प्रश्नसंच ९८ - [अर्थशास्त्र-PSI Pre 2014]

[प्र.१] श्रमिकांची "शून्य सीमांत उत्पादकता" म्हणजे
१] तांत्रिक बेकारी
२] छुपी बेकारी
३] अर्ध बेकारी
४] हंगामी बेकारी

उत्तर
२] छुपी बेकारी
------------------
[प्र.२] पुढीलपैकी कोणते विधान/विधाने  योग्य आहे?
अ] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली.
ब] PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत प्रमुख हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.

१] अ आणि ब दोन्ही योग्य
२] अ आणि ब दोन्ही अयोग्य
३] फक्त अ योग्य
४] फक्त ब योग्य

उत्तर
१] अ आणि ब दोन्ही योग्य
------------------
[प्र.३] पुढील विधानांचा विचार करा.
अ] नवे औद्योगिक धोरण २४ जुलै १९९१ रोजी जाहीर केले गेले.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणूकीचे धोरण स्वीकारण्यात आले.

१] अ बरोबर तर ब चूक आहे.
२] अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
३] ब बरोबर तर अ चूक आहे
४] अ आणि ब एकमेकांशी संबंधित नाही

उत्तर
२] अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
------------------
[प्र.४] तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
१] आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.
२] नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
३] अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
४] विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे.

उत्तर
३] अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
------------------
[प्र.५] खालील विधानांचा विचार करा.
अ] प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम [PMEGP] ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला.
ब] PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
क] प्रधानमंत्री रोजगार योजना [PMRY] हि PMEGP मध्ये विलीन केली गेली.

१] फक्त अ बरोबर
२] फक्त अ आणि ब बरोबर
३] फक्त क बरोबर
४] सर्व बरोबर

उत्तर
४] सर्व बरोबर
------------------
[प्र.६] "राज्य व्यापार महामंडळ" पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही?
अ] निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.
ब] पारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
क] अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
ड] वरीलपैकी कोणतेही नाही.

१] अ आणि ब फक्त
२] ब फक्त
३] अ आणि क फक्त
४] ड फक्त

उत्तर
२] ब फक्त
------------------
[प्र.७] कमाल जमीन धारणा कायदा कोणत्या दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला?
१] १९६१ पर्यंत व १९६२ नंतर
२] १९७१ पर्यंत व १९७२ नंतर
३] १९७२ पर्यंत व १९७२ नंतर
४] १९८२ पर्यंत व १९८२ नंतर

उत्तर
३] १९७२ पर्यंत व १९७२ नंतर
------------------
[प्र.८] खालील विधानांचा विचार करा.
अ] थेट कर संहिता आणि वस्तू सेवा करांची सुरुवात
ब] कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण
क] वित्तीय सर्वसमावेशाकतेबाबतची समिती

१] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.
२] अ हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
३] ब हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
४] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा नाहीत.

उत्तर
४] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा नाहीत.
------------------
[प्र.९] २०१३-१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तुट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८% पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे सध्या करण्याचे अपेक्षित होते:
अ] निर्गुंतवणूकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
ब] कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
क] अर्थसहाय्यावरील कर्चात कपात करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?
१] अ फक्त
२] ब आणि क फक्त
३] अ आणि क फक्त
४] अ, ब आणि क

उत्तर
४] अ, ब आणि क
------------------
[प्र.१०] "दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही" हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे?
अ] स्वामी विवेकानंद
ब] सोनिया गांधी
क] एम.एस.स्वामिनाथन
ड] डॉ.व्ही.एम.दांडेकर

१] अ फक्त
२] ब आणि क फक्त
३] क फक्त
४] क आणि ड फक्त

उत्तर
३] क फक्त
------------------
[प्र.११] मानवी विकास निर्देशांक हा _ _ _ _ _ _ यातील यशाचे सरासरी मापन करतो.
अ] दीर्घ आणि निरोगी आयुष्य
ब] प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क] दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी

१] वरील सर्व
२] अ आणि क फक्त
३] ब आणि क फक्त
४] अ आणि ब फक्त

उत्तर
४] अ आणि ब फक्त
-----------------------------