प्रश्नसंच १०० - [इतिहास-PSI Pre 2014]

[प्र.१] अयोग्य विधान ओळखा.
१] स्थापना  १८८५मध्ये झाली.
२] राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
३] राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
४] इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.

उत्तर
२] राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
------------------
[प्र.२] समाजसुधारक व त्यांची जन्म्स्थळे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] एम.जी.रानडे                                             १] जमखिंडी
ब] जी.जी.आगरकर                                         २] टेंभू
क] व्ही.आर.शिंदे                                             ३] पुणे
ड] जी.एच.देशमुख                                           ४] निफाड

पर्याय
१] अ-२/ब-१/क-३/ड-४
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
------------------
[प्र.३] 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
१] अशोक कोठारी
२] डॉ.एस.एन.सेन
३] अशोक मेहता
४] वि.डी.सावरकर

उत्तर
३] अशोक मेहता
------------------
[प्र.४] पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.
१] 'शारदासन' आणि 'मुक्तिसदन'ची स्थापना
२] 'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
३] निराश्रित विधवा स्त्रियांसाठी 'कृपासदन' व 'प्रीतीसादन'
४] त्यांच्या कार्याबद्दल "कैसर ए हिंद" हि पदवी बहाल  

उत्तर
२] 'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
------------------
[प्र.५] १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती?
अ] प्रांतीय स्वायत्तता
ब] संघराज्याचे न्यायालय
क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

१] अ आणि ड फक्त
२] अ, क, ड फक्त
३] वरील सर्व
४] ब आणि क फक्त

उत्तर
३] वरील सर्व
------------------
[प्र.६] मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?
१] १९२६ मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमावले
२] १९२९ मध्ये, कॉंग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर
३] १९३२ मध्ये, सरकारने कॉंग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा
४] १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा

उत्तर
४] १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणती/कोणत्या व्यक्ती १८५७च्या उठावाशी संबंधित नाही?
अ] पेठचा राजा भगवंतराव
ब] अजीजन नर्तिका
क] गुलमार दुबे
ड] काश्मीरचा राजा गुलाबसिंह

१] अ आणि ब फक्त
२] ब आणि ड फक्त
३] अ, ब, क
४] ड फक्त

उत्तर
४] ड फक्त
------------------
[प्र.८] पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा.सावरकरांनी समाज सुधारणेसाठी केल्या?
अ] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
ब] स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
क] आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.

१] अ, क
२] ब फक्त
३] ब, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] १८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटीश समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
१] दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, हॉवर्ड
२] ह्यूम, टिळक, ब्राडलॉ, नॉरटोन
३] यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
४] यूल, ह्यूम, अॅडम्स, ब्राडलॉ

उत्तर
३] यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
------------------
[प्र.१०] पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
१] नंदाताई गवळी
२] जाईबाई चौधरी
३] वेणूताई भटकर
४] तुळसाबाई बनसोडे

उत्तर
२] जाईबाई चौधरी
------------------
[प्र.११] १९व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून मांडणी कोणी केली?
अ] दादाभाई नौरोजी
ब] एम.जी.रानडे
क] रोमेशचन्द्र दत्त
ड] आर.सी.मुजुमदार

१] अ फक्त
२] अ आणि ब फक्त
३] अ, ब आणि क
४] अ आणि ड फक्त

उत्तर
३] अ, ब आणि क
------------------
[प्र.१२] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] नेहरू रेपोर्ट
ब] सायमन कमिशन
क] मुडीमन कमिशन
ड] प्रांतीय द्विदलशासन पद्धती

१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ड-ब-क-अ
४] ब-क-अ-ड

उत्तर
२] ड-क-ब-अ
------------------
[प्र.१३] ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१] १७९३चा सनदी कायदा
२] १८१३चा सनदी कायदा
३] १७७३चा नियमनाचा कायदा
४] १८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा

उत्तर
२] १८१३चा सनदी कायदा
------------------
[प्र.१४] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] समाजवादी पक्षाची स्थापना
ब] कॉंग्रेसचे पाटणा अधिवेशन
क] श्वेतपत्रिका
ड] तिसरी गोलमेज परिषद

१] क-ब-अ-ड
२] ड-क-ब-अ
३] अ-ड-क-ब
४] ब-अ-ड-क

उत्तर
२] ड-क-ब-अ
-------------------------------

प्रश्नसंच ९९ - [राज्यशास्त्र-PSI Pre 2014]

[प्र.१] खालील विधानांचा विचार करा.
अ] डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितेचे अध्यक्ष होते.
ब] श्री.एच.जे.खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

१] ब बरोबर आहे
२] अ बरोबर आहे
३] अ आणि ब दोन्ही बरोबर
४] अ आणि ब दोन्ही चूक आहे

उत्तर
२] अ बरोबर आहे
--------------------------------
[प्र.२] राज्यपाल कोणत्या कलमानुसार राज्य सरकारचे अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगतो?
१] कलम २००
२] कलम २०२
३] कलम २०७
४] कलम २०४

उत्तर
२] कलम २०२
--------------------------------
[प्र.३] राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] त्यांची नियुक्ती संबंधित राज्याचे राज्यपालाकडून होते.
२] त्यांच्याकडे सोपविलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो.
३] जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधीमंडळापुढे भाषण करू शकतो.
४] विधीमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.

उत्तर
४] विधीमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.
--------------------------------
[प्र.४] ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा.
अ] तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ब] तो ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवतो.
क] ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो.
ड] अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते.

वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ, ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
--------------------------------
[प्र.५] राज्य लोकसेवा आयोगाच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर नियुक्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
२] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
३] तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
४] तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.

उत्तर
४] तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.
--------------------------------
[प्र.६] राज्यपालाला दया दाखविण्याचा विशेष अधिकार कोणत्या कलमाने प्रदान करण्यात आला आहे?
१] कलम १५६
२] कलम १६०
३] कलम १६१
४] कलम १६३  

उत्तर
३] कलम १६१
--------------------------------
[प्र.७] कोणत्या कलमानुसार राज्यपाल अंग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती विधानसभेत करू शकतात?
१] कलम ३३०
२] कलम ३३१
३] कलम ३३२
४] कलम ३३३

उत्तर
४] कलम ३३३
--------------------------------
[प्र.८] खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणेसंदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले?
अ] इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीनचा वापर.
ब] EVM आणि मतपत्रिकेवर 'NOTA' (यापैकी कुणीही नाही) पर्याय
क] निवडणूक ओळखपत्र
ड] गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (खासदार), राज्य विधीमंडळाचा सदस्य (आमदार) अपात्र ठरतो.
१] अ फक्त
२] अ आणि ड
३] अ, ब, क
४] ब आणि ड

उत्तर
४] ब आणि ड
--------------------------------
[प्र.९] भूमी, अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३ मधील खालील तरतुदीपैकी बरोबर तरतुदी ओळखा.
अ] भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे.
ब] अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.
क] पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल
ड] ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या चारपटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त ब, क आणि ड
४] फक्त क आणि ड

उत्तर
३] फक्त ब, क आणि ड
--------------------------------
[प्र.१०] उद्देशपत्रिकेची वर्णने व विद्वान यांच्या जोड्या लावा.
अ] राजकीय कुंडली
ब] कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे
क] उत्कृष्ट गद्य काव्य
ड] अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा

१] पंडित ठाकूरदास भार्गव
२] एम.व्ही.पायली
३] के.एम.मुन्शी
४] आचार्य जे.बी.कृपलानी

पर्याय
१] अ-३/ब-४/क-१/ड-२
२] अ-१/ब-२/क-३/ड-४
३] अ-२/ब-१/क-४/ड-३
४] अ-४/ब-३/क-२/ड-१

उत्तर
१] अ-३/ब-४/क-१/ड-२
------------------------------

प्रश्नसंच ९८ - [अर्थशास्त्र-PSI Pre 2014]

[प्र.१] श्रमिकांची "शून्य सीमांत उत्पादकता" म्हणजे
१] तांत्रिक बेकारी
२] छुपी बेकारी
३] अर्ध बेकारी
४] हंगामी बेकारी

उत्तर
२] छुपी बेकारी
------------------
[प्र.२] पुढीलपैकी कोणते विधान/विधाने  योग्य आहे?
अ] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली.
ब] PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत प्रमुख हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.

१] अ आणि ब दोन्ही योग्य
२] अ आणि ब दोन्ही अयोग्य
३] फक्त अ योग्य
४] फक्त ब योग्य

उत्तर
१] अ आणि ब दोन्ही योग्य
------------------
[प्र.३] पुढील विधानांचा विचार करा.
अ] नवे औद्योगिक धोरण २४ जुलै १९९१ रोजी जाहीर केले गेले.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणूकीचे धोरण स्वीकारण्यात आले.

१] अ बरोबर तर ब चूक आहे.
२] अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
३] ब बरोबर तर अ चूक आहे
४] अ आणि ब एकमेकांशी संबंधित नाही

उत्तर
२] अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
------------------
[प्र.४] तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
१] आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.
२] नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
३] अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
४] विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे.

उत्तर
३] अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
------------------
[प्र.५] खालील विधानांचा विचार करा.
अ] प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम [PMEGP] ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला.
ब] PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
क] प्रधानमंत्री रोजगार योजना [PMRY] हि PMEGP मध्ये विलीन केली गेली.

१] फक्त अ बरोबर
२] फक्त अ आणि ब बरोबर
३] फक्त क बरोबर
४] सर्व बरोबर

उत्तर
४] सर्व बरोबर
------------------
[प्र.६] "राज्य व्यापार महामंडळ" पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही?
अ] निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.
ब] पारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
क] अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
ड] वरीलपैकी कोणतेही नाही.

१] अ आणि ब फक्त
२] ब फक्त
३] अ आणि क फक्त
४] ड फक्त

उत्तर
२] ब फक्त
------------------
[प्र.७] कमाल जमीन धारणा कायदा कोणत्या दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला?
१] १९६१ पर्यंत व १९६२ नंतर
२] १९७१ पर्यंत व १९७२ नंतर
३] १९७२ पर्यंत व १९७२ नंतर
४] १९८२ पर्यंत व १९८२ नंतर

उत्तर
३] १९७२ पर्यंत व १९७२ नंतर
------------------
[प्र.८] खालील विधानांचा विचार करा.
अ] थेट कर संहिता आणि वस्तू सेवा करांची सुरुवात
ब] कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण
क] वित्तीय सर्वसमावेशाकतेबाबतची समिती

१] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.
२] अ हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
३] ब हि फक्त प्रस्तावित कर सुधारणा आहे.
४] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा नाहीत.

उत्तर
४] अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा नाहीत.
------------------
[प्र.९] २०१३-१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तुट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८% पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे सध्या करण्याचे अपेक्षित होते:
अ] निर्गुंतवणूकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
ब] कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
क] अर्थसहाय्यावरील कर्चात कपात करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?
१] अ फक्त
२] ब आणि क फक्त
३] अ आणि क फक्त
४] अ, ब आणि क

उत्तर
४] अ, ब आणि क
------------------
[प्र.१०] "दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही" हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे?
अ] स्वामी विवेकानंद
ब] सोनिया गांधी
क] एम.एस.स्वामिनाथन
ड] डॉ.व्ही.एम.दांडेकर

१] अ फक्त
२] ब आणि क फक्त
३] क फक्त
४] क आणि ड फक्त

उत्तर
३] क फक्त
------------------
[प्र.११] मानवी विकास निर्देशांक हा _ _ _ _ _ _ यातील यशाचे सरासरी मापन करतो.
अ] दीर्घ आणि निरोगी आयुष्य
ब] प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क] दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी

१] वरील सर्व
२] अ आणि क फक्त
३] ब आणि क फक्त
४] अ आणि ब फक्त

उत्तर
४] अ आणि ब फक्त
-----------------------------

प्रश्नसंच ९७ - [भूगोल]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
१] मुंबई
२] भोपाळ
३] जम्मू
४] चेन्नई

उत्तर
३] जम्मू
------------------
[प्र.२] समान तापमान असणा-या ठिकाणांना जोडणा-या रेषांना काय म्हणतात?
१] समताप रेषा
२] समभार रेषा
३] अक्षवृत्त
४] समशीतोष्ण रेषा

उत्तर
१] समताप रेषा
------------------
[प्र.३] आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे?
१] उत्तर अमेरिका
२] आफ्रिका
३] दक्षिण अमेरिका
४] ऑस्ट्रेलिया

उत्तर
३] दक्षिण अमेरिका
------------------
[प्र.४] आस्वान धारण कोणत्या नदीवर आहे?
१] कोलोराडो
२] नाईल
३] अमेझोन
४] झाम्बेझी

उत्तर
२] नाईल
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणते सरोवर गोड्या पाण्याचे नाही?
१] मान सरोवर
२] जिनेव्हा सरोवर
३] दल सरोवर
४] यापैकी नाही

उत्तर
४] यापैकी नाही
------------------
[प्र.६] म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] औरंगाबाद
३] नंदुरबार
४] जळगाव

उत्तर
२] औरंगाबाद
------------------
[प्र.७] धारवाड खडकात प्रामुख्याने कोणता घटक आढळतो?
१] लोहखनिज
२] कोळसा
३] बॉक्साइट
४] मॅगनीझ

उत्तर
४] मॅगनीझ
------------------
[प्र.८] "रत्नांची भूमी" म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
१] भुवनेश्वर
२] मणिपूर
३] बंगलोर
४] कोलकत्ता

उत्तर
२] मणिपूर
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणती भाषा "इंडो-आर्यन" या प्रकारात येत नाही?
१] ओरिया
२] मराठी
३] गुजराती
४] तामिळ

उत्तर
४] तामिळ
------------------
[प्र.१०] "लिंगराज मंदिर" खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१] भुवनेश्वर
२] कोलकत्ता
३] दिसपूर
४] गुवाहाटी

उत्तर
१] भुवनेश्वर
----------------------------

प्रश्नसंच ९६ - [इतिहास]

[प्र.१] भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु करण्याचा मान खालीलपैकी कुणास जातो?
१] बाळशास्त्री जांभेकर
२] दादाभाई नौरोजी
३] जेम्स ऑगस्टस हिक्की
४] लोकमान्य टिळक

उत्तर
३] जेम्स ऑगस्टस हिक्की
------------------
[प्र.२] मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म कोठे झाला?
१] कराची
२] मक्का
३] लाहोर
४] दिल्ली

उत्तर
२] मक्का [११ नोव्हेंबर १८८८ रोजी]
------------------
[प्र.३] लियाकत अली खान संबंधी अयोग्य विधान ओळखा.
१] १९३६ मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते.
२] १९३७ मध्ये मुस्लिम लीगचे सचिव होते.
३] पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान [१९४७-१९५१]
४] मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

उत्तर
४] मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणती सुधारणा वॉरेन हेस्टीन्ग्जने केलेली नाही?
१] दुहेरी शासनव्यवस्था रद्द केली
२] राजकोष मुर्शिदाबादवरून कलकत्त्याला आणले.
३] पोलिस व न्याय प्रशासन आपल्या हातात घेतले.
४] विद्यापीठ आयोगाची स्थापना करून शिक्षणात सुधारणा घडवून आणली.

उत्तर
४] विद्यापीठ आयोगाची स्थापना करून शिक्षणात सुधारणा घडवून आणली.
------------------
[प्र.५] १८९१ मध्ये संमती वयाचा कायदा पारित करण्यात आला यासंबंधी खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] १२ वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आला.
ब] स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने घालण्यात आली.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही  

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.६] "जाती पद्धती हिंदू समाजात ऐक्य घडवून आणण्यास मोठीच बाधा आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर समाप्त झाली पाहिजे." हे वाक्य कोणत्या संघटनेने ठरावाद्वारे जाहीर केले?
१] राष्ट्रीय सभा
२] हरिजन सेवा संघ
३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद
४] हिंदू महासभा

उत्तर
३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद [१९२८]
------------------
[प्र.७] १८६० सालच्या दंड संहितेबद्दल योग्य विधाने ओळखा.
अ] या कायद्याने गुलामांचा व्यापार अवैध ठरविण्यात आला.
ब] बंधक मजुरांची प्रथा मात्र या कायद्याने बंद झाली नाही.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही  

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणती संस्था श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केली?
अ] भारत स्वशासन समिती
ब] इंडिया हाउस
क] यंग करंट्स ऑफ इंडिया

१] फक्त ब
२] फक्त क
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
३] अ आणि ब
------------------
[प्र.९] काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली?
१] अनी [Annie] बेजंट
२] राजा राममोहन रॉय
३] पंडित मदन मोहन मालवीय
४] जे.एल.मेहता

उत्तर
१] अनी [Annie] बेजंट [१९१६]
------------------
[प्र.१०] १ जानेवारी १९३० रोजी भारताचा तिरंगी झेंडा कोणी फडकाविला?
१] मादाम कामा
२] जवाहरलाल नेहरू
३] महात्मा गांधी
४] चित्तरंजन दास

उत्तर
२] जवाहरलाल नेहरू
---------------------------------------

प्रश्नसंच ९५ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत नाही?
१] ज्वलन
२] श्वसन
३] किण्वन
४] प्रकाश संश्लेषण

उत्तर
४] प्रकाश संश्लेषण
------------------
[प्र.२] रासायनिक रूपातील शुष्क बर्फ म्हणजे काय?
१] शुष्क सल्फर डायऑक्साइड
२] शुष्क कार्बन डायऑक्साइड
३] शुष्क क्लोरीन
४] रासायनिक क्रिया करून बनवलेला वर्फ

उत्तर
२] शुष्क कार्बन डायऑक्साइड
------------------
[प्र.३] संतृप्त सोडियम क्लोराईडला उष्णता दिल्यास तो . . . . .
१] विद्युत वाहक बनेल
२] अतिसंतृप्त बनेल
३] असंतृप्त बनेल
४] रंगहीन बनेल

उत्तर
३] असंतृप्त बनेल
------------------
[प्र.४] परमशुन्य तापमान म्हणजेच . . . . . .
१] ज्या तापमानामुळे द्रवाचे बाष्प बनते.
२] ज्या तापमानामुळे द्रवाचे स्थायू बनण्यास सुरुवात होते.
३] कोणत्याही तापमानाचा आरंभ बिंदू असतो.
४] शास्त्रीयदृष्ट्या सर्वात न्यूनतम तापमान असते.

उत्तर
४] शास्त्रीयदृष्ट्या सर्वात न्यूनतम तापमान असते.
------------------
[प्र.५] चुकीची जोडी ओळखा.
१] रेशीम - पॉलीअमाईड
२] इंडिगो [नीळ] - एजोरंजक
३] लाइपेज - उत्प्रेरक
४] कॅरोटीन – प्रोटीन

उत्तर
२] इंडिगो [नीळ] - एजोरंजक
------------------
[प्र.६] लोखंडाच्या पाईपांना जास्ताचे लेपन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
१] Electroplating
२] Annealing
३] Galvanization
४] Vulcanization

उत्तर
३] Galvanization
------------------
[प्र.७] समभारी [Isobar] म्हणजेच
१] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा भिन्न असतो.
२] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा समान असतो.
३] अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो व अणुअंक हा समान असतो.
४] अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो व अणुअंक हा भिन्न असतो.

उत्तर
१] अणुवस्तुमानांक हा समान असतो व अणुअंक हा भिन्न असतो.
------------------
[प्र.८] उत्प्रेरक पदार्थ म्हणजे असा पदार्थ जो . . . . . .
१] रासायनिक अभिक्रिया थांबवतो
२] रासायनिक अभिक्रिया सुरु करण्यास मदत करतो
३] रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतो
४] रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो

उत्तर
४] रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो
------------------
[प्र.९] योग्य विधान ओळखा.
१] मार्शगॅस म्हणजेच मिथेन वायू
२] मार्शगॅस कोळश्याच्या खाणीत सापडतो
३] मार्शगॅस हा गोबरगॅसमध्ये मुख्यत्वे आढळतो
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या क्रियेत बेंझीन वापरतात?
१] साबण तयार करण्यासाठी
२] वॉटरप्रुफ कपडे तयार करण्यासाठी
३] पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून
४] वीजनिर्मिती केंद्रात

उत्तर
३] पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून
----------------------------------

प्रश्नसंच ९४ - [पंचायत राज]

[प्र.१] स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले?
१] १६वी
२] ७३वी
३] ९३वी
४] ४२वी

उत्तर
२] ७३वी
--------------------------------
[प्र.२] वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?
१] १९५७
२] १९७०
३] १९६०
४] १९६२

उत्तर
३] १९६०
--------------------------------
 [प्र.३] गाव पातळीवर रोजगार हमी दिनाचे आयोजन कोण करतो?
१] पंचायत समिती
२] तलाठी
३] कोतवाल
४] ग्रामसेवक

उत्तर
४] ग्रामसेवक
--------------------------------
 [प्र.४] ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचे काम कोण करते?
१] स्थानिक दक्षता समिती
२] जिल्हा दक्षता समिती
३] ग्रामपंचायत समिती
४] जिल्हा नियोजन समिती

उत्तर
१] स्थानिक दक्षता समिती
--------------------------------
 [प्र.५] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल ग्रामसभा कोणाला सादर करते?
१] पंचायत समिती
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
--------------------------------
[प्र.६] महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] ठाणे
२] पुणे
३] अमरावती
४] सातारा

उत्तर
४] सातारा
--------------------------------
 [प्र.७] नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते?
१] ५०१-१०००
२] १००१-१५००
३] १५०१-३०००
४] ३००१-४०००

उत्तर
३] १५०१-३०००
--------------------------------
 [प्र.८] अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात?
१] जिल्हा परिषद
२] जिल्हाधिकारी
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] राज्यशासन

उत्तर
२] जिल्हाधिकारी
--------------------------------
[प्र.९] ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी
२] मुख्य कार्यकारी अधिकारी
३] विभागीय आयुक्त
४] राज्यशासन

उत्तर
४] राज्यशासन
--------------------------------
 [प्र.१०] राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?
१] २४० दिवस
२] १२० दिवस
३] १८० दिवस
४] ९० दिवस

उत्तर
३] १८० दिवस
-----------------------------------------

प्रश्नसंच ९३ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] खालीलपैकी कोणते घटक कॅस्तु व सेवांच्या पुरवठ्यात घट घडवून आणतात?
अ] साठेबाजी
ब] भूकंप, अवर्षण व पूर
क] मजूर, भांडवल व कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.२] सरकारने सरकारी कर्जरोख्यांद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असता अर्थव्यवस्थेवर खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल?
१] चलन पुरवठ्यात वाढ होईल.
२] उपभोग्य वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल.
३] चलनवाढ होईल.
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.३] केंद्र शासनाच्या विकासात्मक अथवा बिगर विकासात्मक खर्चात वाढ झाली असता..........
१] जनतेची खरेदीशक्ती वाढते.
२] वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होते.
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
४] रोजगारात वाढ होते.

उत्तर
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतात.
------------------
[प्र.४] ठराविक काळासाठी सरकारने ठराविक वस्तू व सेवांची निर्यात खुली केली असता.........
१] वस्तू व सेवांच्या किंमती स्थिर होतील
२] वस्तू व सेवांच्या किंमती वाढतील
३] वस्तू व सेवांच्या किंमती कमी होतील
४] यापैकी नाही

उत्तर
२] वस्तू व सेवांच्या किंमती वाढतील
------------------
[प्र.५] वस्तू व सेवांची मागणी हि पुरवठ्यापेक्षा अधिक होण्याची खालीलपैकी कारणे कोणती?
अ] वस्तू व सेवांच्या मागणीतील वाढ
ब] वस्तू व सेवांच्या उत्पादनातील घट  

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.६] चलनवाढीच्या काळात सरकारने कर कपात केली असता...............
१] चलनवाढ स्थिर होते.
२] चलनवाढीचा दर कमी होतो
३] चलनवाढीचा दर वाढतो
४] वरील सर्व

उत्तर
३] चलनवाढीचा दर वाढतो
------------------
[प्र.७] वखार महामंडळ स्थापन करण्यामागे केंद्र व राज्य सरकारचा खालीलपैकी मुख्य उद्देश कोणता?
१] बि-बियाण्यांचे व खताचे योग्य वाटप करणे.
२] शेतक-यांना पुनर्वित्तसहाय्य करणे.
३] शेतमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
४] शेतमालावर प्रक्रिया करणे.  

उत्तर
३] शेतमाल साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
------------------
[प्र.८] मध्यवर्ती बँकेच्या "स्वस्त पैशाच्या धोरणाचा" खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल?
अ] चलनपुरवठ्यात वाढ होईल
ब]  वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होईल
क] वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होईल.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] उत्पादनाच्या खाराचात झालेल्या वाढीमुळे जेव्हा वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होते तेव्हा त्यास .........
१] मागणीजण्य चलनवाढ म्हणतात
२] परीव्ययजण्य  चलनवाढ म्हणतात  
३] मंद चलनवाढ म्हणतात
४] धावणारी चलनवाढ म्हणतात

उत्तर
२] परीव्ययजण्य चलनवाढ म्हणतात
------------------
[प्र.१०] चलनवाढीच्या काळात विनिमय दर .......
१] स्थिर असतो
२] कमी असतो
३] जास्त असतो
४] यापैकी नाही

उत्तर
२] कमी असतो
------------------
[प्र.११]  नगदी पिकाच्या आधारभूत किंमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते?
१] कृषी मुल्य आयोग
२] कृषी मंत्रालय
३] नाफेड
४] नाबार्ड

उत्तर
३] नाफेड
----------------------------------

प्रश्नसंच ९२ - [राज्यघटना]

[प्र.१] भारतीय नागरीकात्वासंबंधी व्यापक तरतुदी कोणत्या कायद्याने करण्यात आल्या?
१] १९४७चा कायदा
२] १९३५चा कायदा
३] १९५५चा कायदा
४] १९४९चा कायदा

उत्तर
३] १९५५चा कायदा
------------------
[प्र.२] राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागचा उद्देश काय?
१] राजकीय लोकशाहीची स्थापना
२] सामाजिक लोकशाहीची स्थापना
३] गांधीवादी लोकशाहीची स्थापना
४] सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना

उत्तर
४] सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या प्रकाराने भारतीय नागरिकत्व प्राप्त होते?
अ] नोंदणी करून
ब] वारसा हक्काने
क] जन्माने

१] फक्त अ आणि क
२] फक्त ब आणि क
३] वरील सर्व
४] फक्त क

उत्तर
३] वरील सर्व
------------------
[प्र.४] जनहित याचिका या सकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
१] नॉर्वे
२] अमेरिका
३] कॅनडा
४] भारत

उत्तर
२] अमेरिका
------------------
[प्र.५] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ४८
२] कलम ४९
३] कलम ५०
४] कलम ५१

उत्तर
४] कलम ५१
------------------
[प्र.६] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये होतो?
अ] वेठबिगार व मानवी तस्कर बंदी
ब] अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.७] सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आली आहे?
१] कलम १४
२] कलम १६
३] कलम २०
४] कलम २१

उत्तर
२] कलम १६
------------------
[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला?
१] २४ वी
२] ४२ वी
३] २५ वी
४] २७ वी

उत्तर
२] ४२ वी
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] रोजगाराचा अधिकार हा मुलभूत हक्क आहे.
ब] संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर हक्क आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
२] फक्त ब
------------------
[प्र.१०] कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आदेश काढू शकतात?
१] कलम ३२
२] कलम ३१
३] कलम २२६
४] कलम २१६

उत्तर
३] कलम २२६
--------------------------------

प्रश्नसंच ९१ - [भूगोल]

[प्र.१] गिर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
१] अहमदाबाद
२] जुनागढ
३] इदुक्की
४] गांधीनगर

उत्तर
२] जुनागढ
------------------
[प्र.२] अयोग्य जोडी ओळखा.
१] गाळाची मृदा - मैदानी भाग
२] वाळवंटी मृदा - राजस्थान
३] काळी मृदा - दख्खनचे पठार
४] जांभी मृदा - पर्वतीय भागात पायथ्याशी

उत्तर
४] जांभी मृदा - पर्वतीय भागात पायथ्याशी
------------------
[प्र.३] महाराष्ट्रात सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] अहमदनगर
२] जळगाव
३] बुलढाणा
४] औरंगाबाद

उत्तर
१] अहमदनगर
------------------
[प्र.४] बन्नघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे?
१] वाघ
२] हत्ती
३] सिंह
४] उंट

उत्तर
२] हत्ती
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या वायुभारीत पट्ट्याला "डोलड्रम" नावाने ओळखले जाते?
१] विषुवृत्तीय कमी वायुभारीत पट्टा
२] उपोष्ण पट्टा
३] उपधृवीय कमी वायुभाराचा पट्टा
४] ध्रुवीय जास्त वायुभाराचा पट्टा

उत्तर
१] विषुवृत्तीय कमी वायुभारीत पट्टा
------------------
[प्र.६] हवेच्या वहनासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] "विषुवृत्तीय प्रदेशात" हवा उर्ध्वगामी दिशेने वाहते.
ब] "उपोष्ण प्रदेशात" हवा अधोगामी दिशेने वाहते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] ध्रुवीय प्रदेशात हवेचा कमी दाबाचा पट्टा असतो.
ब] ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरण सरळ दिशेत लंबरूप पडतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
४] यापैकी नाही
------------------
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] उत्तर गोलार्धात वायुभारात भिन्नता अधिक असते.
ब] दक्षिण गोलार्धात वायुभारात भिन्नता कमी असते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.९] फतेहबाद अणुउर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] उत्तर प्रदेश
२] आंध्रप्रदेश
३] हिमाचल प्रदेश
४] हरियाणा

उत्तर
४] हरियाणा
------------------
[प्र.१०] खालील राज्यांचा बॉक्साईटच्या उत्पादनानुसार उतरता क्रम लावा.
अ] महाराष्ट्र
ब] गुजरात
क] झारखंड
ड] ओडिशा

१] ड-ब-क-अ
२] अ-ब-क-ड
३] ड-क-ब-अ
४] क-ब-ड-अ

उत्तर
१] ड-ब-क-अ
------------------

प्रश्नसंच ९० - [इतिहास]

[प्र.१] बुद्धांच्या उपदेशाचे पहिले प्रवचन कोठे झाले?
१] लुम्बिनी
२] सारनाथ
३] सांची
४] गया

उत्तर
२] सारनाथ
------------------
[प्र.२] दिल्ली सल्तनतचा पहिला सार्वभौम सत्ताधीश कोण?
१] इल्तमश
२] आरमशाह
३] अलाउद्दीन खिलजी
४] महंमद तुघलक

उत्तर
१] इल्तमश
------------------
[प्र.३] दीनबंधू मित्र लिखित नीलदर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?
१] ग्रामीण लोकजीवन
२] नीळ मळ्यांची उपयुक्तता
३] नीळ उत्पादन शेतकरी
४] भारतातील वृत्तपत्रे

उत्तर
३] नीळ उत्पादन शेतकरी
------------------
[प्र.४] वैदिक संस्कृतीचा भारतीय इतिहासावर झालेला प्रमुख परिणाम कोणता?
१] संस्कृतचा विकास
२] तत्वज्ञानाचा विकास
३] जाती व्यवस्थेची बांधणी
४] वैश्विकतेची भावना  

उत्तर
३] जाती व्यवस्थेची बांधणी
------------------
[प्र.५] पंचशील करारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
१] परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर ठेवणे.
२] समानता व परस्पर लाभ
३] शांततापूर्वक सहचर्य
४] परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.

उत्तर
४] परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.
------------------
[प्र.६] ऋग्वेदामध्ये किती ऋचा आढळतात?
१] १०२४
२] १०२८
३] २०२५
४] १०००

उत्तर
२] १०२८
------------------
[प्र.७] 'स्वदेशी गीतंगल' हि काव्यरचना कोणाची आहे?
१] रवींद्रनाथ टागोर
२] सत्येंद्रनाथ टागोर
३] अरविंद घोष
४] सुब्रमण्यम भारती

उत्तर
४] सुब्रमण्यम भारती
------------------
[प्र.८] 'जिझिया कर' कोणी लावला?
१] महंमद बिन तुघलक
२] फिरोझशहा तुघलक
३] अल्लाउद्दिन खिलजी
४] बल्बन

उत्तर
२] फिरोझशहा तुघलक
------------------
[प्र.९] पिट्स इंडिया कायद्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा.
१] सरकारचे कंपनीवरील नियंत्रण वाढले.
२] राजस्वसंबंधी कारभारासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
३] भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलकडे सोपविण्यात आले.
४] सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.

उत्तर
४] सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे कराराशी संबंधित नाही?
१] बाबासाहेब आंबेडकर
२] टी. प्रकाशन
३] मदन मोहन मालवीय
४] महात्मा गांधी

उत्तर
२] टी. प्रकाशन
------------------

प्रश्नसंच ८९ - [चालू घडामोडी]

[प्र.१] "ट्वेंटी यीअर्स इन अ डेकेड" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
१] अमिताभ बच्चन
२] शाहरुख खान
३] आदित्य चोप्रा
४] सुश्मिता सेन

उत्तर
२] शाहरुख खान
------------------
[प्र.२] इंग्लंड मध्ये सर्वाधिक स्थलांतरित कोणत्या देशातून आलेले आहेत?
१] रशिया
२] जर्मनी
३] भारत
४] चीन

उत्तर
४] चीन
------------------
[प्र.३] इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार कामात महिलांच्या सहभागाबाबत आघाडीवर असलेला देश कोणता?
१] जपान
२] नॉर्वे
३] चीन
४] अमेरिका

उत्तर
२] नॉर्वे
------------------
[प्र.४] संकीर्तन हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे?
१] ओडिशा
२] मणिपूर
३] मेघालय
४] अरुणाचल प्रदेश

उत्तर
२] मणिपूर
------------------
[प्र.५] WHO-इंडिया या संस्थेने कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी IVR २०२० हा कार्यक्रम सुरु केला आहे?
१] चित्ता
२] वाघ
३] एकशिंगी गेंडा
४] सिंह

उत्तर
३] एकशिंगी गेंडा
------------------
[प्र.६] भारताच्या अमेरिकेच्या दूतावासातील अमेरिकन राजदूताचे अधिकृत निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?
१] गांधी हाउस
२] केनेडी हाउस
३] वॉशिंग्टन हाउस
४] रूझवेल्ट हाउस

उत्तर
४] रूझवेल्ट हाउस
------------------
[प्र.७] २४ आणि २५ मार्च २०१४ रोजी तिसरी अणुपरिषद नुकतीच कोठे पार पडली?
१] ओस्लो (नॉर्वे)
२] हेग (नेदरलॅंड)
३] मॉस्को (रशिया)
४] न्युयॉर्क (अमेरिका)

उत्तर
२] हेग (नेदरलॅंड)
------------------
[प्र.८] शनी ग्रहाच्या कोणत्या चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे नासाच्या संशोधकांना मिळाले आहेत?
१] टायटन
२] एन्सेलॉडस
३] टेथिस
४] रिओ

उत्तर
२] एन्सेलॉडस
------------------
[प्र.९] मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाबाबत आहे?
१] हवामान बदल
२] हरितगृह परिणाम
३] ओझोन थराचे संरक्षण
४] वरील सर्व

उत्तर
३] ओझोन थराचे संरक्षण
------------------
[प्र.१०] F-1 मलेशियन ग्रांप्री २०१४ चा विजेता कोण?
१] निको रॉसबर्ग
२] लुइस हॅमिल्टन
३] फ़र्नांडो अलोंसो
४] सेबॅस्टीयन वेटेल

उत्तर
२] लुइस हॅमिल्टन
-----------------------------------