प्रश्नसंच ६ - [बुद्धीमत्ता चाचणी]

---------------------------------------------------
[प्र.१] आजोबांबद्दल पुढीलपैकी कोणते विधान निश्चित खरे असेल?
१] त्यांना एक मुलगा व मुलगी असेल.
२] त्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असेल.
३] त्यांचे केस पांढरे असतील.
४] त्यांना नात अथवा नातू असेल.

-------------------------------------------------------------
[प्र.२] पुढीलपैकी कोणती दोन विधाने सोने हे चांदीपेक्षा जड आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त आहेत?
अ] चांदी जस्तापेक्षा जड आहे.
ब] सोने शिशापेक्षा जड आहे.
क] शिसे चांदीपेक्षा जड आहे.
ड] लोखंड सोन्यापेक्षा हलके आहे.

१] ब आणि ड
२] क आणि ड
३] ब आणि क
३] अ आणि क

-------------------------------------------------------------
[प्र.३] खाली दोन विधाने दिली आहेत त्यावरून दोन निष्कर्ष काढलेले आहेत. विधानातील माहिती खरी आहे असे समजून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगा.

विधान १] सर्व दिवे खांब आहेत.
विधान २] सर्व खांब दार आहेत.

निष्कर्ष अ] कोणतेही दार दिवे नाहीत.
निष्कर्ष ब] काही खांब दिवे आहेत.

पर्याय
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] कोणतेही योग्य नाही
  
-------------------------------------------------------------
[प्र.४] रामचे वडील म्हणतात त्यांना तीन मुले आहेत. राम म्हणतो मला दोन भाऊ आहेत.तर कोणाचे म्हणणे चुकीचे आहे?
१] रामच्या वडिलांचे
२] रामचे
३] दोघांचे
४] कोणाचेही नाही

 -------------------------------------------------------------
[प्र.५] लढाई करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
१] हत्यारे
२] सैनिक
३] शत्रू
४] रणांगण

-------------------------------------------------------------
[प्र.६] शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत." तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय?
१] सून-सासरा
२] सासू-जावई
३] नवरा-बायको
४] भाऊ-बहिण

-------------------------------------------------------------
[प्र.७] अ या गावाहून ब या गावी जायला ४ रस्ते आहेत आणि ब या गावाहून क या गावी जायला ५ रस्ते आहेत तर अ या गावाहून क या गावी जायला वेगवेगळे किती रस्ते आहेत?
१] २०
२] ९
३] १०
४] ४०

-------------------------------------------------------------
[प्र.८] खाली दोन विधाने दिली आहेत त्यावरून दोन निष्कर्ष काढलेले आहेत. विधानातील माहिती खरी आहे असे समजून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगा.

विधान १] सर्व चिकू पेरू आहेत.
विधान २] सर्व डाळिंब हे पेरू नाहीत.

निष्कर्ष अ] सर्व डाळिंब चिकू आहेत.
निष्कर्ष ब] काही डाळिंब चिकू आहेत.

पर्याय
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] कोणतेही योग्य नाही

-------------------------------------------------------------
[प्र.९] परवा सोमवार होता. काल जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आज हवामान ढगाळ आहे. हि तिन्ही विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य असेल?
१] उद्या पाऊस पडेल.
२] रविवारी पाऊस पडला नाही.
३] मंगळवारी पाऊस पडला.
४] सोमवारी हवा स्वच्छ होती.

-------------------------------------------------------------
[प्र.१०] रमेश हा रश्मीचा भाऊ व सुशांत हा रश्मीचा मुलगा आहे. वाणी हि विनिताचि मुलगी आहे. विनिता रश्मीची बहिण आहे. तर वाणी हि सुशांतची कोण?
१] भाची
२] मुलगी
३] आत्या
४] मावस बहिण

-------------------------------------------------------------