‘ई-कॉमर्स’मधील सर्वांत मोठा ‘शॉपिंग फेस्टिव्हल’ असे बिरुद मिरविणाऱ्या ‘अलिबाबा डॉट कॉम’च्या ‘सिंगल्स डे’मध्ये १४ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली.
अमेरिकेच्या ‘सायबर मंडे’ या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’लाही चीनने भरपूर मागे टाकले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या ‘सायबर मंडे’ या सर्वांत मोठ्या ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये एका दिवसामध्ये दोन अब्जांहून अधिक डॉलरची विक्री झाली होती.
चीनमध्ये दरवर्षी ११ नोव्हेंबरला ‘अलिबाबा’तर्फे ‘सिंगल्स डे’ साजरा केला जातो. गेल्या वर्षी २४ तासांमध्ये ‘अलिबाबा’ने एकूण ९.३ अब्ज डॉलरची विक्री केली होती.
‘अलिबाबा डॉट कॉम’ कंपनीचे सीईओ : डॅनियल झॅंग
द्रमुकचे माजी खासदार एन. राजेंद्रन यांची आत्महत्या
द्रमुकचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार एन. राजेंद्रन यांनी स्वतःला गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
तमिळनाडूतील तुतिकोरीन जिल्ह्यातील कोविलपट्टी येथील बस स्टँडजवळ स्वतःच्या मोटारीत त्यांनी गोळी झाडून घेतली.
राजेंद्रन हे द्रमुकचे १९९५ ते २००१ या काळात राज्यसभेचे खासदार होते.
जर्मनीचे माजी चॅन्सेलर हेल्मट श्मिड्ट यांचे निधन
तत्कालीन पश्चिम जर्मनीचे माजी चॅन्सेलर हेल्मट श्मिड्ट यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. युरोपीय राजकारणातील स्पष्टवक्ते असलेले नेते म्हणून ते परिचित होते.
श्मिड्ट यांनी १९७४ ते १९८२ दरम्यान पश्चिम जर्मनीचे नेतृत्व केले असून त्यावेळी तो देश आर्थिक शक्तीकेंद्र होता.
श्मिड्ट हे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, त्यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करताना अति डाव्या रेड आर्मी गटाशी झुंज दिली.
रशियाकडून इराणला वर्षअखेरीस क्षेपणास्त्रे
२०१५च्या अखेरीपर्यंत रशिया इराणला एस ३०० प्रकारची संरक्षण क्षेपणास्त्रे देणार आहे. रशियाकडे या क्षेपणास्त्रांची मागणी इराणने आधीच नोंदवली होती.
इराणी सैन्याला रशियात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे. रशियन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (रोस्टेक) या संस्थेने इराणशी एस ३०० क्षेपणास्त्रे देण्याचा करार २००७ मध्ये केला होता.
रशियाने २०१० पासून इराणला क्षेपणास्त्रे विकण्यावर असलेले निर्बंध उठवले होते. रशियाच्या या निर्णयाने इस्रायलने चिंता व्यक्त केली असून निर्बंध उठवण्याआधीच क्षेपणास्त्रे देण्याचा करार केल्याबाबत अमेरिकेने नाराजी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा