चालू घडामोडी - २८ ऑक्टोबर २०१४
- विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवलेल्या तीन भारतीयांची नावे केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टासमोर सादर केली.
- प्रदीप बर्मन [डाबर इंडिया कंपनीचे माजी संचालक]
- सध्या 'संदेश' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
- पंकज चिमणलाल लोढीया [श्रीजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन]
- राधा सतीश तिन्बोलो [गोव्यातील खाण व्यावसायिक तिन्बोलो समूहाच्या प्रतिनिधी]
- संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या एकूण २२ बैठका होणार आहेत.
- सानिया मिर्झा आणि कारा ब्लेक (झिम्बाब्वे) यांनी WTA फायनल जिंकली.
- रशियाकडून आयात केलेल्या 'सुखोई-३०' विमानाला अपघात झाल्याने तांत्रिक चाचणी होईपर्यंत संरक्षण मंत्रालयाने या विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.
- देशाच्या पश्चिम किना-यावर निलोफर चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे.
- पेशंटला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी 'अरमान'या सामाजिक संस्थेने 'मुंबई हिरो' उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे आयसीयू आणि रक्ताची उपलब्धता याबाबतची माहिती संगणक व मोबाईलद्वारे पुरविण्यात येईल.
सामान्य ज्ञान
- एडीस इजिप्ती नामक डासांमुळे डेंग्यू रोगाचा प्रसार होतो.
- भारताने विविध देशांकडून आयात केलेली लढाऊ विमाने
- रशिया - मिग-२५, मिग-२७, मिग-२९, सुखोई-३०
- ब्रिटन - जॅग्वार
- फ्रांस - मिराज २०००
- अमेरिका - हर्क्युलस