चालू घडामोडी - १६ डिसेंबर २०१५
नवीन डिझेल वाहनांच्या नोंदणीस दिल्लीत बंदी
- डिझेलवर चालणाऱ्या दोन हजार सी.सी. क्षमतेच्या मोटर व ‘एसयूव्ही’ वाहनांच्या नोंदणीस नवी दिल्ली व परिसरात बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही बंदी ३१ मार्च २०१६ पर्यंत लागू असेल.
- दिल्लीतील प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोचले आहे. त्यावर उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
- याशिवाय दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. दिल्लीतील रस्त्यांचा वापर करणाऱ्या हलक्या व जड वाहनांवर १०० टक्के पर्यावरण कर लादण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
- २००५ पूर्वीच्या जुन्या वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पुणे आणि राजकोट करीता खेळाडूंचा लिलाव
- सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमुळे दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई आणि राजस्थान या संघांची जागा घेणाऱ्या पुणे आणि राजकोट संघांनी चेन्नई आणि राजस्थान संघांतील प्रत्येकी पाच खेळाडूंची खरेदी केली.
- चेन्नई आणि राजस्थान संघातील एकूण ५० खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यातील १० खेळाडूंची खरेदी झाली असून, उर्वरित ४० खेळाडूंची निवड ६ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावातून होणार आहे. त्या अगोदर तीन टप्प्यात ट्रेडिंग (अदलाबदली) होणार आहे.
अशी आहे निवड आणि रक्कम |
पुणे | राजकोट |
खेळाडू | किमत (कोटी रु.) | खेळाडू | किमत (कोटी रु.) |
महेंद्रसिंह धोनी | १२.५ | सुरेश रैना | १२.५ |
अजिंक्य रहाणे | ९.५ | रवींद्र जडेजा | ९.५ |
आर. अश्विन | ७.५ | ब्रॅंडम् मॅकल्म | ७.५ |
स्टीव स्मिथ | ५.५ | जेम्स फॉकनर | ५.५ |
फाफ ड्युप्लेसी | ४ | ड्वेन ब्रावो | ४ |
एअर इंडियाची अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवा
- एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवेला सुरवात झाली.
- काही तांत्रिक अडचणी आणि धुक्याचा प्रश्न असल्याने सध्या हे विमान मुंबईत अल्पकाळासाठी थांबून पुढे लंडनकडे रवाना होईल. मात्र जानेवारीच्या १५ तारखेपासून अहमदाबाद-लंडन विमानसेवा विनाथांबा होणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे.
- विनाथांबा सेवा सुरू झाल्यावर प्रवासाचा कालावधी सात ते आठ तासांनी कमी होईल. या विमानमार्गावर एअर इंडियाने बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान रुजू केले आहे.
- मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत सरदार सरोवर धरणाजवळ सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या बांधकामास सुरवात झाली असून हा जगातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा