चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१५


रघुवीर चौधरी यांना ५१वा ज्ञानपीठ पुरस्कार

 • भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ५१वा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.
 • वरिष्ठ साहित्य समालोचक नामवर सिंह यांच्या अध्यक्षीतेखीलील समितीने रघुवीर चौधरी यांची निवड केली आहे.
 रघुवीर चौधरी 
  Raghuvir Chaudhari
 • त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३८ रोजी गुजरातमध्ये झाला असून त्यांनी कविता, नाटकाशिवाय साहित्यप्रकरात विपूल लेखन केलं आहे. १९७७ साली त्यांच्या ‘उप्रवास कथात्रयी’ यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 • चौधरी यांची 'रूद्र महालया' ही कांदबरी ऐतिहासिक गुजराती लिखाणातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. 
 • याशिवाय त्यांना कवितांसाठी कुमार चंद्रक पुरस्कार तसेच उत्तर प्रदेश हिंदी संस्थानचा सौहार्द सन्मानदेखील प्राप्त झाला आहे.
 • १९८८ मध्ये चौधरी गुजरात विद्यापीठातून हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९९८ ते २००२ या कालावधीत साहित्य अकादमीमध्ये व्यवस्थापकीय कार्यकारिणीमध्येही ते कार्यरत होते.
 • चौधरी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २००२ ते २००४ या कालावधीत ते भारतीय चित्रपट महोत्सवात निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत होते.
 • हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे ते चौथे गुजराती साहित्यिक ठरले आहेत. याआधी उमा शंकर (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) या गुजराती साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 
 • सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


चीनमध्ये आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक

 • आग्नेय चीनच्या शेनझेनमध्ये २९ डिसेंबर रोजी आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.
 • 'फुतियान हायस्पीड रेल्वे स्टेशन' असे या स्थ्नाकाचे नाव असून ते  १ लाख ४७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर विस्तारले आहे.
 या स्थानकाची वैशिष्ट्ये 
  China-underground-railway-station
 • हे रेल्वे स्थानक २१ फुटबॉल मैदान इतके मोठे असून यातील तीन भूमिगत मजल्यांमध्ये १,२०० पेक्षा जास्त आसन व्यवस्था आहे. येथे ३००० प्रवाशी एकाच वेळी प्रतिक्षा करु शकतात. 
 • पहिल्या मजल्यावर मेट्रो आणि लांब पल्ल्याच्या हायस्पीट रेल्वेचे तिकिट मिळतील. येथे मेट्रो रेल्वेची सेवा उपलब्ध आहे. 
 • दुसऱ्या मजल्यावर स्टेशन हॉल आणि प्रतिक्षालय आहे. 
 • सर्वात खालच्या मजल्यावर हायस्पीड रेल्वेचे फलाट (प्लॅटफॉर्म) आहेत. येथे हायस्पीड रेल्वे ३५० किमी प्रतितास या गतीने धावेल.
 • या प्रकल्पाची सुरुवात २००८मध्ये झाली होती. यास एकूण खर्च ४१ अब्ज रुपये (६२२ मिलियन अमेरिकन डॉलर) आला आहे.
 • जगातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्थानक अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. यास 'ग्रँड सेंट्रल' या नावाने ओळखले जाते.

जीबी मीमामसी यांचे निधन

 • सेंटर फॉर डिवेलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT)चे संस्थापक व कार्यकारी संचालक जीबी मीमामसी यांचे २१ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.
 • भारतात टेलिकॉम क्रांतीचा पाया रचणाऱ्या जीबी मीमामसी यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
 • स्वतंत्र भारतात मीमामसी यांच्या नेतृत्वाखाली C-DoT ने रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयत्न सुरू ठेवले होते आणि त्यात त्यांना अन्य संशोधन संस्थांपेक्षा जास्त यश मिळाल्याचेही जाणकार सांगतात.
 • भारतात पीसीओ सर्वदूर पसरण्यामागे देखील C-Dotचे प्रयत्नच कारणीभूत होते.

विजय हजारे ट्रॉफी गुजरातला

 • युवा फलंदाज पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी पटकावली.
 • या टीमने फायनलमध्ये गौतम गंभीरच्या दिल्ली संघावर मात केली. याच स्पर्धेत २०१०-११ मध्ये गुजरात संघ उपविजेता होता. 

चीनमध्ये पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू

 • चीनने २७ डिसेंबरपासून पहिला दहशतवादविरोधी कायदा लागू असून या कायद्यान्वये चिनी सेना आता दहशतवाद्यांच्या धरपकडीसाठी परदेशातही रवाना करणे शक्य होईल.
 • विविध देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त मोहिमेत चिनी सैनिकही सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच तंत्रज्ञान कंपन्यांना सरकारने मागितलेली माहिती देणे बंधनकारक असेल.
 • अमेरिकेने चीनच्या या नव्या कायद्याचा विरोध केला आहे. हा कायदा तिबेटमध्येही लागू होईल. येथे चीनच्या धोरणांविरुद्ध १२० बौद्ध धर्मीयांनी आत्मदहन केले आहे.
 • चीनच्या संसदेने या कायद्याला १५९च्या बहुमताने संमती दिली. चिनी सैन्यदल आणि सशस्त्र पोलिस दल दहशतवादविरोधी लढ्यात केंद्रीय सैन्य आयोगाच्या संमतीनंतर सहभागी होऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा