प्रश्नसंच ११२ - [इतिहास-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]

[प्र.१] महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते?
१] ज्योतिबा फुले
२] वि.रा.शिंदे
३] डॉ. आंबेडकर
४] छत्रपति शाहू महाराज

उत्तर
१] ज्योतिबा फुले
----------------
[प्र.२] काँग्रेसमधील कोणत्या गटावर 'संधिसाधू', ब्रिटीश धार्जिणे', 'राजकीय भिकारी' अशी टीका केली जात असे?
१] महाराष्ट्रीयन
२] बंगाली
३] जहाल
४] मवाळ

उत्तर
४] मवाळ
----------------
 [प्र.३] पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
१] शेतीवरील परिणाम
२] किंमतींचे  स्थिरीकरण
३] उत्पादनाच्या किंमतीच्या चढउतारात वाढ
४] शहराच्या संख्येत वाढ

उत्तर
२] किंमतींचे स्थिरीकरण
----------------
[प्र.४] ब्रिटीशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता?
१] अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीटची पार्श्वभूमी तयार झाली.
२] तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य होते.
३] भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेष, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्यांचे अनुकरण आढळते.
४] अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली.

उत्तर
२] तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य होते.
----------------
[प्र.५] हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून 'राजदरबारात (१८७७)' कोण उपस्थित होते?
१] गणेश वासुदेव जोशी
२] म.गो.रानडे
३] रवींद्रनाथ टागोर
४] बाळेन्द्रनाथ टागोर

उत्तर
१] गणेश वासुदेव जोशी
----------------
[प्र.६] ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरु केला कारण.....
अ] त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते
ब] भारतीय उद्योगधंद्यांचा विकास करणे.
क] भारीतीयांना रोजगार मिळवून देणे.
ड] वाढती मागणी होती व अधिक नफा मिळविणे.

१] अ फक्त
२] अ आणि ब फक्त
३] अ, ब आणि क फक्त
४] अ आणि ड फक्त

उत्तर
४] अ आणि ड फक्त
----------------
[प्र.७] १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला?
१] ओट्रम
२] हॅवलॉक
३] हेनरी लॉरेन्स
४] कँपबेल

उत्तर
३] हेनरी लॉरेन्स
----------------
[प्र.८] देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती' समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली?
अ] श्रीमती दुर्गाबाई बोहरा
ब] कल्पना दत्त
क] सौ. येसू बाबाराव सावरकर
ड] सौ. लक्ष्मीबाई दातार

१] फक्त क बरोबर
२] अ आणि ब दोन्ही बरोबर
३] वरील सर्व बरोबर
४] वरील सर्व चुकीचे

उत्तर
१] फक्त क बरोबर
----------------
[प्र.९] घटना कालानुक्रमे लावा.
अ] समता संघ
ब] निष्काम कर्ममठ
क] महिला विद्यालय
ड] महिला विद्यापीठ

१] अ - ब - क - ड
२] ड - क - ब - अ
३] क - ब - ड - अ
४] ब - क - अ - ड

उत्तर
३] क - ब - ड - अ
----------------
[प्र.१०] भारतात ब्रिटिशांनी जी संपत्तीची लुट केली त्याबद्दल ब्रिटीश इस्ट कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण' असे कोणी म्हंटले?
१] दादाभाई नौरोजी
२] अॅडम स्मिथ
३] लोकमान्य टिळक
४] ब्रॅड लॉ

उत्तर
२] अॅडम स्मिथ
----------------
[प्र.११] राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
अ] गोपाळकृष्ण गोखले
ब] गंगारामभाऊ मस्के
क] गोपाळ गणेश आगरकर
ड] फिरोजशहा मेहता

१] अ आणि ब बरोबर
२] ब आणि क चूक
३] अ, ब आणि ड बरोबर
४] अ, ब, क, ड बरोबर

उत्तर
४] अ, ब, क, ड बरोबर
----------------
[प्र.१२] जोड्या लावा
अ] भिल्लांचा उठाव                                              i] १८३८
ब] पागल पंथीयांचा उठाव                                    ii] १८२९
क] कोळ्यांचा उठाव                                             iii] १८२५
ड] फरेजी उठाव                                                   iv] १८१७

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
----------------
[प्र.१३] जोड्या लावा
अ] १८८७               i] अमलगमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हटस ऑफ इंडिया
ब] १८९७                ii] कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
क] १९१०                iii] कामगार हितवर्धक सभा
ड] १९१०                 iv] सोशल सर्व्हिस लीग

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv
---------------------------------