प्रश्नसंच ९९ - [राज्यशास्त्र-PSI Pre 2014]

[प्र.१] खालील विधानांचा विचार करा.
अ] डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितेचे अध्यक्ष होते.
ब] श्री.एच.जे.खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

१] ब बरोबर आहे
२] अ बरोबर आहे
३] अ आणि ब दोन्ही बरोबर
४] अ आणि ब दोन्ही चूक आहे

उत्तर
२] अ बरोबर आहे
--------------------------------
[प्र.२] राज्यपाल कोणत्या कलमानुसार राज्य सरकारचे अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगतो?
१] कलम २००
२] कलम २०२
३] कलम २०७
४] कलम २०४

उत्तर
२] कलम २०२
--------------------------------
[प्र.३] राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] त्यांची नियुक्ती संबंधित राज्याचे राज्यपालाकडून होते.
२] त्यांच्याकडे सोपविलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो.
३] जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधीमंडळापुढे भाषण करू शकतो.
४] विधीमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.

उत्तर
४] विधीमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.
--------------------------------
[प्र.४] ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा.
अ] तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ब] तो ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवतो.
क] ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो.
ड] अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते.

वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ, ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
--------------------------------
[प्र.५] राज्य लोकसेवा आयोगाच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर नियुक्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
२] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
३] तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
४] तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.

उत्तर
४] तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.
--------------------------------
[प्र.६] राज्यपालाला दया दाखविण्याचा विशेष अधिकार कोणत्या कलमाने प्रदान करण्यात आला आहे?
१] कलम १५६
२] कलम १६०
३] कलम १६१
४] कलम १६३  

उत्तर
३] कलम १६१
--------------------------------
[प्र.७] कोणत्या कलमानुसार राज्यपाल अंग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती विधानसभेत करू शकतात?
१] कलम ३३०
२] कलम ३३१
३] कलम ३३२
४] कलम ३३३

उत्तर
४] कलम ३३३
--------------------------------
[प्र.८] खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेसंदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले?
अ] इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीनचा वापर.
ब] EVM आणि मतपत्रिकेवर 'NOTA' (यापैकी कुणीही नाही) पर्याय
क] निवडणूक ओळखपत्र
ड] गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (खासदार), राज्य विधीमंडळाचा सदस्य (आमदार) अपात्र ठरतो.
१] अ फक्त
२] अ आणि ड
३] अ, ब, क
४] ब आणि ड

उत्तर
४] ब आणि ड
--------------------------------
[प्र.९] भूमी, अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३ मधील खालील तरतुदीपैकी बरोबर तरतुदी ओळखा.
अ] भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे.
ब] अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.
क] पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल
ड] ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या चारपटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त ब, क आणि ड
४] फक्त क आणि ड

उत्तर
३] फक्त ब, क आणि ड
--------------------------------
[प्र.१०] उद्देशपत्रिकेची वर्णने व विद्वान यांच्या जोड्या लावा.
अ] राजकीय कुंडली
ब] कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे
क] उत्कृष्ट गद्य काव्य
ड] अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा

१] पंडित ठाकूरदास भार्गव
२] एम.व्ही.पायली
३] के.एम.मुन्शी
४] आचार्य जे.बी.कृपलानी

पर्याय
१] अ-३/ब-४/क-१/ड-२
२] अ-१/ब-२/क-३/ड-४
३] अ-२/ब-१/क-४/ड-३
४] अ-४/ब-३/क-२/ड-१

उत्तर
१] अ-३/ब-४/क-१/ड-२
------------------------------