम जाहीर केल्यानंतर आज ई-कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम जाहीर केले.
 • संगणक, मोबाईल, टीव्ही, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, संगणकाला जोडलेले प्रिंटर्स व अन्य उपकरणांचा पूर्ण वापरानंतर ‘ई-कचऱ्या’त समावेश होतो.
 • आता नव्या नियमांनुसार लोकांना आता हा कचरा बेजबाबदारपणे कोठेही टाकता येणार नाही.
 • या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादक आणि त्याचबरोबर वितरक म्हणजेच दुकानदार यांच्यावर टाकण्यात आलेली आहे.
 • पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी तयार केलेल्या नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूदही त्यामध्ये आहे. 
 • २०११मध्ये यासंबंधीची पहिली नियमावली तयार करण्यात आली होती. परंतु, बदलत्या काळानुसार ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याने मंत्रालयाने ही नवी नियमावली तयार केली आहे.
 प्रमुख नियम पुढीलप्रमाणे 
 • उत्पादक, वितरक, रिफर्बिशर आणि निर्माते जबाबदारी संघटना (प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशन : पीआरओ) यांचा अतिरिक्त किंवा वाढीव स्टेकहोल्डर म्हणून समावेश.
 • केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे तर तिच्यामध्ये वापरले जाणारे भाग, सुटे भाग, कन्झ्युमेबल्स यांचाही अंतर्भाव.
 • सीएफएल आणि इतर पारायुक्त दिव्यांचा समावेश. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याच्या यंत्रणांची निर्मिती करण्याची जबाबदारी उत्पादकांवर. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणा किंवा संस्थांची नोंदणी, नोंदणी व परवाना पर्यावरण मंत्रालयाकडून आणि राज्यवार अशा अधिकृत संस्थांची यादी तयार करणे. 
 • इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विशिष्ट जीवनमान किंवा त्या किती काळ वापरता येऊ शकतात याचा विशिष्ट कालावधी असतो. त्यानंतर ती वस्तू टाकाऊ होते. वस्तू खरेदी करतानाच उत्पादक किंवा वितरक ग्राहकाकडून विशिष्ट अशी रक्कम अनामत म्हणून आकारेल आणि त्या वस्तूचे आयुष्य संपून ती टाकाऊ झाल्यावर परत त्या उत्पादक किंवा वितरकाकडेच पुन्हा देण्याचे बंधन यामुळे तयार होईल. संबंधित अनामत रक्कम व्याजासह ग्राहकाला परत मिळण्याची तरतूद नियमात करण्यात आली आहे. 
 • इलेक्ट्रॉनिक कचरा विनिमय यंत्रणेची स्थापना. 
 • आता अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्यांना नव्या नियमानुसार अधिकृत किंवा औपचारिक दर्जा देणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना परवाना देणे या गोष्टीही यापुढच्या काळात केल्या जाणार आहेत.

चिनाब नदीवर सर्वांत उंच रेल्वे पूल

 • जम्मू-काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावरील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. २०१९ मध्ये हा रेल्वे पूल बांधून पूर्ण केला जाईल.
 • चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा ३५९ मीटर उंचीचा आणि शत्रू राष्ट्राच्या सीमेजवळील निर्जन स्थळी बांधण्यात येत असलेला रेल्वे पूल जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच असेल.
 • जगात सध्या फ्रान्समधील टॉम नदीवर बांधण्यात आलेला पूल सर्वांत उंच पूल मानला जातो. या पुलाचे खांब नदीपात्रापासून ३४० मीटर उंचीवर आहेत.
 • चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला हा कमानीच्या आकाराचा रेल्वे पूल बक्कल (कत्रा) आणि कौरी (श्रीनगर) या दोन नदीकाठांना जोडणार आहे.
 • ताशी २६६ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा तडाखा सहन करू शकेल, अशा पद्धतीने या पुलाची रचना करण्यात आली आहे.
 • वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे या पुलावर संवेदक (सेन्सर) बसविण्यात येतील. वाऱ्याने ताशी ९० कि.मी.चा वेग घेतला की रेल्वे मार्गावरील सिग्नल आपोआप लाल होतील आणि रेल्वेला पुलावर येण्याआधीच थांबविता येईल.
 • कोकण रेल्वेने आतापर्यंत या प्रकल्पावर २९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ६१०० कोटी रुपये आहे.

रेमण्ड मूर यांचा राजीनामा

 • महिला टेनिसपटूंबद्दल अनुदार उदगार काढणारे इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेमण्ड मूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
 • ‘मी जर महिला टेनिसपटू असतो तर गुडघ्यावर बसून मी देवाचे आभार मानले असते की, रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल यांच्यासारख्या खेळाडूंचा जन्म झाला. त्यांच्यामुळेच हा खेळ वाटचाल करतो आहे,’ असे विधान मूर यांनी केले होते.
 • मूर यांच्या या विधानानंतर महिला टेनिसमध्ये खळबळ उडाली आणि स्वतः सेरेना विल्यम्सने याची गंभीर दखल घेत मूर यांच्यावर सडेतोड टीका केली.
 • इंडियन वेल्स स्पर्धा प्रमुख लॅरी एलिसन यांना मूर यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय कळविला. रेमण्ड यांनी सदर अवमानकारक विधान केल्यानंतर महिला टेनिसची माफीही मागितली होती.

चालू घडामोडी : २२ मार्च

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा

 • स्वतंत्र मराठवाडा करण्याचे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असलेले महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राज्यपाल सी. विद्यासागार राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
 • शिवसेनेने राजीनाम्याबरोबरच त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे. तर विरोधी पक्षाने अणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली.
 • जालना येथील एका कार्यक्रमात बोलताना विदर्भासह मराठवाडाही स्वतंत्र व्हावा असे वादग्रस्त वक्तव्य श्रीहरी अणे यांनी केले होते.

अगस्त्यमाला जैवपर्यावरण क्षेत्र

 • जैव पर्यावरण क्षेत्रांच्या जागतिक साखळीमध्ये युनेस्कोने आणखी १९ नव्या ठिकाणांचा समावेश केला असून, त्यात भारतातील अगस्त्यमाला जैव पर्यावरण क्षेत्राचेही नाव आहे.
 • पेरूची राजधानी लिमामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या या निर्णयामुळे जागतिक साखळीमधील जैवपर्यावरण क्षेत्रांची संख्या ६६९ झाली आहे.
 • नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या जैवावरणात नवीन १८ ठिकाणांचा समावेश असून एक जैवावरण हे स्पेन व पोर्तुगाल यांच्यात संयुक्त आहे.
 अगस्त्यमाला 
 • अगस्त्यमाला जैवपर्यावरण क्षेत्र हे पश्चिम घाटात असून, यामध्ये १,८६८ मीटर उंचीपर्यंतच्या पर्वतशिखरांचाही समावेश आहे.
 • हा भाग सदाहरित वनांचा असून, येथे जवळपास २,२५४ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यातील ४०० प्रजाती प्रादेशिक आहेत.
 • प्राचीन काळापासून येथे वेलदोडे, जांभूळ, सुपारी, मिरे आणि केळी यांची लागवड केली जाते. याच भागात तीन अभयारण्ये असून, व्याघ्र संरक्षित क्षेत्रही आहे.
 • केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हे अगस्त्यमाला जैव पर्यावरण क्षेत्र पसरले आहे. या पर्यावरण क्षेत्रात अनेक आदिवासी राहात असून, त्यांची संख्या जवळपास तीन हजार आहे.
 भारत आणि जैवपर्यावरण क्षेत्र 
 • नैसर्गिक स्रोतांचा वापर करून जैवविविधतेचे जतन करत त्याचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्याच्या ठिकाणांना जैवपर्यावरण क्षेत्र म्हणतात.
 • युनेस्कोतर्फे दरवर्षी जगभरातील काही ठिकाणांचा या क्षेत्रांच्या यादीत समावेश केला जातो. 
 • भारतात एकूण अठरा जैवपर्यावरण क्षेत्रे असून, त्यापैकी निलगिरी, नंदादेवी, मन्नारचे आखात, सुंदरबन, निकोबारसह नऊ क्षेत्रांचा युनेस्कोच्या साखळीत समावेश आहे.
 • भारतातील जैवपर्यावरण क्षेत्रांमधील नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण केले जाते. तसेच, या क्षेत्रामध्ये शक्यतो एखादे अभयारण्य अथवा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश असतो.
 • या क्षेत्रामधील फक्त वने आणि प्राण्यांचाच नव्हे, तर जंगलात राहणाऱ्या मानव समुदायांचेही संरक्षण केले जाते.

आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायदा

 • येत्या एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले.
 • यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या २१ होणार आहे. 
 • डिजिटायझेशन, आधार कार्ड, रेशन कार्डला जोडले जाणे, संगणकीकृत यंत्रणा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी या राज्यांनी पूर्ण केल्या आहेत.
 • देशभरातील एकूण २४ कोटी १८ लाख ५० हजार रेशन कार्डांपैकी ९९.९० टक्के रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात केले असून, ४८ टक्के रेशन कार्ड आधार कार्डला जोडण्यात आले आहेत.

ब्रुसेल्स येथील विमानतळावर दहशतवादी हल्ला

 • बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील झॅव्हनटेम विमानतळाचा प्रस्थान कक्ष आणि मेट्रो स्टेशन अशा दोन ठिकाणी २२ मार्चच्या सकाळी बॉम्बस्फोट झाले.
 • या घटनेनंतर ब्रुसेल्स विमानतळ खाली करण्यात आले. तसेच विमानतळाकडे जाणारी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.
 • या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ३४ जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एक महिला आणि एक पुरुष अशा दोन भारतीयांचा समावेश असून हे दोघेही जेट एअरवेजचे कर्मचारी आहेत. 
 • या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.
 • नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी ब्रसेल्समध्ये हल्ला करण्यात आला.
 • बेल्जियमचे पंतप्रधान : चार्ल्स मिचेल

इंटेलचे माजी सीईओ अँडी ग्रूव्ह यांचे निधन

 • संगणकाचा महत्त्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील आघाडीची व सर्वांत मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रूव्ह यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. 
 • नाझी राजवटीत वाढल्यानंतर तरुण वयातच हंगेरीतून बाहेर पडून अमेरिकेत गेलेल्या ग्रूव्ह यांनी १९८०च्या दशकात इंटेल कंपनीला दिवाळखोरीपासून वाचविले.
 • इंटेलमध्ये ३७ वर्षे कार्यरत असताना कंपनीला चिप बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी बनविण्यात ग्रूव्ह यांचा सिंहाचा वाटा होता.

जोकोव्हिच आणि अझारेन्का यांना इंडियन वेल्स स्पर्धेचे जेतेपद

 • नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेचे जोकोव्हिचचे हे तिसरे जेतेपद आहे.
 • अंतिम लढतीत जोकोव्हिचने खोलवर सर्व्हिससाठी प्रसिद्ध मिलास राओनिकचा ६-२, ६-० असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझारेन्काने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला ६-४, ६-४ असे नमवले.
 • जेतेपदासह अझारेन्काने २०१४ नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे.

चालू घडामोडी : २१ मार्च

चीन व नेपाळ देशांदरम्यान रेल्वेमार्ग

  Khadga Prasad Sharma Oli
 • पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे पहिल्यांदाच सात दिवसीय चीन दौऱ्यावर गेले आहेत.
 • या दौऱ्यात चीन व नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात ओली यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली.
 • नेपाळच्या पंतप्रधानांनी तिबेटमार्गे चीन ते नेपाळ असा रेल्वेमार्ग तयार करावा असा चीनकडे आग्रह धरला होता. नेपाळचे भारतावरील भूराजकीय अवलंबित्व या मार्गामुळे कमी होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
 • नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी या दौऱ्यात १० करारांवर सह्या केल्या. या करारांमध्ये ‘ट्रान्झिट ट्रेड’ हा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा करार देखील अंतर्भूत आहे.
 • चीनच्या सहकार्याने नेपाळमध्ये नवीन विमानतळ बनवले जाणार आहे. नेपाळच्या पोखरामध्ये चीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. हे ठिकाण नेपाळचे सर्वात महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.
 • भारतीय वंशाच्या मधेशी समुदायाने भारत व नेपाळमधील मार्ग रोखून धरल्याने नेपाळमधील जनजीवन विस्कळित झाले होते. या पार्श्वभूमीवर, नेपाळ व चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व प्रयत्नशील आहे. 
 • चीनचे पंतप्रधान : ली केकियांग
 • चीनचे राष्ट्रपती : शी झिंनफिंग

मिझोराममध्ये पहिली ब्रॉडगेज मालगाडी

 • गुवाहाटीहून २६०० मेट्रिक टन तांदूळ घेऊन येणारी रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी मिझोरामच्या बैराबी स्थानकात दाखल झाली.
 • मालगाडीतून मोठ्या प्रमाणात तांदूळ आल्यामुळे मिझोराम-आसाम सीमेवरच्या बैराबीमध्ये अन्न स्वस्त दराने उलब्ध होऊ शकेल.
 • आसामच्या सिल्चर शहरातून मिझोरामला देशाबरोबर जोडणारा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक ५४ हाच सध्या मिझोरामचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे. मात्र, आता लोहमार्गामुळे वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.

ट्विटरला दहा वर्षे पूर्ण

  Twitter
 • आजच्या पिढीसाठी व्यक्त होण्याचे लोकप्रिय माध्यम असणाऱ्या ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटला २१ मार्च रोजी दहा वर्षे पूर्ण झाली.
 • ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉरसी यांनी २१ मार्च २००६ रोजी पहिले ट्विट केले. त्यापाठोपाठ त्यांच्या टीमने ट्विटरवर जॅकला फॉलो केले.
 • बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली होती. 
 • सध्या ट्विटरचे जगभरात ३२ कोटी वापरकर्ते आहेत. जगभरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी आणि संशोधकांपर्यंत ट्विटर वापरकर्ते आहेत.
 • ट्विटरवर दिवसभरात ५० कोटीहून अधिक ट्विट केले जातात. त्यामुळे आज जगातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सरकारे, संस्थांसाठी ट्विटर हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे.
 • पण, ट्विटरला सोशल मीडियावरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे. दोन्ही माध्यमांपाठोपाठ ट्विटर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बराक ओबामा यांचा क्युबाचा ऐतिहासिक दौरा

 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा दोन दिवसीय ऐतिहासिक क्युबा देशाच्या दौऱ्यावर पोहचले. ८८ वर्षांत क्युबाला भेट देणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले आहेत.
 • शीतयुद्धानंतर क्युबा व अमेरिका यांच्यातील संबंध पूर्णपणे संपुष्टात आले होते. अमेरिकेने क्युबावर आर्थिक र्निबध लादून त्यांना जेरीस आणले. क्युबा हा रशियाचा मित्र देश मानला जात होता.
 • क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी डिसेंबर २०१४मध्ये जुनै वैर सोडून पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी ओबामांशी बोलणे केले होते. अमेरिकेने नुकताच क्युबामध्ये आपला दुतावासही सुरु केला होता. 
 • ओबामा यांच्या दौऱ्याला विरोध करत २०० मानवधिकार कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
 • ओबामांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान दूरसंचार, हवाई संपर्क आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर काही करार होण्याची शक्यता आहे.
 • अमेरिकेचे अध्यक्ष असलेले कॅलविन कुलिज यांनी १९२८मध्ये क्युबाला भेट दिली होती.

उत्तर कोरियाच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी

 • उत्तर कोरियाने पुन्हा एकदा लघू पल्ल्याच्या पाच क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध झुगारून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे.
 • अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांपासून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. 
 • दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
 • अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा संयुक्त सराव सुरू असून, त्याला उत्तर कोरियाचा आक्षेप आहे. त्यामुळे उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन एकप्रकारे सोल आणि वॉशिंग्टनवर हल्ला करण्याची धमकी देत आहे.

चालू घडामोडी : २० मार्च

आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरमीतसिंगला सुवर्णपदक

 • आशियाई २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत भारताच्या गुरमीतसिंगने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
 • ३० वर्षीय गुरमितसिंगने २० किलोमीटर अंतर १ तास २० मिनिटे आणि २९ सेकंदांत चालून पूर्ण केले. त्याने जपानच्या इसामु फुजिसावा (१ तास २० मिनिटे ४९ सेकंद) याला मागे टाकत विजेतेपद पटकावले.
 • ३४ वर्षांच्या इतिहासात आशियाई अजिंक्यपद तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय धावपटू आहे.
 • हकम सिंग यांनी १९७८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत २० किमी रोड रेसमध्ये, तर चंदराम यांनी १९८२ मध्ये याच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 • २०११ मध्ये याच स्पर्धेत गुरमीतला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कामगिरीत सुधारणा करत २०१२मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली.
 • २०१३ आणि २०१४ मध्ये त्याला कांस्यपदक मिळाले. गेल्या वर्षी त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • या विजयासोबतच गुरमितने आपले रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान पक्के केले आहे. नऊ धावपटू आतापर्यंत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, नऊपैकी केवळ तिघांचेच रिओवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

प्रणॉयला स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

 • आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताचा उगवता तारा असलेल्या एचएस प्रणॉयने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
 • प्रणॉयचे हे ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे दुसरे विजेतेपद ठरले. प्रणॉयने २०१४मध्ये इंडोनेशिया ओपन ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
 • १३व्या मानांकित प्रणॉयने ४५ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या मार्क ज्वेबलरला २१-१८, २१-१५ असे नमवले. जागतिक क्रमवारीत प्रणॉय २७व्या, तर मार्क १९व्या स्थानावर आहे.
 • गेल्या वर्षी ही स्पर्धा भारताच्या के. श्रीकांतने जिंकली होती. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूने या स्पर्धेत बाजी मारली. 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हिंदुजा बंधू

 • ब्रिटनमध्ये असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधू पहिल्या क्रमांकावर आहेत. लागोपाठ चौथ्या वर्षी त्यांचा पहिला क्रमांक असून व्यक्तिगत संपत्ती १६.५ अब्ज पौंड आहे.
 • यादीची क्रमवारी ठरवताना ब्रिटनमधील आशियायी व्यक्तींचा विचार केला जातो. ही यादी एशियन मीडिया अँड मार्केट यांच्या वतीने प्रसारित केली जाते.
 • पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मित्तल यांची संपत्ती ३.३ अब्ज पौडांनी कमी झाली असून ती ६.४ अब्ज पौंड आहे.
 • या वर्षीच्या विश्लेषणानुसार श्रीमंत आशियायी व्यक्तींचे उत्पन्न २०१५ मध्ये ५४.४८ अब्ज पौंड होते ते आता ५५.५४ अब्ज पौंड झाले आहे.
 • श्रीप्रकाश लोहिया यांचा तिसरा क्रमांक लागला. त्यांची संपत्ती ३ अब्ज पौंड आहे. 

हरदीप रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

 • भारताचा मल्ल हरदीपने (९८ किलो) कुस्तीच्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक मिळवले. यासह तो रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे तीन कुस्तीपटू पात्र ठरले आहे. यापूर्वी योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव रिओसाठी पात्र ठरले आहेत.

चालू घडामोडी : १९ मार्च

कॅप इंडिया २०१६

 • रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने मुंबईत येत्या २० ते २२ मार्च दरम्यान ‘कॅप इंडिया २०१६’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 • जागतिक बाजारात रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. मेक इन इंडियाच्या धर्तीवर या वस्तूंच्या उत्पादनवाढीवर भर दिला जाणार आहे.
 • या उद्योगाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने मुंबईत कॅप इंडिया या औद्योगिक मेळाव्याचे आयोजन केले आले. या प्रदर्शनात विविध देशातील २५० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
 • प्लेक्सकोन्सिल, केमिक्सिल, कॅपेक्सिल आणि शेफेक्सिल या चार निर्यात प्रोत्साहक संस्था यासाठी (ईपीसी) सह-आयोजक आहेत.
 • रसायने, प्लास्टिक आणि संलग्न उत्पादने यांच्या जागतिक व्यापारात भारत हा महत्त्वाचा स्पर्धक आहे. जागतिक व्यापारात आपल्या हिस्सेदारीत वाढीला मोठा वाव आहे.
 • सरकारने २०२० सालापर्यंत ९०० अब्ज अमेरिकी डॉलरचे निर्यात लक्ष्य गाठण्याचे आणि जागतिक व्यापारात आपला हिस्सा २ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर नेण्याचा दृष्टिकोन राखला आहे.
 • भारतीय रसायन उद्योग जगातील तिसरा मोठा उत्पादक आणि एकूण उलाढालीच्या मानाने जगात १२व्या स्थानावर आहे. 
 • CAP India 2016 : Chemicals & Plastics Exhibition 2016 

योगेश्वर दत्तचा रिओ ऑलिंपिकमध्ये प्रवेश निश्चित

 • भारताचा प्रमुख कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने यावर्षी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.
 • आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत योगेश्वरने ६५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवीत आपले ऑलिंपिकमधील स्थान निश्चित केले.
 • ऑलिंपिकसाठी पात्र होणारा योगेश्वर हा दुसरा कुस्तीपटू आहे. यापूर्वी नरसिंग यादवने ऑलिंपिकमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे. 

उर्दू लेखकांची कोंडी

 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उर्दू लेखकांना यापुढे त्यांच्या पुस्तकात देशद्रोही किंवा सरकारच्या विरोधात मजकूर नसेल, अशी ग्वाही देण्याची सक्ती केली आहे.
 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन समितीने हा आदेश काढला आहे. 
 • या समितीकडून अनेक उर्दू लेखक आणि प्रकाशकांना अर्ज धाडण्यात आले आहेत. त्या अर्जांत लेखकांची कोंडी करणाऱ्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत.
 • उर्दू भाषा प्रोत्साहन समितीकडून आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत विविध लेखकांकडून पुस्तकांची खरेदी केली जाते. त्यासाठी आधी अर्ज भरून द्यावा लागतो.
 • या अर्जात बदल करण्यात आला असून, पुस्तकातील मजकूर सरकारविरोधी नसेल, त्यात देशविरोधी वा विविध समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होईल असे लिखाण नसेल, अशी हमी देण्याचे बंधन आता घालण्यात आले आहे.
 • हा एकप्रकारचा करारनामाच असून लेखी हमीचा भंग केल्यास लेखकावर कारवाई करून दिलेले अर्थसहाय्य परत घेण्यात येईल, असेही या अर्जात बजावण्यात आले आहे.