चालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१५


भारत-ब्रिटन यांच्यात नागरी अणुकरार

    India and UK
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करारावर इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबरोबरच उभय देशांत ९ बिलियन पौंडचा व्यापारी करारही झाला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये आगमन झाल्यानंतर ब्रिटिश लष्कराच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. कॅमेरून आणि मोदी यांच्यात १० डाउनस्ट्रीट येथे सुमारे ९० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली.
  • याशिवाय युनोच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या समावेशाला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचेही कॅमेरून यांनी सांगितले.
  • त्यानंतर जगातील लोकशाही व्यवस्थेचे मंदिर असलेल्या ऐतिहासिक बिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत भाषण दिले.

छगन भुजबळांकडील १६० कोटींची जमीन जप्त

  • ‘महाराष्ट्र सदन’ बांधकामातील कथित गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नवी मुंबईतील खारघर येथील भूखंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली. या जमिनीची किंमत जवळपास १६० कोटी आहे. 
  • खारघरमध्ये देवीशा इन्फ्रा कंपनीकडून गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी भुजबळ यांनी बनावट कंपन्या दाखवून ६५ एकर भूखंड खरेदी केला होता. या ठिकाणी ‘हेक्सवर्ल्ड’ या नियोजित प्रकल्पासाठी २३०० ग्राहकांकडून ४४ कोटी कंपनीने घेतले; मात्र तिथे कुठलाही प्रकल्प सुरू न झाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली, असा आरोप आहे. 
  • देवीशा इन्फ्राचे संचालक समीर आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात जूनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण असल्याने लाचलुचपतविरोधी विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.
  • कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता गोळा करून विविध बनावट कंपन्यांत गुंतवल्याप्रकरणी भुजबळ कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता गोळा करून विविध बनावट कंपन्यांत गुंतवल्याप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

ऑफस्पिनर रमेश पोवार निवृत्त

  • तब्बल १५ वर्षे दर्जेदार क्रिकेट खेळल्यानंतर भारताचा ऑफस्पिनर म्हणून काही काळ योगदान देणारा मुंबईचा क्रिकेटपटू रमेश पोवार याने अखेर स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • ३७ वर्षीय रमेश पोवारने २ कसोटी सामने व ३१ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दोन कसोटी सामन्यात पोवारने सहा विकेटस घेतले. वनडेत त्याच्या खात्यात ३४ विकेटस जमा आहेत.
  • मुंबईसाठी मात्र त्याने दिलेले योगदान अधिक प्रभावी होते. तब्बल ४४२ विकेटस त्याच्या नावावर जमा आहेत. साईराज बहुतुलेसह त्याने मुंबईला अनेक रणजी विजेतीपदे जिंकून देण्यात मोलाची जबाबदारी बजावली.
  • पोवारने कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात राजस्थान व गुजरातचेही प्रतिनिधित्व केले.

एडीबीचे भारताला कर्ज

  • आशियाई विकास बँक भारताला २७३ दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात बँकेबरोबर केंद्र सरकारने एक करार केला आहे.
  • या कर्जातून आसाम, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओदिशा व पश्चिम बंगाल येथील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त केले जातील. हे कर्ज भारताला तीन टप्प्यांत दिले जाईल.
  • यातून ग्रामीण भागात कोणत्याही हवामानात टिकू शकतील, असे सुमारे ६ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जातील, ज्यामुळे ४ हजार २०० कुटुंबांना लाभ होईल.

निफ्टी निर्देशांकाचे नाव आता ‘निफ्टी ५०’

  • ३ नोव्हेंबर १९९५ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी निर्देशांक आता ‘निफ्टी ५०’ नावाने ओळखला जाईल.
  • एनएसईची समूह कंपनी असलेल्या ‘इंडिया इन्डेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने सीएनएक्स निफ्टीसह विविध ५३ निर्देशांकांच्या नामाभिधानातही बदल केला आहे.
  • गत दोन दशकांत निफ्टी ५०चे बाजारमूल्य ५८.५ टक्क्यांनी वाढले आहे. तर १६ क्षेत्रामध्ये वित्तीय सेवा विभागाने ३१ टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत निफ्टी ५० या निर्देशांकाने ११ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी ५० ने २००९ मध्ये सर्वाधिक, ७५.८० टक्के परतावा दिला.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी : चित्रा रामकृष्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा