प्रश्नसंच ७४ - [GK]

[प्र.१] गोविंदाग्रज नावाने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक कोण?
१] राम गणेश गडकरी
२] विष्णू वामन शिरवाडकर
३] प्रल्हाद केशव अत्रे
४] नारायण गुप्ते

उत्तर
१] राम गणेश गडकरी
------------------
[प्र.२] दलित अत्याचारामुळे चर्चेत आलेले खैरलांजी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] गडचिरोली
२] भंडारा
३] नंदुरबार
४] अमरावती

उत्तर
२] भंडारा
------------------
[प्र.३] भारतीय संस्कृतीत कोणत्या गोष्टीवर योग्य भर दिलेला नाही?
१] साक्षरता
२] संगीत
३] उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता
४] दृष्टीकोन परिवर्तन

उत्तर
३] उदात्त विचारांची व्यावहारिक उपयोगिता
------------------
[प्र.४] मराठी चित्रपटातून पहिली नायिका म्हणून मान मिळवणारी व्यक्ती कोण?
१] दुर्गा खोटे
२] शुभा खोटे
३] शामाबाई
४] स्मिता पाटील

उत्तर
१] दुर्गा खोटे
------------------
[प्र.५] IPL ची सुरुवात केव्हापासून झाली?
१] २००५
२] २००६
३] २००७
४] २००८

उत्तर
४] २००८
------------------
[प्र.६] सचिन तेंडूलकरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
१] १९९९
२] २००१
३] २००२
४] २००३

उत्तर
२] २००१
------------------
[प्र.७] गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
१] उत्तर प्रदेश
२] महाराष्ट्र
३] आंध्रप्रदेश
४] बिहार

उत्तर
४] बिहार
------------------
[प्र.८] विभावरी शिरुरकर कोणत्या लेखिकेचे टोपण नाव आहे?
१] दुर्गा भागवत
२] इंदिरा संत
३] मालती बेडेकर
४] संजीवनी मराठे

उत्तर
३] मालती बेडेकर
------------------
[प्र.९] सिंचन दिन हा कोणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा करतात?
१] यशवंतराव चव्हाण
२] शंकरराव चव्हाण
३] वसंतदादा पाटील
४] वसंतराव नाईक

उत्तर
२] शंकरराव चव्हाण
------------------
[प्र.१०] प्राथमिक शिक्षणातील नोंदणी संदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत?
अ] सकल नोंदणी
ब] लिंग समानता निर्देशांक
क] नक्त नोंदणी दर
ड] नक्त उपस्थिती दर

१] फक्त अ आणि ड
२] फक्त अ आणि क
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त अ आणि क
---------------------------------------

प्रश्नसंच ७३ - [तंत्रज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणाला तर्कशास्त्राचा जनक म्हणतात?
१] हिपोक्रेटस
२] अरीस्टॉटल
३] अरीस्टार्कस
४] टॉलेमी

उत्तर
२] अरीस्टॉटल
------------------
[प्र.२] बंदुकीच्या दारूचा शोध कोणत्या संस्कृतीने लावला?
१] इजिप्शियन संस्कृती
२] सुमेरियन संस्कृती
३] भारतीय संस्कृती
४] चीनी संस्कृती

उत्तर
४] चीनी संस्कृती
------------------
[प्र.३] राजा रामण्णा सेंटर फॉर अँडव्हान्स्ड स्टडी कोठे आहे?
१] बंगळूर
२] श्रीहरीकोटा
३] इंदौर
४] मुंबई

उत्तर
३] इंदौर
------------------
[प्र.४] देशातील पहिले आयुर्वेदिक जैवतंत्रज्ञान कोठे विकसित होत आहे?
१] रांची
२] चेन्नई
३] रायपुर
४] दिग्बोई

उत्तर
३] रायपुर
------------------
[प्र.५] देशातील पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे किती साली सुरु झाले?
१] १९६९
२] १९७२
३] १९४९
४] १९५४

उत्तर
१] १९६९
------------------
[प्र.६] केंद्रकीय विखंडन होण्यासाठी आवश्यक असणा-या उर्जेला काय म्हणतात?
१] अणुउर्जा
२] क्रांतिक उर्जा
३] आण्विक उर्जा
४] गतिज उर्जा

उत्तर
२] क्रांतिक उर्जा
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणाला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात?
१] रॉजर बेकन
२] फ्रान्सिस बेकन
३] विल्यम गिल्बर्ट
४] न्यूटन

उत्तर
१] रॉजर बेकन
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या क्रियांचे कार्य केंद्रकीय संम्मीलनावर  आधारित आहे?
अ] सूर्यप्रकाश निर्मिती
ब] हायड्रोजन बॉम्ब
क] अणुबॉम्ब

१] अ आणि ब
२] अ आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.९] कॉस्मिक किरणांचा शोध कोणी लावला?
अ] मिलिकन
ब] होमी भाभा
क] जेम्स डेबर

१] अ आणि ब
२] फक्त अ
३] फक्त ब
४] ब आणि क

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.१०] केंद्रकीय विखंडनाचा शोध कोणी लावला?
अ] हेन्री बेक्वेरल
ब] मादाम क्युरी
क] ऑटोहान
ड] स्ट्रॉसमन

१] अ आणि ब
२] अ आणि क
३] क आणि ड
४] ब आणि ड

उत्तर
३] क आणि ड
----------------------------------------------

प्रश्नसंच ७२ - [पंचायत राज]

[प्र.१] स्थानिक स्वराज्य परिषदेच्या अध्यक्षपदी पी.बी.पाटील समितीने कोणाची शिफारस केली?
१] राज्यपाल
२] मुख्यमंत्री
३] जिल्हाधिकारी
४] विभागीय आयुक्त

उत्तर
२] मुख्यमंत्री
------------------
[प्र.२] 'सामाजिक न्याय समितीची स्थापना करण्यात यावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] बलवंतराय मेहता समिती

उत्तर
१] अशोक मेहता समिती
------------------
[प्र.३] 'विकास प्रशासनाचे केंद्र जिल्हा असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बाबुराव काळे समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] जी.व्ही.के.राव समिती

उत्तर
४] जी.व्ही.के.राव समिती
------------------
[प्र.४] 'ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची लोकसंख्या २००० असावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बाबुराव काळे समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] जी.व्ही.के.राव समिती

उत्तर
३] पी.बी.पाटील समिती
------------------
[प्र.५] जिल्हास्तरीय योजनासंबंधी शिफारशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
१] एल.एम.सिंघवी समिती
२] हनुमंतय्या समिती
३] गोविंद सहाय समिती
४] भूषण गगराणी समिती

उत्तर
२] हनुमंतय्या समिती
------------------
[प्र.६] सरपंचांना मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बलवंतराय मेहता समिती
२] वसंतराव नाईक समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] अशोक मेहता समिती

उत्तर
३] पी.बी.पाटील समिती
------------------
[प्र.७] मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मजुरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते?
१] तलाठी
२] सरपंच
३] उपसरपंच
४] ग्रामसेवक

उत्तर
४] ग्रामसेवक
------------------
[प्र.८] पंचायत राज संस्था स्वशासित संस्था म्हणून विकसित करण्यासाठी त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] एल.एम.सिंघवी समिती
२] हनुमंतय्या समिती
३] गोविंद सहाय समिती
४] भूषण गगराणी समिती

उत्तर
१] एल.एम.सिंघवी समिती
------------------
[प्र.९] पी.बी.पाटील समिती नेमण्यामागील खालीलपैकी कोणते उद्दिष्टे होते?
अ] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्माचा-यांच्या समस्या
ब] ग्रामपंचायतीचे आर्थिक प्रश्न
क] पंचायतराजच्या कार्याचे पुनर्विलोकन
ड] ग्रामपंचायत प्रशासनात सुधारणा

१] अ,ब आणि क
२] ब,क आणि ड
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] पी.बी.पाटील समितीच्या शिफारशी लक्षात घ्या.
अ] ग्रामपंचायतीची महसुली कार्ये हि पंचायत समितीकडे असावी.
ब] अविश्वास ठरावावर  १/३ सदस्यांची सही असावी.
क] ग्रामसेवकाप्रमाणे तलाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा.

वरीलपैकी कोणती शिफारस पी.बी.पाटील समितीची नाही?
१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] अ आणि क

उत्तर
१] फक्त अ
---------------------------------------------

प्रश्नसंच ७१ - [राज्यघटना]

[प्र.१] केंद्रीय आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण देते?
१] राष्ट्रीय विकास परिषद
२] आंतरराज्य परिषद
३] नियोजन आयोग
४] वित्त आयोग

उत्तर
४] वित्त आयोग
------------------
[प्र.२] एक व्यक्ती २६ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशात जन्मली तर ती कुठली नागरिक असेल?
१] मध्यप्रदेश
२] भारत
३] भारत आणि मध्यप्रदेश
४] वरीलपैकी नाही

उत्तर
२] भारत
------------------
[प्र.३] जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
१] इंग्लंड
२] अमेरिका
३] स्वीडन
४] भारत

उत्तर
२] अमेरिका
------------------
[प्र.४] राज्यघटनेतील कोणत्या कलमाने सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आली आहे?
१] कलम १४
२] कलम १५
३] कलम १६
४] कलम १७

उत्तर
३] कलम १६
------------------
[प्र.५] कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आले?
१] ४१व्या
२] ४२व्या
३] ४३व्या
४] ४४व्या

उत्तर
१] ४१व्या
------------------
[प्र.६] भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारच्या अल्पसंख्यांकांना मान्यता देते?
अ] धार्मिक अल्पसंख्यांक
ब] वांशिक अल्पसंख्यांक
क] भाषिक अल्पसंख्यांक

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त अ आणि क
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] संचित निधीवरील अधिभारीत खर्चात राष्ट्रपतींच्या वेतनाचा समावेश होतो.
ब] अधिभारीत खर्चावर लोकसभेत मतदान घेण्यात येते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणी लोकसभेचा सभापती पदावर काम केले नाही?
१] नीलम संजीव रेड्डी
२] पी.ए.संगमा
३] सोमनाथ चटर्जी
४] बाबू जगजीवन राम

उत्तर
४] बाबू जगजीवन राम
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.
ब] वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्क आहे.
क] अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे.

१] फक्त ब
२] फक्त अ आणि ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त अ आणि ब
------------------
[प्र.१०] अयोग्य विधान ओळखा.
अ] २२व्या घटनादुरुस्तीने मेघालयला सहराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब] १९६९ साली मद्रास राज्याचे नाव तामिळनाडू असे करण्यात आले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही [दोन्ही विधाने योग्य आहेत]
---------------------------------------------

प्रश्नसंच ७० - [भूगोल]

[प्र.१] थेम्स नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते?
१] अमेरिका
२] रशिया
३] फ्रांस
४] ग्रेट ब्रिटन

उत्तर
४] ग्रेट ब्रिटन
------------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते?
१] उत्तर अमेरिका
२] दक्षिण अमेरिका
३] आफ्रिका
४] ऑस्ट्रेलिया

उत्तर
४] ऑस्ट्रेलिया
------------------
[प्र.३] उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] नर्मदा
२] चंबळ
३] तापी
४] तुंगभद्रा

उत्तर
३] तापी
------------------
[प्र.४] आनंदभुवन हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] मुंबई
२] बंगळूर
३] अलाहाबाद
४] गांधीनगर

उत्तर
३] अलाहाबाद
------------------
[प्र.५] ब-हनेर हि कोणत्या नदीची उपनदी आहे?
१] नर्मदा
२] ब्रम्हपुत्रा
३] कृष्णा
४] दिहांग

उत्तर
१] नर्मदा
------------------
[प्र.६] 'कोल' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
१] उत्तर प्रदेश
२] आसाम
३] मध्यप्रदेश
४] अरुणाचल प्रदेश

उत्तर
३] मध्यप्रदेश
------------------
[प्र.७] ‘ब्लॅक फॉरेस्ट पर्वत’ खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
१] इजिप्त
२] जर्मनी
३] दक्षिण सुदान
४] सौदी अरेबिया

उत्तर
२] जर्मनी
------------------
[प्र.८] 'किंबुत्स' आणि 'मोशाव' हे शेतवसाहतीचे वैशिष्ट कोणत्या देशात आढळते?
१] अमेरिका
२] इंग्लंड
३] इजिप्त
४] इस्त्राईल

उत्तर
४] इस्त्राईल
------------------
[प्र.९] अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
१] सरस्वती
२] यमुना
३] शरयू
४] घंडक

उत्तर
३] शरयू
------------------
[प्र.१०] पूर निर्मितीस खालीलपैकी कोणते कारण मदत करते?
अ] अतिवृष्टी
ब] नदीपात्राची नागमोडी वळणे
क] नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड
ड] नदीच्या दरी उतारावरील शेती

१] अ आणि ड
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
--------------------------------------------

प्रश्नसंच ६९ - [इतिहास]

[प्र.१] भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात?
१] राधाकृष्णन आयोग
२] हंटर आयोग
३] वूड्सचा खलिता
४] मॅकोलेचा सिद्धांत

उत्तर
३] वूड्सचा खलिता
------------------
[प्र.२] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?
१] राजा राममोहन रॉय
२] म.गो.रानडे
३] लोकमान्य टिळक
४] गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर
२] म.गो.रानडे
------------------
[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.
ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.४] १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
१] १६ वर्षे
२] १२ वर्षे
३] १४ वर्षे
४] १८ वर्षे

उत्तर
३] १४ वर्षे
------------------
[प्र.५] तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?
१] ११९०
२] ११९१
३] ११९२
४] ११९३

उत्तर
२] ११९१
------------------
[प्र.६] नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?
१] कुतुबुद्दीन ऐबक
२] याल्दुज
३] बख्तियार खिलजी
४] घियासुद्दिन खिलजी

उत्तर
३] बख्तियार खिलजी
------------------
[प्र.७] ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने सर्वप्रथम १८१९मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
१] एल्फिन्स्टन कॉलेज
२] सेंट जॉर्ज ख्रिश्चन मिशन
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
४] मुंबई युवा स्त्री शिक्षण संस्था

उत्तर
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
------------------
[प्र.८] कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?
१] जे.इ.डी.बेथून
२] हेनरी कॉटन
३] ईश्वरचंद्र विद्यासागर
४] राजा राममोहन रॉय

उत्तर
१] जे.इ.डी.बेथून
------------------
[प्र.९] महंमद गझनीच्या दरबारी इतिहासकार कोण होता?
१] उत्बी
२] फिरदौसी
३] अल-बरुनी
४] मिन्हास सिराज

उत्तर
१] उत्बी
------------------
[प्र.१०] भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले?
१] मुलतान
२] सिंध
३] पंजाब
४] राजस्थान

उत्तर
२] सिंध
------------------------------------------------

प्रश्नसंच ६८ - [GK]

[प्र.१] CD/DVD हे कोणत्या प्रकारचे उपकरणे आहेत>
१] आउटपुट
२] स्टोरेज
३] इनपुट
४] ऑक्टल

उत्तर
२] स्टोरेज
------------------
[प्र.२] MIME चे पूर्ण रूप सांगा.
१] Multipurpose internet mail extensions
२] Multitask internet mail extensions
३] Multiprogram interface mail engine
४] Multiuser internet management extensions

उत्तर
१] Multipurpose internet mail extensions
------------------
[प्र.३] 'Smart cane project' कशाशी संबंधित आहे?
१] शैक्षणिक संस्था
२] अंध व्यक्ती
३] IT पार्कस
४] महिला सक्षमीकरण

उत्तर
२] अंध व्यक्ती
------------------
[प्र.४] सर्वात जास्त बॅंडविडथ देणारी मिडीया खालीलपैकी कोणती?
१] फायबर ट्वीस्टेड केबल
२] ऑप्टीकल फायबर
३] ट्वीस्टेड केबल पेअर
४] कोअक्झियल केबल

उत्तर
२] ऑप्टीकल फायबर
------------------
[प्र.५] भारतातील सर्वात मोठे तारघर कोठे आहे?
१] मुंबई
२] कोलकत्ता
३] नवी दिल्ली
४] चेन्नई

उत्तर
१] मुंबई
------------------
[प्र.६] खालीलपैकी सक्तीचे शिक्षण देणारा देश कोणता?
१] भारत
२] उरुग्वे
३] अमेरिका
४] नॉर्वे

उत्तर
२] उरुग्वे
------------------
[प्र.७] प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तहसीलदार
४] तलाठी

उत्तर
४] तलाठी
------------------
[प्र.८] दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे?
१] १९५४
२] १९६०
३] १९६९
३] १९४८

उत्तर
३] १९६९
------------------
[प्र.९] मोडेमच्या साह्याने कोणत्या प्रकारचे सिग्नल कम्युनिकेट करता येतात?
अ] Analog सिग्नल
ब] Digital सिग्नल
क] Binary सिग्नल

१] अ आणि ब
२] फक्त अ
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.१०] प्रसिद्ध टेनिसपटू कलीम क्लिस्टर्स कोणत्या देशाशी संबंधित आहे?
१] अमेरिका
२] इटली
३] सर्बिया
४] बेल्जियम

उत्तर
४] बेल्जियम
---------------------------------------------

प्रश्नसंच ६७ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] 'सागर माला' कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे?
१] हवाई वाहतूक
२] सागर वाहतूक
३] ईशान्य भारत रस्ते विकास
४] भारत पाकिस्तान रेल्वे लाइन

उत्तर
२] सागर वाहतूक
------------------
[प्र.२] २००६ साली सुरु झालेल्या २० कलमी कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
१] ई-शासन
२] सामाजिक सुरक्षा
३] स्वछ पेयजल
४] अंतराळ संशोधन

उत्तर
४] अंतराळ संशोधन
------------------
[प्र.३] डॉ. आंबेडकर दुग्ध रोजगार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] महाराष्ट्र
२] उत्तर प्रदेश
३] गुजरात
४] बिहार

उत्तर
२] उत्तर प्रदेश
------------------
[प्र.४]  कल्पवृक्ष योजनेचा मुख्य हेतू कोणता?
१] अनाथ विधवांना पेंशन
२] गरीब स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
३] SC/ST आदिवासी स्त्रियांना  रोजगार उपलब्ध करून देणे
४] गरीब स्त्रियांना वैद्यकीय सेवा देणे

उत्तर
३] SC/ST आदिवासी स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
------------------
[प्र.५] पंचधारा हि मध्यप्रदेशची योजना कोणासाठी आहे?
१] शहरी रोजगार
२] ग्रामीण व आदिवासी स्त्रिया
३] ग्रामीण विधवा
४] ग्रामीण लघुउद्योग

उत्तर
२] ग्रामीण व आदिवासी स्त्रिया
------------------
[प्र.६] 'जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा' हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे?
१] मातोश्री योजना
२] जननी सुरक्षा योजना
३] वात्सल्य योजना
४] आयुष्यमती  योजना

उत्तर
३] वात्सल्य योजना
------------------
[प्र.७] 'राष्ट्रीय महिला कोष'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] या संस्थेची स्थापना १९९३ साली झाली.
ब] या योजनेंतर्गत गरीब महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
३] या कोषामध्ये स्त्रियांसंबंधी सर्व सामाजिक कार्याचा समावेश होतो.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.८] खालील दिलेल्या वैशिष्ठ्यांवरून योजनेचे नाव ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २५ डिसेंबर २००५ पासून झाली.
ब] हि योजना १००% केंद्र पुरस्कृत आहे.
क] केंद्रीय रस्ते निधी मध्ये जमा झालेल्या डीझेल उपकराचा वापर या योजनेसाठी होतो.

१] इंदिरा आवास योजना
२] नागपूर योजना
३] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
४] जवाहर रोजगार योजना

उत्तर
३] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
------------------
[प्र.९] 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रतिव्यक्ती १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
ब] अर्ज केल्यापासून १५ दिवसात रोजगार उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यास महागाई भत्ता दिला जातो.
३] प्रकल्पाची निवड, अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामसभेच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीची आहे.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
२] ब आणि क
------------------
[प्र.१०] ‘वाल्मिकी आंबेडकर योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] हि योजना शहरी झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
ब] हि योजना ग्रामीण झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
३] हि योजना ग्रामीण मागासवर्गीय समाजातील अपंग लोकांसाठी आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
१] फक्त अ
---------------------------------------------

प्रश्नसंच ६६ - [राज्यघटना]

[प्र.१] राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?
१] कलम २१
२] कलम २३
३] कलम २४
४] कलम २८

उत्तर
३] कलम २४
------------------
[प्र.२] राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या परिशिष्टात दिले आहे?
१] चौथ्या
२] पाचव्या
३] सहाव्या
४] सातव्या

उत्तर
१] चौथ्या
------------------
[प्र.३] भारतीय संघराज्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ] राज्य
ब] केंद्रशासित प्रदेश
क] मिळवलेले प्रदेश

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.४]  राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट असलेला समान नागरी कायदा काय दर्शवतो?
१] आर्थिक समानता
२] राजकीय समानता
३] राष्ट्रीय एकात्मता
४] कमकुवत गटाला सहाय्य

उत्तर
३] राष्ट्रीय एकात्मता
------------------
[प्र.५] मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा.
अ] मार्गदर्शक तत्वे हि अवाद योग्य आहेत.
ब] त्यांचे स्वरूप आदर्शवादी आहे
क] सामाजिक लोकशाहीच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे.

१] फक्त ब
२] फक्त क
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.६] रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले कलम कोणते?
१] कलम ४०
२] कलम ४१
३] कलम ४२
४] कलम ४३

उत्तर
२] कलम ४१
------------------
[प्र.७] चुकीची जोडी ओळखा.
१] कर्नाटक - म्हैसूर
२] तामिळनाडू - मद्रास
३] लक्षद्वीप - लख्खदिप
४] मेघालय - पूर्वीय टेकड्या प्रांत

उत्तर
४] मेघालय - पूर्वीय टेकड्या प्रांत
------------------
[प्र.८] भारताचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत रद्द होते?
अ] जेव्हा व्यक्ती स्वतःहून नागरिकत्वाचा त्याग करते.
ब] जेव्हा व्यक्ती दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारते.
क] जेव्हा वाजवी कारणास्तव केंद्रशासन नागरिकत्व रद्द करते.

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ५१
२] कलम ४८
३] कलम ४९
४] कलम ५०

उत्तर
१] कलम ५१
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वात होतो?
अ] वेठबिगार व मानव तस्कर बंदी
ब] अमली पदार्थाच्या सेवनावर बंदी

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही  

उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------

प्रश्नसंच ६५ - [इतिहास]

[प्र.१] खालीलपैकी कोणत्या भागात सिंधू संस्कृतीचा विस्तार झालेला नाही?
१] गुजरात
२] सिंध
३] राजस्थान
४] काश्मीर

उत्तर
४] काश्मीर
------------------
[प्र.२] असत्य विधान ओळखा.
१] चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांना मारले.
२] समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हंटले जाते.
३] स्कंदगुप्ताने हुनांना पराभूत केले.
४] कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.

उत्तर
४] कुमारगुप्ताने सुदर्शन सरोवर खुले केले.
------------------
[प्र.३] पुष्यमित्राने कोणत्या घराण्याची स्थापना केली?
१] मौर्य
२] शुंग
३] शक
४] वाकाटक

उत्तर
२] शुंग
------------------
[प्र.४]  सिंधू संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी केव्हा होती?
१] इ.स.पू. ३५००
२] इ.स.पू. २५००
३] इ.स.पू. ५००
४] इ.स.पू. २०००

उत्तर
२] इ.स.पू. २५००
------------------
[प्र.५] रामानुज कोणत्या मंदिराचे मुख्य पुजारी होते?
१] द्वारका
२] शृंगेरी
३] पुरी
४] श्रीरंगम

उत्तर
४] श्रीरंगम
------------------
[प्र.६] 'मिताक्षरा' ग्रंथाची रचना कोणी केली?
१] पंप
२] विज्ञानेश्वर
३] बिळण
४] सोमेश्वर तिसरा

उत्तर
२] विज्ञानेश्वर
------------------
[प्र.७] चालुक्य काळातील शहरांपैकी कोणते शहर 'मंदिरांचे शहर' म्हणून ओळखले जाते?
१] बदामी
२] ऐहोळ
३] कान्हेरी
४] कल्याणी

उत्तर
२] ऐहोळ
------------------
[प्र.८] महंमद गझनीने स्वतःला खालीलपैकी कोणते शीर्षक घेतले?
१] गाझी
२] सम्राट
३] बुतशिकन
४] प्रेषित

उत्तर
३] बुतशिकन
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या सुलतानाने हक्क-इ-शर्ब नावाचा कर सुरु केला?
१] इल्तमश
२] अल्लाउद्दिन खिलजी
३] गियासुद्दीन तुघलक
४] फिरोजशाह तुघलक

उत्तर
४] फिरोजशाह तुघलक
------------------
[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] 'शहानामा' ग्रंथ फिरदौसीने लिहिला.
ब] 'नुरसीपिहर' हा ग्रंथ आमीर खुस्त्रोने ग्रंथ लिहिला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] अ आणि ब दोन्ही
-----------------------------------------------

प्रश्नसंच ६४ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे?
१] AB
२] A
३] B
४] O

उत्तर
४] O
------------------
[प्र.२] रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात?
१] जवळजवळ १०,००० पेशी
२] जवळजवळ १,००,००० पेशी
३] जवळजवळ १० लाखापेक्षा जास्त
४] २५००० पेक्षा कमी

उत्तर
३] जवळजवळ १० लाखापेक्षा जास्त
------------------
[प्र.३] स्त्रियांमध्ये असणारे X गुणसूत्र त्यांना कोणाकडून मिळतात?
१] आईकडून
२] वडिलांकडून
३] आईकडून आणि वडिलांकडून
४] यापैकी नाही

उत्तर
३] आईकडून आणि वडिलांकडून
------------------
[प्र.४]  AIDS हा रोग कशामुळे होतो?
१] जिवाणूमुळे
२] आदिजीवामुळे
३] विषाणूमुळे
४] कवकामुळे

उत्तर
३] विषाणूमुळे
------------------
[प्र.५] मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग कार्यरत असते?
१] अंतर्वक्र
२] बहिर्वक्र
३] दंडगोलाकृती
४] अंतर्वक्र आणि बहिर्वक्र दोन्ही

उत्तर
२] बहिर्वक्र
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणते उदाहरण समपृष्ठरज्जु  प्राण्याचे नाही?
१] रोहू
२] बेडूक
३] तारामासा
४] साप

उत्तर
३] तारामासा
------------------
[प्र.७] केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो?
१] प्रथिने
२] ग्लुकोज
३] कर्बोदके
४] मेद

उत्तर
२] ग्लुकोज
------------------
[प्र.८] रक्तातील हिमोग्लोबिनचा सर्वात जास्त जवळचा सबंध कशाशी आहे?
१] ऑक्सिजन
२] कार्बन मोनॉक्साईड
३] कार्बन डायऑक्साईड
४] हायड्रोजन

उत्तर
२] कार्बन मोनॉक्साईड
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही?
१] हिमोग्लोबिन
२] फायब्रिनोजेन
३] प्रोथोंबिन
४] टेपॅरिन

उत्तर
४] टेपॅरिन
------------------
[प्र.१०] शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात?
१] कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट
२] कॅल्शियम व सल्फेट
३] कॅल्शियम व मॅग्नेशियम
४] कॅल्शियम व लोह

उत्तर
१] कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट
------------------------------------------

प्रश्नसंच ६३ - [भूगोल]

[प्र.१] हिमसागर हि आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते?
१] आंध्रप्रदेश
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] पश्चिम बंगाल

उत्तर
४] पश्चिम बंगाल
------------------
[प्र.२] भुतिया हि जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते?
१] कुमाऊ गढवाल
२] छोटे अंदमान
३] आसाम
४] केरळ

उत्तर
१] कुमाऊ गढवाल
------------------
[प्र.३] ग्रॅनाईटचे प्रमुख उत्पादक राज्य खालीलपैकी कोणते?
१] गुजरात
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक

उत्तर
१] गुजरात
------------------
[प्र.४]  नाल्को ही अँल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] उत्तर प्रदेश
२] छत्तिसगड
३] ओडिशा
४] तामिळनाडू

उत्तर
३] ओडिशा
------------------
[प्र.५] दादरी ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार

उत्तर
२] उत्तर प्रदेश
------------------
[प्र.६] तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते?
१] पश्चिम बंगाल
२] महाराष्ट्र
३] पंजाब
४] मध्य प्रदेश

उत्तर
३] पंजाब
------------------
[प्र.७] देशातील एकूण अभ्रक उत्पादनापैकी ५०% उत्पादन _ _ _ _ _ _ _ राज्यात होते?
१] छत्तिसगड
२] झारखंड
३] मध्यप्रदेश
४] राजस्थान

उत्तर
२] झारखंड
------------------
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] जागतिक तागाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब] भारतात सहकारी तत्वावर आधारित साखर कारखाने तामिळनाडू राज्यात सर्वाधिक आहेत.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
------------------
[प्र.९] खालीलपैकी कोणता कालवा नागार्जुनसागर प्रकल्पाशी संबंधित आहे?
अ] बँकिंगहम कालवा
ब] जवाहर कालवा
क] लालबहाद्दूर कालवा

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] ब आणि क
------------------
[प्र.१०] कवास ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार

उत्तर
१] गुजरात
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ६२ - [सामान्य ज्ञान]

[प्र.१] ताश्कंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?
१] 1962 चे भारत -चीन युध्द    
२] 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
३] 1971 चे भारत -पाक युध्द    
४] 1999 चे कारगील युध्द

उत्तर
२] 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
------------------
[प्र.२] ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती  विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?
अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.

१] अ,ब,क        
२] अ,ब,ड        
३] फक्त अ    
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.३] परदेशी कपडे आणि वस्तू यांवरील बहिष्कार हे कोणत्या लढ्याचे वैशिष्टय होते?
१] स्वदेशी चळवळ      
२] असहकार आंदोलन  
३] भारत छोडो आंदोलन    
४] सविनय कायदेभंग चळवळ

उत्तर
१] स्वदेशी चळवळ
------------------
[प्र.४]  __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.
१] राष्ट्रपती  
२] पंतप्रधान  
३] राज्यपाल  
४] सरन्यायाधीश

उत्तर
३] राज्यपाल
------------------
[प्र.५] कारगील मधील विजयाची स्मृती 'कारगील विजय दिवस 'म्हणून केव्हा साजरा केला जातो?
१] 16 डिसेंबर  
२] 31 ऑक्टोबर          
३] 14 जानेवारी            
४] 26 जुलै

उत्तर
४] 26 जुलै
------------------
[प्र.६] तिसरे इंग्रज-मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ?
१] त्रिंबकजी डेंगळे    
२] गंगाधर शास्त्री        
३] बापू गोखले  
४] यशवंतराव होळकर

उत्तर
३] बापू गोखले
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?
१] जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
२] सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
३] भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
४] मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही

उत्तर
३] भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
------------------
[प्र.८] अयोग्य जोडी ओळखा.
१] राज्य पुनर्रचना आयोग : आंध्रप्रदेश
२] मद्रास राज्य : तामिळनाडू
३] बिलासपुर राज्य : हिमाचल प्रदेश
४] १९६६ : गुजरातची स्थापना

उत्तर
४] १९६६ : गुजरातची स्थापना
[गुजरातची स्थापना : १ मे १९६०]

------------------
[प्र.९] मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशावर अवलंबून असते?
१] न्यायालये
२] विरोधी पक्षांच्या दबावावर
३] सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
४] लोकाच्या सहकार्यावर

उत्तर
३] सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
------------------
[प्र.१०] असत्य विधाने ओळखा.
१] महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाली.
२] दीव हे बेट खंबायतच्या आखातात आहे.
३] दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
४] गोव्याला १९८७ साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

उत्तर
३] दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
[दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होते.]

-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ६१ - [इतिहास]

[प्र.१] खालीलपैकी कोण सम्राट अशोकाचा मुलगा नव्हता?
१] तिवरा
२] कुणाल
३] जलौका
४] सुमण

उत्तर
४] सुमण
------------------
[प्र.२] आर्यभट्ट : खगोलशास्त्र : : सुश्रुत : ???
१] गणितशास्त्र
२] औषधशास्त्र
३] राज्यशास्त्र
४] अर्थशास्त्र

उत्तर
२] औषधशास्त्र
------------------
[प्र.३] 'मालविकाग्निमित्र' या नाटकाची रचना कोणी केली?
१] अग्निमित्र
२] समुद्रगुप्त
३] कालिदास
४] हर्षवर्धन

उत्तर
३] कालिदास
------------------
[प्र.४] अयोग्य जोडी ओळखा.
१] पहिली बौद्ध सभा : राजगृह
२] दुसरी बौद्ध सभा : मगध
३] तिसरी बौद्ध सभा : पाटलीपुत्र
४] चौथी बौद्ध सभा : काश्मिर

उत्तर
२] दुसरी बौद्ध सभा : मगध
------------------
[प्र.५] विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती?
१] पुरुषपूर
२] पाटलीपुत्र
३] उज्जैन
४] वाराणशी

उत्तर
२] पाटलीपुत्र
------------------
[प्र.६] गुप्त काळातील चांदीच्या नाण्यांना काय नाव होते?
१] दिनार
२] रुप्याका
३] सतमान
४] कर्शपान

उत्तर
२] रुप्याका
------------------
[प्र.७] गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्यासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे?
१] दोघेही एकाच शतकात जन्मले होते.
२] दोघेही क्षत्रिय आहेत.
३] दोघांचाही साध्या आणि नीट राहाणीमानावर विश्वास होता.
४] वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती.    

उत्तर
४] वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती.
------------------
[प्र.८] 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा उल्लेख कोणाबद्दल केला जातो?
१] गौतमीपुत्र सातकर्णी
२] सम्राट अशोका
३] हर्षवर्धन
४] विक्रमादित्य

उत्तर
१] गौतमीपुत्र सातकर्णी
------------------
[प्र.९] मौर्य साम्राज्याच्या -हासाचे खालीलपैकी कोणती कारणे सांगता येतील?
अ] अशोक राजाचे शांततेचे धोरण
ब] अशोका नंतरचे दुबळे शासक
क] परकीय आक्रमण

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] ब आणि क
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोण कोण पल्लवांचे समकालीन होते?
अ] गंग
ब] कदंब
क] चालुक्य
ड] सातवाहन

१] अ आणि ड
२] अ,ब आणि क
३] अ आणि क
४] अ,क आणि ड

उत्तर
२] अ,ब आणि क
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ६० - [पर्यावरण]

[प्र.१] पुदिना या वनस्पतीचा उपयोग _ _ _ _ _ _ _ म्हणून केला जातो.
१] वेदनाशामक
२] मलेरिया प्रतिबंधक
३] कर्करोग प्रतिबंधक
४] रक्तप्रवाह वर्धक

उत्तर
४] रक्तप्रवाह वर्धक
------------------
[प्र.२] खालील परीसंस्थेतील प्राणी आणि त्यांचा पोषण प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा.
१] काळवीट - शाकाहारी
२] भुछत्रे - मृतोपाजीवी
३] चिंकारा - मांसाहारी
४] रानमांजर – मांसाहारी

उत्तर
३] चिंकारा - मांसाहारी
------------------
[प्र.३] आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना कोणत्या संस्थेअंतर्गत कार्यरत आहे?
१] संयुक्त राष्ट्रसंघाचा आर्थिक आयोग
२] आंतरराष्ट्रीय भूआवरण - जीवावरण कार्यक्रम
३] महासागरीय संशोधनावर वैज्ञानिक समिती
४] वरीलपैकी नाही

उत्तर
२] आंतरराष्ट्रीय भूआवरण - जीवावरण कार्यक्रम
------------------
[प्र.४] थ्रिमाइल्स आयलंड अनु अपघात हि दुर्घटना कोणत्या देशाशी संबंधित आहे?
१] रशिया
२] जपान
३] अमेरिका
४] चीन

उत्तर
३] अमेरिका
------------------
[प्र.५] युनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम केव्हा सुरु करण्यात आला?
१] १९७०
२] १९९५
३] २०००
४] २००२

उत्तर
१] १९७०
------------------
[प्र.६] आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती कोणी आणि केव्हा स्थापन केली?
१] सार्क-१९९८
२] NATO-१९६९
३] आसियान-२००२
४] आफ्रिका-१९७८  

उत्तर
२] NATO-१९६९
------------------
[प्र.७] आसिको ही पर्यावरण संरक्षक चळवळ कोणत्या राज्यात झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] कर्नाटक

उत्तर
४] कर्नाटक
------------------
[प्र.८] आम्ल पर्जन्याच्या बाबतीत अयोग्य विधाने ओळखा.
अ] राजस्थानातील आम्ल पर्जन्यामुळे भरतपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्षी कमी झाले आहेत.
ब] आग्राच्या ताजमहालवर आम्ल पर्जन्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.९] १९८७ सालच्या  मॉन्ट्रीयल करार व १९८९ मधील लंडन परिषदेमध्ये कोणत्या बाबींवर भर देण्यात आला होता?
अ] ओझोन -हासाचे गांभीर्य
ब] नष्ट होत जाणा-या प्रजातींचे संवर्धन
क] क्लोरो-फ्लोरो कार्बनचे उत्पादन २०%नी कमी करणे.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त अ आणि क
------------------
[प्र.१०] आधुनिक समाजाच्या आव्हानासंबंधी समिती खालीलपैकी कोणत्या विषयावर लक्ष ठेवते?
अ तटवर्ती प्रदूषण
ब] हवा प्रदूषण
क] खंडातर्गत पाणी

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५९ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे?
१] १४.९%
२] २०.१%
३] ०२.०२%
४] १८.९%

उत्तर
१] १४.९%
------------------
[प्र.२] २००९-१० मधील निकषानुसार भारताचे दरडोई प्रतिमाह ग्रामीण आणि शहरी उत्पन्न अनुक्रमे [अंदाजे] किती आहे?
१] ३०० रु. , ४०० रु
२] ५६५ रु. , ८७९ रु.
३] ६७२ रु. , ८५९ रु
४] ९५४ रु. , १००४ रु.

उत्तर
३] ६७२ रु. , ८५९ रु
------------------
[प्र.३] २००९-१० च्या सुरेश तेंडूलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?
१] ३८.२%
२] २४.५%
३] ४८.३%
४] १८.७%

उत्तर
२] २४.५%
------------------
[प्र.४] कोणत्या योजनेमध्ये बदल करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली?
१] जवाहर रोजगार योजना
२] संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
३] १ आणि २ दोन्ही
४] प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

उत्तर
१] जवाहर रोजगार योजना
------------------
[प्र.५] १ एप्रिल १९९९मध्ये  सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.
१] IRDP
२] TRYSEM
३] DWCRA
४] ICDS

उत्तर
४] ICDS
------------------
[प्र.६] योग्य विधाने ओळखा.
अ] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत देशाच्या मानव विकास निर्देशांकात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत महाराष्ट्राच्या मानव विकास निर्देशांकात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
४] वरील दोन्ही
------------------
[प्र.७] सहस्त्रकालीन चिकास उद्दिष्ठासंबंधी अयोग्य विधाने ओळखा.
अ] १९९० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्म्यावर आणणे.
ब] १९९० ते २०१५ दरम्यान पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी करणे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला.
ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते.


१] फक्त अ
२] फक्त ब
३] एकही नाही
४] वरील दोन्ही

उत्तर
३] एकही नाही
------------------
[प्र.९] महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते?
अ] हस्तकला कारागिरांना मदत.
ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत.
क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] भांडवल बाजारासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] भांडवल बाजारात मध्यमकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात.
ब] या बाजारात उद्योजक व्यावसायिक या बाजारात शेअर्स, बॉन्डस वगैरे विकून भांडवलाची उभारणी
करतात.
क] भांडवल बाजार हा फक्त शुक्रवारी जिल्ह्याच्या ठिकाणी भरतो.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] फक्त अ आणि ब
----------------------------------------------------

प्रश्नसंच ५८ - [भूगोल]

[प्र.१] नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
१] आंध्रप्रदेश
२] कर्नाटक
३] केरळ
४] तामिळनाडू

उत्तर
४] तामिळनाडू
------------------
[प्र.२] स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर सर्वप्रथम बांधण्यात आले?
१] न्हावाशेवा [JNPT]
२] कांडला
३] मार्मागोवा
४] मुंब्रा

उत्तर
२] कांडला
------------------
[प्र.३] अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते?
१] पाल्क
२] जिब्राल्टर
३] मल्लाक्का
४] बिअरिंग

उत्तर
३] मल्लाक्का
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही?
१] ब्रुनेई
२] मलाया
३] सेहाद
४] सारवाक

उत्तर
१] ब्रुनेई
------------------
[प्र.५] 'इल्मेनाईट' हे खनिज उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते?
१] आंध्रप्रदेश
२] कर्नाटक
३] केरळ
४] तामिळनाडू

उत्तर
३] केरळ
[इल्मेनाईट हे Iron titanium oxide mineral आहे. जे मुख्यत्वे केरळमध्ये सापडते]

------------------
[प्र.६] खाली दिलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश मोठा आहे?
१] हो-हॅंग-हो
२] नाईल
३] इरावती
४] मिसिसीपी
 
उत्तर
२] नाईल
------------------
[प्र.७] लोकतक जलविद्युत निर्मिती क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
१] मेघालय
२] मिझोरम
३] त्रिपुरा
४] मणिपूर

उत्तर
४] मणिपूर
------------------
[प्र.८] 'शॉन'चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
१] कंबोडिया
२] थायलंड
३] व्हिएतनाम
४] म्यानमार

उत्तर
४] म्यानमार
------------------
[प्र.९] अयोग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्र हा शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य आहे.
ब] भारताला १०% कागद आयात करावा लागतो.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
------------------
[प्र.१०] भारताच्या इतर किनारी भागांपेक्षा सौराष्ट्राचा किनारी भाग मत्स्य व्यवसायासंबंधी कमी विकसित आहे, कारण.........................
१] तेथील किनारी भागात पाण्याची क्षारता जास्त आहे.
२] औद्योगिक विकासामुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे.
३] मत्स्य व्यवसायासंदर्भात तेथील लोकांत जागरूकता नाही.
४] तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.  

उत्तर
४] तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.
-------------------------------------------------------------

प्रश्नसंच ५७ - [इतिहास]

[प्र.१] राष्ट्रकुट कोणत्या धर्माचे अनुयायी होते?
१] बौद्ध
२] जैन
३] वैष्णव
४] शैव

उत्तर
२] जैन
------------------
[प्र.२] अयोग्य जोडी ओळखा.
१] यादव - देवगिरी
२] राष्ट्रकुट - मान्यखेत
३] होयसाळ - द्वारसमुद्र
४] पांड्य - बेलूर  

उत्तर
४] पांड्य - बेलूर
------------------
[प्र.३] 'राजतरंगिणी' या ग्रंथात कोणत्या प्रदेशचा इतिहास वर्णन केला आहे?
१] मध्यप्रदेश
२] महाराष्ट्र
३] काश्मीर
४] राजस्थान

उत्तर
३] काश्मीर
------------------
[प्र.४] महमद गझनीने भारतावर पहिली स्वारी कधी केली?
१] इ.स.१०००
२] इ.स.९९९
३] इ.स.९७५
४] इ.स.१००८

उत्तर
१] इ.स.१०००
------------------
[प्र.५] क्रिप्स मिशनला पोस्ट डेटेड चेक कोणी म्हंटले?
१] पट्टाभी सीतारामय्या
२] दादाभाई नौरोजी
३] न्या.रानडे
४] महात्मा गांधी

उत्तर
४] महात्मा गांधी
------------------
[प्र.६] भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यानचे दत्त-ब्रॅडली प्रबंध कशासंबंधी होता?
१] कम्युनिस्ट चळवळ
२] भारतीयांना नागरी सेवेत प्रवेश
३] कामगार चळवळी
४] कृषी महसुलाच्या पद्धती
 
उत्तर
१] कम्युनिस्ट चळवळ
------------------
[प्र.७] सुलतान महंमद गझनीसोबत भारतात कोण आले?
१] अल मसुदी
२] अल बरुनी
३] सुलेमान
४] इक्न हकल

उत्तर
३] सुलेमान
------------------
[प्र.८] भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या घटकाने सर्वात कमी प्रमाणात सहभाग घेतला?
१] शेतकरी
२] राज्यांचे राजे
३] सरकारी अधिकारी
४] उद्योगपती

उत्तर
२] राज्यांचे राजे
------------------
[प्र.९] दिल्ली प्रस्तावामध्ये खालीलपैकी काय अंतर्भूत होते?
अ] विभक्त मतदार संघाऐवजी एकत्रित मतदार संघ आणि मुस्लिमांना राखीव जागा
ब] केंद्रीय कायदेमंडळामध्ये मुस्लिम लीगला एक तृतीयांश प्रतिनिधीत्व देण्यात आले.
क] पंजाब व बंगाल मध्ये मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या राजांनी उत्तर भारतावर आक्रमण केले?
अ] ध्रुव
ब] गोविंद तिसरा
क] इंद्र तिसरा

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------