प्रश्नसंच ७६ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?
अ] चलनी नोटा
ब] चलनी नाणी
क] सरकारी रोखे

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] फक्त ब आणि क

उत्तर
३] फक्त क
------------------
[प्र.२] भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली?
१] नाणे दुरुस्ती कायदा १९४८
२] नाणे दुरुस्ती कायदा  १९३५
३] नाणे दुरुस्ती कायदा  १९५५
४] नाणे दुरुस्ती कायदा १९४९

उत्तर
३] नाणे दुरुस्ती कायदा १९५५
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे?
१] अल्पसंख्यांक विकास योजना
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
३] मौलाना आझाद विकास योजना
४] स्वाभिमान योजना

उत्तर
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
------------------
[प्र.४] आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे.
ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो.
क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
३] अ आणि क
------------------
[प्र.५] नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली?
१] १९९१-९२
२] १९९५-९६
३] २००२-०३
४] १९९८-९९

उत्तर
२] १९९५-९६
------------------
[प्र.६] 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती?
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
२] जीवन शेतकरी सुरक्षा योजना
३] राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना
४] वरीलपैकी नाही

उत्तर
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
------------------
[प्र.७] ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती?
१] कृषी उर्जा योजना
२] कृषी संजीवनी योजना
३] उर्जा शेती योजना
४] महावितरण योजना

उत्तर
२] कृषी संजीवनी योजना
------------------
[प्र.८] किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली.
ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
[२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.]

------------------
[प्र.९] राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.१०] राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली.
ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरीलपैकी एकही नाही

उत्तर
४] वरीलपैकी एकही नाही
--------------------------------------