प्रश्नसंच ६२ - [सामान्य ज्ञान]

[प्र.१] ताश्कंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?
१] 1962 चे भारत -चीन युध्द    
२] 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
३] 1971 चे भारत -पाक युध्द    
४] 1999 चे कारगील युध्द

उत्तर
२] 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
------------------
[प्र.२] ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती  विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?
अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.

१] अ,ब,क        
२] अ,ब,ड        
३] फक्त अ    
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.३] परदेशी कपडे आणि वस्तू यांवरील बहिष्कार हे कोणत्या लढ्याचे वैशिष्टय होते?
१] स्वदेशी चळवळ      
२] असहकार आंदोलन  
३] भारत छोडो आंदोलन    
४] सविनय कायदेभंग चळवळ

उत्तर
१] स्वदेशी चळवळ
------------------
[प्र.४]  __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.
१] राष्ट्रपती  
२] पंतप्रधान  
३] राज्यपाल  
४] सरन्यायाधीश

उत्तर
३] राज्यपाल
------------------
[प्र.५] कारगील मधील विजयाची स्मृती 'कारगील विजय दिवस 'म्हणून केव्हा साजरा केला जातो?
१] 16 डिसेंबर  
२] 31 ऑक्टोबर          
३] 14 जानेवारी            
४] 26 जुलै

उत्तर
४] 26 जुलै
------------------
[प्र.६] तिसरे इंग्रज-मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
१] त्रिंबकजी डेंगळे    
२] गंगाधर शास्त्री        
३] बापू गोखले  
४] यशवंतराव होळकर

उत्तर
३] बापू गोखले
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?
१] जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
२] सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
३] भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
४] मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही

उत्तर
३] भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
------------------
[प्र.८] अयोग्य जोडी ओळखा.
१] राज्य पुनर्रचना आयोग : आंध्रप्रदेश
२] मद्रास राज्य : तामिळनाडू
३] बिलासपुर राज्य : हिमाचल प्रदेश
४] १९६६ : गुजरातची स्थापना

उत्तर
४] १९६६ : गुजरातची स्थापना
[गुजरातची स्थापना : १ मे १९६०]

------------------
[प्र.९] मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशावर अवलंबून असते?
१] न्यायालये
२] विरोधी पक्षांच्या दबावावर
३] सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
४] लोकाच्या सहकार्यावर

उत्तर
३] सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
------------------
[प्र.१०] असत्य विधाने ओळखा.
१] महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाली.
२] दीव हे बेट खंबायतच्या आखातात आहे.
३] दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
४] गोव्याला १९८७ साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

उत्तर
३] दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
[दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होते.]

-------------------------------------------------------------