प्रश्नसंच ६० - [पर्यावरण]

[प्र.१] पुदिना या वनस्पतीचा उपयोग _ _ _ _ _ _ _ म्हणून केला जातो.
१] वेदनाशामक
२] मलेरिया प्रतिबंधक
३] कर्करोग प्रतिबंधक
४] रक्तप्रवाह वर्धक

उत्तर
४] रक्तप्रवाह वर्धक
------------------
[प्र.२] खालील परीसंस्थेतील प्राणी आणि त्यांचा पोषण प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा.
१] काळवीट - शाकाहारी
२] भुछत्रे - मृतोपाजीवी
३] चिंकारा - मांसाहारी
४] रानमांजर – मांसाहारी

उत्तर
३] चिंकारा - मांसाहारी
------------------
[प्र.३] आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना कोणत्या संस्थेअंतर्गत कार्यरत आहे?
१] संयुक्त राष्ट्रसंघाचा आर्थिक आयोग
२] आंतरराष्ट्रीय भूआवरण - जीवावरण कार्यक्रम
३] महासागरीय संशोधनावर वैज्ञानिक समिती
४] वरीलपैकी नाही

उत्तर
२] आंतरराष्ट्रीय भूआवरण - जीवावरण कार्यक्रम
------------------
[प्र.४] थ्रिमाइल्स आयलंड अनु अपघात हि दुर्घटना कोणत्या देशाशी संबंधित आहे?
१] रशिया
२] जपान
३] अमेरिका
४] चीन

उत्तर
३] अमेरिका
------------------
[प्र.५] युनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम केव्हा सुरु करण्यात आला?
१] १९७०
२] १९९५
३] २०००
४] २००२

उत्तर
१] १९७०
------------------
[प्र.६] आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती कोणी आणि केव्हा स्थापन केली?
१] सार्क-१९९८
२] NATO-१९६९
३] आसियान-२००२
४] आफ्रिका-१९७८  

उत्तर
२] NATO-१९६९
------------------
[प्र.७] आसिको ही पर्यावरण संरक्षक चळवळ कोणत्या राज्यात झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] कर्नाटक

उत्तर
४] कर्नाटक
------------------
[प्र.८] आम्ल पर्जन्याच्या बाबतीत अयोग्य विधाने ओळखा.
अ] राजस्थानातील आम्ल पर्जन्यामुळे भरतपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्षी कमी झाले आहेत.
ब] आग्राच्या ताजमहालवर आम्ल पर्जन्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.९] १९८७ सालच्या  मॉन्ट्रीयल करार व १९८९ मधील लंडन परिषदेमध्ये कोणत्या बाबींवर भर देण्यात आला होता?
अ] ओझोन -हासाचे गांभीर्य
ब] नष्ट होत जाणा-या प्रजातींचे संवर्धन
क] क्लोरो-फ्लोरो कार्बनचे उत्पादन २०%नी कमी करणे.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त अ आणि क
------------------
[प्र.१०] आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती खालीलपैकी कोणत्या विषयावर लक्ष ठेवते?
अ तटवर्ती प्रदूषण
ब] हवा प्रदूषण
क] खंडातर्गत पाणी

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------