चालू घडामोडी : ५ एप्रिल

पनामा पेपर्स

    The Panama Papers
  • उत्तर व दक्षिण अमेरिका यांच्या मधोमध वसलेल्या पनामा या देशात २१ अन्य देशांतून व अधिकारक्षेत्रांतून अब्जावधी रुपये जमवण्यात आल्याचे व याद्वारे कोट्यवधींचा कर चुकवल्याचे उघड झाले.
  • इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट अर्थात आयसीआयजे या गटाने ही माहिती उघड केली आहे. 
  • जगभरातील १०० पत्रकारांनी एकत्र येऊन ठोस पुरावे गोळा करुन यादी प्रसिद्ध केल्याचा दावा ‘आयसीआयजे’ने केला आहे.
  • अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची निर्मिती करण्यात अनेक देशांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योगपती, फिफा खेळाडू आदींचा समावेश आहे. भारतातील सिनेक्षेत्रापासून उद्योगक्षेत्रापर्यंत महनीय व्यक्तीही यात गुरफटलेल्या आहेत.
  • ही सर्व रक्कम मोझॅक फोन्सेका या विधी कंपनीमध्ये ठेवण्यात आली आहे. याविषयी ११.५ दशलक्ष कागदपत्रे मिळाली असून २.६ टेराबाइट माहिती समोर आली आहे. यासाठीच याला पनामा पेपर्स असे नाव पडले आहे.
  • मोठ्या प्रमाणावर कराची थकबाकी ठेवणाऱ्या जगभरातील बड्या नेत्यांची आणि सेलिब्रेटींची यादी जाहीर झाली आहे. या यादीतून अनेकांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
  • यात तब्बल ५०० नामवंत भारतीय असल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी तातडीने मल्टि-एजन्सी तपासगटाची स्थापना केली आहे.
 मल्टि-एजन्सी गट 
  • या गटात केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ (सीबीडीटी), फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू), फॉरेन टॅक्स अँड टॅक्स रिसर्च (एफटीअँडटीआर) व रिझर्व्ह बँक या तपास यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे.
  • याखेरीज विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली असून हे पथक आयसीआयजेने उघड केलेल्या भारतीयांच्या यादीची तपासणी करणार आहे.
 आइसलँडच्या पंतप्रधानांचा राजीनामा 
  • आइसलँडचे पंतप्रधान सिगमंदर डेव्हिड गनलॉगसन व त्यांच्या पत्नीने ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील कंपन्यांमध्ये कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक केल्याचे समोर आल्याने देशात राजकीय संकट उभे ठाकले आहे.
  • जर्मन वर्तमानपत्रात याविषयीचे वृत्त प्रसिद्ध होताच, देशाच्या संसद परिसरात हजारो नागरिकांनी निदर्शने करीत गनलॉगसन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
  • त्यामुळे गनलॉगसन यांनी राष्ट्रपतींकडे संसद बरखास्त करण्याची परवानगी मागितली. मात्र राष्ट्रपतींनी ती फेटाळली.
  • जनतेचा क्षोभ शांत होणार नाही, याची जाणीव झाल्याने अखेर गनलॉगसन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

आरबीआयचा पतधोरण आढावा

  • २०१६-१७या आर्थिक वर्षासाठी पतधोरणाचा पहिला द्वैमासिक आढावा मांडताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का कपात केली. 
  • याचा थेट परिणाम म्हणून आगामी काळात कर्जे स्वस्त होतील, असा कयास आरबीआयने व्यक्त केला आहे. पतधोरणाचा यापुढील आढावा ७ जून रोजी घेतला जाणार आहे.
पतधोरण आढावा ठळक वैशिष्ट्ये
दर पूर्वीचा नवीन
रेपो दर ६.७५ ६.५
रिव्हर्स रेपो दर ५.७५
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी
बँक रेट
सीआरआर

बिहारमध्ये दारूवर पूर्ण बंदी

  • बिहारमध्ये दारूवर (विक्री आणि प्राशन) पूर्ण बंदी घालण्यात आल्याने बिहार हे देशातील चौथे ‘ड्राय स्टेट’ बनले आहे. यापूर्वी गुजरात, नागालॅंड आणि मिझोराम या राज्यांनी दारूवर पूर्ण बंदी घातली आहे.
  • याआधी बिहार सरकारने १ एप्रिलपासून देशी दारूवर पूर्ण बंदी घातली होती. या निर्णयास पाच दिवस पूर्ण होत नाही तोच नितीश सरकारने विदेशी दारूवरही बंदी घालण्याचा निर्णय.
  • या निर्णयामुळे छोट्या-मोठ्या शहरांमधील हॉटेल, क्लब आणि बारमध्येही मद्यविक्री आणि प्राशनासाठी यापुढे परवाना मिळणार नसून या निर्णयामधून लष्कराच्या कॅन्टोन्मेंटला वगळण्यात आले आहे. 
  • बिहारमधील कंपन्या येथे मद्यनिर्मिती करू शकतात; परंतु त्यांना मद्यविक्री करता येणार नाही. इथे तयार झालेले मद्य अन्य राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवण्याची मुभा त्यांना आहे.
  • ताडीपासून तयार करण्यात येणाऱ्या दारूबाबत सरकारने १९९१चा नियम लागू केला असून केवळ नीरा पिण्यास परवानगी असून ताडीला बंदी घालण्यात आली आहे. नीरा व ताडी पामच्या झाडापासून काढली जाते.

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती

  • जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राजभवनात शपथ घेतली.
  • त्यांच्यासह १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. भाजपच्या निर्मलसिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि ‘पीडीपी’ची राज्यात युती आहे. 
  • भाजप पक्षाला या मंत्रिमंडळात पूर्वीच्या सहाऐवजी आठ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत.
  • मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या तर, देशातील दुसऱ्या मुस्लिम मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी सईदा अन्वरा तैमूर यांनी ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ या काळात आसामचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
  • मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात ९ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
  • जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल : एन. एन. व्होरा 

मायामी टेनिस स्पर्धा

  • अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने मायामी टेनिस स्पर्धा जिंकत, कारकीर्दीतील २८वे मास्टर्स जेतेपद मिळविले. जोकोविचचे हे या स्पर्धेतील सहावे जेतेपद ठरले.
  • मायामी स्पर्धा जिंकून जोकोविचने कारकीर्दीत सर्वाधिक बक्षीस रक्कम मिळवणाऱ्या रॉजरर फेडररला मागे टाकले आहे. 
  • जोकोविचने कारकीर्दीत आतापर्यंत पटकावलेली बक्षीस रक्कम ६४८.७५ कोटी रुपये आहे. तर स्वित्झर्लंडच्या फेडररने ६४६.७० कोटी बक्षीस रकमेची कमाई केली आहे.
  • दणदणीत फिटनेस आणि त्यामुळे विजयी कामगिरीतील राखलेले सातत्य यामुळे गेले ९२ आठवडे जोकोविचने जागतिक टेनिस रँकिंगमधील अव्वल क्रमांक कायम राखला आहे हे विशेष. 
  • मायामी जेतेपद हे जोकोविचच्या कारकीर्दीतील ६३वे एटीपी जेतेपद ठरले आहे. रॉजर फेडररच्या नावावर ८८ जेतेपदे असून रफाएल नदालने ६७ जेतेपदे पटकावली आहेत.
 अझारेन्का अजिंक्य 
  • ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने तिसऱ्यांदा डब्लूटीए मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
  • अंतिम फेरीत तिने दोन ग्रॅण्ड स्लॅम नावावर असलेल्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला. 
  • यापूर्वी अझारेन्काने २००९ आणि २०११मध्ये या स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले होते. तसेच या वर्षांतील तिचे हे ब्रिस्बेन आणि इंडियन वेल्सनंतरचे तिसरे अजिंक्यपद आहे.
  • अझारेन्काने एकाच हंगामात मियामी आणि इंडियन वेल्स स्पर्धेत बाजी मारणाऱ्या तिसऱ्या खेळाडूचा मान पटकावला. यापूर्वी स्टेफी ग्राफने १९९४ व १९९६मध्ये, तर किम क्लिजस्टेर्सने २००५मध्ये ही किमया केली होती.

1 टिप्पणी: