चालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१५


दिनविशेष

  • भारतीय संविधान दिन
  • २६ नोव्हेंबर १९२१ : श्वेतक्रांतींचे जनक व्हर्गीस कुरियन जन्मदिन

‘पृथ्वी २’ची यशस्वी चाचणी

    Prithvi 2
  • अण्वस्त्रधारी ‘पृथ्वी २’ या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चंडीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या संस्थने ही चाचणी घेतली.
  • आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली.
  • या मोहिमेमध्ये उपयुक्य सर्व रडार यंत्रणा, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटर आहे, तर ते १००० किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.

पॉंडिचरीत विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना

  • पॉंडिचरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी या योजनेवर ७.६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी मोफत सायकल मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेमुळे २६,२०७ विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळणार आहेत.

राज्यसभा सदस्य खेकीहो झिमोमी यांचे निधन

    Khekiho Zhimomi
  • नागा पिपल्स फ्रंटचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य खेकीहो झिमोमी यांचे २६ नोव्हेंबर रोजी एआयआयएमएस रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
  • झिमोमी यांनी नागालॅंड स्टुडंट फेडरेशनमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नागालॅंडमधील ते एक यशस्वी उद्योजक होते.
  • ते तीन वेळा नागालॅंड विधानसभेचे सदस्य होते. तसेच नागालॅंडमध्ये त्यांनी काही मंत्रिपदेही भूषविली होती. 
  • म्यानमारसोबत शांतता करार करण्यासाठी त्यांनी अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत म्यानमारला भेट दिली होती.
  • हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे कामकाज त्यांच्या निधनामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

२०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष

  • जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) अहवालानुसार, पृथ्वीवरील आतापर्यंतच्या इतिहासात २०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून, एल निनोच्या प्रभावामुळे २०१६ या वर्षीही काहीशी अशीच परिस्थिती जाणवेल, असे अहवालात म्हटले आहे.
  • तापमानवाढीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलल्यास सध्याच्या तापमानात ६ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. 
  • उद्योगक्रांतीच्या कालखंडानंतर जागतिक तापमानामध्ये २ अंशांनी वाढ झाली. हे तापमान २०१० पर्यंत सरासरीपर्यंत आणण्याचे लक्ष्य होते.
  • डब्ल्यूएमओच्या मते, २०१५ या वर्षातील भूपृष्ठावरील तापमानवाढ ही उद्योगपूर्व कालखंडानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. तापमानातील हे बदल हे एल निनोच्या प्रभावामुळे आणि मानवनिर्मित तापमानवाढीमुळे झालेले आहेत. 
  • १९९८ पासून आतापर्यंत जगातील सर्वाधिक दहा उष्ण वर्षे झाली आहेत. त्यापैकी २००५नंतर आतापर्यंत आठ वर्षांचा समावेश पहिल्या दहामध्ये आहे.

दिल्ली सरकारने उद्देशिका चुकविली

  • दिल्ली सरकारने संविधान दिनाच्या निमित्ताने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये संविधानाची उद्देशिका छापली. मात्र त्यात गंभीर चूक करत 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे दोन्ही शब्द वगळून टाकले.
  • माहिती व प्रसारण विभागाच्या संचालकांना यांसदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून ४ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री : मनीष सिसोदिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा