आरबीआयचे पतधोरण जाहीर
रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) | ४ टक्के |
वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) | २१.५० टक्के |
रेपो दर | ७.२५ टक्के |
रिव्हर्स रेपो दर | ६.२५ टक्के |
बँक रेट | ८.२५ टक्के |
मार्जिनल स्टँडींग फॅसिलीटी | ८.२५ टक्के |
पॉर्न संकेतस्थळांवरची बंदी मागे
- गेले काही दिवस झालेल्या टीकेच्या भडीमारानंतर अखेर केंद्र सरकारने सरसकट लागू केलेली पॉर्न संकेतस्थळांवरची बंदी उठवली आहे आणि लहान मुलांसंदर्भातली मात्र ही बंदी कायम असेल हे स्पष्ट केले आहे.
- इंटरनेट स्वातंत्र्य मुक्तहस्ते वापरण्याच्या हक्कावर गदा आणून, सरकारने जवळपास ८५७ पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घातली होती. त्याचसोबत संकेतस्थळांमधील चित्रफिती, छायाचित्र-मजकुरावर कठोर देखरेख करण्यासाठी लोकपाल नेमण्याचा विचारही सरकारकडून केला जात आहे.
- माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाकडून इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना बंदीचे आदेश देण्यात आले होते, त्यांना ८५७ पॉर्न संकेतस्थळांची यादी पुरविण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार खासगी खोलीत बसून कामुक संकेतस्थळे पाहणे हा गुन्हा नाही व ते थांबवता येणार नाही, कारण व्यक्तिगत स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे.
- जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात असे म्हटले होते, की प्रौढ व्यक्तीने 'पॉर्न' पाहिल्यास तो गुन्हा होत नाही, फक्त त्याने ते त्याच्या शयनगृहात पाहावे.
- पॉर्न पाहण्यास बंदी घालणारा अंतरिम आदेश आम्ही देऊ शकत नाही. कारण कलम २१ (व्यक्तिगतता) या मुद्दय़ावर तो खासगी अधिकारांचा भंग आहे, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी म्हटले होते.
सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पाचवा
- पॉर्न साईट्सवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, इंटरनेटच्या माध्यमामधून सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहिल्या जाणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये मिझोराम अग्रस्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- या यादीमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. मिझोरामसहित नागालॅंड, मेघालय, आणि आसाम ही ईशान्य भारतामधील राज्येही या यादीमध्ये आघाडीवर आहेत.
- याच अहवालानुसार, सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे.
काँग्रेसच्या २५ सदस्यांचे निलंबन
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली.
- सभागृहाच्या कामकाजात सातत्याने आणि हेतूपुरस्सर अडथळे आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ सदस्यांना या आठवड्याच्या उर्वरित काळासाठी (५ दिवस) नियम ३७४ (अ) नुसार निलंबित करण्यात येत असून त्यांना सभागृहाच्या पाच बैठकींना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश महाजन यांनी दिला.
- काँग्रेसच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला, तर समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेसचे उर्वरित १९ खासदारही सभागृहात आले नाहीत.
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नवचरा कक्ष’चे उद्घाटन
- राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विज्ञान आणि नावीन्यता संग्रहालयाचे उद्घाटन केले. नवचरा कक्ष असे नाव याला देण्यात आले असून, इंटेल इंडिया यांच्या मदतीने या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे.
- यामध्ये माहितीबरोबरच शास्त्रीयदृष्ट्या आधारित अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. यातून तरुणांना प्रोत्साहित करून वैज्ञानिक शोध आणि अभ्यास वाढीस नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- या संग्रहालयात रोबोटिक डॉग, व्हर्चुअल तबला, स्ट्रिंगलेस पिआनो, थ्रीडी प्रिंटर, टॉकिंग वॉल आणि प्लॅनेट वॉलसारख्या विस्मयकारी गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
- राष्ट्रपती भवन भेटीमध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लोकांना हे संग्रहालय पाहता येईल.
७ ऑगस्ट : राष्ट्रीय हातमाग दिवस
- हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच, या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकारतर्फे ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
- या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया हँडलूम या ब्रँडचे अनावरण करणार आहेत.
- या दिवशी १९०५मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा होणार असून याचा पहिला मोठा कार्यक्रम चेन्नईमध्ये होईल.
‘सुविधा' बनली आघाडीची 'डिजिटल पेमेंट सेवा' कंपनी
- देशांतर्गत बँक खात्याविना आप्तस्वकीयांना पैसे धाडण्याची (रेमिटन्स) सुविधा आणि अन्य अनेक प्रकारच्या भरणा सुविधा प्रदान करणारी सर्वात मोठी बिगरबँकिंग कंपनी बनून सुविधा इन्फोसव्र्ह लि. ही कंपनी पुढे आली आहे.
- देशभरात तब्बल ८५,००० किरकोळ विक्रेते, किराणा मालाचे दुकानदार यांना आपल्या सेवा जाळ्यात सामावून घेऊन, सुविधाला ग्राहकांना या भरणा सुविधा प्रदान करण्याचे बळ मिळाले आहे.
- देशातील ग्रामीण भागात अनेकांचे बँकेत खाते नाही, तर शहरातही विशेषत: स्थलांतरित मजुरांना कायम निवासी पत्ता नसल्याने बँकेत खाते उघडता येत नाही. या व अशा संगणक निरक्षर मंडळींना आधुनिक तंत्रज्ञान वापरून, पण पारंपरिक मनी ऑर्डरच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षितरीत्या देशातील कोणत्याही भागात पैसे धाडण्याची सोय सुविधामुळे शक्य झाली आहे.
ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन
- औष्णिक विद्युत केंद्रांमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले आहे. 'ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन' या नावाने हे धोरण ओळखण्यात येत आहे.
- हवामानातील बदलावर पॅरिस येथे चर्चा होणार असून, त्या दृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे मानण्यात येते.
- 'अमेरिकेच्या वीज प्रकल्पांमधून २०३०पर्यंत कार्बनी वायूंचे प्रदूषण ३२ टक्क्यांनी कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
- या धोरणामध्ये कार्बनी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचलण्याबरोबरच दरडोई उर्जेच्या वापराविषयीही विचार करण्यात आला आहे. यामध्ये अपारंपरिक उर्जा आणि किमान खर्चात जास्त उर्जा देणाऱ्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या राज्यांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा उल्लेखही या धोरणामध्ये करण्यात आला आहे.
केटी लेडेकीचा जागतिक जलतरण स्पर्धेत नवीन विक्रम
- अमेरिकेच्या केटी लेडेकीने जागतिक जलतरण स्पर्धेत १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तिने आपलाच मागील विक्रम मोडीत काढला. लेडेकीने १५०० मीटर फ्रीस्टाइलच्या हिटमध्ये १५ मिनिटे २७.७१ सेकंद अशी वेळ नोंदवून नवा विक्रम रचला.
- या प्रकारात गेल्यावर्षी तिने पॅन पॅसिफिक स्पर्धेत १५ मिनिटे २८.३६ सेकंद अशी वेळ नोंदवून जागतिक विक्रम रचला होता.
- लेडेकीने कारकिर्दीत आठव्यांदा जागतिक विक्रमाची नोंद केली. या प्रकारात तिने चौथ्यांदा जागतिक विक्रम नोंदविला. तिने २०१३मधील बार्सिलोना स्पर्धेत १५ मिनिटे ३६.५३ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षी दोन वेळा तिने आपलाच विक्रम मोडला होता.
- तसेच या स्पर्धेत लेडेकीने ४०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत ३ मिनिटे ५९.१३ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक राखले आहे.
व्हॅन डर बर्गचा जागतिक विक्रम
- दक्षिण आफ्रिकेच्या कॅमेरून व्हॅन डर बर्गने जागतिक जलतरण स्पर्धेतील ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली. त्याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकच्या हिटमध्ये २६.६२ सेकंद अशी वेळ नोंदवली.
- ब्रिटनच्या अॅडम पिटीने गेल्या वर्षी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये २६.६२ सेकंद अशीच वेळ नोंदवली होती. परंतु, त्याने नोंदविलेल्या वेळेला आंतरराष्ट्रीय जलतरण संघटनेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातील जागतिक विक्रम बर्गच्याच नावावर होता.
- त्याने २००९मध्ये इटली जागतिक अॅक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेत २६.६७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. आपला हा विक्रम बर्गने मोडीत काढला. या हिटमध्ये ब्रिटनचा अॅडम (२६.६८ सेकंद) दुसऱ्या स्थानी राहिला.
- बर्गने २०१३च्या बार्सिलोना स्पर्धेत याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये त्याने सुवर्ण पटकावले आहे.
दक्षिण आशियाई बास्केटबॉल स्पर्धा : भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाला सुवर्ण
- भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या ३बाय ३ दक्षिण आशियाई बास्केटबॉल असोसिएशन (साबा) पात्रता स्पध्रेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत त्यांनी यजामन श्रीलंकेवर २१-१० असा विजय साजरा करून सुवर्ण जिंकले.
- बासिल फिलिप, राजेश उप्पर, सिद्धांत शिंदे आणि जीवनंथम पांडी या खेळाडूंचा विजयी संघात समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा