प्रश्नसंच १६४ - माहितीची अधिकार, २००५

आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : माहितीचा अधिकार अधिनियम २००५


RTI 2005 Question Bank[प्र.१] भारतात ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ कधीपासून लागू झाला?
१] ६ डिसेंबर २००५
२] १२ ऑक्टोबर २००५
३] १५ जून २००५
४] १ एप्रिल २००५


२] १२ ऑक्टोबर २००५

[प्र.२] केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्ताच्या नियुक्तीसाठी गठीत केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो?
१] पंतप्रधान
२] राष्ट्रपती
३] विरोधी पक्षनेता
४] पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला मंत्री


२] राष्ट्रपती

[प्र.३] माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला?
१] दक्षिण आफ्रिका
२] ऑस्ट्रेलिया
३] स्वीडन
४] यु.एस.ए (अमेरिका)


३] स्वीडन

[प्र.४] जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळेत ती माहिती देणे बंधनकारक आहे?
१] ३० दिवस
२] १ दिवस
३] ४८ तास
४] १२ तास


३] ४८ तास

[प्र.५] केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त पदाचा कालावधी किती आहे?
१] ३ वर्षे 
२] ४ वर्षे
३] ५ वर्षे
४] ६ वर्षे


३] ५ वर्षे

[प्र.६] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ मधील कोणत्या कलमामध्ये अपिलाची तरतूद करण्यात आलेली आहे?
१] कलम १८
२] कलम १९
३] कलम २०
४] कलम २१


२] कलम १९

[प्र.७] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ मधील कलम १९ नुसार जन माहिती अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे व्याधीत झालेली कोणतीही व्यक्ती प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे किती दिवसांमध्ये अपील करू शकतो?
१] १५ दिवस
२] २० दिवस
३] २५ दिवस
४] ३० दिवस


४] ३० दिवस

[प्र.८] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे?
१] १५ दिवस
२] २० दिवस
३] २५ दिवस
४] ३० दिवस


४] ३० दिवस

[प्र.९] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’च्या कलम २(इ) नुसार “सक्षम प्राधिकारी” या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही?
१] लोकसभा सभापती
२] भारताचे सरन्यायाधीश
३] भारताचे राष्ट्रपती
४] राज्यांचे मुख्यमंत्री


४] राज्यांचे मुख्यमंत्री

[प्र.१०] ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’नुसार सार्वजनिक प्राधिकरणाने अधिनियम अधिनियमित झाल्यापासून किती दिवसात केंद्रीय/राज्य माहिती अधिकारी नियुक्त करायचे असतात?
१] ३० दिवस
२] ४५ दिवस
३] ५० दिवस
४] १०० दिवस


४] १०० दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा