चालू घडामोडी : १७ मार्च

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०१६

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क (एसडीएसएन) या संस्थेने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०१६मध्ये जगातील १५६ देशांच्या आनंद निर्देशांकाची यादी प्रसिध्द केली.
  • २० मार्च रोजी असलेल्या जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • या यादीत चीन आणि पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. भारत ११८व्या क्रमांकावर असून पाकिस्तानला ९२ तर चीनला ८३वा क्रमांक मिळाला आहे.
  • डेन्मार्क हा जगातील सर्वांत आनंदी देश असून बुरुंडी या देशाने सर्वांत खालचे स्थान पटकावले आहे. जगातील महासत्ता अमेरिका १३व्या क्रमांकावर आहे.
  • सतत युद्धाच्या छायेत असलेली पॅलेस्टिनी जनताही भारतीयांपेक्षा अधिक आनंदी आहे. आनंदी देशांच्या यादीत पॅलेस्टाइनचा क्रमांक १०८वा आहे.
  • या अहवालात राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), आयुर्मान, सामाजिक वातावरण आणि स्वातंत्र्य आदी घटकांचा अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार क्रमवारी करण्यात आली आहे. 
यादीतील पहिले पाच देश
देश स्थान
डेन्मार्क
स्वित्झर्लंड
आइसलॅंड
नॉर्वे
फिनलंड
यादीतील शेवटचे पाच देश
बेनिन १५२
अफगाणिस्तान १५३
टोगो १५४
सिरीया १५५
बुरुंडी १५६
इतर
चीन ८३
पाकिस्तान ९२
पॅलेस्टाइन १०८
बांगलादेश ११०
भारत ११८

नरेंद्र मोदी ‘इंटरनेट स्टार’

  • निवडणुकीचा प्रचार, आंतरराष्ट्रीय राजकारणातील भेटीगाठी यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख टाइम मासिकाने ‘इंटरनेट स्टार’ असा केला आहे.
  • गेल्या वर्षी पाकिस्तानला भेट देण्याची घोषणा टि्वटरवरून करण्याच्या घटनेचा उल्लेख करुन 'टाइम'ने सलग दुसऱ्या वर्षी इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश केला आहे.
  • इंटरनेटवरील प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्याची ही दुसरीच वेळ आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारे आणि चर्चेत राहणाऱ्या क्षमतेवर या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. 
  • जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील नेते असलेले नरेंद्र मोदी यांना टि्वटरवर १.८ कोटी फॉलोअर्स आहेत तर त्यांच्या फेसबुक पेजच्या लाइक्सची संख्या ३.२ कोटी इतकी आहे.
  • या यादीत अमेरिकेतील राष्ट्रपतीपदासाठी रिपल्बिकन पक्षाकडून दावा करणारे डॉनाल्ड ट्रम्प, रियालटी टीव्ही स्टार किम कार्डिशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट, लेखिका जे. के. रॉलिंग, माजी ऑलिपिंकपटू केटलिन जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांचा समावेश आहे.

म्यानमारच्या अध्यक्षपदी हतिन क्याव

  • म्यानमारच्या अध्यक्षपदी आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू हतिन क्याव (Htin Kyaw) यांची निवड झाली आहे. ५० वर्षात प्रथमच एक सामान्य नागरिक म्यानमारचे अध्यक्षपद भुषवणार आहे. 
  • सू की यांनी हतिन क्याव यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले होते. हतिन क्याव यांना ६५२ पैकी ३६० मते मिळाली. 
  • म्यानमारची घटना लष्कराने लिहिली असून देशाचे सर्वोच्च पद ज्याचे जवळचे नातेवाईक विदेशी आहेत त्याला भूषविता येत नाही, अशी तरतूद त्यात आहे.
  • आँग सान सू की विवाहित असल्याने तसंच त्यांचे दिवंगत पती आणि दोन मुले ही ब्रिटिश असल्याने त्यांना अध्यक्षपदी राहता येणे शक्य नव्हते.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यामुळे हतिन क्याव यांना निवडून येण्यात अडचण आली नाही.
 कोण आहेत हतिन क्याव? 
  • हतिन क्याव (वय ६९) हे ‘एनएलडी’च्या नेत्या आँग सान स्यू की यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
  • क्याव यांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. अतिशय साधी राहणी असलेले क्याव प्रामाणिक नेते म्हणून ओळखले जातात.
  • म्यानमारमधील प्रसिद्ध लेखक, कवी आणि विचारवंत मीन थू वून यांचे क्याव हे सुपुत्र आहेत. वून यांनी ‘एनएलडी’कडून १९९०मध्ये निवडणूक जिंकली होती. 
  • स्यू की यांच्या आईच्या नावे चालवल्या जाण्याऱ्या डॉ खिन की फाऊंडेशमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.

विजय मल्ल्याचा आरसीबी संचालकपदाचा राजीनामा

  • आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या विजय मल्ल्या यांनी इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स स्पोर्टस या फ्रॅंचाईजीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. 
  • रॉयल चॅलेंजर्स फ्रॅंचाईजीची सूत्रे आता रसेल ऍडम्स ऍडम्स हे सांभाळत असून, मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मात्र अजूनही संचालक मंडळावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा