चालू घडामोडी - ३१ जुलै २०१५


पेटीएम बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सर

    Paytm title sponser for BCCI
  • २०१९ पर्यंत भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा टायटल प्रायोजक मिळाला आहे.
  • ई-कॉमर्स वेबसाईट कंपनी पेटीएम चालविणाऱ्या ‘वन-९७ कम्युनिकेशन्स कंपनी’ला २०३.२८ कोटी रूपयांत बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व मिळाले आहे.
  • पुढील चार वर्षांत भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम बीसीआयला २.४२ कोटी रूपये मोजणार आहे. बीसीसीआयचे प्रायोजकत्व पहिल्यांदाच ई-कॉमर्स कंपनीला देण्यात आले आहे.
  • पुढील चार वर्षात भारतात जवळपास ८४ सामने खेळले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यापासून पेटीएम आता बीसीसीआयच्या जर्सीवर आपली ब्रॅन्डींग करू शकणार आहे.
  • आता नव्या मोसमापासून रणजी करंडक स्पर्धा ‘पेटीएम रणजी करंडक’ म्हणून ओळखली जाईल.
  • यापुर्वी मायक्रोमॅक्स या कंपनीकडे बीसीसीआयचे टायटल प्रायोजकत्व होते, ते प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला २.०२ कोटी रूपये मोजायचे. अपुर्ण कागदपत्रांमुळे यावेळी मायक्रोमॅक्स टायटल प्रायोजकत्वावर बोली लावू शकले नाही. 

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची उच्चस्तरीय समिती

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे दिली आहे. 
  • ‘स्मार्ट सिटीज्’ तयार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे-पिंपरी, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या दहा शहरांची निवड केली आहे. 

स्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेला दहा लाख डॉलर्सचा दंड

    SBI Logo
  • हाँगकाँग सेंट्रल बँकेनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हाँगकाँग येथील शाखेला दहा लाख डॉलरचा (सुमारे ६.२ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादविरोधी आर्थिक नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण दाखवत स्टेट बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • हाँगकाँगमध्ये २०१२ साली ‘अँटी मनी लाँडरिंग आणि काऊंटर टेरेरिस्ट फायनान्सिंग लॉ’ (मनी लाँड्रिंगविरोधी कायदा) आल्यानंतर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.
  • एप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान स्टेट बँकेच्या हाँगकाँग शाखेने मनी लाँड्रिंगविरोधी नियम राबविण्यात हलगर्जीपणा केला. विशेषत: बँकेच्या २८ कॉर्पोरेट ग्राहकांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात आली नाही. ग्राहकांच्या सध्याच्या औद्योगिक व्यवहारांवर बँकेचे नियंत्रण नाही. बँकेच्या ग्राहकांमध्ये राजकीयदृष्ट्या भ्रष्ट व्यक्तींचा समावेश आहे की नाही याची शहानिशा करण्यात आलेली नाही, असा ठपका हाँगकाँग पत नियामक प्राधिकरणानं (एचएमए) ठेवला आहे. 
  • दहा लाख डॉलरच्या दंडाबरोबरच स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश ‘एचएमए’ने स्टेट बँकेला दिले आहेत. बँकेच्या अंतर्गत कारभारावर पुढील काळात कसे नियंत्रण ठेवले जाणार आहे, त्यासाठी बँक काय उपाययोजना करणार, याची माहिती देण्यासही ‘एचएमए’ने बजावले आहे.
  • स्टेट बँकेचे हाँगकाँगमध्ये ३५ हून अधिक वर्षांसाठी अस्तित्व आहे.

दरवर्षी १ रुपयाच्या नव्या नोटा सरकार छापणार

  • एक रुपया बाजारमूल्याच्या १५ कोटी नोटा दरवर्षी छापण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. १ जानेवारी २०१५पासून दरवर्षी या नोटा छापल्या जातील. 
  • १ जानेवारीपासून दरवर्षी १ रुपया बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी १५ डिसेंबर २०१४रोजी राजपत्र (गॅझेट) अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नोटा कॉइनेज अॅक्टमधील तरतुदींनुसार छापण्यात येतील. 
  • नोटा छपाईचा खर्च वाढत असल्याचे कारण देऊन १, २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे या नोटा सरकारने छापण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप २ व ५ रुपये बाजारमूल्याच्या नोटा छापण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.

चीनमध्ये विजेवरील बसचा सार्वजनिक वाहतुकीत वापर

  • चीनमध्ये दहा सेकंदात पूर्णपणे विद्युतभारित होणारी (चार्जिग) बस तयार करण्यात आली असून ती ३१ जुलैपासून सेवेत दाखल करण्यात आली आहे.
  • ही बस ११ कि.मी. रस्त्यावर धावते. झेजियांग प्रांतात निंगबो येथे या बससेवेला एकूण २४ थांबे आहेत. येत्या तीन वर्षांत अशा १२०० बसगाड्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. या शहरात विद्युत बसगाड्या निर्मितीचा प्रकल्पही आहे.
  • बस थांबलेली असताना किंवा प्रवासी चढत-उतरत असताना विद्युतभारित होते. एका विद्युतभारात ही बस पाच किमी अंतर कापते. तसेच या बसच्या वापरामुळे प्रदूषणदेखील कमी होते.
  • झुझाऊ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कंपनीने ही बस तयार केली असून, चीनमधील वेगवान रेल्वे बनवणाऱ्या चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन या संस्थेची ही उपकंपनी आहे.
  • या बस उत्पादनाशिवाय याच धर्तीवर इतर विद्युत वाहनांपेक्षा ३० ते ५० टक्के कमी वीज लागणारी इतर वीज वाहने कंपनी एप्रिलपर्यंत तयार करणार आहे.
  • या बसचे संधारित्र (कॅपॅसिटर) २० लाख वेळा विद्युतभारित करता येते त्यामुळे त्याचा कार्यकाल १० वर्षांचा आहे. या बससेवेत बस रॅपिड ट्रान्झिट पद्धतीच्या मार्गाचा अवलंब केल्याने ती रहदारीच्या अडथळ्यांशिवाय चालू शकते.

आयएमएफचे इराकला १.२४ अब्ज डॉलरचे कर्ज

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इराकला १.२४ अब्ज डॉलरच्या कर्जास तात्काळ मंजुरी दिली आहे. 
  • इसिसची वाढलेली बंडखोरी आणि जागतिक बाजारात कमी झालेल्या तेलाच्या किंमतीमुळे वित्तीय तूट इराकची वित्तीय तूट वाढली आहे. त्यामुळे देशाला अतिरिक्त निधीची गरज असल्याचे सांगितले आहे.
  • सरकारच्या अर्थसंकल्पासाठी तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्ट्रक्चरल सुधारणांचा स्वीकार करण्यासाठी आयएमएफ पूर्ण मदत करेल, असे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार इराकी अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी (२०१४-१५) २.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चालू वर्षात अर्थव्यवस्थेत फक्त ०.५ टक्के वाढीची शक्यता आहे.

आयसीजीएस आरुष नौकेचे जलावतरण

  • कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)तर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या २० जलद गस्त नौकांपैकी (बीवाय ५१७) १७ व्या नौकेचे गुरुवारी कोचीन गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.
  • तटरक्षक दुरुस्ती आणि उत्पादन पर्यवेक्षकचे डीआयजी जी. देवानंद यांची पत्नी ज्योती देवानंद यांच्या हस्ते ‘आयसीजीएस आरुष’ या नौकेचे जलावतरण करण्यात आले.

मंगल सिंग चाम्पियाचा रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित

  • कोपनहेगन, डेन्मार्क येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंगल सिंग चाम्पियाने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासह रिओ ऑलिम्पिक मधील प्रवेश निश्चित केला आहे.
  • रजत चौहानने कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत प्रवेशासह रजत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, महिलांमध्ये लक्ष्मीराणी माझी रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीची लढत खेळणार आहे.

इंडोको रेमेडिजची महाराष्ट्र व गोव्यात १२५ कोटींची गुंतवणूक

  • औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या इंडोको रेमेडिजने महाराष्ट्र व गोवा प्रकल्प विस्ताराची योजना आखली असून यासाठी १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • कंपनी महाराष्ट्रातील पातळगंगा येथे हरितक्षेत्र एपीआय सुविधा केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील स्टरलाईट ऑप्थॅल्मिक सुविधा केंद्राचाही विस्तार करण्यात येणार आहे.

शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासचा ताबा

    BNP Paribas to buy brokerage firm Sharekhan
  • दीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसऱ्या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या शेअरखानवर फ्रान्सच्या बीएनपी पारिबासने ताबा मिळविला आहे. हा व्यवहार २००० कोटी रुपयांचा झाला असण्याची शक्यता आहे.
  • भारतीय भांडवली बाजारात सल्लागाराच्या भूमिकेचा विस्तार करताना बीएनपी पारिबासने शेअरखानचे सर्व, १०० टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. बीएनपी पारिबासचे युरोपात १७ लाख ग्राहक आहेत.
  • बीएनपी पारिबासमध्ये विलीन झाल्यानंतर शेअरखान ही यंत्रणा भारतातील व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत असेल; समभाग तसेच म्युच्युअल फंड, अन्य बचत योजनांची विक्री शेअरखानमार्फत कायम असेल.
  • २०००च्या दशकात देशातील पहिली स्वतंत्र दलाल पेढी म्हणून अस्तित्वात आलेल्या शेअरखानचा खाते राखण्यातील ७ टक्के हिस्सा आहे. गेल्या एक तपापासून ही पेढी नफ्यात राहिली आहे. तर बीएनपी पारिबासचे ७५ देशांमध्ये अस्तित्व असून तिच्याअंतर्गत १.८५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
  • एसएसकेआय इन्व्हेस्टर सर्व्हिसेसच्या नावाने शेअरखान १९९५ मध्ये कार्यरत होती.

इसिसने अपहरण केलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका

  • लिबियातील सर्टे या शहरात इसिसचा मोठा प्रभाव असून ३० जुलै रोजी संध्याकाळी येथून चार भारतीय प्राध्यापकांचे इसिसने अपहरण केले होते. 
  • लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आलेल्या चार भारतीयांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. 
  • यापैकी दोघेजण हैदराबाद, एकजण रायचूर आणि एक प्राध्यापक बेंगुळरूमधील आहे. हे सर्व जण त्रिपोली आणि ट्युनिसमार्गे भारताकडे येण्यास निघाले होते. त्यावेळी सर्टे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकनाक्यावरून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. 
  • अपहरण करण्यात आलेले चारही प्राध्यापक गेल्या एक वर्षापासून लिबियातील विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात. इसिसच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून भारतीय नागरिकांना लिबिया सोडण्याची सूचना केली होती. 

देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन यांचे निधन

    Suniti Solomon, M.D., HIV specialist
  • देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. सुनिती सोलोमन २९ जुलै २०१५ रोजी यांचे चेन्नईमध्ये कर्करोगाने निधन झाले.
  • देशात एड्सचा १९८५च्या दरम्यान वेगाने प्रसार होत असताना डॉ सुनितींनी पुढाकार घेऊन एड्स प्रसाराची कारणं, त्यावरच्या उपचारांसाठी लागणारी यंत्रणा, आणि भारतात त्याबाबतची जागृती यासाठी आयुष्य वेचले. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे काम साऱ्या जगात वाखाण्यात आले.
  • चेन्नईत त्यांनी उभ्या केलेल्या वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेत साडे पाच हजार रुग्णांवर उपचार करण्यात येतात.
  • डॉ. सुनिती यांना तीन महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे  निधन

  • वर्णभेद प्रकरणातील बंदी उठल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार क्लाइव्ह राईस यांचे २८ जुलै रोजी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
  • वर्ण आणि वांशिक भेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांना फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नाही. बंदी उठल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने १९९१ मध्ये जेव्हा भारताचा दौरा केला, तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कर्णधार ठरले. त्या वेळी ते ४२ वर्षांचे होते.
  • क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते. पण त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तीन एकदिवसीय सामन्यांपुरतीच मर्यादित राहिली. त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधीच मिळाली नाही.
  • नॉटिंगहॅमशायरचे नेतृत्व करताना त्यांनी संघाला दोन वेळा इंग्लिश कौंटीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी नॉटिंगहॅमशायर संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.

MT Fast Facts
पॉन्झी योजना म्हणजे काय?
  • कोणत्याही आर्थिक योजनेतून नागरिकांकडून १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गोळा करणारी योजना सेबीअंतर्गत येते. त्याचप्रमाणे एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ५० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अशी योजना सार्वजनिक योजना म्हणून ओळखली जाते. अशी योजना सेबीअंतर्गत येते.
  • अनेक योजनांमध्ये ५०पेक्षा कमी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्याची तर एकूण रक्कम १०० कोटींपेक्षा कमी गोळा केल्याची बतावणी अशी योजना राबवणाऱ्या कंपनीकडून केली जाते. अशा प्रकारे पैसे गोळा करण्यासाठी अपरिवर्तनशील ऋणपत्रे (एनसीडी) किंवा तत्सम आर्थिक उत्पादनांची मदत घेतली जाते.

चालू घडामोडी - ३० जुलै २०१५


विज्ञानेश्वराचे प्रस्थान

    Tribute to Dr. Kalam
  • ‘भारतरत्न’ माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना लाखोंच्या जनसमुदायाने शोकाकुल वातावरणात ३० जुलै रोजी अखेरचा निरोप दिला.
  • रामेश्वरम येथून फुलांनी सजविलेल्या गाडीतून कलाम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. रामेश्वरमपासून जवळच असलेल्या पेईकरूम्बू येथे दफनविधी करण्यात आले. 
  • आपल्या भूमीतील लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्यविधीवेळी लाखोंचा जनसागर लोटला होता. ‘कलाम सर अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
  • लष्करी इतमामात झालेल्या अंत्यविधीवेळी लष्कराच्या जवानांकडून बंदुकीच्या फेऱ्या झाडून सलामी देण्यात आली.
केरळमधील तांत्रिक विद्यापीठाला डॉ. कलाम यांचे नाव
  • केरळमधील प्रस्तावित तांत्रिक विद्यापीठाला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय केरळ राज्य सरकारने घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी राज्य विधानसभेत ही घोषणा केली.
  • भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. कलाम यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. एक वैज्ञानिक म्हणून डॉ. कलाम यांचा केरळशी जवळपास २० वर्षे निकटचा संबंध होता, असे चंडी म्हणाले.
गुगलकडून विशेष श्रद्धांजली
  • डॉ. अब्दुल कलाम यांना गुगलकडून विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या असामान्य व्यक्तिमत्त्वाला ‘सर्च इंजिन गुगल’नेही सलाम केला आहे.
  • गुगलने डूडलचा वापर न करता सर्च टॅबच्याखाली एक काळी रिबन लावून कलाम यांना अनोखी अशी श्रद्धांजली वाहिली आहे. या रिबनवर कर्सर नेल्यास ‘इन मेमरी ऑफ डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ असा संदेश बाजूला उमटत आहे.
  • कलाम यांनी राष्ट्रपती झाल्यानंतरही साधेपणा सोडला नाही. हाच साधेपणा श्रद्धांजलीत असावा अशा पद्धतीने गुगलने डूडल न वापरता ही श्रद्धांजली वाहिली आहे.

अखेर याकूब मेमनला फाशी

    Yakub Menon
  • मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमनला ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
  • २९ जुलैच्या रात्री राष्ट्रपतींनी याकूबचा दया अर्ज फेटाळल्यानंतर २९ जुलैच्या रात्रीपासून ते ३० जुलैच्या पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात अभूतपूर्व अशा घडामोडी पहायला मिळाल्या.
  • या सुनावणीसाठी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक ४ मध्ये ३० जुलैच्या पहाटे ३.१८ ते ५ या वेळेत याकूबच्या याचिकेवर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. पी. सी. पंत आणि आमिताव रॉय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
  • याकूबच्या वकिलांनी शिक्षेचा निकाल सुनाविल्यापासून शिक्षेच्या अंमलबजावणीमध्ये १४ दिवसांचे अंतर असावे, हे कायदेशीर कारण पुढे करत ही याचिका दाखल केली होती.
याकूबने शिक्षेबाबत घेतलेल्या हरकती
  • न्यायालयाने न्याय देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी विचारात घेतल्या नव्हत्या.
  • राष्ट्रपतींनी ११ एप्रिल २०१४ रोजी दयेचा अर्ज फेटाळून लावला, त्याची माहिती २६ मे रोजी देण्यात आली.
  • आपले म्हणणे ऐकून न घेताच परस्पर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • आरोपीला दोन आठवडे आधी शिक्षेची माहिती देण्यात येते, मात्र हा नियमही पाळण्यात आला नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
  • टाडा न्यायालयाने ३० एप्रिल रोजी याकूबला सुनावलेल्या मृत्युदंडाच्या आदेशात कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळलेली नाही. या पार्श्वभूमीवर याकूबने सादर केलेली रिट याचिका रद्दबातल ठरते. तसेच त्याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा निर्णयही योग्य होता.
  • याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीसाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला जात नसतानाही याकूबच्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी दहा दिवस सुरू होती. यावरून, याकूबला त्याची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता अशाप्रकारच्या खटल्यात अधिक वेळ वाया घालवणे योग्य नसल्याचे सांगत न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांनी याकूबची याचिका फेटाळली.
पार्श्वभूमी
  • मुंबई बाँबस्फोट खटल्यातील १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्यात प्रमुख आरोपी याकूब मेमनसह आरडीएक्स स्फोटके विविध ठिकाणी ठेवणाऱ्यांसह १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
देशात नजीकच्या काळातील फाशीच्या शिक्षा
३० जुलै २०१५ (नागपूर)याकूब मेमनमुंबईत १९९३ मध्ये साखळी बाँबस्फोटांमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा सिद्ध.
९ फेब्रुवारी २०१३ (दिल्ली)अफजल गुरूभारताच्या संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी दोषी.
२१ नोव्हेंबर २०१२ (पुणे)अजमल कसाबमुंबईवर २००८मध्ये (२६/११) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोषी.
१४ ऑगस्ट २००४ (कोलकता)धनंजय चटर्जी१९९० मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध.

 जीएसटी विधेयकात दुरुस्तीस मंजुरी

    GST Bill
  • जीएसटी विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे राज्यांचे होणारे नुकसान पहिली पाच वर्षे केंद्राकडून भरून देण्याबाबतच्या जीएसटी विधेयकातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ जुलै रोजी मंजुरी दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीएसटीबाबत राज्यसभेच्या प्रवर समितीने केलेल्या या सूचनेस मंजुरी देण्यात आली.
  • जीएसटीमधील या बदलांमुळे प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ओडिशामधील बिजू जनता दल यांचा विश्वास जिंकणे सत्ताधारी एनडीएला शक्य होणार असून एनडीएचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत जीएसटी विधेयकाचा मार्ग सोपा होण्याची अपेक्षा आहे.
ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर
  • मंत्रिमंडळाने बैठकीत ‘ग्राहक संरक्षण विधेयक-२०१५’लाही मंजुरी दिली आहे. हे विधेयक संमत झाल्यास गेली २९ वर्षे अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेईल. या नव्या विधेयकात व्यापारी गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी एका नियामक प्राधिकरणाच्या स्थापनेची तरतूद आहे.
  • विविध उत्पादनांबाबत ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा वेगाने निपटारा व्हावा, तसेच, मुळात त्यांना दर्जेदार व सुरक्षित उत्पादने मिळावीत, हा या विधेयकाचा हेतू आहे. 
  • उत्पादनात खोट असल्यास व त्याचा फटका एकपेक्षा अधिक ग्राहकांना बसल्यास वेळप्रसंगी संबंधित उत्पादकास त्याची उत्पादने बाजारातून काढून घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार या प्रस्तावित प्राधिकरणास असेल. 
  • ग्राहकहक्कांना नख लागल्यास काही प्रकरणांत संबंधितांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात असून, ई-रिटेलिंग व्यवहारांतही ग्राहकहित जपण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.
विमान अपहरणविरोधी विधेयक मंजूर
  • विमान अपहरणात विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तरीही संबंधित दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेल्या विमान अपहरणविरोधी विधेयकाला (२०१४) मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी
  • याव्यतिरिक्त, पायाभूत प्रकल्पांसाठी २० हजार कोटी रु.च्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या (एनआयआयएफ) स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
संसदेच्या चालू असलेल्या पावसा‍ळी अधिवेशनात हि विधेयके मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत.

२०२२ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश

  • संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक लोकसंख्या अहवाल-२०१५’ची सुधारित आवृत्ती २९ जुलै रोजी जाहीर केली.
  • भारत २०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले आहे.
  • पुढील सात वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार असून २१०० सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे. 
  • सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी इतकी, तर भारताची १३१ कोटींच्या घरात आहे.
  • भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर २०३० साली भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या आसपास असेल. २०५० साली हाच आकडा १७० कोटींच्या घरात जाऊ शकतो.
  • चीनच्या बाबतीत २०३०पर्यंत त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बऱ्यापैकी स्थिर राहील तर २०५० नंतर दर कमी झालेला असेल. 
  • २०१३ साली जाहीर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात भारत २०२८ सालापर्यंत लोकसंख्येच्या आकडेवारीत चीनच्या पुढे जाईल, असे नमूद करण्यात आले होते.

जनरल मोटर्सची भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक

  • अमेरिकेच्या जनरल मोटर्सने भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. याचबरोबर शेव्हरले नाममुद्रेसह भारतीय वाहन बाजारपेठेत अस्तित्व राखणाऱ्या जनरल मोटर्सने येत्या पाच वर्षांत १० नवीन वाहने सादर करण्याचे ठरविले आहे.
  • तसेच कंपनी गुजरातमधील उत्पादन प्रकल्प बंद करून तिच्या महाराष्ट्रातील पुण्यानजीकच्या तळेगाव येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित करणार आहे.
  • जनरल मोटर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी : मेरी बॅरा

कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचे ४०० विकेट

    Dale Steyn joins 400 test wicket club
  • दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने ४०० विकेट घेणाऱ्या महान गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा तो तेरावा गोलंदाज ठरला आहे. 
  • शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरूद्ध मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत स्टेनने ४०० वा बळी टिपला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल ही स्टेनची ४००वी शिकार ठरली. या विकेटने ४०० चा टप्पा गाठणाऱ्या अन्य १२ महान गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन स्टेन बसला आहे. 
  • २००४ मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी पदार्पण करणारा स्टेन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात ‘खतरनाक’ गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

ह्युंदाई मोटर इंडियाला ४२० कोटींचा दंड

    Hyundai
  • वाहनांचे सुटे भाग खुल्या बाजारात उपलब्ध न करून देण्यावरून भारतीय देशातील वाहननिर्मिती व्यवसाय पुन्हा एकदा दंडाच्या जाळ्यात ओढला गेला असून यंदाच्या फेऱ्यात कोरियन ह्युंदाई मोटर इंडियाला ४२० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
  • भारतीय स्पर्धा आयोगाने ऑगस्ट २०१४ मध्ये वाहन कंपन्यांना केलेल्या दंडानंतर आता एकत्रित रक्मक २,५४४.६४ कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी १४ कंपन्यांबाबत आयोगाने आदेश दिले होते. 
  • यंदा ह्युंदाईला ४२० कोटी रुपयांचा दंडाचे आदेश जारी करण्यात आले असून महिंद्र रेवा व प्रीमियरला शिस्तीचा अवलंब करण्याबाबत बजाविले आहे.
  • ह्युंदाईच्या दंडाची रक्कम ही कंपनीच्या तीन आर्थिक वर्षांतील सरासरी उलाढालीपैकी २ टक्के आहे.

शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचे निधन

    Vasundhara Komkali
  • प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित कुमार गंधर्व यांची पत्नी, शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली (वय ८५) यांचे २९ जुलै रोजी निधन झाले.
  • पद्मश्री पुरस्कार विजेत्या वसुंधरा कोमकली यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्काराचा समावेश आहे.
  • जमशेदपूर येथे जन्मलेल्या वसुंधरा या कालांतराने कोलकत्ता येथे राहण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यानंतर प्रोफेसर बी. आर. देवधर यांनी त्यांना संगीताचे शिक्षण दिले आणि नंतर पंडित कुमार गंधर्व यांच्या शिष्या बनल्या.
  • १९६३ साली पंडित कुमार गंधर्व यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या देवास येथे स्थलांतरित झाल्या होत्या.

चालू घडामोडी - २९ जुलै २०१५

२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन

संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’

    Sanjiv Chaturvedi and founder of NGO Goonj Anshu Gupta
  • भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणणारे धडाकेबाज आयएफएस अधिकारी व माजी मुख्य दक्षता अधिकारी (सीव्हीओ) संजीव चतुर्वेदी आणि ‘गुंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता या दोघा तरुण-तडफदार भारतीयांना प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ (२०१४ साठीचा) जाहीर झाला आहे.
  • यंदाच्या मॅगसेसे पुरस्कारासाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून त्यात या दोघा भारतीयांचा समावेश आहे. संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना हा सन्मान ३१ ऑगस्टला फिलिपाइन्सच्या कल्चरल सेंटरमध्ये प्रदान केला जाणार आहे.
  • याशिवाय लाओस येथील कोमली चानतावोंग, फिलिपिन्सच्या लिगावा फर्नांडो-अलिबंगसा आणि म्यानमारच्या क्वॉ थू यांनाही मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
संजीव चतुर्वेदी यांच्याबद्दल...
  • २००२च्या तुकडीतील आयएफएस अधिकारी असलेल्या संजीव चतुर्वेदी यांना भ्रष्टाचाराविरोधात बेधडक कामगिरी केल्याबद्दल मॅगसेसे पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 
  • ‘एम्स’मध्ये मुख्य दक्षता अधिकारी असताना त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघड केली होती. बेकायदेशीरपणे परदेश दौरे करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं. त्यातील ७८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात झाली आहे. 
  • त्याशिवाय, त्यांनी उघडकीस आणलेल्या ८७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय, तर २० प्रकरणांची चौकशी सीबीआय करतेय.
  • या मोहिमेनंतर, त्यांची बदली झाल्यानं त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. सध्या ते एम्समध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत.
  • सरकारी सेवेत असताना मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी ठरलेले ते दुसरे भारतीय ठरलेत. याआधी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना सेवेत असतानाच हा पुरस्कार मिळाला होता.
अंशू गुप्ता यांच्याबद्दल...
  • देशातील गरिबांच्या व्यथा-वेदना दूर करण्यासाठी, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी समाजसेवेचा ध्यास घेऊन अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये भक्कम पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘गूंज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. आज ही संस्था २१ राज्यांमधील गरजूंना कपडे, घरगुती सामान आणि अन्नधान्य पुरवण्याचं कार्य करतेय. 
  • नैसर्गिक संकटांवेळी पीडितांना मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य ‘गुंज’च्या माध्यमातून केले जाते. २००४च्या त्सुनामीदरम्यान ‘नॉट जस्ट अ पीस ऑफ कलॉथ’ या कॅम्पेनची सुरुवात अंशू गुप्ता यांनी केली. 
  • २००९मध्ये गांधी जयंती सप्ताहाचे औचित्य साधून त्यांनी ‘जॉय ऑफ गिव्हिंग वीक’ची सुरुवात केली. ही चळवळ पुढे दान उत्सव म्हणून ओळखली जाऊ लागली.
  • या संस्थेच्या माध्यमातून शहरी भागातील गरिबांमध्ये तब्बल १ हजार टन कपड्यांचं वाटप करण्यात आले आहे. त्यातून अंशू गुप्ता यांची सामाजिक जाणीव आणि नेतृत्वक्षमता या गुणांचा सहज प्रत्यय येऊ शकतो. त्याची दखल घेऊनच, त्यांना मॅगसेसे पुरस्काराचा बहुमान प्रदान करण्यात आलाय.
मॅगसेसे पुरस्काराबद्दल...
  • ‘आशियाचा नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील ‘द रॅमन मॅगसेसे अॅवॉड फाउंडेशन’तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
  • फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची सुरूवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
  • सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. 

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेप कायम

  • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली क्यूरेटिव पिटिशन सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम राहणार आहे. 
  • सुप्रीम कोर्टाने १८ फेब्रुवारी २०१४ रोजी राजीव गांधी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले तीन दोषी संथन, मुरुगन आणि पेरारिवलन यांची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली होती.
  • या तिघांनीही दया याचिकेवर निर्णय घेण्यास झालेला उशीर समोर ठेवत फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तीत करण्यासाठी कोर्टाला विनंती केली होती. याचा विरोध करणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व तर्कांना सुप्रीम कोर्टाने रद्द केले.

टाटाची लोणावळ्याच्या जलाशयात तरंगती सौरऊर्जा ग्रहण केंद्रे

  • लोणावळ्याच्या वळवण जलाशयात तरंगती सौरऊर्जा ग्रहण केंद्रे उभारून त्याद्वारे सौरऊर्जा निर्मिती करण्याचा प्रायोगिक प्रकल्प टाटा पॉवरने हाती घेतला आहे. 
  • ऑस्ट्रेलिअन कंपनीच्या सहकार्याने टाटा पॉवरने तलावातील सौरऊर्जेचा वापर करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. तलावाचे स्थिर पाणी व तेथे दिवसभर मिळणारा सूर्यप्रकाश हा त्यासाठी लाभदायी असतो.
  • सौरऊर्जा ग्रहण करण्यासाठी उभारावयाच्या पॅनेल्सना जेवढी जागा लागते, तेवढीच जागा तलावातही लागते. एक मेगावॉट वीजनिर्मितीसाठी साधारण चार एकर जागा लागते.
  • वळवण जलाशयात उभारलेल्या सौरऊर्जाग्रहण पॅनेल्समध्ये सध्या तरी १३.५ किलोवॉट म्हणजे फारच अत्यल्प वीजनिर्मिती होत आहे. 
  • तलावात सौरऊर्जा ग्रहणाची पॅनेल्स लावल्यामुळे येथे सूर्यप्रकाश कमी येऊन त्याचा जलजीवनावर काही परिणाम होत नाही ना, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

सहाराचा म्युच्युअल फंड परवाना रद्द

    Sahara India mutual fund
  • व्यवसाय करण्यास योग्य नसल्याचे कारण दाखवत सहारा समूहाच्या म्युच्युअल फंडाचा परवाना भांडवल बाजार नियामक सेबीने रद्द केला आहे. या फंडाने आतापर्यंत केलेले काम दुसऱ्या एखाद्या म्युच्युअल फंडाकडे वळवण्यास सेबीने सहारा समूहाला सांगितले आहे.
  • आता सहा महिन्यांची मुदत देत सेबीने सहारा म्युच्युअल फंडाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. सहारा म्युच्युअल फंड व सहारा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने लोकांकडून गुंतवणूक स्वीकारणे बंद करावे, असा आदेशही सेबीने जारी केला आहे. 
  • याशिवाय सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड व सहारा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांतील सर्व व्यवहार सेबीने मान्यता दिलेल्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीत लवकरात लवकर वर्ग करावेत असाही आदेश सेबीने दिला आहे. 
  • पुढील पाच महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर सहारा म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांचे सर्व युनिट्स त्यापुढील तीस दिवसांत गुंतवणूकदारांना परत द्यावे लागणार आहेत.
  • गुंतवणूकदारांची २४,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम परस्पर अन्य योजनांमध्ये वळविल्याच्या प्रकरणात सहारा समूह अध्यक्ष सुब्रता रॉय हे २०१४ पासून तुरुंगात आहेत. सेबीने सहारा समूहातील दोन कंपन्यांना २४ हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत देण्याचा आदेश दिला होता. त्यातच सेबीने सहारा समूहाच्या या कंपनीचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट परवानाही रद्द केला होता.

“कोहिनूर हिरा भारताला परत करा” : कीथ वाझ

  • ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी भारताच्या इतिहासकालीन ऐश्वर्याचे प्रतिक असणारा ब्रिटनमधील कोहिनूर हिरा भारताला परत देण्याची मागणी उचलून धरली आहे. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नोव्हेंबरमध्ये ब्रिटनला भेट देत असून त्यावेळी कोहिनूर त्यांच्याकडे देण्यात यावा, असे कीथ यांनी म्हटले आहे.
  • कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा सन १८५०मध्ये राणी व्हिक्टोरियाला हा हिरा भेट देण्यात आला होता. भारताने यापूर्वीही अनेकदा कोहिनूर परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. याबाबत ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र, ब्रिटनकडून वेळोवेळी ही मागणी फेटाळण्यात आली होती.

भारतीय महिला तिरंदाजांचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

  • भारताच्या महिला तिरंदाजांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रिकर्व्ह विभागात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आणि रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. मात्र भारताच्या पुरुष संघास ही पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले. 
  • दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी माझी व रिमिल बुरियुली यांनी सातव्या मानांकित जर्मनीविरुद्ध १-३ अशा पिछाडीवरून ५-३ असा विजय मिळविला.

बांगलादेशमधील प्रभावशाली विरोधी पक्ष नेत्यास फाशी

    Salauddin quader chowdhury
  • बांगलादेशमधील प्रभावशाली विरोधी पक्ष नेते व माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचे निकटवर्तीय असलेल्या सलाऊद्दीन कादर चौधरी यांना सुनाविण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर ढाका सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
  • पाकिस्तानविरोधातील बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामावेळी (१९७१) मानवतेविरोधातील गुन्हे केल्याचा आरोप चौधरी यांच्याविरोधात निश्चित करण्यात आला होता.
  • बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे नेते असलेल्या चौधरी यांच्या फाशीच्या शिक्षेवर सरन्यायाधीश एस के सिन्हा यांनी शिक्कामोर्तब केले. यामुळे चौधरी यांना आता राष्ट्रपतींनी दया न दाखविल्यास त्यांना फाशी देण्यात येईल.
पार्श्वभूमी
  • डिसेंबर १९७१ मध्ये संपलेल्या व एकूण ९ महिने चाललेल्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्याने येथील स्थानिक नेत्यांच्या मदतीने किमान ३० लाख नागरिकांची हत्या केली व सुमारे २ लाख महिलांवर बलात्कार केल्याचा बांगलादेशमधील सरकारचा आरोप आहे. 
  • या अत्यंत भीषण हत्याकांडाची चौकशी करुन दोषींना कठोर शासन करण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांनी २०१० मध्ये लवादाची स्थापना केली. 
  • या लवादाच्या निकालानुसार आत्तापर्यंत १५ पेक्षा जास्त जणांना जन्मठेप वा फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे; तर जमाते इस्लामी या बांलादेशमधील मुख्य पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना मृत्युदंड देण्यात आला आहे.
 

नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

  • नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे. नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या घटनेत सेक्युलॅरिझमऐवजी ‘हिंदू’ किंवा ‘धार्मिक स्वातंत्र्य’ असा शब्द हवा आहे.
  • दशकभराच्या बंडखोरीनंतर मुख्य प्रवाहात सामील झालेल्या युनिफाईड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओईस्ट सरकारने २००७ मध्ये नेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयानंतर नेपाळची शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जगातील एकमेव हिंदू राजवट अशी ओळख संपली होती.
  • नव्या घटनेवर नागरिकांची मते मागविण्यात आली होती. त्यात बहुसंख्य लक्षावधी नागरिकांनी घटनेतून धर्मनिरपेक्ष (सेक्युलॅरिझम) शब्द काढून टाकण्याची सूचना केल्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला.
  • नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकसंख्या हिंदू आहे.

चालू घडामोडी - २८ जुलै २०१५

२८ जुलै : जागतिक हिपॅटायटीस दिन

राम सेवक शर्मा यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    RS Sharma
  • राम सेवक शर्मा यांची २७ जुलै २०१५ रोजी ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’च्या (ट्राय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मे २०१५ मध्ये निवृत्त झालेले राहुल खुल्लर यांची ते जागा घेतील.
  • राम सेवक शर्मा १९७८च्या बॅचचे झारखंड कॅडेरचे आयएएस अधिकारी आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून सप्टेंबर २०१५मध्ये शर्मा निवृत्त होत आहेत.
  • त्यांनी यापूर्वी झारखंड सरकारचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
  • त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातून (यूएसए) मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)
    Telecom Regulatory Authority in India
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India TRAI) हे भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकार द्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे.
  • १९९७ मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम १९९७ अन्वये ट्रायची स्थापना करण्यात आली.
  • मुख्यालय - नवी दिल्ली 

‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदी आशिष बहुगुणा

  • आशिष बहुगुणा यांची भारतीय ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’च्या अध्यक्षपदी (Food Safety and Standards Authority : FSSAI) जुलै २०१५मध्ये नियुक्ती करण्यात आली.
  • त्याची कारकीर्द तीन वर्षाची असेल आणि जानेवारी २०१५ मध्ये निवृत्त झालेले के. चंद्रमौली यांची ते जागा घेतील. जानेवारी २०१५ पासून हे पद रिक्त होते आणि आरोग्य विभागाचे सचिव भानू प्रताप शर्मा यांच्यावर ‘एफएसएसएआय’च्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. 
  • बहुगुणा राजस्थान कॅडेरचे एक १९७८च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. ते फेब्रुवारी २०१५मध्ये कृषी मंत्रालयाच्या सचिव पदावरुन निवृत्त झाले आहेत. 
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण
    Food Safety and Standards Authority
  • ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ची (Food Safety and Standards Authority : FSSAI) स्थापना ऑगस्ट २०११मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अन्वये करण्यात आली. या कायद्यामध्ये विविध मंत्रालयांद्वारे अन्न विषयक मुद्दे हाताळण्यासाठी  केलेल्या विविध कायदे व आदेशांना अंतर्भूत केले आहे.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे ‘एफएसएसएआय’ची अंमलबजावणी केली जाते.
  • मुख्यालय : नवी दिल्ली

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वाती मलिवाल

  • दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वाती मलिवाल यांनी २८ जुलै रोजी स्वीकारला. मलिवाल यांच्या नियुक्तीला दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मलिवाल यांच्यासह इतर तीन सदस्यांनीही पदाची सूत्रे स्वीकारली.
  • सूत्रे स्वीकारल्यानंतर मलिवाल आणि आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मलिवाल यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या नियुक्तीला नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आक्षेप घेतला होता. केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा राज्यपालांना याबाबत विनंती केली होती. नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतरच आपण पदाची सूत्रे स्वीकारू, अशी घोषणा मलिवाल यांनी केली होती.

सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धा : मेक्सिकोचे विक्रमी जेतेपद

    Mexico won Gold cup
  • मेक्सिको संघाने सातव्यांदा सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मेक्सिकोने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जमैका संघाचा ३-१ असा पराभव केला.
  • उत्तर व दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत जमैकाच्या रूपाने पहिल्यांदाच कॅरेबियन संघाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम गाजवला, परंतु त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली.
  • ३१व्या मिनिटाला कर्णधार अँड्रेस गुआर्डाडोने गोल करून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ४७व्या मिनिटाला जिसस कोरोना आणि ६१व्या मिनिटाला ऑरिबे पेराल्टाने गोल करून ती आघाडी ३-० अशी भक्कम केली. 
  • जमैकाकडून ८०व्या मिनिटाला डॅरेन मॅटॉक्सने एकमेव गोल केला. अखेरीस मेक्सिकोने ३-१ अशा फरकाने जेतेपद पटकावले.

ख्रिस फ्रूम टूर दी फ्रान्स स्पर्धेचा विजेता

    Chris Froom
  • ब्रिटनच्या ख्रिस फ्रूमने टूर दी फ्रान्स या नावाजलेल्या सायकल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गेल्या तीन वर्षांतील त्याचे हे दुसरे, तर त्याचा संघ स्काय यांचे गेल्या चार वर्षांतील तिसरे जेतेपद आहे. याआधी २०१२मध्ये ब्रॅडली विग्गींन्सने, तर २०१३मध्ये फ्रूमने स्काय संघाला जेतेपद पटकावून दिले होते.
  • फ्रूमच्या या विजयाने त्याला टूर दी फ्रान्स शर्यतीत दबदबा निर्माण करणारा नवा नायक अशी ओळख मिळवून दिली आहे. २०११मध्ये टूर ऑफ स्पेन शर्यतीत दुसरे स्थान पटकावल्यानंतर फ्रूम प्रसिद्धी झोकात आला होता.
‘टूर दी फ्रान्स’ स्पर्धेबद्दल...
    Tour de France
  • १९०३ सालापासून चालू असलेली ही युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत आहे. 
  • दरवर्षी जुलै महिन्यात साधारण ३ आठवडे चालणाऱ्या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो.
  • ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शाँज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो.
  • ही शर्यत अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्राँगने विक्रमी ७ वेळा जिंकली आहे. परंतु नंतर त्याच्यावरील डोपिंगच्या आरोपामुळे त्याची सर्व विजेतेपदे काढून घेण्यात आली व त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.

बांग्लादेशातील सुंदरबनात फक्त १०६ वाघ

  • बांग्लादेशातील सुंदरबनात फक्त १०६ वाघ उरले आहेत. जगातील हे सर्वांत मोठे खारफुटीचे जंगल (६०१७ चौ.किमी) आहे.
  • २००४ मध्ये वाघांची संख्या ४४० होती; पण चोरट्या शिकारीमुळे वाघांची संख्या घटल्याचे भारत-बांगलादेशाच्या संयुक्त पाहणीत आढळले.
  • बांगलादेश सरकारने २००४ मध्ये केलेल्या गणनेत सुंदरबनात ४४० वाघ आढळले होते. मात्र त्या वेळी ठशांवरून वाघांची मोजणी करण्यात आली होती. 
  • यंदा भारत-बांगलादेश संयुक्त व्याघ्रगणनेचा प्रकल्प राबविला गेला. कॅमेऱ्यांद्वारे काढलेल्या सुंदरबनातील १५००पेक्षा जास्त छायाचित्रांचा व ठशांचा यात अभ्यास करण्यात आल्यावर ही माहिती उपलब्ध झाली.
  • सन १९०० मध्ये एक लाख असलेली जगभरातील वाघांची संख्या आता ३२००वर आल्याबद्दल विश्वप्रकृती निधीने (WWF- World Wildlife Fund) चिंता व्यक्त केली आहे.

नेपाळमध्ये गधीमाई उत्सवादरम्यान होणाऱ्या पशू हत्येवर बंदी

  • नेपाळमध्ये गधीमाई उत्सवादरम्यान होणाऱ्या पशू हत्येवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गढीमाई मंदिराच्या ट्रस्टेनेच ही बंदी घातली आहे.
  • गढीमाई उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात बैल, बकऱ्या, कोंबड्या, म्हशी इत्यादी प्राण्यांची हत्या केली जात होती. दर पाच वर्षांनी हा उत्सव साजरा केला जात होता. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणात या उत्सवात पशूंची हत्या होत होती.
  • जगात सर्वात जास्त पशूबळी नेपाळच्या गढीमाई मंदिरातील जत्रेच्या काळात जातात. गढीमाई मंदिरात पुढील पूजा २०१९ मध्ये होणार आहे. या जत्रेसाठी येताना भाविकांनी प्राणी आणू नयेत असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.
  • भारतासह अनेक देशांनी ही पद्धत बंद करावी यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने नेपाळ सरकारला पशूबळी थांबवण्याचे आवाहन केले होते. अखेर या आवाहनाला प्रतिसाद देत गढीमाई मंदिराच्या ट्रस्टने पशूबळींवर बंदी घातली आहे.
  • भारतात सुप्रीम कोर्टाने एका सुनावणीदरम्यान गढीमाई मंदिरातील पशुबळींवर बंदी घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच भारतातून गढीमाई मंदिरात जाणाऱ्या पशूंवर बंदी घातली होती.

सीरियामध्ये बंडखोरांच्या फौजेचा मोठा हल्ला

  • वायव्य सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या किनारी भागाच्या नियंत्रणासाठी बंडखोरांच्या फौजेने मोठा हल्ला चढविला. हा हल्ला फार मोठा व प्रभावी असल्याचे सीरियन लष्कराने म्हटले आहे. 
  • सहल अल-घाब या भागामध्ये घुसण्यासाठी बंडखोरांची फौज प्रयत्नशील आहे. असद यांच्या अलवाईट पंथाच्या नागरिकांची मोठी लोकसंख्या असलेला हा भाग आहे.
  • या भागामधील एक वीजप्रकल्पासहित एकूण १६ महत्त्वाची ठिकाणे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. बंडखोरांच्या सैन्यामध्ये अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल नुस्रा फ्रंटचे दहशतवादीही आहेत.
  • या व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या प्रांताच्या नियंत्रणासाठी सुरु झालेली ही लढाई असद यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

लीबियन हुकूमशहा गद्दाफी याच्या पुत्रास फाशी

  • लीबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा असलेल्या सैफ अल इस्लाम व इतर आठ जणांना युद्ध गुन्ह्यांसदर्भातील खटल्याच्या सुनावणीनंतर तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सैफ अल इस्लाम हा यावेळी न्यायालयमध्ये उपस्थित नव्हता. 
  • गद्दाफी याची राजवट उलथवून लावण्यासाठी लीबियात २०११ मध्ये झालेल्या उठावादरम्यान युद्धगुन्हे केल्याचा; तसेच उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला होता.
  • लीबियामधील झिंतान शहरामध्ये कारवाया करत असलेल्या एका बंडखोर गटाने सैफ अल इस्लाम याला २०११ पासून कैदेत ठेवले असून त्याची मुक्तता करण्यास नकार दिला आहे. ट्रिपोलीमधील सरकारला या गटाचा विरोध आहे. 
  • लीबियामध्ये सध्या सत्तासंघर्ष सुरु असून टोब्रुक व ट्रिपोली अश दोन शहरांमध्ये दोन सरकारे स्थापन करण्यात आली आहेत. 
  • सैफ अल इस्लामबरोबरच लीबियाचे माजी गुप्तचर विभाग प्रमुख अब्दुल्लाह सेनुस्सी व पंतप्रधान बगदादी अली महमुदी यांनाही फाशी सुनाविण्यात आली. 
  • लीबियावर सुमारे चार दशके राज्य केलेल्या गद्दाफी याला ऑक्टोबर २०११ मध्ये ठार मारण्यात आले होते.

डॉ. अब्दुल कलाम पंचत्वात विलीन

भारताचे अग्निपंख विसावले
आपले लाडके राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना एमपीएससी टॉपर्सची भावपूर्ण श्रद्धांजली

DR. APJ Abdul Kalaam     भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (वय ८३) यांचे २७ जुलै रोजी सायंकाळी मेघालयमधील शिलाँग येथे हृदयाघाताने निधन झाले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीने बेथानी रुग्णालयात नेण्यात आले; पण त्यांची प्राणज्योत मालविली.
     निधन झाल्यानंतर २८ जुलै रोजी त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम येथील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसांचा (२७ जुलै ते २ ऑगस्ट) दुखवटा जाहीर केला आहे तर तेलंगण सरकारने २८ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मात्र सुट्टी नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. आपल्या मृत्यूदिवशी देशाला सुटी देऊ नये, अशी कलाम यांची इच्छा होती. सात दिवसांच्या दुखवटा दरम्यान राष्ट्रध्वज अर्धा खाली उतरविण्यात येणार आहे.
     आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशातील अनेक तरुण मनांना चेतना देण्याचे काम केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले ‘कलाम सर’ आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे आवडते विद्यादानाचे काम करत राहिले.

“परदेशी बनवाटची शस्त्रास्त्रे आयात करणे भारतासारख्या देशाला परवडणारे नसून, भारतीय बनावटीची आयुधे विकसित करण्याची क्षमता देशात निर्माण झाली पाहिजे.”

डॉ. अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय
  • पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
  • जन्म- १५ ऑक्टोबर १९३१, (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
  • वडील- जैनुलाबदिन अब्दुल
      अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजविण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता.
  • प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
  • पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची (विज्ञान)
  • व्यावसायिक : १९५४ ते ५७ मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू राहणार
     कलाम यांच्या सहकाऱ्यांनी कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने अकाउंट सुरू राहील. कलाम यांचे सहकारी सृजनपालसिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “हे अकाउंट डॉ. कलाम यांच्या अमर झालेल्या आठवणींना समर्पित आहे. कलामांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांच्या ध्येयाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे अकाउंट काम करेल. मिस यू सर.” सिंह हेच या ट्विटर अकाउंटचे चालक असतील. कलामांनी दिलेली भाषणे, त्यांची पुस्तके आदींमधील महत्त्वाचे अंश ट्विटरवरून शेअर केले जाणार आहेत.

कार्य
  • १९५८ साली डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
  • भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
  • १९६३ ते १९८० या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
  • १९८० : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
  • ११ व १३ मे १९९८ : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.
  • १७ जुलै २००२ ते २४ जुलै २००७ : भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. (त्यांच्या कार्यामुळे ते आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.)
बिहार सरकारने डॉ. कलाम यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी किशनगंज कृषी विद्यापीठाचे नाव बदलून ते डॉ. कलाम कृषी विद्यापीठ असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरस्कार
१९८१
पद्मभूषण
१९९०
पद्मविभूषण
१९९७
भारतरत्न
१९९७
इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता
१९९८
वीर सावरकर पुरस्कार
२०००
रामानुजम पुरस्कार
२००७
ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक
२००७
वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी
२००९
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक
२००९
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
२०१०
वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग
२०११
एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स
२०११
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व
२०१२
डॉक्टर ऑफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ)
२०१४
डॉक्टर ऑफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड)

२०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ घोषित केला.
तसेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहताना १५ ऑक्टोबर हा कलाम यांचा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

ग्रंथसंपदा
डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी (१९८८)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रोद्दाम नरसिम्हा
इंडिया २०२०: ए व्हिज‌न फॉर दी न्यू मिलेनियम (१९९८)
डॉ. एपीजे कलाम आणि वाय. एस. राजन
विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद - अग्न‌पिंख) (१९९९)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी
इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विदिन इंडिया (२००२)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
दी ल्यूमिनस स्पार्क्स (२००४)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
म‌शिन इंडिया (२००५)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
इन्स्पायरिंग थॉट्स (२००७)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
इनडॉम‌टिेबल स्पिरीट्स (२००७)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन
डॉ. एपीजे कलाम आणि ‌सिवाथानू पिल्लई
यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी बियाँड (२०११)
डॉ. एपीजे कलाम आणि अरुण तिवारी
टर्निंग पॉईंट्स : ए जर्नी थ्रु चॅलेंजेस (२०१२)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
टार्गेट थ्री ब‌लि‌यिन (२०११)
डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग
माय जर्नीः ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन्टू अॅक्शन्स (२०१३)
डॉ. एपीजे कलाम आणि व्ही. पोनराज
ए मॅनीफेस्टो फॉर चेंज : ए सिक्वेल टू इंडिया २०२० (२०१४)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
ट्रान्सेंडिंग माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी (२०१५)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
रिइग्नायटेड : सायंटिफ‌कि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर (२०१५)
डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग

देश २०२०च्या दिशेने झेपावत आहे. देशातील ५४ कोटी तरुण या बदलात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान ५ वृक्ष लावावे.

दिले जिज्ञासेचे पंख..
     नागपूर विद्यापीठाच्या शतकी दीक्षांत समारंभात पदवीधरांच्या जिज्ञासेला डॉ. कलाम यांनी पंख दिले. अग्निपंखासमान हे जिज्ञासेचे पंखही युवकांना प्रेरित करणारे ठरले. त्यांची प्रेरणादायी कविता त्यांच्याच शब्दांत....
आय विल फ्लाय,
आय एम बॉर्न विथ पोटेंशिअल,
आय एम बॉर्न विथ गुडनेस
आय एम बॉर्न विथ आयडियाज् अॅण्ड ड्रीम्स
आय एम बॉर्न विथ ग्रेटनेस
आय एम बॉर्न विथ कॉन्फिडन्स
आय एम बॉर्न विथ विंग्स
सो, आय एम नॉट मेड फॉर क्रॉलिंग
आय हॅव विंग्स
आय विल फ्लाय, फ्लाय, फ्लाय....

     शून्यातून सुरुवात करताना तरुण सहकाऱ्यांना हाताशी धरून अग्नीस पृथ्वी, आकाश, त्रिशूळ, नाग अशा दीर्घ पल्ल्याच्या प्रखर क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. अंतरिक्ष आणि क्षेपणास्त्र संशोधनासाठी उच्च प्रतीचे अस्सल स्वदेशी तंत्रज्ञान त्यांनी सिद्ध केले. वडिलांकडून घेतलेले मुस्लीम रीतिरिवाज, रामेश्वरम देवस्थानच्या पंडित लक्ष्मण शास्त्रींकडून मिळविलेले हिंदु धर्माचे ज्ञान आणि ख्रिश्चन संस्थेत घेतलेले औपचारिक शिक्षण या त्रिवेणी धर्मनिरपेक्ष संगमातून घडलेल्या या वैज्ञानिकाने अलौकिक कर्तबगारीने तरुण पिढ्यांच्या मनात दुर्दम्य आत्मविश्वासाची ज्योत निरंतर तेवती ठेवली.

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

चालू घडामोडी - २६ व २७ जुलै २०१५


२६ जुलै : कारगिल विजय दिन

  • पाकिस्तानी लष्करानं कारगिलमध्ये १९९९ मध्ये मे महिन्यात अचानक घुसखोरी केली. भारतीय लष्करानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आणि २६ जुलैला संपूर्ण विजय मिळविला. हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा होतो.
 

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

  • पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १० ते १२ कि.मी. अंतरावर असलेल्या गुरदासपूरमधील दिनानगरमध्ये २७ जुलै रोजी सकाळी ६ च्या सुमारास चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला. जम्मूकडे जाणाऱ्या एका बसवर हल्ला चढविल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यातही घुसून अंदाधुंद गोळीबार केला.
  • हल्ल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये व पंजाब पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. तब्बल अकरा तास उलटल्यानंतरही ही धुमश्चक्री सुरूच होती. अखेर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी पंजाब पोलिसांनी हातबॉम्बचा वापर केला. पोलिसांच्या या प्रतिहल्ल्यात तिन्ही दहशतवादी मारले गेले आहेत.
  • या हल्यात दोन पोलिसांसह आठ ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

७०० प्रजातीय औषधांच्या विक्रीवर युरोपियन युनियनची बंदी

  • प्रजातीय औषधांच्या (जेनरिक) भारतातील वैद्यकीय चाचण्यात जीव्हीके बायोसायन्सेस या कंपनीने घोटाळे केल्याने युरोपीय समुदायाने अशा ७०० प्रजातीय औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
  • ही बंदी युरोपमध्ये घालण्यात आली असून ती २१ ऑगस्टपासून अमलात येईल व २८ सदस्य देशांत लागू राहील, असे जर्मनीच्या ‘फेडरल इन्स्टिटय़ूट फॉर मेडिसीन अँड मेडिकल प्रॉडक्ट्स’ या औषध नियंत्रण संस्थेने म्हटले आहे.
  • विक्रीवर बंदी घालण्याच्या या निर्णयावर औषध कंपन्या अपील करण्याची शक्यता आहे मात्र ही बंदी लगेच उठण्याची शक्यता नाही.
  • जीव्हीके बायोसायन्सेस या हैदराबादच्या संस्थेने या चाचण्या फ्रेंच मेडिसीन एजन्सीच्या परवानगीने केल्या होत्या पण त्यातील माहितीत अनेक गडबडी करण्यात आल्या. इलेक्ट्रो-कार्डिओग्रॅम हवे तसे बदलण्यात आले, इतरही औषधांच्या चाचण्यातील माहितीत अनुकूल माहिती घुसवण्यात आली असा आरोप आहे.

पत्रकार, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते यांना तुरुंगामध्ये प्रवेशबंदी

  • दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या तुरुंगातील मुलाखतीमुळे उठलेल्या वादळावरून बोध घेतलेल्या सरकारने देशातील तुरुंगांमध्ये पत्रकार, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रवेशबंदी केली आहे.
  • विशेष विनंतीद्वारे घेतलेल्या परवानगीचा अपवाद वगळता कैद्यांच्या मुलाखती घेण्यासाठी किंवा लेख लिहिण्यासाठी कैद्यांच्या भेटीवर यामुळे र्निबध आले आहेत.
  • ब्रिटिश चित्रपट निर्माते लेस्ली उद्विन याने दिल्लीतील १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची दिल्लीच्या तिहार कारागृहात मुलाखत घेऊन तयार केलेल्या वृत्तचित्रासह पत्रकारांनी तुरुंगात मुलाखती घेतल्याच्या अनेक घटनांमुळे वाद उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • संशोधन करणे, वृत्तचित्र तयार करणे, लेख लिहिणे किंवा मुलाखती घेणे या कारणांसाठी कुणीही खासगी व्यक्ती, पत्रकार, स्वयंसेवी संस्था किंवा कंपनी यांना सर्वसामान्यपणे परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव कुमार आलोक यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना पाठवलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
  • तथापि, असे लेख, संशोधन किंवा वृत्तचित्र तुरुंग सुधारांबाबत सकारात्मक सामाजिक जागृती करण्यासाठी आहे असे वाटल्यास राज्य सरकारे संबंधितांना त्या कामासाठी तुरुंगात प्रवेशाची परवानगी देऊ शकते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी

  • धार्मिक असहिष्णुता निर्माण करण्यासाठी अतिरेकी समूहांकडून इंटरनेटचा वापर वाढत असतानाच, सरकारने अल्पसंख्याक समुदायास चिथावणी देणारी वा धार्मिक तेढ निर्माण करणारी संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • या निर्णयामुळे सोशल मिडिया तसेच व्हिडिओ शेअरिंग संकेतस्थळासह अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित ४० संकेतस्थळ बंद होणार आहेत. 
  • ‘सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २००९’नुसार अल्पसंख्यांक समुदायाला चिथावणी देणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे.
  • २९ जून रोजीच्या या आदेशानुसार बहुतेक इंटरनेट सेवा पुरवठादारांनी अशी व्हिडिओ ब्लॉक केली आहेत. मात्र, त्यापैकी काही व्हिडिओ अद्यापही दिसत असून ते ‘सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉल’वरून अपलोड केली असल्याने ब्लॉक करता येत नसल्याचा दावा सेवा पुरवठादारांनी केला आहे.
  • दूरसंचार नियामक मंडळानेही ८ जुलै रोजी सोशलमिडियासह व्हिडिओ शेअरिंग साईटस्‌वरील काही खाती तसेच पोस्ट हटविण्याचे आदेश दिले आहेत.

बाह्यकर्जांच्या बाबतीत विकसनशील देशांमध्ये भारत चौथा

  • जागतिक बँकेच्या ‘इंटरनॅशनल डेट स्टॅटिस्टिक्स २०१५’नुसार, बाह्यकर्जांच्या बाबतीत २० विकसनशील देशांमध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे.
  • विकासदराला गती देण्यासाठी विकासात्मक कामांसाठी केलेल्या खर्चामुळे २०१४-१५ या आर्थिक वर्षात दरडोई कर्जामध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढ होऊन ते माणशी ४४ हजार ९५ रुपये झाले. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये हे कर्ज ४१ हजार १२९ रुपये होते. दरडोई कर्जामध्ये अंतर्गत व बाह्य कर्जे, तसेच अन्य जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
  • ३१ मार्च २०१५ पर्यंत, सरकारचे एकूण थकित कर्ज ६८.९५ लाख कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत वित्तीय तूट ३ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी सरकारने आर्थिक नियोजन जाहीर केले आहे.
  • देशांतर्गत कर्जावरील व्याजापोटी २०१२-१३ मध्ये ४.०४ लाख कोटी, २०१३-१४ मध्ये ४.८५ लाख कोटी आणि २०१४-१५ मध्ये ५.५६ लाख कोटी रुपये खर्च केले. या तीन आर्थिक वर्षात विदेशी कर्जावरील व्याजापोटी क्रमश: ३७.२ कोटी डॉलर, ३६.६ कोटी डॉलर आणि ३८.९ कोटी डॉलर खर्च करण्यात आले.

प्रा. रंगनाथ तिवारी यांना ‘हिन्दीरत्न’ पुरस्कार

    Prof. Rangnath Tiwari
  • मराठी व हिंदीतील ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी यांना नवी दिल्ली येथील हिंदी भवन यांच्या वतीने देण्यात येणारा स्व. पुरुषोत्तमदास टंडन स्मृती ‘हिंदीरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 
  • एक लाख रुपये रोख, शाल, सन्मानपत्र व वाग्देवीची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक १ ऑगस्ट २०१५ रोजी नवी दिल्ली येथील हिंदी भवन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. 
  • सोलापूर येथे जन्मलेले प्रा. रंगनाथ तिवारी अंबाजोगाई येथे स्थायिक झाले आणि तेथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून १९९३ साली सेवानिवृत्त झाले आहेत.
  • हिंदी विषयाचे अध्यापन करतानाच त्यांनी मराठी व हिंदी दोन्ही भाषांतून विपुल ग्रंथरचना केली आहे. ऐतिहासिक कादंबरी हा त्यांचा मुख्य लेखनप्रांत असून देवगिरी बिलावल, बेगम समरू, उत्तम पुरुष एकवचन, अनन्वय आणि संपल्या सुरावटी या त्यांच्या चर्चित मराठी कादंबऱ्या आहेत. काया परकाया आणि संगीत देवगिरी बिलावल हि त्यांची नाटकेही प्रसिद्ध आहेत.
  • त्यांच्या मराठी रचनांना राज्य शासनाचे विविध पुरस्कार, भैरुरतन दमाणी पुरस्कार व इतरही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
  • हिंदी भाषेत देवगिरी बिलावल आणि सरधाना की बेगम या लोकप्रिय कादंबऱ्यांच्या पाठोपाठ गतवर्षी प्रा. तिवारींची ‘उत्तरायण’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
  • यापूर्वीही या कादंबरीनिमित्त प्रा. तिवारींना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे. 
  • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या बिढार या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केला. त्यालाही केंद्रीय हिंदी निदेशालयाने उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्काराने (पुरस्कार राशी एक लाख रुपये) गौरवले होते.
हिंदीरत्न पुरस्कार
  • स्व. लाल बहादूर शास्त्रीजींनी स्थापन केलेली हिंदी भवन ही संस्था १९९८ पासून हा पुरस्कार हिंदीतर भाषी प्रदेशात राहून हिंदी भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिकास प्रदान करते.
  • पंडित गोपालप्रसादजी व्यास हे त्या संस्थेचे संस्थापक मंत्री असून कर्नाटकचे माजी राज्यपाल त्रिलोकीनाथ चतुर्वेदी हेही तेथील एक सन्माननीय सदस्य आहेत. 
  • यापूर्वी ज्या महनीय व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांमध्ये बी. एस. शांताबाई (कन्नड), आचार्य राधागोविंद थोडाम (मणिपुरी), बालशौरी रेड्डी (तेलुगु), साईजी माकीनो (जापानी), ज्येष्ठ हिंदी रंगकर्मी इब्राहीम अलकाजी (इराणी), पद्मा सचदेव (डोगरी), डॉक्टर सरोजिनी महिषी (कन्नड), हिंदी समालोचक जसदेव सिंग (पंजाबी) तसेच प्राध्यापक ए. अराविन्दाक्षन (मल्याळम) यांचा समावेश आहे.

    गंगा नदीत सुमारे ५० डॉल्फिन आढळले

      Gangetic-river-Dolphin
    • उत्तर प्रदेशातील गारमुक्तेश्वर आणि नरोरा दरम्यानच्या ८० किलोमीटरच्या भागात गंगा नदीत सुमारे ५० डॉल्फिन असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे हा भाग विशेष संरक्षित भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
    • नदीतील डॉल्फिनची प्रजाती सध्या दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे गंगा नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिन आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि पर्यावरण मंत्रालयाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत सुमारे ५० डॉल्फिन या भागात आढळून आले आहेत.

    परदेशी नागरिकांना मालदीवमध्ये भूखंड खरेदी करण्यास परवानगी

    • परदेशी नागरिकांना मालदीवमध्ये भूखंड खरेदी करण्यास परवानगी देणारा कायदा तेथील सरकारने केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
    • परदेशी नागरिकांना ठराविक ठिकाणी भूखंड घेण्यासाठी एक अब्जांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यास परवानगी देणारा कायदा मालदीवने केला आहे. मात्र, या भूखंडाचा ७० टक्के भाग हा समुद्रात भराव टाकून विकसित केलेला (रिक्लेमेनेशन) असावा, अशी अट आहे.
    • परदेशी नागरिकांना भूखंड घेण्यास परवानगी देणाऱ्या कायद्यामुळे इतर देशांच्या संभाव्य लष्करी विस्ताराची शक्यता मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यांनी फेटाळून लावली आहे. हिंदी महासागर हा बिगरलष्करी भाग राहील, असे आश्वासन यामीन यांनी भारत आणि इतर शेजारी देशांना आश्वासन दिले आहे. 

    भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी रोएलंट ओल्टमन्स

    • भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून पॉल वॅन ऐस यांना काढून टाकल्यानंतर संघाचे हाय परफॉर्ममन्स संचालक रोएलंट ओल्टमन्स यांच्याकडे रियो ऑलिम्पिकपर्यंत प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली.
    • हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई - स्पोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडिया) महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ६१ वर्षांचे ओल्टमन्स यांना पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

    दिलशानच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत १० हजार धावा पूर्ण

      Tilakratne Dilshan
    • श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील ११वा फलंदाज बनला.
    • दिलशानने पाकिस्तानविरुद्ध ६३ धावा करून १० हजार धावांचा टप्पा गाठला. आता त्याच्या नावावर १०००८ धावा नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात २२ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी ३९.७१ अशी आहे. त्याने सर्वाधिक धावा या भारताविरुद्ध २२५५ केल्या आहेत.
    • झिम्बाब्वेविरुद्ध १९९९ मध्ये बुलावायो येथे आपल्या एकदिवसीय कारकीर्दीस सुरुवात करणारा दिलशान हा १० हजार धावा पूर्ण करणारा श्रीलंकेचा चौथा फलंदाज आहे. याआधी सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली आहे.
    • दिलशानने श्रीलंकेकडून सर्वात कमी डावात ही कामगिरी करण्याचा नवा विक्रम केला आहे. आपला ३१९ वा वनडे सामना खेळणाऱ्या या ३८ वर्षीय फलंदाजाने २९३ डावात ही उपलब्धी प्राप्त केली आहे. त्याने संगकाराचा विक्रम मोडीत काढला. संगकाराने २९६ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. जयसूर्याने ३२८ आणि ३३३ डावात ही कामगिरी केली होती.
    • सर्वात कमी डावात १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने १० हजार धावा फक्त २५९ डावात केला होता.
    • दिलशानने वनडेत आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. तो वनडेत १० हजार धावा आणि १०० विकेटस् घेणारा पाचवा खेळाडू बनला आहे. त्याआधी तेंडुलकर, जयसूर्या, गांगुली, कॅलिस यांनी ही कामगिरी केली आहे. ऑफस्पिनर दिलशानच्या नावावर १०४ विकेटस् आहेत.
    • दिलशानने श्रीलंकेकडून २६ सामन्यांत कर्णधारपदही भूषवले आहे. तसेच तीन सामन्यांत त्याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने २७ सामन्यांत ११९६ धावा केल्या आहेत.
    वनडेत १० हजार धावांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज
    सचिन तेंडुलकर (१८,४२६)कुमार संगकारा (१४,२३४)
    रिकी पाँटिंग (१३,७०४)सनथ जयसूर्या (१३,४३०)
    महेला जयवर्धने (१२,६५०)इंजमाम उल हक (११,७३९)
    जॅक कॅलिस (११,५७९)सौरव गांगुली (११,३६३)
    राहुल द्रविड (१०,८८९)ब्रायन लारा (१०,४०५)
    दिलशान (१०,००८)

    विफाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल

    • आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) अध्यक्षपदी तर, साऊटर वाझ यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. 
    • नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये पुण्याच्या विश्वजीत कदम, कोल्हापूरचे मालोजी राजे छत्रपती, औरंगाबादचे सय्यद हुसेन, नागपूरचे हरेश व्होरा आणि समीर मेघे यांनी बाजी मारली.

    MT Gyaan
    • बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७वे अधिवेशन ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजेलिसमध्ये पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
    • मराठी संस्कृतीची ओळख अमेरिकेत जन्मलेल्या मराठी पिढीला व्हावी म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ अर्थात 'बीएमएम'द्वारे गेली सोळा वर्षे अमेरिकेत मराठी अधिवेशन भरवण्यात येते.