प्रश्नसंच ८८ - [सामान्यज्ञान]

[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?
१] १००-२०० nm
२] २८०-३१५ nm
३] ६४०-८२० nm
४] ८५०-९१० nm

उत्तर
२] २८०-३१५ nm
--------------------------------
[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?
१] पर्यावरणवादी
२] पर्यावरण विशेषज्ञ
३] जंगलात रहाणारे आदिवासी
४] जुन्या पिढीतील शहरी लोक

उत्तर
३] जंगलात रहाणारे आदिवासी
--------------------------------
[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?
१] पेंच
२] ताडोबा
३] मेळघाट
४] सह्याद्री

उत्तर
१] पेंच
--------------------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती
३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती
४] जैविक नैसर्गिक आपत्ती

उत्तर
१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती
--------------------------------
[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?
१] निकटदृष्टीता
२] दूरदृष्टीता
३] रंगांधळेपणा
४] वृद्धदृष्टीता

उत्तर
१] निकटदृष्टीता
--------------------------------
[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?
१] अमेरिका
२] इस्त्राईल
३] पेरू
४] फ़िलिपाइन्स

उत्तर
४] फ़िलिपाइन्स
--------------------------------
[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?
१] २ ऑक्टोबर २००८
२] १५ ऑगस्ट २००८
३] २ ऑक्टोबर २००९
४] १५ ऑगस्ट २००९

उत्तर
३] २ ऑक्टोबर २००९
--------------------------------
[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] ठाणे
२] बुलढाणा
३] पुणे
४] धुळे

उत्तर
३] पुणे
--------------------------------
[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?
१] म.गो.रानडे
२] पंजाबराव देशमुख
३] नारायण लोखंडे
४] मुकुंदराव पाटील

उत्तर
१] म.गो.रानडे
---------------------------------
[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती
ब] कमी वेळ लागतो
क] कमी मजूर लागतात

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] फक्त अ
--------------------------------

प्रश्नसंच ८७ - [भूगोल]

[प्र.१] पाम्बम बेट खालीलपैकी कोणत्या भागात आहे?
१] अंदमान
२] निकोबार
३] तामिळनाडू पठारावर
४] लक्षद्वीप  

उत्तर
३] तामिळनाडू पठारावर
------------------
[प्र.२] पूर्व किनारपट्टीची उत्तर सीमा म्हणजे _ _ _ _ _ _ होय.
१] महानदी
२] राजमहल डोंगररांग
३] सुवर्णरेखा नदी
४] हुगळी नदी

उत्तर
३] सुवर्णरेखा नदी
------------------
[प्र.३] कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे?
१] मुंबई
२] डेहराडून
३] भोपाळ
४] मथुरा

उत्तर
२] डेहराडून
------------------
[प्र.४] महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?
१] गडचिरोली
२] वर्धा
३] अकोला
४] चंद्रपूर

उत्तर
३] अकोला
------------------
[प्र.५] अयोग्य जोडी ओळखा.
१] साबरमती - अहमदाबाद
२] महानदी - कटक
३] क्षिप्रा - इंदौर
४] तावी – काश्मीर

उत्तर
४] तावी – काश्मीर
------------------
[प्र.६] गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आढळते?
१] कझाकस्तान
२] म्यानमार
३] दक्षिण कोरिया
४] चीन

उत्तर
४] चीन
------------------
[प्र.७] युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?
१] -हाइन
२] व्होल्गा
३] डॉन
४] सुदा

उत्तर
२] व्होल्गा
------------------
[प्र.८] जगप्रसिद्ध यलो स्टोन नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे?
१] बेल्जियम
२] ऑस्ट्रेलिया
३] अमेरिका
४] कॅनडा

उत्तर
३] अमेरिका
------------------
[प्र.९] कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?
१] अमेरिका
२] रशिया
३] जर्मनी
४] फ्रांस

उत्तर
२] रशिया
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या सातपुडा पर्वतरांगेच्या उपरांगा आहेत?
अ] मैकल
ब] महादेव
क] राजपिपला

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
----------------------------------

प्रश्नसंच ८६ - [सामान्यज्ञान]

[प्र.१] कांद्याच्या कंदामध्ये _ _ _ _ _ _ _ असल्यामुळे त्याचा तिखटपणा वाढतो?
१] नायट्रोजन 
२] सल्फर
३] पारा 
४] हायड्रोजन

उत्तर
२] सल्फर
-------------------------------------------------------------
[प्र.२] खालीलपैकी कोणती आवळ्याची जात आहे?
१] कांचन
२] सोनामुखी
३] सुवर्णा
४] धनश्री

उत्तर
१] कांचन
-------------------------------------------------------------
[प्र.३] _ _ _ _ _ _ _ यांनी 'गुरुदेव सेवा मंडळे' स्थापन केली?
१] विष्णुबुवा ब्रम्हचारी
२] बाबा परमानंद 
३] संत तुकडोजी महाराज
४] संत गाडगेबाबा

उत्तर
३] संत तुकडोजी महाराज
-------------------------------------------------------------
[प्र.४] महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
१] औरंगाबाद
२] नाशिक
३] पुणे
४] वर्धा

उत्तर
२] नाशिक
-------------------------------------------------------------
[प्र.५] डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?
१] देशमुख
२] कदम
३] पाटील
४] मुरकुटे

उत्तर
२] कदम
-------------------------------------------------------------
[प्र.६] संकरीत कापसाचे जनक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात?
१] वाय.एल.पीग
२] एस.जी.नायडू
३] सी.टी.पटेल
४] जगदीशचंद्र बोस

उत्तर
३] सी.टी.पटेल
-------------------------------------------------------------
[प्र.७] कोणत्या कालखंडात जिल्ह्याला 'सरकार' म्हंटले जात?
१] मौर्य 
२] गुप्त
३] मुघल
४] राष्ट्रकुट

उत्तर
३] मुघल
-------------------------------------------------------------
[प्र.८] साबरमती आश्रमाची स्थापना गांधीजींनी केव्हा केली?
१] १९१७
२] १९१८
३] १९२०
४] १९३१

उत्तर
१] १९१७
-------------------------------------------------------------
[प्र.९] भारतीय वायू दल दिन?
१] ८ ऑक्टोबर
२] १२ डिसेंबर
३] ४ सप्टेंबर
४] ८ नोव्हेंबर

उत्तर
१] ८ ऑक्टोबर
-------------------------------------------------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला नाही?
अ] वडाळा
ब] बिळाशी
क] तासगाव
ड] शिरोडा 

१]  अ, क आणि ड
२] ब, क, आणि ड 
३] अ, ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] अ, क आणि ड
-----------------------------

प्रश्नसंच ८५ - [GK]

[प्र.१] १९३७ साली देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या?
१] १०
२] ११
३] १२
४] १३


उत्तर
२] ११
--------------------------------
[प्र.२] खालीलपैकी कोणता देश G-8  चा सदस्य नाही?
१] जपान
२] फ्रांस
३] चीन
४] इटली


उत्तर
३] चीन
{G-8 सदस्य- अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रांस, जपान, कॅनडा, (रशिया-Temporarily suspended)}
--------------------------------
 [प्र.३] व्हेवेल योजनेला _ _ _ _ _ _ _ सुद्धा म्हणतात.
१] डिव्हायडेशन प्लान
२] ब्रेकडाऊन प्लान
३] अल्टीमेट प्लान
४] यापैकी नाही


उत्तर
२] ब्रेकडाऊन प्लान
--------------------------------
 [प्र.४] भारतात लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजनावर भर दिला?
१] ४थ्या
२] ५व्या
३] ६व्या
४] ७व्या


उत्तर
२] ५व्या
--------------------------------
 [प्र.५] महाराष्ट्रात जिल्हा परिषदांचे कार्य प्रत्यक्षात कधीपासून सुरु झाले?
१] १ मे १९६१
२] १ एप्रिल १९६१
३] १ मे १९६२
४] १ एप्रिल १९६१


उत्तर
३] १ मे १९६२
--------------------------------
[प्र.६] बाययुरेट चाचणी आहारातील _ _ _ _ _ चे अस्तित्व ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.
१] विषारी घटक
२] खनिजे
३] प्रथिने
४] कर्बोदके


उत्तर
३] प्रथिने
--------------------------------
 [प्र.७] विल्ट हा रोग _ _ _ _ _ _ _ वर होतो.
१] बाजरी
२] बटाटा
३] पालक
४] टोमॅटो


उत्तर
४] टोमॅटो
--------------------------------
 [प्र.८] भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरात आहे?
१] चेन्नई
२] मुंबई
३] नवी दिल्ली
४] कोलकत्ता


उत्तर
३] नवी दिल्ली
--------------------------------
 [प्र.९] महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी ७५% सूर्यफुलाचे क्षेत्र _ _ _ _ _ _ _या विभागात आहे.
१] कोकण
२] विदर्भ
३] मराठवाडा
४] खानदेश


उत्तर
३] मराठवाडा
--------------------------------
 [प्र.१०] जलमणी योजना कशाशी संबंधित आहे?
१] विध्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे.
२] शहरांना शुद्ध पाणीपुरवठा
३] पावसाचे पाणी साठवणे
४] पाण्याचा जपून वापर


उत्तर
१] विध्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे.
------------------

प्रश्नसंच ८४ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] भारतात खालीलपैकी कोणत्या चलन पुरवठा मापन पद्धतीचा अवलंब केला जातो?
१] M1, M2
२] M1, M2, M3
३] M1, M2, M3, M4
४] यापैकी नाही

उत्तर
२] M1, M2, M3
------------------
[प्र.२] भारतात टांकसाळी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही?
१] मुंबई
२] कलकत्ता
३] हैद्राबाद
४] दिल्ली

उत्तर
४] दिल्ली
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या पैशाचा M1 चलन पुरवठा मापन पद्धतीत समावेश होतो?
१] लोकांजवळील चलनी नोटा व नाणी
२] जनतेच्या बँकांमधील मागणी ठेवी
३] RBI मधील इतर ठेवी
४] जनतेच्या बँकांमधील मुदत ठेवी  

उत्तर
४] जनतेच्या बँकांमधील मुदत ठेवी
------------------
[प्र.४] चलनी नोटांचा समावेश _ _ _ _ _
१] प्रतिक चलनात होतो
२] प्रमाणित चलनात होतो
३] कायदेशीर चलनात होतो
४] वरील सर्व

उत्तर
३] कायदेशीर चलनात होतो
------------------
[प्र.५] चुकीची जोडी ओळखा
अ] M1 - संकुचित पैसा
ब] M3 - विस्तृत पैसा
क] M2 - संकुचित पैसा

१] अ आणि क
२] फक्त अ
३] फक्त ब
४] फक्त क
:)  उत्तर : ४] फक्त क :)

उत्तर
४] फक्त क
------------------
[प्र.६] राष्ट्रीय नदी कृती आराखड्यासंबंधी योग्य विधाने निवडा.
अ] देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांचे शुद्धीकरण करणे.
ब] या योजनेत केंद्राचा वाटा ७०% आहे.
क] या योजनेअंतर्गत नदी जोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त अ आणि ब
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या बाबींचा चलन पुरवठ्यात समावेश होतो?
अ] जनतेच्या बँकांमधील ठेवी
ब] जनतेच्या स्वताच्या हातातील पैसा
क] स्थानिक सरकार, वित्तीय संस्था यांच्याजवळील पैसा
ड]  RBI बँकेमधील विविध राखीव निधी

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त अ, ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त अ, ब आणि क
------------------
[प्र.८] १९७७ साली कोणत्या समितीच्या शिफारशीवरून RBI ने चलन पुरवठा मापन पद्धतीचा अवलंब केला?
१] केल्विन
२] रेडक्लिफ
३] होलब्रुक
४] एन.माधवन

उत्तर
२] रेडक्लिफ
------------------
[प्र.९] अयोग्य विधान ओळखा
चलनवाढीच्या काळात  . . . . . . . . . . . .
१] वस्तू व सेवांच्या किंमती वाढतात
२] चलनाची खरेदीशक्ती कमी होते
३] लोकांच्या हातात मुबलक पैसा असतो
४]  चलनाची खरेदीशक्ती वाढते

उत्तर
४] चलनाची खरेदीशक्ती वाढते
------------------
[प्र.१०] भारताबाहेरील उद्योगसमूहाने भारतात गुंतवणूक केल्यास भारताच्या चलन पुरवठ्यात . . . .
१] वाढ होईल
२] घट होईल
३] काहीही परिणाम होणार नाही
४] यापैकी नाही

उत्तर
१] वाढ होईल
------------------

प्रश्नसंच ८३ - [इतिहास]

[प्र.१] रामायण व महाभारत हि महाकाव्ये कोणत्या शतकात पूर्ण झाली?
१] इ.स.पू. चौथे शतक
२] इ.स.पू. दुसरे शतक
३] इ.स.पू. आठवे शतक
४] इ.स.पू. पाचवे शतक

उत्तर
१] इ.स.पू. चौथे शतक
------------------
[प्र.२] राजा भोज-१ याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?
१] मिहिर
२] प्रभास
३] कैलास
४] १ व २ दोन्ही

उत्तर
३] कैलास
------------------
[प्र.३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद कोणी स्थापन केली?
१] राजा राममोहन रॉय
२] महादेव गोविंद रानडे
३] बाळ गंगाधर टिळक
४] महर्षी कर्वे

उत्तर
२] महादेव गोविंद रानडे
------------------
[प्र.४] आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंघेर येथे नेणारा बंगालचा नवाब कोण?
१] सुजा उदौला
२] मीर जाफर
३] मीर मदान
४] मीर कासीम

उत्तर
४] मीर कासीम
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणता ग्रंथ हा कवी राजशेखर याच्याशी संबंधित आहे?
१] सेतुबंधन
२] गौडवध
३] कपुर्रमंजिरी  
४] सप्तशत

उत्तर
३] कपुर्रमंजिरी
------------------
[प्र.६] लाला लजपतराय यांचा मृत्यू  _ _ _ _ _  या दिवशी झाला.
१] १७ नोव्हेंबर १९२८
२] १५ जानेवारी १९३०
३] १२ नोव्हेंबर १९१९
४] १५ जानेवारी १९२७

उत्तर
१] १७ नोव्हेंबर १९२८
------------------
[प्र.७] सप्टेंबर १७६० मध्ये मीर कासीम आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्यासंबंधी अयोग्य विधान निवडा?
१] कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल मात्र अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही.
२] सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
३] मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे.
४] कंपनीचे शत्रू-मित्र मीर कासीम आपले शत्रू-मित्र मानील.  

उत्तर
२] सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
------------------
[प्र.८] १८९१ मध्ये इंग्लंड मधून बॅरीस्टर झाल्यावर गांधीजींनी सर्वप्रथम कोठे वकिली केली?
१] मुंबई
२] दक्षिण आफ्रिका
३] राजकोट
४] अहमदाबाद

उत्तर
३] राजकोट
------------------
[प्र.९] वि.दा.सावरकरांना इंग्लंडला जाण्यास कोणी मदत केली?
१] सेनापती बापट
२] लोकमान्य टिळक
३] श्यामजी कृष्ण वर्मा
४] लाला हरदयाळ

उत्तर
३] श्यामजी कृष्ण वर्मा
------------------
[प्र.१०] आफ्रिकेत खालीलपैकी कोणते कायदे काळ्या वर्णाच्या लोकांविरुद्ध होते?
अ] एशियाटिक कायदा
ब] ट्रान्सवल इमिग्रेशन कायदा
क] सोशल सिक्युरिटी कायदा

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] अ आणि ब
--------------------------------

प्रश्नसंच ८२ - [विज्ञान]

[प्र.१] कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते?
१] ग्लुकोमा
२] कॅटॅरेक्स
३] प्रेसबायोपिया
४] कलर ब्लाइंडनेस  

उत्तर
१] ग्लुकोमा
------------------
[प्र.२] शरीरक्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचं क्रियेमध्ये समावेश होणार नाही?
१] श्वसन
२] उत्सर्जन
३] आवाज करणे
४] पेशींची वाढ

उत्तर
४] पेशींची वाढ
------------------
[प्र.३] गाईचे दुध कशाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे?
१] जीवनसत्व ब
२] जीवनसत्व अ
३] जीवनसत्व ब-१२
४] जीवनसत्व क

उत्तर
१] जीवनसत्व ब
------------------
[प्र.४] कोणते शैवाल (Algae) मनुष्याच्या आतड्यांमध्ये परजीवी म्हणून असते?
१] ऑसीलेटोरिया
२] प्रोटोडर्मा
३] झुक्लोरेला
४] यीस्ट

उत्तर
१] ऑसीलेटोरिया
------------------
[प्र.५] क्लोरोमायसेटीन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात?
१] क्षय जंतू
२] विषमज्वर जंतू
३] घटसर्प जंतू
४] डांग्या खोकला जंतू    

उत्तर
२] विषमज्वर जंतू
------------------
[प्र.६] मुलऊती (Paranchyama) असणा-यांमध्ये कोणाचा समावेश होतो?
अ] गाजर
ब] मुळा
क] बटाटा

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.७] २००९चे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?
१] केंद्रक
२] तंतूकणिका
३] तारकाकाय
४] रायबोझोम

उत्तर
४] रायबोझोम
------------------
[प्र.८] आदिकेंद्रकी पेशी श्वसन कशामार्फ़त करतात?
१] तंतूकणिका
२] रायबोझोम
३] मेसोझो
४] पेशीभित्तिका

उत्तर
३] मेसोझो
------------------
[प्र.९] चुकीचे विधान ओळखा.
अ] सर्वात मोठी पेशी - शहामृगाचे अंडे
ब] सर्वात लहान पेशी - अमिबा
क] मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी - चेतापेशी (Nerve Cell)

१] फक्त अ चूक
२] फक्त ब चूक
३] फक्त क चूक
४] सर्व विधाने बरोबर

उत्तर
२] फक्त ब चूक
[सर्वात लहान पेशी - मायकोप्लाझमची पेशी]

------------------
[प्र.१०] केंद्रक आणि पेशी अंगकाचे पेशी संघटनेतील अस्तित्वावर वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधली?
१] ऑरीस्टॉटल
२] मेंडेल
३] व्हीटाकर
४] थिओफ्रेंटस

उत्तर
३] व्हीटाकर
-------------------------------------

प्रश्नसंच ८१ - [तंत्रज्ञान]

[प्र.१] भारतीय विज्ञान संस्था, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी वायू मंडळातील इलेक्ट्रोन चक्राचे मापन करण्यासाठी कोणता लघुग्रह सोडला?
१] जुगनू
२] प्रथम
३] स्टुडसॅट
४] अणुसॅट

उत्तर
२] प्रथम
------------------
[प्र.२] National Remote Sensing Agency कोठे स्थित आहे?
१] बंगलोर
२] कानपूर
३] हैद्राबाद
४] तिरुअनन्तपुरम    

उत्तर
३] हैद्राबाद
------------------
[प्र.३] भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?
१] नागपूर
२] आर्वी
३] अहमदाबाद
४] चंद्रपूर

उत्तर
२] आर्वी (पुणे)
------------------
[प्र.४] देशातील पहिले सैन्य विद्यापीठ कोठे आहे?
१] हरियाणा
२] दिल्ली
३] पंजाब
४] नागपूर

उत्तर
३] पंजाब
------------------
[प्र.५] भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता?
१] नाग
२] अर्जुन
३] अजय
४] विजयंता

उत्तर
४] विजयंता
------------------
[प्र.६] शत्रूंच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेऊन ते वातावरणातच नष्ट करणारे भारतीय क्षेपणास्त्र कोणते?
१] धनुष
२] सागरिका २
३] अस्त्र
४] प्रद्युम्न

उत्तर
४] प्रद्युम्न
------------------
[प्र.७] संपूर्ण भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली कोणती?
१] पिनाक
२] चकोर
३] अग्निवर्षा
४] पृथ्वी

उत्तर
१] पिनाक
------------------
[प्र.८] National Center for Antarctic & Ocean Research कोठे आहे?
१] गुजरात
२] मुंबई
३] गोवा
४] विशाखापट्टणम  

उत्तर
३] गोवा
------------------
[प्र.९] देशातील पहिले पोस्टाचे तिकीट कोठे वितरीत करण्यात आले?
१] लाहोर
२] मुंबई
३] डायमंड हार्बर
४] कराची

उत्तर
४] कराची
------------------
[प्र.१०] फायबर ऑपटिक्सचा जनक कोणाला म्हणतात?
१] चार्ल्स काओ
२] मिस्टर टोक
३] अल्बर्ट स्टोन
४] जॉर्ज स्मिथ

उत्तर
१] चार्ल्स काओ
--------------------------------------

प्रश्नसंच ८० - [चालू घडामोडी]

[प्र.१] ट्वेंटी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०००  धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला?
१] ख्रिस गेल
२] ब्रेंडन मॅककूलम
३] विराट कोहली
४] मिसबा उल हक

उत्तर
२] ब्रेंडन मॅककूलम
------------------
[प्र.२] सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांच्या जागी IPL ७ च्या काळात कोणाला BCCI अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले?
१] सुनील गावस्कर
२] रवि शास्त्री
३] जगमोहन दालमिया
४] शरद पवार

उत्तर
१] सुनील गावस्कर
------------------
[प्र.३] २८ मार्च २०१४ रोजी _ _ _ _ _ _ ने भारताला पोलिओ मुक्त देश घोषित केले?
१] UNO
२] WHO
३] Red Cross Organization
४] UNDP

उत्तर
२] WHO
------------------
[प्र.४] नुकतेच निधन झालेल्या जेष्ठ अभिनेत्री नंदा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या शहरात झाला होता?
१] मुंबई
२] जबलपूर
३] कोल्हापूर
४] बंगळूर

उत्तर
३] कोल्हापूर
------------------
[प्र.५] मार्च २०१४ मध्ये कोण जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला?
१] ख्रिस्तियानो रोनाल्डो
२] लायोनेल मेस्सी
३] डेविड बेकहम
४] इकर कॅसिलास

उत्तर
१] ख्रिस्तियानो रोनाल्डो
------------------
[प्र.६] 'क्रिकेटर ऑफ दि जनरेशन' या पुरस्काराने मार्च २०१४ मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले?
१] डॉन ब्रॅडमन
२] सचिन तेंडूलकर
३] विवियन रिचर्डस
४] ब्रायन लारा

उत्तर
२] सचिन तेंडूलकर
------------------
[प्र.७] भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस  विक्रांत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ६० कोटी  रुपयाला खरेदी केली. हि युद्धनौका कधी सेवेतून निवृत्त झाली होती?
१] १९७१
२] १९८७
३] १९९४
४] १९९७

उत्तर
४] १९९७
------------------
[प्र.८] 'फेमिना मिस इंडिया २०१४' चा खिताब कोणी पटकावला?
१] सृष्टी राणा
२] कोयल राणा
३] झटालेखा मल्होत्रा
४] सिमरन खंडेलवाल

उत्तर
२] कोयल राणा
------------------
[प्र.९] निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०१४ चा राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली?
१] सचिन तेंडूलकर
२] आमिर खान
३] महेंद्रसिंग धोनी
४] जीव मिल्खा सिंग

उत्तर
२] आमिर खान
------------------
[प्र.१०] 'फेमिना मिस इंडिया अर्थ २०१४'चा खिताब कोणी पटकावला?
१] अमरजोत कौर
२] सिमरन खंडेलवाल
३] झटालेखा मल्होत्रा
४] गेल डिसिल्व्हा

उत्तर
३] झटालेखा मल्होत्रा
--------------------------------------

प्रश्नसंच ७९ - [भूगोल]

[प्र.१] वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळ्या बाजूंनी वेढला गेलेला आहे?
१] रोम
२] फ्रांस
३] इटली
४] ग्रीस

उत्तर
३] इटली
------------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे?
१] पोर्तुगाल
२] लिस्बन
३] कॅलिफोर्निया
४] डेन्मार्क

उत्तर
४] डेन्मार्क
------------------
[प्र.३] महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?
१] तांदूळ
२] ऊस
३] ज्वारी
४] कापूस

उत्तर
१] तांदूळ
------------------
[प्र.४] महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
१] नागपूर
२] अमरावती
३] औरंगाबाद
४] कोकण

उत्तर
२] अमरावती
------------------
[प्र.५] किलीमांजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे?
१] केंद्रीय ज्वालामुखी
२] भेगीय ज्वालामुखी
३] वरील दोन्ही
४] निद्रिस्त

उत्तर
१] केंद्रीय ज्वालामुखी
------------------
[प्र.६] सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
१] अहमदनगर
२] जळगाव
३] बुलढाणा
४] औरंगाबाद

उत्तर
१] अहमदनगर
------------------
[प्र.७] पूर्वीच्या निजाम [हैद्राबाद] राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?
१] औरंगाबाद
२] उस्मानाबाद
३] नांदेड
४] सोलापूर

उत्तर
४] सोलापूर
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणते प्राणी/पक्षी अंटार्टीका खंडात आढळतात?
अ] पेंग्विन
ब] देवमासे
क] सील
ड] स्कुआ पक्षी

१] अ आणि ब
२] अ,ब आणि क
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात?
१] आंध्रप्रदेश
२] गडचिरोली
३] विदर्भ
४] कोकण

उत्तर
२] गडचिरोली
------------------
[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] गाविलगड टेकडयांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे.
ब] सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे अतिशय मंद स्वरुपाचा आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ योग्य
--------------------------------------

प्रश्नसंच ७८ - [राज्यघटना]

[प्र.१] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

---------------------------
[प्र.२] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
---------------------------
[प्र.३] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

---------------------------
[प्र.४] भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी जोडण्यात आलेले मूलभूत कर्तव्य कोणते?
अ] पर्यावरणाचे रक्षण करणे.
ब] सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे.
क] मतदान करणे.
ड] पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.

उत्तर
ड] पालकाने ६-१४ वयोगटातील पाल्यास शिक्षण देणे.
{८६व्या घटना दुरुस्तीने (२००२) हे कर्तव्य जोडण्यात आले}

---------------------------
[प्र.५] राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे?
अ] २४३(A)
ब] २४३(G)
क] २४३(J)
ड] २४३(K)

उत्तर
ड] २४३(K)
---------------------------
[प्र.६] दोन्ही सभागृहान्ची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते?
अ] १०६
ब] १०८
क] १००
ड] १०५

उत्तर
ब] १०८
---------------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या समितीला 'काटकसर समिती' असेही म्हणतात?
अ] अंदाज समिती
ब] लोक लेखा समिती
क] संसदीय कामकाज समिती
ड] आश्वासन समिती

उत्तर
अ] अंदाज समिती
---------------------------
[प्र.८]  एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल दोन वेळा शिक्षा करता येणार नाही असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?
अ] १९
ब] २०
क] २१
ड] २२

उत्तर
अ] १९
---------------------------
[प्र.९]  लोकसभा आणि विधानसभा यामध्ये स्त्रियांना ३३% आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
अ] १११
ब] १०८
क] ११०
ड] ११३

उत्तर
ब] १०८
{११०वी घटना दुरुस्ती- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षण}

---------------------------
[प्र.१०]  लोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले?
अ] १९६७
ब] १९६८
क] १९७१
ड] १९७३

उत्तर
ब] १९६८
{२०११ पर्यंत ११ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडण्यात आले होते.}

-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ७७ - [इतिहास]

[प्र.१] श्रीमद भगवतगीता मूळ कोणत्या भाषेत लिहिलेली होती?
१] संस्कृत
२] प्राकृत
३] पाली
४] अपभ्रंश

उत्तर
१] संस्कृत
------------------
[प्र.२] मेगस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता?
१] सेल्युकस
२] नेपोलियन
३] अलेक्झांडर
४] दारीस

उत्तर
१] सेल्युकस
------------------
[प्र.३] १९३२ च्या जातीय निवाड्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती याला अपवाद कोणता प्रदेश होता?
१] आसाम
२] पंजाब
३] बंगाल
४] वायव्य सरहद्द प्रांत

उत्तर
४] वायव्य सरहद्द प्रांत
------------------
[प्र.४] मुंबई योजनेच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
१] लाला श्रीराम
२] जी.डी.बिर्ला
३] भुलाभाई देसाई
४] जे.आर.डी.टाटा

उत्तर
३] भुलाभाई देसाई
------------------
[प्र.५] मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली?
१] १८८२
२] १८८३
३] १९८४
४] १८८४

उत्तर
४] १८८४
------------------
[प्र.६] गंगेच्या मैदानामध्ये मानवाच्या वास्तव्याचे सर्वात पहिले अवशेष खालीलपैकी कोठे आढळतात?
१] बागोर
२] कल्पी
३] आदमगड
४] टेरीस

उत्तर
२] कल्पी
------------------
[प्र.७] योग्य जोडी ओळखा.
अ] आदिनाथ चरित्र - वर्धमान
ब] शांतीनाथ चरित्र - देवचंद्र
क] पृथ्वीचंद्र चरित्र - शांतीसुरी

१] फक्त अ
२] फक्त क
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सूर्यमंदिर आढळते?
१] श्रीशैलम [आंध्रप्रदेश]
२] मोधेरा [गुजरात]
३] हळेबिड [कर्नाटक]
४] सिकर [राजस्थान]

उत्तर
२] मोधेरा [गुजरात]
------------------
[प्र.९] घटना कालानुक्रमे लावा.
अ] राष्ट्रीय सभेची स्थापना
ब] खिलाफत चळवळ
क] मुस्लिम लीगची स्थापना
ड] जहाल मवाळ फुट

१] अ-ब-क-ड
२] अ-क-ड-ब
३] अ-ड-क-ब
४] ड-अ-क-ब

उत्तर
२] अ-क-ड-ब
------------------
[प्र.१०] ब्रिटीश भारतातील रयतवारी महसूल प्रशासनासंबंधी खालीलपैकी कोणाचे नाव महत्वाचे आहे?
१] थॉमस मनरो
२] आर.एम.बर्ड
३] चार्ल्स नेपिअर
४] जोनाथन डंकन

उत्तर
१] थॉमस मनरो
----------------------------------

प्रश्नसंच ७६ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?
अ] चलनी नोटा
ब] चलनी नाणी
क] सरकारी रोखे

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] फक्त ब आणि क

उत्तर
३] फक्त क
------------------
[प्र.२] भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली?
१] नाणे दुरुस्ती कायदा १९४८
२] नाणे दुरुस्ती कायदा  १९३५
३] नाणे दुरुस्ती कायदा  १९५५
४] नाणे दुरुस्ती कायदा १९४९

उत्तर
३] नाणे दुरुस्ती कायदा १९५५
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे?
१] अल्पसंख्यांक विकास योजना
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
३] मौलाना आझाद विकास योजना
४] स्वाभिमान योजना

उत्तर
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
------------------
[प्र.४] आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे.
ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो.
क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
३] अ आणि क
------------------
[प्र.५] नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली?
१] १९९१-९२
२] १९९५-९६
३] २००२-०३
४] १९९८-९९

उत्तर
२] १९९५-९६
------------------
[प्र.६] 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती?
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
२] जीवन शेतकरी सुरक्षा योजना
३] राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना
४] वरीलपैकी नाही

उत्तर
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
------------------
[प्र.७] ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती?
१] कृषी उर्जा योजना
२] कृषी संजीवनी योजना
३] उर्जा शेती योजना
४] महावितरण योजना

उत्तर
२] कृषी संजीवनी योजना
------------------
[प्र.८] किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली.
ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
[२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.]

------------------
[प्र.९] राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.१०] राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली.
ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरीलपैकी एकही नाही

उत्तर
४] वरीलपैकी एकही नाही
--------------------------------------

प्रश्नसंच ७५ - [चालू घडामोडी]

[प्र.१] एशियन टूर्सच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय गोल्फपटूला नामांकन मिळाले आहे?
१] ज्योती रंधावा
२] जीव मिल्खा सिंग
३] अर्जुन सिंग
४] दिग्विजय सिंग

उत्तर
२] जीव मिल्खा सिंग
------------------
[प्र.२] विजय हजारे चषक २०१३-१४ कोणत्या संघाने जिंकला?
१] रेल्वे
२] दिल्ली
३] मुंबई
४] कर्नाटक

उत्तर
४] कर्नाटक
------------------
[प्र.३] पहिल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (IIM) स्थापना कोठे झाली?
१] मुंबई
२] हैद्राबाद
३] कोलकत्ता
४] दिल्ली

उत्तर
३] कोलकत्ता
------------------
[प्र.४] राष्ट्रीय किसान दिन कधी असतो?
१] १ जून
२] २३ डिसेंबर
३] २० मे
४] २० नोव्हेंबर

उत्तर
२] २३ डिसेंबर
------------------
[प्र.५] रंगानाथिट्टू पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१] कर्नाटक
२] तामिळनाडू
३] आंध्रप्रदेश
४] केरळ

उत्तर
१] कर्नाटक
------------------
[प्र.६] फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे?
१] हिमाचल प्रदेश
२] पश्चिम बंगाल
३] गुजरात
४] मेघालय

उत्तर
३] गुजरात
------------------
[प्र.७] २०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले?
१] सौरव कोठारी
२] आदित्य मेहता
३] पंकज अडवानी
४] विजय सिंग

उत्तर
१] सौरव कोठारी
------------------
[प्र.८] मशिल बॅचलेट यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली?
१] पेरू
२] उरुग्वे
३] चिली
४] फिजी

उत्तर
३] चिली
------------------
[प्र.९] चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] हरियाणा
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक

उत्तर
३] मध्यप्रदेश
------------------
[प्र.१०] कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे?
१] महाराष्ट्र
२] केरळ
३] उत्तर प्रदेश
४] छत्तीसगड

उत्तर
२] केरळ
-----------------------------------