प्रश्नसंच १०९ - [इतिहास]

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}

-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}

-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}

-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]

-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}

-------------------
 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

-------------------