प्रश्नसंच ९६ - [इतिहास]

[प्र.१] भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु करण्याचा मान खालीलपैकी कुणास जातो?
१] बाळशास्त्री जांभेकर
२] दादाभाई नौरोजी
३] जेम्स ऑगस्टस हिक्की
४] लोकमान्य टिळक

उत्तर
३] जेम्स ऑगस्टस हिक्की
------------------
[प्र.२] मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म कोठे झाला?
१] कराची
२] मक्का
३] लाहोर
४] दिल्ली

उत्तर
२] मक्का [११ नोव्हेंबर १८८८ रोजी]
------------------
[प्र.३] लियाकत अली खान संबंधी अयोग्य विधान ओळखा.
१] १९३६ मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते.
२] १९३७ मध्ये मुस्लिम लीगचे सचिव होते.
३] पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान [१९४७-१९५१]
४] मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

उत्तर
४] मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणती सुधारणा वॉरेन हेस्टीन्ग्जने केलेली नाही?
१] दुहेरी शासनव्यवस्था रद्द केली
२] राजकोष मुर्शिदाबादवरून कलकत्त्याला आणले.
३] पोलिस व न्याय प्रशासन आपल्या हातात घेतले.
४] विद्यापीठ आयोगाची स्थापना करून शिक्षणात सुधारणा घडवून आणली.

उत्तर
४] विद्यापीठ आयोगाची स्थापना करून शिक्षणात सुधारणा घडवून आणली.
------------------
[प्र.५] १८९१ मध्ये संमती वयाचा कायदा पारित करण्यात आला यासंबंधी खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] १२ वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आला.
ब] स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने घालण्यात आली.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही  

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.६] "जाती पद्धती हिंदू समाजात ऐक्य घडवून आणण्यास मोठीच बाधा आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर समाप्त झाली पाहिजे." हे वाक्य कोणत्या संघटनेने ठरावाद्वारे जाहीर केले?
१] राष्ट्रीय सभा
२] हरिजन सेवा संघ
३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद
४] हिंदू महासभा

उत्तर
३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद [१९२८]
------------------
[प्र.७] १८६० सालच्या दंड संहितेबद्दल योग्य विधाने ओळखा.
अ] या कायद्याने गुलामांचा व्यापार अवैध ठरविण्यात आला.
ब] बंधक मजुरांची प्रथा मात्र या कायद्याने बंद झाली नाही.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही  

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणती संस्था श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केली?
अ] भारत स्वशासन समिती
ब] इंडिया हाउस
क] यंग करंट्स ऑफ इंडिया

१] फक्त ब
२] फक्त क
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
३] अ आणि ब
------------------
[प्र.९] काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली?
१] अनी [Annie] बेजंट
२] राजा राममोहन रॉय
३] पंडित मदन मोहन मालवीय
४] जे.एल.मेहता

उत्तर
१] अनी [Annie] बेजंट [१९१६]
------------------
[प्र.१०] १ जानेवारी १९३० रोजी भारताचा तिरंगी झेंडा कोणी फडकाविला?
१] मादाम कामा
२] जवाहरलाल नेहरू
३] महात्मा गांधी
४] चित्तरंजन दास

उत्तर
२] जवाहरलाल नेहरू
---------------------------------------